संस्मरमणीय मोहीम

By Admin | Updated: August 16, 2014 22:21 IST2014-08-16T22:21:03+5:302014-08-16T22:21:03+5:30

अंधश्रद्धा व भोंदू चमत्कारांच्या विरोधात विवेकाचा आणि विज्ञाननिष्ठतेचा जागर करणा:या अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्वर्यू डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा पहिला स्मृतिदिन येत्या 20 ऑगस्ट रोजी आहे. त्यांच्या आठवणींना दिलेला उजाळा..

The Monumental Campaign | संस्मरमणीय मोहीम

संस्मरमणीय मोहीम

 डॉ. जयंत नारळीकर

 
नरेंद्र दाभोलकर आणि अंनिसबरोबर 2008 ला एका प्रयोगात भाग घ्यायची संधी मला मिळाली होती, त्या अनुभवावर हा लेख आधारित आहे. 
भारत हा अंधश्रद्धांचा देश आहे, असे म्हणणो वावगे ठरू नये. ज्याप्रमाणो विचारस्वातंत्र्यामुळे इथे विविध धर्म, संप्रदाय, तत्त्वज्ञान आदींना आसरा मिळाला, त्याचप्रमाणो अंधविश्वासांनादेखील खतपाणी मिळाले. फलज्योतिष आणि वास्तुशास्त्र यांचा उगम मुळात भारतात झाला नसला तरी त्यात लक्षणीय वाढ इथेच झाली. आज फलज्योतिषाचा व्यवसाय करणा:यांची संख्या भारतात जेवढी आहे, तितकी जगातल्या बाकीच्या सर्व देशांत मिळून नसावी.
अंधश्रद्धांना आवर घालणारा प्रमुख उपाय म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास करणो. हा दृष्टिकोन विज्ञानातून उद्भवला असला तरी त्याचा वापर इतर क्षेत्रंत, दैनंदिन जीवनात होऊ शकतो. जर एखादे विधान ठामपणो एखाद्या अधिकारी व्यक्तीने केले, तर ते विश्वासार्ह असेलच असे नाही. स्वतंत्रपणो त्याची तपासणी, शहानिशा करूनच ठरवावे असे वैज्ञानिक दृष्टिकोन सांगतो.
उदाहरणार्थ, लग्न यशस्वी का अयशस्वी होईल हे पत्रिका जुळतात का नाही यावरून ठरते, असे फलज्योतिष सांगते. हे विधान प्रयोगांनी तपासता येईल. लग्न जुळून यशस्वी ठरलेल्या जोडप्यांच्या पत्रिकांच्या जोडय़ा आणि लग्ने अयशस्वी ठरलेल्या जोडप्यांच्या पत्रिकांच्या जोडय़ा मिसळून (पत्ते पिसावेत तसे) फलज्योतिषतज्ज्ञांना तपासायला द्याव्यात. त्यांनी पत्रिका जुळणो/ न जुळणो याबद्दलचे आपले निकष लावून कुठली लग्ने यशस्वी ठरली आणि कुठली नापास झाली ते सांगावे. त्यांचे निदान वस्तुस्थितीप्रमाणो आहे का नाही ते संख्याशास्त्रचे नियम ठरवतील. 
असा प्रयोग पाश्चात्य फलज्योतिषाची तपासणी करण्यासाठी अमेरिकेत केला गेला आणि त्यात फलज्योतिष नापास ठरले. पत्रिका जुळणो/ न जुळणो याचा भारतात लग्न ठरवण्यासाठी पुष्कळ उपयोग होतो म्हणून अशी तपासणी भारतात होणो आवश्यक आहे. 
परंतु, वैज्ञानिक तपासणी अशी असावी, की त्यात पळवाट असता कामा नये. लग्न यशस्वी/ अयशस्वी होणो म्हणजे नेमके काय? एकत्र राहणारे दांपत्य, मराठी छत्तीसप्रमाणो विरुद्ध दिशांना जाऊ इच्छिणारे, लग्न अयशस्वी असल्याची ग्वाही देते. त्यामुळे घटस्फोट नसूनही लग्न ‘अयशस्वी’ म्हणायला पाहिजे. असे अनेक प्रश्न उद्भवतात; म्हणून ही चाचणी पुष्कळ विचारपूर्वक घ्यायला हवी होती. 
मी या विवंचनेत असताना नरेंद्र दाभोलकर माङया मदतीला आले. पत्रिका जुळणो/ न जुळणो याला सोपा पर्याय त्यांनी सुचवला, तो असा!
लग्न झालेल्या/मोडलेल्या जोडप्यांऐवजी हुशार/ मतिमंद अशा मुलांची चाचणी घ्यावी. ‘हुशार’ हे विशेषण शाळेत त्या मुलाच्या कीर्तीवरून ठरवणो सोपे आहे. त्याचप्रमाणो मतिमंद मुलांच्या शाळेत त्यांची माहिती मिळू शकते. एकूण इथे शंका घ्यायला जागा नाही. तसेच फलज्योतिषांचा दावा असतो, की जन्मपत्रिकेमधून सांगता येते की ज्याची ती पत्रिका आहे तो विद्यार्थी हुशार आहे का मतिमंद. तपासणीच्या प्रयोगासाठी दाभोलकरांनी अंनिसच्या मदतीने ही माहिती गोळा करायची तयारी दाखवली. 
यापुढे जाण्यासाठी आम्हाला आणखी दोन सहकारी हवे होते. पुणो विद्यापीठातील संख्याशास्त्र विभागातील निवृत्त प्राध्यापक सुधाकर कुंटे यांनी प्रयोगाच्या एकंदर आखणी आणि कृतीबाबत मार्गदर्शन करायची जबाबदारी स्वीकारली. तसेच प्रत्येक विद्याथ्र्याची माहिती (जन्मवेळ, जन्मस्थान आदी) घेऊन त्याची पत्रिका बनवायचे काम प्रकाश घाटपांडे यांनी अंगावर घेतले. घाटपांडे पूर्वी स्वत: फलज्योतिषाचा व्यवसाय करत; पण नंतर त्यातील सत्याचा अभाव आणि अविश्वासार्हता पाहून त्यांनी तो सोडून दिला आणि ते त्याचे टीकाकार झाले. 
अंनिसच्या मदतीने आम्ही शंभर हुशार मुले आणि मतिमंद मुले यांची आवश्यक ती माहिती मिळवली. आणि घाटपांडे यांनी ती माहिती वापरून त्यांच्या जन्मकुंडल्या तयार केल्या. सर्व पत्रिकांचे सांकेतिक रेकॉर्ड कुंटे यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले. ते रेकॉर्ड पाहिल्याशिवाय कुठली कुंडली कोणाची हे सांगणो शक्य नव्हते. 
आता प्रयोगाची सुरुवात म्हणून आम्ही चौघांनी 12 मे 2क्क्8 रोजी एक पत्रकार परिषद बोलावली. प्रयोगाची थोडक्यात पण आवश्यक इतकी माहिती देऊन आम्ही व्यावसायिक फलज्योतिषांना आवाहन केले, की त्यांनी या प्रयोगात भाग घ्यावा. त्यासाठी खालील क्रिया अपेक्षित होत्या. 
1) भाग घेणा:याने स्वत:ची व्यावसायिक माहिती आणि तिकीट लावलेले रजिस्टर्ड पोस्टाचे पाकीट आपल्या पत्त्यासकट पाठवावे.
2) प्रत्येक भाग घेणा:याला आम्ही 4क् पत्रिकांचा सेट पाठवू. हा सेट यादृच्छिकपणो (फंल्लेि) मूळ 2क्क् पासून काढलेला असेल. सेट स्पर्धकाच्या पत्त्यावर पाठवण्यात येईल. 
3) स्पर्धकाने त्याच्या सेटमधील कुंडल्यांचा अभ्यास करून प्रत्येक कुंडली हुशार का मतिमंद मुलाची आहे, ते त्यावर लिहून आमच्याकडे पाठवावे. पत्ता डॉ. कुंटे यांचा. 
4) संख्याशास्त्रचे निकष लावले तर ‘पत्रिकेवरून हुशार/ मतिमंद हे निदान करता येते’ हा निष्कर्ष काढायला 40 पैकी 28 भाकिते किंवा पत्रिकेनुसार वर्णने बरोबर यायला हवी होती़ 
वरील (4 क्रमांकाची) अट समजावून घेण्यासाठी कल्पना करा की फलज्योतिष न वापरता तुम्ही असे ठरवले, की एक नाणो टॉससाठी फेकून ‘हेड’ आले तर हुशार आणि ‘टेल’ आले तर मतिमंद असा निर्णय घ्यायचा. असे असेल तर सरासरी निम्मे 4क् पैकी 2क् बरोबर येतील. तुमच्यात खरोखर भाकीत करायची करामत असेल, तर तुमचा निकाल याहून जास्त पाहिजे. किती जास्त? संख्याशास्त्रज्ञांच्या मते 40 पैकी 28. असा निकाल यादृच्छिकपणो नाणोफेकीतून मिळण्याची संभाव्यता अर्धा टक्का असेल. त्यामुळे असा निकाल यादृच्छिकपणो येणार नाही, तो मिळवणा:याकडे भाकीत करायची खास शक्ती असावी, असे समजायला जागा आहे. 
पण प्रत्यक्षात काय झाले? 51 फलज्योतिषतज्ज्ञांनी या प्रयोगात भाग घेण्यासाठी रजिस्टर्ड पाकिटे पाठवली. पण त्यापैकी 27 स्पर्धकांनी उत्तरे पाठविली. त्यांत सर्वोच्च रेकॉर्ड 4क् पैकी 24 बरोबर, त्यापाठोपाठ दोघांचे 40 पैकी 22 बरोबर. म्हणजे 4क् पैकी 28 ही ‘पास’ व्हायची रेषा  कोणी ओलांडू शकला नाही. सर्व 27 स्पर्धकांच्या गुणांची सरासरी 4क् पैकी 17.25 होती. म्हणजे नाणोफेकीतून याहून अधिक गुण मिळाले असते! आम्ही फलज्योतिषाला वाहिलेल्या संस्थांनापण आवाहन केले होते, की तुम्ही संस्थेतर्फे भाग घ्या; आम्ही तुम्हाला सगळ्या (200) पत्रिका देतो. फक्त एका संस्थेने भाग घेतला. त्यांना 200 पैकी 102 गुण मिळाले. इथे कमीत कमी अपेक्षा होती जवळ जवळ 118 गुणांची़
या संदर्भात दाभोलकरांची भूमिका अशी होती़ काही फलज्योतिषात पुढे आलेले लोक अशी शंका घेऊ लागले, की अंनिस अंधश्रद्धाविरोधात असल्याने त्यांनी गोळा केलेला डेटा तटस्थ असणार नाही. एका फलज्योतिषांच्या परिसंवादात अशी शंका व्यक्त करण्यात आली, तेव्हा दाभोलकरांनी स्वत: सौम्य शब्दांत ग्वाही दिली, की अंनिसतर्फे डेटा गोळा करताना तटस्थता पाळली गेली आहे. शिवाय त्यापुढची कार्यवाही डॉ. कुंटे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असल्याने येथे अंनिसचा प्रभाव असणार नाही. विरोधकांशी वाद घालताना नरेंद्र दाभोलकरांची वृत्ती कधीही आक्रमक नव्हती. 
वरील परिणाम जाहीर झाले तेव्हा काही फलज्योतिषी म्हणू लागले, की ज्या स्पर्धकांनी भाग घेतला ते निष्णात फलज्योतिषी नव्हते; म्हणून निकाल फलज्योतिषाविरुद्ध लागला. पण आमच्याकडे जे 51 स्पर्धक प्रथम आले, त्या सर्वानी स्वत:चा अनेक वर्षाचा त्या विषयाचा अनुभव मांडला होता. शिवाय एका संस्थेने भाग घेतला त्याचे काय? त्या संस्थेतले सगळे सदस्य फलज्योतिषी नव्हते का? या धर्तीवर आणखी प्रयोग करता येण्याजोगे आहेत. खुद्द नरेंद्र दाभोलकरांचा त्याला पाठिंबा होता. त्यांच्या पश्चात इतर सत्यशोधक त्यासाठी पुढे येतील अशी आशा आहे. 
(लेखक ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत़)

Web Title: The Monumental Campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.