शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
3
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
4
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
5
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
6
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
7
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
8
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
9
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
10
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
12
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
13
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
14
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
15
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
16
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
17
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
18
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
19
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
20
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

चिमणीचं घरटं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 1:36 PM

मुलांनी आपल्या पणजीला  कधीच पाहिलेलं नव्हतं. अचानक ती घरी येणार म्हटल्यावर सगळ्यांचीच धांदल उडाली. ही पणजी खूपच खडूस असणार, असा त्यांचा अंदाज होता. पणजीला स्वच्छतेची आवड होती; पण प्राणी-पक्ष्यांबद्दलही तिला खूपच जिव्हाळा होता. मुलांचं मग तिच्याशी खूपच जमलं!

ठळक मुद्देधड ना लहान, धड ना मोठे अशा ‘मधल्या’ मुलांसाठी नवी ‘विण्डो’

- गौरी पटवर्धन 

तेजलच्या घरी आज सकाळपासून नुसती धावपळ चालू होती. तेजलच्या आईबाबांनी दोन आठवड्यांपासून घर आवरायला काढलं होतं. दिवाळी आल्यासारखं सगळं घर झाडून पुसून घेतलं होतं. सगळे पलंग आणि सोफे पुढे सरकावून त्यांच्या मागून केर काढला होता. घरातली सगळीकडची जाळी-जळमटं काढली होती. डबे घासून पुसून परत सामान भरून ठेवले होते. चादरी आणि पांघरुणं धुऊन ठेवली होती. तेजल आणि तिच्या धाकट्या भावाला त्यांचं कपाट आवरायला लावलं होतं.तेजल सातवीत आणि तिचा भाऊ, अमित चौथीत होता. त्यामुळे त्यांनी आवरलेलं कपाट आईबाबांना पटत नव्हतं. त्यामुळे ते पुन:पुन्हा त्यांना सामान आवरायला लावत होते. आणि आज सकाळपासून तर या सगळ्याचा अतिरेक झाला होता. तेजलची म्हातारी पणजी गावाकडून त्यांच्याकडे राहायला येणार होती आणि आज दुपारी ती येऊन पोहोचणार होती. तिचं वय पुष्कळ होतं आणि ती गेली दहा वर्षे प्रवास करून कुठेच गेली नव्हती. पण, आता अचानक तिच्या मनाने असं घेतलं होतं की आपले हातपाय चालताहेत तोवर सगळ्या नातवंडांना आणि पंतवंडांना एकदा भेटून यावं. या प्रवासात ती तिच्या एका चुलत काकांकडे गेली होती आणि ते तिला घेऊन सकाळी निघाले होते. ते आता केव्हाही पोहोचतीलच अशी परिस्थिती होती. आईबाबा अस्वस्थ होऊन येरझार्‍या घालत होते. अमितला ती पणजी आठवतच नव्हती. तेजलला इतकंच आठवत होतं, की ती लहान असताना आईबाबांबरोबर गावी गेलेली असताना ही पणजी तिला भेटली होती. पण त्यापलीकडे तिलाही काही आठवत नव्हतं.पण या न बघितलेल्या, न आठवणार्‍या पणजीचा त्यांना भेटायच्या आधीच सॉलिड राग आलेला होता. ती दोन दिवस राहायला येणार तर आपण आपलं कपाट चारवेळा का आवरायचं, हे त्यांना पटण्याच्या पलीकडे होतं. ही पणजी खडूस असणार असा अंदाज त्यांनी मनाशी बांधला होता.त्यांच्या आईबाबांनी त्यांना असं सांगितलं होतं की, पणजी स्वभावाने फार छान आहे. पण, तिचं पुन्हा आपल्या घरी येणं होणार नाही; तर आपण आपल्या बाजूने तिचं इथलं राहाणं छान होईल यासाठी प्रयत्न करूया. ही सगळी आवराआवर एवढय़ासाठी करायची की आपल्यामुळे तिला नकळतसुद्धा काही त्नास व्हायला नको.पण तेजलचा त्यांच्या या सांगण्यावर अजिबात विश्वास नव्हता. आईबाबा कधीच कुठल्या मोठय़ा माणसांबद्दल वाईट बोलत नाहीत हे तिला माहिती होतं. आणि त्यामुळेच त्यांनी आपल्याला काहीही सांगितलं तरी ही पणजी खडूस असणार यात तिला काही शंका नव्हती. शिवाय ती इतकी म्हातारी असेल तर दिसायला पण गोष्टीतल्या चेटकिणीसारखी असेल असं अमितला वाटत होतं. चांगली गोष्ट एवढीच होती की ती फक्त दोन दिवस राहणार होती आणि मग गावातच राहणार्‍या आत्याच्या घरी जाणार होती.ती येण्याच्या दिवशी आईबाबांनी तेजलला सांगितलं होतं, की सकाळी एकदा हॉल परत आवरून ठेव. कारण आई स्वयंपाकाच्या कामात होती. तिला आज दुपारी ते चौघं, पणजी आणि तिला सोडायला येणारे तीन-चार जण इतक्या सगळ्यांचा स्वयंपाक करायचा होता. बाबा आईला मदत करत होते आणि काही ऐनवेळी आठवलेल्या वस्तू बाहेरून आणून देत होते. तेजलने मनाशी चडफडत अमितला हाताशी घेऊन परत एकदा हॉल आवरला होता. मग त्या दोघांनी अंघोळ केली होती. घाईघाईने नास्ता केला होता आणि दोघंही छान छान कपडे घालून, केस विंचरून, कुठलेही उपद्व्याप न करता, शहाण्या मुलांसारखे गुपचूप हॉलमधल्या सोफ्यावर हळू आवाजात टीव्ही लावून बसून राहिले होते. दुपारचा दीड वाजला आणि शेवटी एकदाची घराची बेल वाजली. तेजलने पटकन टीव्ही बंद केला आणि दोघं उठून उभे राहिले. बाबांनी दार उघडलं. काकांच्या हाताला धरून कमरेत वाकलेली, सगळे केस पांढरे झालेली, सुरकुतलेल्या चेहर्‍याची, थरथरत्या हातांची, बारीक चणीची पणजी घरात आली. तिने उंबर्‍यातून आत येऊन सगळीकडे नजर फिरवली आणि ती काहीतरी बोलणार एवढय़ात तिच्या डोक्यात टपकन एक काडी पडली. ही काडी कुठून आली असा विचार करेपर्यंत जळमटं लागलेला एक छोटासा कापसाचा बोळा तिच्या डोक्यात पडला.आता मात्न आईने रागाने तेजलकडे बघितलं. तिला हॉल आवरायला सांगूनपण तिने तो आवरला नाही असं आईला वाटलं. तेजल पटकन म्हणाली, ‘अगं, पण मी खरंच आवरला होता हॉल.’ तिला वाटलं की आता आपल्याला चांगलीच बोलणी खायला लागणार आहेत. तेवढय़ात पणजी म्हणाली,‘हो तर! हॉल छान, स्वच्छ आवरलेलाच दिसतोय.’ आणि बोलत बोलत ती सोफ्यावर येऊन बसली. तेजलचे बाबा म्हणाले, ‘तेजल फार मनापासून काम करते. त्या काड्या तिच्या लक्षात आल्या नसतील. नाही तर तिने त्या नक्की काढल्या असत्या.’‘नको गं बाई..’ पणजी म्हणाली, ‘त्या काड्या आणि कापूस काढला नाहीस ते चांगलंच केलंस. तो कचरा पुण्याचा असतो बाई. तो कधी काढू नये.’‘म्हणजे?’ ही पणजी आपल्याला रागवली नाही त्या अर्थी खडूस नसावी, असा अंदाज बांधत तेजलने विचारलं.‘अगं हा कचरा कोणी केलाय?’‘मला नाही माहिती. मी नाही केलेला.’ अमित पटकन म्हणाला.‘ते झालंच रे सोन्या.’ पणजी त्याच्याकडे बघून गोड बोळकं हसत म्हणाली, ‘तू कशाला करशील असा कचरा? तो कचरा केलाय त्या चिमण्यांनी.’ असं म्हणून आजीने दाराच्या वर लटकवलेल्या फ्रेमकडे बोट दाखवलं. आणि खरंच, सगळ्यांच्या समोरच एक चिमणी अजून एक काडी घेऊन भुर्रकन त्या फ्रेमच्या मागे गेली. ते बघून पणजी म्हणाली,‘बाई, चिमण्या कोणत्याही घरात घरटं बांधत नाहीत. जे घर नांदतं असतं तिथेच चिमण्या घरटं बांधतात, कारण त्या मुक्या जिवाला एवढं समजत की लेकुरवाळं घर त्यांचं घरटं पाडणार नाही. तुम्ही चांगली मुलं आहात म्हणून चिमण्यांनी तुमच्या घरात घरटं करायला घेतलंय. आता त्यांची पिल्लं मोठी होऊन उडून जाईपर्यंत उरलेलं घर पाहिजे तेवढं आवरा; पण तेवढा एक कोपरा त्यांना कचरा करायला असू द्या. कोणीतरी मुका जीव आपल्या घरात लेकराबाळांना घेऊन राहण्याएवढा विश्वास टाकतं, तो विश्वास मोडू नका. त्यांनी केलेला कचरा पुण्याचा असतो.’आता मात्न तेजलला वाटायला लागलं होतं, की या पणजीने कायम आपल्याच घरी राहावं.lpf.internal@gmail.com(गौरी ‘लिट्ल प्लॅनेट फाउण्डेशन’ची समन्वयक आहे.)