शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ठाण्यात EVM पडले बंद
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
5
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
6
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
7
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
8
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
9
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
10
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
11
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
12
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
13
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
14
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
15
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
16
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
17
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
18
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
19
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
20
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट

अक्षरांना शारीरिक अंतराचं भान देणारा अक्षरकर्ता 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 6:04 AM

अक्षरांना चेहरा तर असतोच असतो;  पण अक्षरांना मणका असतो,  अक्षरांना असतात खांदे, हात, पाय, पंजे, बोटं  आणि धडही असतं अक्षरांना. हे जाणलं ते कमल शेडगे यांनीच!

ठळक मुद्देकमल शेडग्यांनी अक्षरांना स्वत:च्या पायावर उभं रहायला शिकवलं, तेही शारीरिक अंतराचे नियम घालून देऊन !

- चंद्रमोहन कुलकर्णीचित्रकारानं मुद्दाम घडवलेलं अक्षर हे केवळ कलात्मक असून पुरणार नाही, तर ते शब्दार्थाचं वाहन असावं, ही संकल्पना दलालानंतर पुढे कमल शेडग्यांनी नेली, रुजवली, वाढवली, फुलवली आणि पुढे तिला रसरशीत फळंही आली.सिनेमा-नाटकाचं नाव असो, लेखाचं शीर्षक असो, की कथा कादंबरीचं किंवा समीक्षात्मक पुस्तकाचं शीर्षक; त्या त्या नावांतनं ध्वनित होत असलेला अर्थ, आणि लेखक, संपादक, प्रकाशक, जाहिरातदार अथवा नाटक-सिनेमाचा दिग्दर्शक यांना अपेक्षित असलेला अर्थ स्वत:च्या संस्कारातनं आणि कलात्मक संपादनाच्या गवाक्षातून पहायचा आणि वाचकासमोर ठेवायचा अशी मोठी प्रक्रिया करणारा कमल शेडगे हा अक्षरकर्ता.देवनागरी अक्षरांमधला विशिष्ट अकलात्मक मराठी बोटचेपेपणा अलगद बाजूला सारूनपण मराठी बाणा विसरू न देता साठसत्तरच्या दशकातल्या अमेरिकन आणि युरोपियन  ग्राफिक डिझाइनर्सनी ग्राफिक आर्टला बहाल केलेला निओमॉडर्न पोशाख देवनागरी अक्षरांना रुबाबात चढवला, तो सर्वप्रथम, कमल शेडग्यांनी!सत्तरच्या दशकात एका मराठी दैनिकाच्या अतिशय दुर्वाच्य, आणि किडक्या फॉण्टसमवेत कमल शेडग्यांची अक्षरं छापून आली की त्या विरोधाभासामुळे त्या दैनिकाच्या रविवारच्या पुरवण्या अक्षरश: हिरव्यागार होऊन जात असत.अक्षर फक्त वळणदार नसतं आणि ते फक्त सुंदरही नसतं, अक्षर अर्थासहित असतं, अक्षर आशयासहित असतं. अक्षराचे फराटे निर्थक नसतात, तर ते असतात अक्षरांचे श्वास!अक्षरांना अवयव असतात, ते अशक्त असतात, सुदृढ असतात नि सशक्तही असतात, हे सांगितलं कमल शेडग्यांनी!एखाद्या चित्रकाराचा, मानवी शरीराच्या स्नायूंचा आणि अस्थींचा अभ्यास असावा, तसा अभ्यास होता कमल शेडग्यांचा. अक्षरांची अँनॉटामी पाठ होती त्यांना. अक्षरांना चेहरा तर असतोच असतो; पण अक्षरांना मणका असतो, अक्षरांना असतात खांदे, हात, पाय, पंजे, बोटं आणि धडही असतं अक्षरांना.. अक्षरांमधल्या आकड्यांनाही स्वत:चं मूल्य असतं आणि स्वल्पविराम, अल्पविराम, पूर्णविराम, अर्धविराम, उद्गारवाचक चिन्ह आणि एकेरी-दुहेरी अवतरणचिन्ह ह्या मंडळींना आपापलं काम प्रभावीपणे कसं करावं आणि आशय आणखी बहारदार कसा करावा, हे शिकवलं कमल शेडग्यांनी.कमल शेडग्यांनी अक्षरांना स्वत:च्या पायावर उभं रहायला शिकवलं, तेही शारीरिक अंतराचे नियम घालून देऊन ! अक्षरांच्या दोन उभ्या दंडांमधल्या, दोन गोलाकारांमधल्या, खरं तर दोन श्वासांमधल्या जागांचा अवकाश अचूक ओळखला ह्या कलावंतानं आणि त्या ‘मधल्या जागांच्या अवकाशा’चा सन्मानही केला !- त्यांना सलाम!

chandramohan.kulkarni@gmail.com(लेखक ख्यातकीर्त चित्रकार आहेत)