शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

खुदा, पायल आणि डिस्को.

By admin | Updated: June 13, 2015 13:41 IST

आधुनिक प्रणयी प्रेम हे हिंदी चित्रपटांचे मध्यवर्ती कथासूत्र. त्यामुळे स्त्रीला आधुनिक, धीट किंवा बंडखोर दाखवणोही गरजेचेच. त्यातूनच हिंदी चित्रपटातील स्त्री प्रतिमांची ढोबळ सूत्रे प्रस्थापित होत गेली.

- विश्राम ढोले
आधुनिकतेची ओढ आणि परंपरेचा ताण यांच्यात अडकलेल्या हिंदी चित्रपटांची एक खूप मोठी गोची स्त्रीविषयक प्रश्नात झाली आहे. ती अर्थात एकूणच भारतीय मानसिकतेचीच गोची आहे. हिंदी चित्रपटांमध्ये ती पॉप्युलर पातळीवर आणि स्पष्टपणो दिसते, इतकेच. ते साहजिकही आहे. कारण पारंपरिक बंधनांच्या पलीकडे जाऊ पाहणारे आणि वैयक्तिक निवडीतून केलेले आधुनिक प्रणयी प्रेम हे हिंदी चित्रपटांचे मध्यवर्ती कथासूत्र. त्यामुळे असे प्रेम करण्याइतपत स्त्रीला आधुनिक, धीट किंवा बंडखोर दाखविणो त्यासाठी गरजेचेच. पण तसे करताना, परंपरा आणि पुरु षी वर्चस्वाची खूप सारी मूल्ये बाळगणा:या कुटुंबव्यवस्थेची चौकट मोडणार नाही याची काळजी घेण्याचा ताणही होता. या सगळ्या ओढाताणीतून हिंदी चित्रपटातील स्त्री प्रतिमांची काही ढोबळ सूत्रे प्रस्थापित होत गेली. आणि अर्थातच पुरुष प्रतिमांचीही. ‘प्रणयी प्रेम (किंवा प्रसंगी लैंगिकताही) हे स्त्रीसाठी तर शहर हे पुरुषांसाठी आधुनिकतेचे  अवकाश आहे’, हे त्यातील एक प्रमुख सूत्र. त्यामुळे, आपली आधुनिकता सिद्ध करण्यासाठी शहरामध्ये कर्तृत्व दाखवणो ही हिंदी चित्रपटातल्या नायकाची तर धीटपणो किंवा बंडखोरीने प्रेम व्यक्त करणो किंवा प्रेमाच्या भावनेमध्ये आपले आधुनिक स्वत्त्व शोधणो ही नायिकेची अनेक वर्षे एक प्रमुख गरज बनून गेली होती. या सूत्रमधून आणि गरजेतून जशा अनेक कथा फुलत गेल्या. आणि अर्थातच सूत्रबद्ध गाणीही. 
‘मुगल-ए-आझम’ मधील (1960) ‘प्यार किया तो डरना क्या’ हे या निर्भीड गाण्यातील मेरुमणी. ‘मुगल-ए-आझम’चा सारा संदर्भ अस्सल राजघराण्याचा, ऐतिहासिक आणि पारंपरिक. त्यामुळे तिथे प्रेमाच्या भावनेतून उघडणारा संघर्षही तितकाच प्रखर. म्हणूनच आधुनिक रोमॅण्टिक प्रेमाची महती गाण्यासाठी हिंदी चित्रपटसृष्टीने असा प्रखर संघर्ष लाभलेल्या इतिहास, प्राचीन साहित्य आणि लोककथांमधील अनेक कथांवर चित्रपट बनविले. सलीम अनारकलीची प्रेमकथा त्यातीलच एक लोकप्रिय कथा. अनारकली आणि मुगल-ए-आझम हे त्यावर आधारित दोन मुख्य चित्रपट. दोन्ही चित्रपट खूप गाजले आणि त्यातील गाणीही. पण ‘प्यार किया तो डरना क्या’ हे विशेष लक्षणीय ठरते. कारण त्यात प्रेमासाठी स्त्रीने लौकिक जगातील सर्वोच्च सत्तेला अगदी खुलेआम आव्हान दिले आहे. आणि तेही प्रियकर मूग गिळून गप्प बसला असताना. नौशादचं संगीत, लताचा सूर, मधुबालाचं सौंदर्य आणि ऐश्वर्यसंपन्न आरसेमहालाचा सेट असा एकेक अतिशय सुंदर असा ऐवज असला तरी त्यावरही कडी करून लक्षात राहतो तो शकील बदायुनीच्या ओळींमधला संदेश- प्यार किया तो डरना क्या. भर राजसभेमध्ये प्रत्यक्ष शहेनशहा अकबराला हे आव्हान देणारी अनारकली कुणी राजघराण्यातील स्त्री नाही. परंपरेचा उपहास किंवा उपेक्षा सहन करणारी ती नर्तकी आहे. त्यामुळे या गाण्याला प्रेमासाठीच्या संघर्षासोबतच एका वर्गसंघर्षाचेही अस्तर लाभते. परंपरेने निर्माण केलेले स्त्री-पुरु ष, राजा-रंक वगैरे सत्तेचे भेद प्रेमापुढे निर्थक आहे, असे सांगताना ती दाखला देते परंपरेला आदरणीय असणा:या ईश्वरी सत्तेचा. 
‘परदा नही जब कोई खुदासे’ असा पारलौकिकातील समतेचा आधार घेत ती ‘बंदो से परदा करना क्या’ असा लौकिकातल्या समतेचा उद्घोष करते. आधुनिक प्रेरणा आणि पारंपरिक आधाराची अशी सरमिसळ भारतीय मनच करू जाणो. ‘मुगल-ए-आझम’नंतर पाचेक वर्षातच आलेल्या गाइडमधील ‘काँटो से खिच के ये आँचल’ हे याच सूत्रसाखळीतील पुढचे गाणो. अर्थात हे रूढार्थाने आणि थेटपणो प्रेमगीत नाही. ते खरे तर आपली नवी ओळख शोधू पाहणा:या स्त्रीचे आनंदगीत आहे.  चित्रपटात ते येते रोझीवर (वहिदा रेहमान). रोझीचा नवरा मार्को हा आपल्याच विश्वात रमलेला, पेशाने आधुनिक शास्त्रज्ञ पण मनाने टिपिकल पारंपरिक असलेला पुरुष आहे. त्याच्याशी संसार करण्यासाठी रोझीने तिच्या अत्यंत आवडीच्या नृत्यकलेचाही त्याग केला आहे. घुंगरू बांधून ठेवले आहेत. पण इतके करूनही तिच्या वाटय़ाला नव:याकडून फक्त उपेक्षा, अवहेलनाच आणि फसवणूकच येते. त्यामुळे आत्महत्त्येचा प्रयत्न करण्याइतपत रोझी खचते. या परिस्थितीतून तिला बाहेर काढतो तो तरुण राजू गाइड (देवानंद). सगळ्यांचा विरोध पत्करून तो तिला साथ देतो. त्याच्या संगतीत रोझीला ख:या प्रेमाचीही चाहुल लागते आणि आपल्या गमावलेल्या स्वत्त्वाचीही. नृत्यकला हे आपले स्वत्त्व आहे आणि नव्याने गवसलेले प्रेम हा त्याचा आधार आहे अशा एका प्रत्ययाच्या क्षणी हे गाणो येते. जगण्याची रसरसती इच्छा पुन्हा निर्माण व्हावी आणि अशा स्वयंसिद्ध जगण्यासाठी मरण्याइतपत बेभान व्हावे अशी रोझीची भावावस्था आहे. इथे प्रेमासाठी कोणाला आव्हान देणो वगैरे नाही. पण स्वत्त्वाची ही शोधयात्र प्रेमाच्या मार्गानेच जाते हे सूत्र मात्र संपूर्ण गाण्यातून सुप्तपणो वाहत रहाते. ‘तोड के बंधन बांधी पायल’ किंवा ‘दिल की उडान’ या दोन्ही अवस्थांचा किनारा प्रेमाचा आहे हे जाणवत राहते. निर्भय वाटणो, मुक्त वाटणो, स्वत:चा शोध लागणो, आत्मसन्मान जागा होणो अशा अनेक सकारात्मक अवस्था परंपरेमध्ये स्त्रीच्या वाटय़ाला कमीच येतात. त्या सा:या अवस्था प्रेमाच्या अनुभवातून येऊ शकतात असा युक्तिवाद करीत चित्रपटांनी आणि गाण्यांनी एकाचवेळी प्रेमाची महती गायली आहे आणि स्त्रियांच्या आधुनिक होण्याचा स्वीकारार्ह मार्गही सुचवला आहे. असाच आशय असलेली ‘तुम अपना रंज ओ गम अपनी परेशानिया मुङो दे दो’ (शगून- 1964) ते ‘आजकल पाँव जमींपर नही पडते मेरे’ (घर-1978) अशी बरीच गाणी सांगता येतील. 
‘छोडछाड’मधली अनारकली मूळ अनारकलीच्या कथेतल्या अन्यायाविरुद्ध आव्हान उठवते आणि प्रसंगी ज्याच्यावर जीव टाकला त्या ‘सलीमची गली’ सोडण्याचीही तयारी दर्शविते. एका अर्थाने ही उत्तम आधुनिक अनारकली राजसत्तेलाच नव्हे तर अन्याय करणा:या प्रेमसत्तेलाही आव्हान देते. ‘प्यार किया तो डरना क्या’मध्येही सत्तेला दिलेले आव्हान ‘परदा नही जब कोई खुदासे. बंदो से परदा करना क्या’ अशा दैवी प्रांतातली समानतेवर आधारलेले आहे. ‘छोड छाड के’मधील नव्या अनारकलीला आधार आहे तो डिस्कोचा, उपभोगाचा. तिला माहीत आहे की तिच्याजवळ मादक सौंदर्याची सत्ता आहे. आणि ही सत्ता सहज चालू शकेल अशा डिस्कोथेकसारख्या जागाही तिला माहितेय. प्रेमापेक्षा तिला आजादी प्यारी आहे. 
प्रेमासाठी लढण्याबिढण्यापेक्षा डिस्कोत जाऊन ‘टॉप बीट’ वर ‘हिप हॉप’ करण्यात आणि ‘ट्रान्स म्युङिाक’ अनुभवण्यात तिला जास्त इंटरेस्ट आहे. 
‘मुगल-ए-आझम’मधील अनारकली मृत्यू कवटाळतानादेखील सलीमसाठी ‘खुदा निगेबान हो तुम्हारा’ असेच म्हणते. या पाश्र्वभूमीवर पाहिले तर सलीमची गली सहज सोडून डिस्कोमध्ये डान्स करू शकणारी ही नवी अनारकली जुन्या अनारकलीचा ‘फूल टू’ उत्तर आधुनिक ‘अॅण्टीक्लायमॅक्स’ आहे. पण त्यात एक मेख आहे.
 ‘छोडछाड के अपने’मधील अनारकली मध्यमवर्गी-उच्च मध्यमवर्गीय शहरी संस्कृतीतील ‘भद्र’ स्त्री नाही. रंगरूप, तोकडे कपडे आणि डिस्कोथेकमध्ये नाचणो यामधून तिचे ‘उत्छृंखलपण’, वेगळेपण ठसवले जाते. तिच्यासाठी वापरलेल्या ममता शर्माच्या आवाजाची जातकुळी वेगळी आहे. तो लता मंगेशकरी नाही की अगदी आशा भोसले वळणाचाही नाही. तो ‘चोली के पिछे’वाल्या इला अरुणी आवाजाशी नाते सांगणारा आवाज आहे. असा वेगळा ‘रॉ’नेस असलेला आवाज हिंदी चित्रपटसृष्टी बहुतेकवेळा ग्रामीण, भटक्या, लैंगिकदृष्टय़ा धीट किंवा उत्छृंखल स्त्रीपात्रंसाठी वापरते. त्यामुळे असा आवाज वापरून हे गाणो नव्या अनारकलीचे सामाजिक वेगळेपण आणि मध्यमवर्गीय शहरी प्रेक्षकांसाठीचे तिचे परकेपण अधोरेखित करते. 
खुदाचा आधार घेऊन प्रेमाची निर्भयपणो महती गाणारी नर्तकी अनारकली, प्रेमाचा आधार घेऊन पुन्हा पायल बांधू पाहणारी नर्तकी रोझी आणि डिस्कोतील उपभोगाचा आधार घेत प्रसंगी प्रेमाबिमाला नाकारू शकणारी डान्सर-आयटम अनारकली असा हा गाण्यातील प्रवास मोठा विलक्षण आहे. स्त्री आणि प्रेमभावना यांना हिंदी गाण्यांनी दिलेला प्रतिसाद कसा गुंतागुंतीचा आणि कालसापेक्ष आहे याचेच ते द्योतक आहे.  
 
अनारकली!
स्त्रियांसाठीचे खुलेपण, आधुनिकता मुख्यत्वे प्रेमाच्या प्रांतापुरतीच मर्यादित आहे. प्रेमभावनेचा आधार नसताना असे खुलेपण, अशी निर्भयता, असा स्व-अभिमान हिंदी चित्रपटातील गाण्यांमध्ये स्त्रियांच्या वाटय़ाला तसा कमीच. मात्र गेल्या काही वर्षात त्याचे प्रमाण थोडे वाढले आहे. ‘जिंदगी अगर कोई मॅच है तो समझो तुम मुङो तेंदुलकर, सामने ना आना ना टकराना कभी तुम भूलकर’ असे म्हणत ‘आय अॅम दी बेस्ट’ (फिर भी दिल है हिंदुस्थानी-2000 असे ठणकावून सांगणारी नायिका आताशा अधिक ठळकपणो दिसू लागली आहे. 
काही गाण्यांमध्ये प्रेमभावनेच्या या कथित, मिथकरूप आधारालाही आव्हान देण्यात आले आहे. ‘हाऊसफुल-2’ (2012)मधील ‘छोडछाड के अपने सलीम की गली. अनारकली डिस्को चली’ हे त्यातील एक फार इंटरेस्टिंग गाणो. हिंदी चित्रपटसृष्टी व्यापून राहिलेल्या अनारकलीच्या मिथकाला या गाण्याने पार उलटेपालटे करून टाकले आहे.
(लेखक माध्यम, तंत्नज्ञान आणि संस्कृती 
या विषयाचे अभ्यासक आहेत.)