शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
2
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
3
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
4
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
5
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
6
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
7
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
8
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
9
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
10
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
11
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
12
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
13
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
14
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
15
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
16
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
17
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
18
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
20
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड

मिळमिळीत हनिट्रॅप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 3:57 PM

हेरगिरी प्रकरणात ‘गुप्तता’ असते, थरार असतो, धाडस असतं. प्रेम, सेक्स, पळापळ, मारझोड, खून, दोन बलदंड गटांतलं शत्रुत्व.. असं बरंच काही त्यात असतं. माधुरी गुप्ता प्रकरण त्या तुलनेत अगदीच साधं..

- निळू दामले (damlenilkanth@gmail.com)

हेरगिरी हे प्रकरण फारच थरारक असतं. त्यात धाडस असतं, मारझोड असते, खून असतात, पळापळ असते, प्रेम असतं, सेक्स असतो. शत्रूपक्षाबद्दलची माहिती मिळवायची म्हणजे वरील सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात. मुख्य म्हणजे त्यात ‘गुप्तता’ असते. सारं काही गुपचूपच करायचं असतं. त्यामुळं त्याबद्दल बाहेर येणाऱ्या माहितीचं खरेखोटेपण कधीच निश्चित होत नाही. त्यामुळेच या उद्योगात एक थरार असतो, त्याला एक साहित्यिक मूल्य असतं.रशिया आणि ब्रिटन अशा दोन बाजू असतात. दोन्ही बाजू एकमेकांची माहिती मिळवतात. डेमॉक्रॅट आणि रिपब्लिकन असे दोन पक्ष असतात. ते एकमेकांची माहिती मिळवतात. दोन गटांमधलं शत्रुत्व जितकं तीव्र तितकी हेरगिरी जोरदार होते. दोन गट जितके बलवान आणि त्यांच्याकडे असल्या उद्योगांवर खर्च करायला जितके जास्त पैसे तितकी हेरगिरी जाम इंटरेस्टिंग. रशिया, ब्रिटन, जर्मनी, अमेरिका यांच्यातल्या हेरगिºया रंगतात. त्यांच्या हेरगिºयांवर दणादण सिनेमे निघतात आणि हेरकथा-हेरकादंबºया निघतात. त्या मानानं भारत, पाकिस्तान यांच्यातल्या हेरगिºया म्हणजे अगदीच लल्लू पंजू असतात, देवानंदच्या हेरगिरीसारख्या!अशाच एका हेरगिरीची, देवानंद सिनेमाला शोभेलशा, नुकतीच वाच्यता झाली. माधुरी गुप्ता या ६१ वर्षांच्या भारत सरकारच्या परदेश सेवेतल्या महिलेला दिल्लीतल्या सत्र न्यायालयानं तीन वर्षांची शिक्षा दिली. गुप्तांनी पाकिस्तानातल्या हेरांना भारतीय सरकारी अधिकाºयांबद्दल काही माहिती दिल्याचा आरोप कोर्टानं मान्य केला.दिलेली माहिती अगदीच फालतू होती. अधिकारी, त्यांची पदं, त्यांच्या बदल्या इत्यादी गोष्टी खरं म्हणजे भारतीय पेपरातून सतत येत असतात. कोणाही सरकारी अधिकाºयाला थोड्या गुदगुल्या केल्या किंवा दोन पेग चांगली दारू पाजली की तो अख्ख्या देशातल्या नोकरशाहीबद्दल दणादण माहिती देतो. असल्या माहितीला हेरगिरी म्हणणं म्हणजे अतीच होतं. अशी माहिती मिळवण्यासाठी पाकिस्तानला हेरबीर नेमावे लागतात यावरून तो देशही कसा काम करत असेल याची कल्पना येते!त्यातही गमती कशा आहेत पहा. २०१० साली संशय पक्का झाला आणि गुप्ता यांना अटक झाली, जामिनावर सुटका झाली. त्यानंतर सत्र न्यायालयात आठ वर्षांनी निकाल लागला. आरोप सामान्य. पुरावे सामान्य. ईमेलवरून माहिती दिली होती, ते सारे ईमेलही फिर्यादींनी कोर्टासमोर मांडलेले आणि आरोपीनं ते मान्य केले. मग निकाल लागायला इतकी वर्षं कां लागावीत? त्यातही भानगड अशी की अजून हाय कोर्ट आहे आणि सुप्रीम कोर्ट आहे. किमान दहाएक वर्षं सहज जातील. गुप्ता आता ६१ वर्षांच्या आहेत. आताच त्यांनी कोर्टाला विनंती केलीय की, त्या आता सिनिअर सिटिझन झाल्यानं त्यांची शिक्षा कमी करावी, झालीय तेवढी खूप झाली म्हणून सोडून द्यावं. आणखी १० वर्षांनी त्या अधिक सिनिअर सिटिझन होतील. पुन्हा त्या मागणी करतील की त्यांची शिक्षा कमी करावी.पेपरात ही बातमी आल्यावर गुप्ताबार्इंवर जनता तुटून पडली. त्यांच्या मते गुप्ताबाईंनी देशद्रोह केला होता. देशद्रोह काय तर इकडल्या सरकारी अधिकाºयांची माहिती दिली. पाकिस्तान म्हणजे महा महाशत्रू. तेव्हा त्याला माहिती देणं म्हणजे घोर अपराध. ही माहिती त्यांनी तान्झानिया, अल्बानिया, झिम्बाब्वे इत्यादी देशांना दिली असती तर लोकांनी दुर्लक्ष केलं असतं.गुप्ताबार्इंचा उर्दू साहित्याचा विशेष अभ्यास होता. उर्दू साहित्यावर त्यांनी पीएच.डी. करायला घेतली होती. पण जमलं नाही. पाकिस्तानशी संबंध आणि उर्दू भाषा येणं म्हणजे आणखीनच एक भयंकर गुन्हा. या बाई समजा संस्कृत साहित्याच्या अभ्यासक असत्या आणि त्यांनी नेपाळला काही माहिती पुरवली असती तरीही त्यांच्याकडं दुर्लक्ष झालं असतं.हेरगिरी इत्यादींचा अभ्यास करणारे म्हणतात की, गुप्ता प्रकरण अगदीच किरकोळ आहे. भारतातल्या गुप्तवार्ता विभागाचे एकेकाळचे प्रमुख दुलाट यांनीही गुप्ता प्रकरण अगदीच साधं आहे, त्यात काही महत्त्वाचं घडलेलं नाही असं म्हटलंय. तरीही पेपरांनी या प्रकरणाची बातमी दोन तीन दिवस लावली, ‘हनिट्रॅप’ असं विशेषण लावलं.बॉण्ड सिनेमे आठवून पहावेत. तिथं जेम्स बॉण्ड नावाचा देखणा, सेक्सी, धाडसी माणूस नेहमी कुणातरी सेक्सी स्त्रीच्या प्रेमात पडतो. पडतो म्हणजे ठरवून, मोजून मापून पडतो. बॉण्डला रशिया, चीन किंवा एखाद्या झोटिंगाची माहिती हवी असते, एखादा कट उद्ध्वस्त करायचा असतो. ते करत असतानाच साइड बाय साइड बॉण्ड तुफान सेक्स मजा करतो. ते सारं पाहताना प्रेक्षकही सुखावतात. साधारणपणे जिथं जिथं हेरगिरी प्रकरणात सेक्सचा संबंध असतो तिथं तिथं बॉण्ड कथेचीच विविध रूपं समोर येतात. प्रत्यक्षात कदाचित हेरगिरीचं जीवन तितकं सेक्सी असण्याचीही शक्यता आहे.गुप्ताबार्इंची जी चित्रं प्रसिद्ध झालीयत ती हेरकथांमध्ये दिसणाºया मादक, सेक्सी, धाडसी चित्रांशी जुळणारी नाहीत. मुळात गुप्ताबाई हायकमिशन किंवा दूतावासात काम करत असल्या तरी त्यांचं काम माहिती, प्रसिद्धी अशाच स्वरूपाचं आहे. त्यात थरारबिरार नसतो. आपल्या देशाचं, आपल्या पंतप्रधानांचं कौतुक करणं असलाच अत्यंत कंटाळवाणा आणि पोकळ उद्योग माहिती खात्याला करावा लागतो. स्ट्रॅटेजिक, युद्धासंबंधी, शस्त्रासंबंधी माहितीचा या खात्याशी काहीही संबंध येत नसतो.तो जिमी नावाचा माणूस आणि गुप्ता या बाईंचे हेरकथांतून दिसतात तसे जवळिकीचे संबंध होते की नाही ते कळायला मार्ग नाही. रूप, वयातला फरक इत्यादी गोष्टींचा खरं म्हणजे लैंगिक आनंदाशी संबंध नसतो. ते एक स्वतंत्र प्रकरण असतं. परंतु निदान पत्रकारांनी तरी ‘हनिट्रॅप’सारखे शब्द टाळायला हवेत.टीव्हीचे लोक मुलाखत घेण्यासाठी एखाद्या सरकारी कार्यालयाबाहेर कॅमेरा लावू लागले की हवालदार दंडुका आपटत मनाई करतो. सरकारी कार्यालयासमोर फोटो काढण्याला कायद्यात मनाई आहे! ती माहिती शत्रूपक्षाकडं गेली तर घातपात होऊ शकतो. तसंच विमानतळावरही फोटो काढायला परवानगी नाही. मुंबईतल्या किंवा दिल्लीतल्या इंचन्इंचाचे फोटो सॅटेलाइटवरून घेतले गेलेले आहेत. कोणालाही ते सहज उपलब्ध होतात. तरीही भारतातले पोलीस दंडुके आपटत फिरत असतात!संस्था, सरकारं यांना माहिती हवी असते. कारण माहिती हे एक किमती प्रकरण आहे. माहिती संस्थेला, सरकारांना खड्ड्यात घालू शकते, माहिती संस्था आणि सरकारांना फायदे मिळवून देऊ शकते. हिलरी क्लिंटनबद्दलची माहिती रशियनांनी गोळा केली आणि ट्रम्प यांना दिली. क्लिंटन हरल्या. रशियनांनी फ्रेंच मॅक्रॉन यांच्याबद्दल खोटी माहिती तयार करून फ्रेंच नागरिकांच्या कानात भरली, मॅक्रॉनची खूप मतं त्यामुळं गेली. अमेरिकन सरकारनं व्हिएतनाममध्ये केलेल्या काळ्या धंद्यांची माहिती हर्श, एल्सबर्ग यांनी गोळा केली आणि पेपरात प्रसिद्ध केली. एका प्रेसिडण्टचा त्यात बळी गेला. नायकी ही कंपनी अत्यंत कमी वेतनावर अत्यंत अनारोग्यकारक वातावरणात लोकांकडून चपला-बूट तयार करून विकते, हे प्रकरण त्याच कंपनीतल्या एका माणसानं माध्यमांना माहिती पुरवून जनतेसमोर ठेवलं. नायकीला ते महाग पडलं.माहिती आणि सेक्स अशा दोन गोष्टी एकत्र आल्या रे आल्या की प्रकरण चकटदार होतं. भारतात अशी चटकदार प्रकरणं फारशी हाताशी येत नाहीत. कारण त्यात बहुधा राजकीय पुढारी अडकलेले असतात. अशा प्रकरणांची खासगीत भरपूर चर्चा होत असते, अख्ख्या भारताला ती माहीत असतात; पण त्यावर कोणी लिहीत नाही, सिनेमे काढत नाही. कारण तसं केलं तर पुढाºयांचे हस्तक दंगली घडवून आणतात, लिहिणाºयांवर नाना तºहेनं दबाव आणतात.माधुरी गुप्ता प्रकरण साधंच दिसतंय. त्यामुळं जनता थरारक कथानकाला मुकलीय.(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)