बिबट्या माणसाळलाय?

By Admin | Updated: July 18, 2015 13:49 IST2015-07-18T13:49:51+5:302015-07-18T13:49:51+5:30

‘माणसा’शी संघर्ष करायचा नसेल आणि तंटामुक्त ‘जगायचं’ असेल तर ‘जुळवून’ घेतलं पाहिजे हे आता बहुधा बिबटय़ांनीही जाणून घेतलं आहे. माणसांच्या वाटेला जाणं त्यांनी थांबवलं आहे. त्यांच्या पाळीव जनावरांपासूनही शक्यतो चार हात दूर राहणंच ते पसंत करताहेत. उंदीर-घुशींच्या वाटेला न जाणारा बिबटय़ा तेही आवडीनं खातो आहे. भटक्या कुत्र्यांवर ताव मारतो आहे!.

Leopard man? | बिबट्या माणसाळलाय?

बिबट्या माणसाळलाय?

-काय सांगतोय अभ्यासाचा निष्कर्ष?

 
गजानन दिवाण
 
माणूस. 
जंगल हेच पूर्वी त्याचं विश्व होतं. वल्कलं नेसायचा, गुहेत राहायचा, शिकार करायचा, कंदमुळं आणि कच्चे मांस खाऊन जगायचा.. हाच माणूस पुढे नदीकाठी शेती करू लागला, घरात राहू लागला, नंतर जंगलातूनही बाहेर पडला. अन्न शिजवून खाऊ लागला. सीमेंट कॉँक्रीटच्या जंगलात आला. कंदमुळं खाणं तर सोडाच, ते चित्रंतही ओळखेनासा झाला. मिळेल ते, अगदी पिङझा-बर्गरही पचवू लागला.
अगोदर परिस्थितीनं नंतर स्वत:त स्वत:हून बदल करायच्या इष्र्येनं त्यानं स्वत:ला नको इतकं बदललं. बदलाच्या याच ऊर्मीनं जंगलातून तो पार चौपाटीर्पयत आला.
माणसानं तर परिस्थितीशी जुळवून घेतलं. जुळवून घेता घेता स्वत:ला आणि इतरांनाही इतकं बदललं की त्याचं मूळ शोधणंही कठीण झालं.
.पण माणसांच्या सोबत जंगलात राहणा:या प्राण्यांचं, विशेषत: बिबटय़ांचं काय?
त्यांचं तर स्वत:चं जंगल गेलं, त्यांचा अधिवास गेला, ज्यावर जगायचं, ते अन्नच नाहीसं होत गेलं.
त्यानं कसं जुळवावं परिस्थितीशी?. 
कशी करावी माणसाशी बरोबरी?.
बरीच र्वष नाहीच जमलं त्याला. 
पण जगण्या-मरण्याचा प्रश्न उभा राहिला आणि त्यालाही बदलावंच लागलं. ‘माणसा’शी पंगा घेतला, तर उरलंसुरलं, आहे तेही गमावून बसू हेही बहुधा त्याला कळलं असावं. त्यामुळेच त्यानं ठरवलं असावं, बदलाच्या या प्रवासात होता होईतो माणसाशी पंगा घ्यायचा नाही, स्वत:हून माणसाच्या वाटेला जायचं नाही.
‘माणसांसारखं’ आणि माणसांशी बिबटय़ाला ‘जुळवून’ घ्यावंच लागलं.
अजूनही त्याचा हा प्रयत्न सुरू आहे.
माणसांसोबत जुळवून घेण्यासाठी आता बिबटय़ानेही जंगल ते चौपाटीर्पयतचा प्रवास सुरू केला आहे. माणसाला त्रस होईल असे कुठलेही कृत्य करायचे नाही, असा ‘धडा’ही बहुधा त्यांना मिळाला आहे.
बाहेरची मांजर आम्ही कुठल्याही परिस्थितीत घरात घेत नाही; मात्र घरातली मांजर अगदी स्वयंपाकघरातही अडचणीची ठरत नाही. समोर दूध असो वा अन्न, ती कशातही तोंड घालत नाही, हा विश्वास आपल्या वागणुकीतून तिनेच दिलेला असतो. घाण कुठे करायची यापासून ते मालकाने दिलेले अन्नच खायचे ही शिस्त तिने स्वत:ला घालून दिलेली असते. म्हणूनच ही मांजर आपल्या कुटुंबातील एक सदस्य बनते. असाच काहीसा विश्वास या बिबटय़ांनीही निर्माण केला आहे. त्यामुळेच लोकांचा सर्वाधिक राबता असलेल्या संजय गांधी नॅशनल पार्कच्या या भल्या मोठय़ा कुटुंबात अलीकडच्या काळात बिबटय़ाच्या हल्ल्याची एकही घटना घडली नाही. 
वर्षाला तब्बल 2क् लाख लोक संजय गांधी नॅशनल पार्कला भेट देतात. मिनी ट्रेन, लॉयन सफारी, टायगर सफारी, बोटिंगसह कान्हेरी लेण्या पाहण्यासाठी येणा:यांची संख्या मोठी असते. हे सारे कमी म्हणून की काय, पार्कच्या आतच वीज उपकेंद्र असून, सोबतीला जवळपास 43 पाडे आहेत. येऊर आणि चेना ही दोन गावेही प्रकल्पातच आहेत. 
या पाडय़ांमधील काही लोक जंगलातली शेती कसतात. अधिकतर लोक रोजगार करूनच घर भागवतात आणि यासाठी ते दररोज मुंबई-ठाण्याला जातात. त्यामुळे या जंगलावर त्यांचा फारसा ताण नाही. असे असले तरी जळणासाठी लागणा:या लाकडांचा भार मात्र मोठा आहे. इतर ठिकाणांप्रमाणो या जंगलातही बिबटय़ाने हल्ला केल्याच्या घटना घडायच्या. मात्र गेल्या दोन वर्षापासून ते बंद झाले आहे. जादूची कांडी फिरावी तसा हा बदल अचानक का झाला, याचा शोध गेल्या आठवडय़ात लागला. वाईल्ड लाइफ इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाच्या निकीत सुव्रे यांनी डिसेंबर 2क्14 ते जून 2क्15 दरम्यान या पार्कमधील बिबटय़ाच्या प्रत्येक हालचालींवर पाळत ठेवली. हाती आलेली माहिती माणसांना तोंडात बोट घालायला भाग पाडणारी आहे. 
पार्कमध्ये माणसांसोबत तंटामुक्त जगायचे असेल तर स्वत:मध्ये काही बदल घडवून आणणो महत्त्वाचे आहे, हे या बिबटय़ांनी जाणले आणि तसे केलेही. कुठल्याही परिस्थितीत, काहीही खाऊन माणूस जगू शकतो. अशाच पद्धतीने कुठल्याही परिस्थितीत बिबटय़ाही तग धरून राहू शकतो. म्हणूनच भारतात मोठय़ा संख्येने तो दिसतो. साधारणपणो चितळ, सांबराचे पिलू, वानर खाऊन जगणारा बिबटय़ा प्रसंगी उंदीर-घुशी खाऊनही दिवस काढतो. संजय गांधी नॅशनल पार्क परिसरात नेहमीचे हे खाद्य सोडून तो भटक्या कुत्र्यांवर ताव मारत असल्याचे या अभ्यासातून समोर आले आहे. सहसा उंदीर-घुशीच्या वाटी न जाणारा बिबटय़ा येथे तेही आवडीने खात आहे. संजय गांधी नॅशनल पार्क असो वा राज्यातील बिबटय़ा आढळण्याची इतर कुठलीही ठिकाणो. प्रचंड कचरा आणि त्यावर पोसली जाणारी भटकी कुत्री हेच बिबटय़ाचे प्रमुख अन्न बनू पाहत आहे. 
ताडोबासारख्या व्याघ्र प्रकल्पातील चित्र मात्र वेगळे आहे. या प्रकल्पातील बिबटय़ा काळतोंडी किंवा लालतोंडी माकड, चितळ, रानडुक्कर आवडीने खातो. त्याच्या शिकारींमध्ये या जंगली प्राण्यांचेच प्रमाण अधिक दिसते. जे मिळते त्यात जुळवून घेण्याच्या स्वभावामुळे त्याच्यामध्ये हा बदल झाला असावा. क्.5 ते 2क्क् किलो वजनार्पयतचे भक्ष्य हे बिबटय़ाचे खाद्य असते. जेवढे वजन कमी तेवढे त्याला मारणो आणि खाणो सोपे. म्हणून 2क्क् किलो वजनाच्या सांबराला मारण्याची हिंमत बिबटय़ा फारशी करीत नाही. कुत्रे, कोंबडी, शेळ्या, पाळीव जनावरे यांना मारून खाणो त्याला सोपे जाते. मात्र संजय गांधी उद्यानात कोंबडी, शेळ्या किंवा पाळीव जनावरांना बिबटय़ा फारसे लक्ष्य करताना दिसत नाही. अपवादात्मकच तो यांच्या वाटेला जातो. हे असे का? त्यांची संख्या कमी झाली आहे का? तर असे अजिबात नाही. या अभ्यासादरम्यान केलेल्या कॅमेरा ट्रॅपिंगमध्ये सर्वाधिक छायाचित्रे माणसांची मिळाली आहेत. त्यानंतर बिबटय़ा, रानडुक्कर, सांबर, कुत्र, चितळ, मांजर, पाळीव जनावरे या क्रमाने छायाचित्रे मिळाली आहेत. यात बिबटय़ाची 88 छायाचित्रे मिळाली आहेत. बिबटय़ांचे 57 टक्के भक्ष्य जंगली प्राणी आहेत; शिवाय 43 टक्के भक्ष्य हे जंगली प्राण्यांशिवाय आहे. यातही जवळपास 65 टक्के प्रमाण कुत्र्यांचेच आहे. पाळीव जनावरांचे प्रमाण केवळ 15 टक्के आहे. त्याचवेळी उंदीर-घुशींचे प्रमाण 27 टक्के आहे. वानराचे प्रमाण 18 टक्के आहे. म्हणजेच या पार्कमधील बिबटय़ांनी जंगलाबाहेरच्या प्राण्यांच्या शिकारी केल्या असल्या तरी पाळीव जनावरे, शेळ्या-बक:या किंवा कोंबडय़ांवर फारसे लक्ष केंद्रित केलेले नाही. त्यामुळे माणसांच्या कुटुंबाला धक्का बसलेला नाही. या परिसरात माणसांवर आणि त्यांच्या पाळीव जनावरांवर होणारे बिबटय़ांचे हल्ले अचानक कमी झाले, त्यामागचे हे मूळ कारण. पार्कमधील एका अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे. अशाच अभ्यासाद्वारे त्याच्या आणखी जवळ गेल्यास माणसांशी जुळवून घेणारे अनेक बदल समोर येऊ शकतात. तूर्तास बिबटय़ाने स्वत:मध्ये केलेला हा फार मोठा बदल समजायला हवा. 
कोंबडय़ा, शेळ्या किंवा पाळीव प्राण्यांना लक्ष्य केले, तर माणसांकडून विरोध होतो. त्याचे परिणाम अतिशय वाईट असतात. भटक्या कुत्र्यांची कुठेच नोंद नसते. त्यांना मारल्याने कुणाचेही नुकसान होत नाही. माणसाच्या मेंदूतून जन्म घ्यावा तसा हा विचार बिबटय़ाने केलेला दिसतो. माणसांचे आणि आपले जगणो कुठल्याही विरोधाशिवाय व्हावे, असा विचार करून बिबटय़ाने आपला मोर्चा भटक्या कुत्र्यांकडे वळविला असावा.
संजय गांधी पार्कचा अधिकतर वापर हा माणसांकडूनच केला जातो. प्रति चौरस किलोमीटरला तब्बल 2क् हजार इतकी माणसांची घनता आहे. या पार्कच्या 1क्क् चौरस कि.मी. क्षेत्रत बिबटय़ांची घनता 21.55 इतकी आहे. देशातील इतर प्रकल्पांच्या तुलनेत ही सर्वाधिक घनता मानली जाते. असे असतानादेखील 2क्13 पासून येथे बिबटय़ाने माणसावर हल्ला केल्याची एकही घटना घडली नाही. याचा अर्थ माणूस आणि बिबटे या दोघांनीही एकमेकांना समजून घेतले आहे. काय केल्याने कोणाचे नुकसान होते, हेही त्यांना ठाऊक झाले आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी दोघांनीही एकमेकांमध्ये घडवून आणलेला हा मोठा बदल म्हणजे पर्यावरणक्रांतीचे पहिले पाऊल समजायला काय हरकत आहे?
 
(लेखक ‘लोकमत’च्या मराठवाडा आवृत्तीत उपवृत्तसंपादक आहेत.)

Web Title: Leopard man?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.