शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

‘स्वर-वीणा’- वीणाताई सहस्रबुद्धे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 3:47 PM

वीणाताई सहस्रबुद्धे.  एक उत्तम गायिका, एक उत्कृष्ट व्यक्ती आणि  र्शेष्ठ गुरु म्हणून त्यांची कायम आठवण काढली जाईल. गायनात त्या स्वत: तर तल्लीन होतच, पण आनंदाच्या, स्वरांच्या वादळात आपण  कधी लपेटून गेलो याचे भान र्शोत्यांनाही राहात नसे. कालानुरूप बदलणार्‍या संगीतात आपला सच्चा,  शास्रशुद्ध, घराणेदार, सात्त्विक सूर कसा जोपासावा  याबाबत शिष्यांसाठी त्या अनुपमेय असे भांडार होत्या.

ठळक मुद्देथर्मोडायनॅमिक्समध्ये पहिलाच नियम असा आहे की, - ‘एनर्जी कॅन नॉट बी क्रिएटेड ऑर डिस्ट्रॉइड, बट इट कॅन बी चेंज्ड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर’. वीणाजी, तुमच्या अस्तित्वात असलेली प्रचंड ऊर्जा तुम्ही तुमच्या सर्वच शिष्यांमध्ये संक्रमित केली आहे.

- सतीश पाकणीकर 

आपल्या छोट्या छोट्या आयुष्यात अनेक रंगीबेरंगी घटना सतत घडत असतात. कालांतराने काही घटनांचे रंग फिके होत जात त्या विस्मृतीत जातात. तर काही अगदी काल घडल्यासारख्या मनात कायम राहतात. मग त्यात आनंद देणार्‍या घटनाही असतात व दु:ख देणार्‍याही. 9 ऑगस्ट 2014 हा दिवसही मला काल घडल्यासारखा स्पष्ट आठवतो. पुण्याजवळच कोळवण नावाचं अगदी छोटं गाव आहे. आता ते प्रसिद्ध आहे ते तेथील चिन्मय मिशनच्या भव्य अशा आर्शमामुळे. पद्मविभूषण पंडित शिवकुमार शर्मा यांचे सर्व शिष्य  त्या ठिकाणी दरवर्षी त्यांची ‘गुरु पौर्णिमा’ आयोजित करतात. मला माझ्या शिवजींवरील कॉफी-टेबल बुकसाठी त्यांचे शिष्यांना मार्गदर्शन करतानाचे काही फोटो काढायचे होते. माझे मित्न व शिवजींचे ज्येष्ठ शिष्य  दिलीप काळे यांच्या निमंत्नणावरून मी तेथे पोहोचलो. गुरु -शिष्य परंपरेतील माझ्या मनासारखी काही प्रकाशचित्ने मला मिळाली. आवडत्या कलाकाराचे असे अनोखे फोटो मिळाल्यावर कोणाला आनंद होणार नाही? पहिला सेशन संपला. आम्ही सारे जेवण्यासाठी तेथील मोठय़ा हॉलकडे निघालो.मी हॉलमध्ये पोहोचतोय तोवरच समोरून डॉ. हरी सहस्रबुद्धे येताना दिसले. त्यांनी मला विचारले - ‘अरे सतीश, इकडे कुठे?’ त्यांना मी माझे येण्याचे प्रयोजन सांगून म्हटले- ‘सर, तुम्ही कसे आलात?’ त्यावर त्यांचे उत्तर आले - ‘अरे आम्ही अधून मधून येत असतो इथे. वीणा भेटली का?’ मी प्रश्नार्थक चेहरा करून म्हटले - ‘नाही. कुठे आहेत त्या?’ त्यांनी हाताने समोरच्या बाजूस खूण केली. अरे, मघाशी माझ्या समोरून व्हीलचेअरवरून जाणारी व्यक्ती म्हणजे माझ्या आवडत्या गायिका वीणा सहस्रबुद्धे होत्या यावर माझ्या मनाचा प्रथम विश्वासच बसला नाही. त्या थोड्या आजारी होत्या हे माहीत होते. पण बर्‍याच दिवसात त्यांच्याकडे गेलो नव्हतो. आणि आज त्या अशा माझ्यासमोर. मी त्यांना वाकून नमस्कार केला. वीणाताईंकडे पाहत सर म्हणाले - ‘वीणा, कोण आलंय बघ. सतीश पाकणीकर आलाय.’ त्यांच्या चेहर्‍यावरचे भाव बदलले. त्या काही बोलल्या. मला बोध झाला नाही. सरांनी मला सांगितले - ‘ती म्हणतेय, खूप दिवसात घरी आला नाहीयेस तू!’ मी त्याक्षणी त्यांना घरी येण्याचे कबूल केले. सरांबरोबर बोलल्यावर मला वीणाताईंच्या आजाराबद्दल सर्व काही समजले. संध्याकाळी घरी येताना मनाची अवस्था फारच बिकट झाली होती. एका आवडत्या कलाकाराची वेगळी प्रकाशचित्ने मिळाल्याने आनंदलेले एक मन तर दुसर्‍या आवडत्या कलाकारावर नियतीने केलेला प्रहार सहन न झालेले व त्यामुळे हळवे झालेले दुसरे मन ! अशी नांदतात दोन मने एकत्न? म्हणूनच तो दिवस माझ्या लक्षात राहिला असावा.कोळवण ते पुणे या एका तासाच्या प्रवासात माझं मन एकदम अठ्ठावीस वर्षे मागे गेलं. मी माझ्या पहिल्याच प्रदर्शनाचं निमंत्नण द्यायला विद्यापीठातल्या त्यांच्या घरी गेलो होतो. त्यांनीच स्वत: दरवाजा उघडला होता. आतिथ्यशील स्वभावामुळे अनोळखी असलेल्या माझेही त्यांनी छान स्वागत करून मला प्रदर्शनाला शुभेच्छा दिल्या होत्या. त्याआधीच दोन वर्षे म्हणजे 7 डिसेंबर 1984 रोजी त्यांनी पुण्यात होणार्‍या आणि जगभरात प्रसिद्ध असलेल्या ‘सवाई गंधर्व महोत्सवात’ आपले दमदार गायन सादर केले होते. आणि अल्पावधीतच त्या लोकप्रियही झाल्या होत्या.अधून-मधून त्यांच्या गाण्याचे कार्यक्र म होत असत. मी एकही संधी दवडत नसे. पण माझी, त्यांची व सरांची चांगली ओळख व्हायला एक घरगुती कार्यक्र माचे निमित्त झाले. र्शी. मनुकाका गर्दे हे युनेस्कोचे  ग्रंथपाल. भारतीय अभिजात संगीताचे चाहते व जाणकार. विद्यापीठ रोडवरील मोदीबाग येथे त्यांचा प्रशस्त बंगला. त्यांच्या घरी पुलंच्या पुढाकाराने त्यांनी वीणाताईंचे गाणे आयोजित केले होते. तो दिवस होता रविवार, 23 ऑगस्ट 1987. चार-पाच दिवस आधीच पुलंचा मला निरोप मिळाला होता. मी माझ्या कॅमेर्‍यासहीत तेथे पोहोचलो. र्शोत्यांत पु.ल. व सुनीताबाई होतेच; पण अनेक मान्यवरही उपस्थित होते. साथीदार होते विनायक फाटक व प्रमोद मराठे. वीणाताई येऊन बसल्या. अत्यंत नीटनेटका, पण साधाच पेहराव. जसे त्यांचे खरेखुरे व्यक्तिमत्त्व होते तशाच. जणूकाही र्शोत्यांतूनच कोणीतरी स्वरमंचावर जाऊन बसलंय. जराही नाटकीपणा नाही की अहंकार नाही. बरेचसे आयुष्य कानपूरमध्ये गेल्याने बोलण्यात मराठीबरोबर मधूनच एकदम हिंदी भाषेचा वापर. पण त्या बोलण्यातूनही प्रसन्नता आणि र्शोत्यांबद्दल असलेले अगत्य. आणि पुढचे दोन-अडीच तास म्हणजे अतिशय नजाकतीने फुलवलेले गायन. त्यांचे गाण्याबरोबर होणारे सहज हावभाव. त्यातील तल्लीनता. जणू त्या गाणंच होऊन गेल्या होत्या. त्यांना ऐकण्याचा आनंद तर होताच; पण ते ऐकताना ते पाहणे आणि बरोबरीने ते चित्रित करणे हाही आनंद होता. मला त्या दिवशी त्यांच्या काही सुंदर अशा भावमुद्रा मिळाल्या. फिल्म डेव्हलप केली. मग त्यातून सात-आठ मुद्रा निवडून मी एक कोलाज तयार केले. पाच इंच बाय चोवीस इंच आकाराचे. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे त्याला प्लायवूडवर लॅमिनेशन केले. वीणाताई आता परिहार चौकात राहायला आल्या होत्या. त्यांच्या घरी जाऊन त्यांना ते भेट दिले. त्यांना व सरांना दोघांनाही ते खूपच आवडले. ‘कार्यक्र मासाठी आयोजकांना माझ्या बायोडाटा बरोबर पाठवायला मला हे फोटो आवडतील. तू देऊ शकशील का?’ वीणाताईंचा प्रश्न. ‘हो नक्कीच !’ माझं उत्तर. ‘पण तुला त्याचे पैसे घ्यावे लागतील.’ वीणाताईंची लगेचच प्रतिक्रि या. मग पुढे जवळजवळ दोनेक वर्ष सहस्रबुद्धे सर मला पोस्टकार्ड पाठवून नंबर कळवीत. मी ते प्रिंट्स द्यायला त्यांच्या घरी जाई.रिदम हाउस ही मुंबईतील नामांकित अशी संगीत विषयक साहित्य मिळण्याची शो-रूम. अमीर करमाल्ली हे त्याचे सर्वे-सर्वा. ते वीणाताईंची कॅसेट प्रसिद्ध करणार होते. सरांशी त्यांचे बोलणे झाले. त्यानुसार त्यांच्या मुखपृष्ठांसाठी मी फोटो काढायचे ठरले. रविवार, दिनांक 5 फेब्रुवारी 1989 रोजी मी लाइट्स व कॅमेर्‍यानिशी ‘शीतल’ या त्यांच्या अपार्टमेंटमध्ये पोहोचलो. त्याआधी मी तीन कलाकारांच्या कॅसेट्स व रेकॉर्डससाठी फोटो टिपले होतेच. पण वीणाताईंचा माझा हा पहिलाच अरेंज्ड फोटोसेशन होता. पार्श्वभूमी ठरली, प्रकाशयोजना झाली. वीणाताई तानपुरा घेऊन बसल्या. यात त्यांनी कॅमेर्‍याकडे पाहून गाणे अपेक्षित होते. म्हणजे पर्यायाने कॅसेट पाहताना र्शोत्याला त्या आपल्याकडे पाहून गात आहेत असे वाटावे. काही वेळातच त्या स्वरात हरवल्या व मधूनच डोळे उघडीत व समोर बघत त्यावेळी मी ते क्षण कॅमेर्‍यात अंकित करीत गेलो. पुन्हा एकदा त्यांचा साधेपणा अनुभवला.यानंतर मी त्यांचे परत तीन वेळा फोटोसेशन केले. सप्टेंबर 1991, जून 1998 व जुलै 2000 मध्ये. त्यात सप्टेंबर 1991 मधील फोटोसेशन हा साप्ताहिक सकाळच्या दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठासाठी होता. ठरलेल्या वेळेस माझ्या ऑफिसवर वीणाताई व सर पोहोचले. काही वेळाने संपादक सदा डुंबरे व संध्या टाकसाळे आले. माझी तयारी झाली होतीच. तानपुरा घेऊन वीणाताई बसल्या. त्यांनी त्यांच्या जवारीदार आवाजात गायला सुरु वात केली. सुरेल जुळवलेला तानपुरा, वीणाताईंचा विद्वत्तापूर्ण, शांत असा सालस चेहरा आणि त्यांचे हृदयाला भिडणारे स्वर असा समसमा संयोग आम्ही सारे अनुभवत होतो. मधूनच विजेसारखा क्षणभर फ्लॅश चमकून जाई आणि एक-एक करीत माझ्या कॅमेर्‍यात त्या क्षणांची साठवण केली जाई. दीड तासानंतर या अकृत्रिम मैफलीचा शेवट झाला. माझ्या पोतडीत अनेक भावमुद्रा बंदिस्त झाल्या. आम्ही माझ्याच ऑफिसवर त्या पारदर्शिका प्रोजेक्टरमधून बघितल्या.  त्या भावमुद्रातून आम्हाला कोणती निवडावी याचाच प्रश्न पडला. परत एकदा त्या संपूर्ण मैफलीचा अनुभव घेता आला.नंतर 2000 साली मी एकदा त्यांचा फक्त कृष्ण-धवल प्रकाशचित्नांचा फोटोसेशन केला. त्यावेळी ती प्रकाशचित्ने  कोठेही प्रकाशित होणार नसल्याने त्यांनी त्यांना पाहिजे तसे गायन करावे व मी चित्नण करीत जाईन असे ठरले. त्यांच्या घरीच हा फोटोसेशन झाल्याने व काही शिष्या तेथे असल्याने मध्येच गाणे व मध्येच प्रात्यक्षिकासह मुद्दा सांगणे असा कार्यक्र म झाला. बरोबरीने त्यांची बोटे हार्मोनियमच्या पट्टय़ांवरून सहजच फिरत होती. अनौपचारिक व्याख्यान व त्याचे प्रात्यक्षिक हेही त्यांच्या खास शैलीत आणि वेगळ्या प्रकारची मांडणी असलेले होते. रागातले बारकावे त्या अशा पद्धतीने समजावून सांगत होत्या की, माझ्यासारख्या सर्वसामान्य र्शोत्यालाही ते पटकन आकळावे व त्याचा आनंद घेता यावा. तराणा हा तर त्यांचा खास आवडीचा प्रकार व संशोधनाचा विषयही. त्या तराणा गाऊ लागल्यावर त्या आनंदाच्या, स्वरांच्या वादळात आपण कधी लपेटून गेलो याचे भान तेथे उपस्थित असलेल्या कोणालाही राहिले नाही. उत्तम ख्याल गायनासाठी मींड, गमक आणि ताना या तिन्हींचे काय महत्त्व आहे हे सांगताना मींडचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी अनेक उदाहरणे देत ते खुलवून सांगितले. कालानुरूप बदलणार्‍या संगीतात आपला सच्चा, शास्रशुद्ध, घराणेदार, सात्त्विक सूर कसा जोपासावा यासाठी समोरच्या आपल्या शिष्यांना दिलेले ते अनुपमेय असे भांडार होते. या फोटोसेशनमध्ये मला अनेक छान भावमुद्रा टिपता आल्या.नंतर अधूनमधून काही निमित्ताने त्यांच्या घरी जाण्याचा योग येत असे. काही काळ त्या मुलांकडे अमेरिकेतही वास्तव्यास जात. पण पुण्यात आल्या की कार्यक्र मात भेट होत असे. माझ्या थीम कॅलेंडर्सपैकी 2016 सालचे कॅलेंडर होते ‘स्वरदर्शी’. ज्यांना स्वरांचा साक्षात्कार झाला आहे असे गायक कलावंत. माझं भाग्य असं की माझ्या या कॅलेण्डरमध्ये समाविष्ट असलेल्या कलाकारांबद्दल त्यांच्या वैशिष्ट्यांबद्दल कथन केलं ते तालयोगी पं. सुरेशजी तळवलकर यांनी. वीणाताईंबद्दल लिहिताना पं.सुरेशजी लिहितात - ‘गायन-वादन-नृत्य-‘संगीत’ कलेच्या या तिन्ही अंगांविषयीच्या जिज्ञासेतून वीणाताईंनी वादक व नर्तक कलाकारांबरोबर विचारविनिमय, देवाणघेवाण केली आहे आणि त्यातून त्या आपले गायन समृद्ध करीत आल्या आहेत. बुद्धिनिष्ठ संगीत अध्ययन व चिंतन करून वीणाताई सौंदर्यनिष्ठ संगीत प्रस्तुती करीत आल्या आहेत. त्यांचं गायन विलक्षण सौष्ठवपूर्ण आहे. एकाच आवर्तनातील विविध लयींचे त्यांचे विभ्रम फार मनोहारी असतात. वीणाताईंचे गायन हे नेमकेपणा, नीटनेटकेपणा आणि सर्व स्तरातील प्रमाणबद्धता यांचा वस्तुपाठच असतो.’ मी कॅलेंडर्स द्यायला जेव्हा त्यांच्या घरी गेलो त्यावेळी त्या आतल्या खोलीत त्यांच्या पलंगावर झोपल्या होत्या. मी व सर आत गेलो. टेबलावर ठेवलेल्या ‘डेक’मधून वीणाताईंच्या गाण्याचे स्वर ऐकू येत होते. सरांनी त्यांना एक-एक पान उलटवून सर्व कॅलेंडर दाखवले. त्यांच्या चेहर्‍यावर हास्याची लकेर उमटली. पण यापेक्षा त्यांना व्यक्त होता येत नव्हते. वीणाताईंच्या मैफलीत त्या गाण्याचे ध्वनिमुद्रण करणारे, त्यांचा रसिक, पण चिकित्सक र्शोता असलेले, विद्यापीठातील कॉम्प्युटर विभागाचे प्रमुख म्हणून निवृत्त झालेले डॉ. हरी सहस्रबुद्धे, आपण एखाद्या लहान मुलाची जशी काळजी घेतो त्याप्रमाणे वीणाताईंची काळजी घेत होते. पुढे सहाच महिन्यात ती नकोशी बातमी आली. 29 जून 2016 या दिवशी वीणा सहस्रबुद्धे नावाचा हा खळाळता गानझरा लौकिकाचा प्रवास संपवून अलौकिकाच्या प्रांतात आपली ऊर्जा पसरवण्यासाठी लुप्त झाला. वीणाताई.. एक उत्कृष्ट व्यक्ती, एक उत्तम गायिका आणि र्शेष्ठ गुरु म्हणून तुमची आठवण नेहमीच काढली जाईल; पण शास्र शाखेचा एक विद्यार्थी असल्याने मी हे सांगू शकतो की, थर्मोडायनॅमिक्समध्ये पहिलाच नियम असा आहे की, - ‘एनर्जी कॅन नॉट बी क्रिएटेड ऑर डिस्ट्रॉइड, बट इट कॅन बी चेंज्ड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर’. तुमच्या अस्तित्वात असलेली प्रचंड ऊर्जा तुम्ही तुमच्या सर्वच शिष्यांमध्ये संक्रमित केली आहे. त्यांच्या रूपाने तुम्ही आमच्या सर्वांच्या मनात सदैव वास्तव्यास आहातच.sapaknikar@gmail.com(लेखक प्रसिद्ध प्रकाशचित्रकार आहेत.)