‘खोपडी’, ‘कोंबडी’ आणि ‘ठर्रा’
By Admin | Updated: June 27, 2015 18:51 IST2015-06-27T18:51:39+5:302015-06-27T18:51:39+5:30
गरीब, सामान्य माणसांना ‘पेटवणारी’ (हात)भट्टी.

‘खोपडी’, ‘कोंबडी’ आणि ‘ठर्रा’
>मी वर्दळीच्या, निर्जन भागातून भटकताना आंबूस भपकारा आला की हमखास समजायचं. इथे कुठेतरी ‘हातभट्टी’ आहे किंवा या भागाचा हातभट्टीशी संबंध आहे!
एकतर जवळपास हातभट्टीच्या मसाल्याचे डबे तरी पुरलेले असतील नाहीतर कुठेतरी थेट भट्टीच धडधडत असेल.
अधूनमधून, कुठे ना कुठे मृत्यूच्या तांडवाला कारणीभूत ठरणारी हातभट्टीची ही जहरीली दारू.
मुंबईतील मालवणी परिसरात हातभट्टीच्या विषारी दारूने घातलेल्या मृत्यूच्या भीषण थैमानात शंभरावर बळी गेले.
कधी खोपोली, कधी रोहा, तर कधी मुंबई.. विषारी दारूचे बळी जाण्याच्या घटना अधूनमधून घडतच असतात. अशा विषबाधेनंतर धाडसत्र, कारवाईचा फार्स पार पडतो. काही काळ हातभट्टय़ा थंडावतात, पण थोडय़ाच दिवसात विझलेल्या हातभट्टय़ा धडाडून पेटू लागतात. पुन्हा कुठेतरी दारूकांड होईर्पयत त्या धगधगतच असतात.
कोटय़वधींची उलाढाल असलेल्या या बेकायदेशीर धंद्यात सरकारी अधिका:यांपासून राजकारण्यांर्पयत सा:यांचेच हात गुंतलेले. म्हणूनच कितीही आटापिटा केला तरी हातभट्टीच्या वितरणाचं जाळं तुटता तुटत नाही. हजारो संसारांची राखरांगोळी करणा:या या हातभट्टय़ांच्या काळ्या दुनियेचा हा वेध.