यूं ही चला चल..
By Admin | Updated: April 25, 2015 14:54 IST2015-04-25T14:54:53+5:302015-04-25T14:54:53+5:30
शाहरूख काजोलने गाणो गायले त्या स्विस खेडय़ात, गूळ-काकवी तयार होते त्या गावात, फ्लेमिंगो दिसतात त्या खाडीच्या काठी, इस्त्रयलमधल्या सहाशे गायींच्या गोठय़ात, नाशिकजवळच्या वायनरींमध्ये .. कुठेकुठे जात असतात लोक!

यूं ही चला चल..
>कृषी आणि उद्योग पर्यटन
वालुकायमय मृदा, अत्यल्प पाऊस आणि प्रतिकूल हवामानाच्या प्रदेशात इस्त्रयलने विकसित केलेली सिंचन पद्धती तसेच ग्रीन हाउस, ग्लास हाउस अशा विविध प्रकारात केली जाणारी शेती पाहायला जगभरातील शेतकरी तेथे जातात. त्यासाठी अॅग्रीटेक नावाचे प्रदर्शनही भरवले जाते. सहाशे ते सातशे गायींचे गोठे संपूर्ण यंत्रंच्या आधारे आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने चालविले जातात. अशा महाकाय गोठय़ांची माहिती आणि सैरही पर्यटकांना करता येते. तसेच केवळ शेतकरीच नव्हे तर उत्साही अभ्यासूंना हे पाहायला आवडते.
शेतीमधल्या प्रयोगांबरोबरच उद्योगातल्या नव्या संधी शोधण्यासाठी उद्योजकही देशविदेशांची सैर करतात. भारतातील उद्योजक चीन, कोरिया, तसेच नायजेरियासारख्या आफ्रिकन देशात, मध्यपूर्वेत जातात. भारतातही गुजरात, कर्नाटकसारखी राज्ये उद्योगांच्या परिषदा आयोजित करतात त्याला परदेशातील व देशातील उद्योजक हजेरी लावतात.
वॉकिंग टूर्स
एखाद्या शहरात, गावात पायाचे तुकडे पडेर्पयत चालणो आणि चालताचालता माहिती घेणो हल्ली खूप लोकांना आवडते. तीच ती वॉकिंग टूर! सोबत स्थानिक गाइड असतो आणि अन्य भटकेही! वाराणसीमधील सर्व घाटांना भेटी देऊन त्यांचे महत्त्व-इतिहास जाणून घेणो, व्हॅटिकनसारख्या प्राचीन गावाची फेरी, जेरूसलेममध्ये येशू ख्रिस्ताला क्रुसावर चढविले ते स्थळ, अल अक्सा मशीद, शोक करण्याची भिंत दाखविणो अशा वॉकिंग टूर्स प्रसिध्द आहेत. भारतामध्ये अशा चालत जाऊन करण्याच्या टूर्स पर्यटकांना भावी काळात आकर्षित करू शकतील.
वॉकिंग टूर्समध्ये फोटोटूरचाही समावेश होतो. फोटोग्राफी आवडणा:या पर्यटकांना किंवा छायाचित्रकारांना घेऊन चालत असे दौरे केले जातात. त्यामध्ये निसर्गपर्यटन, वाघ पाहण्याची सफर किंवा सकाळच्या वेळात फुलपाखरांना कॅमे:यात टिपण्याची संधी मिळते.
खाद्यभ्रमंती
कित्येक गावे, शहरे खाद्यपदार्थासाठी प्रसिद्ध असतात किंवा एखाद्या प्रक्रिया उद्योगासाठी. आता स्ट्रीटफूड खाण्याचाही नवा ट्रेण्ड आला आहे. त्यामुळे मोठय़ा हॉटेलांसह स्ट्रीटफूडलाही चांगले दिवस आले आहेत.
नाशिकमध्ये द्राक्षांपासून वाईन तयार करणा:या विनयार्ड्समध्ये भेट देऊन वाईन निर्मितीचा उद्योग व प्रक्रिया पाहायला मिळते.
अशा अनेक गोष्टी पर्यटन, शेती आणि उद्योग यांच्या मिलाफातून करता येऊ शकतात. कित्येक लोकांना गूळ कसा तयार होतो, साखर कशी तयार होते हे पाहायचे असते. अनेकांनी काकवी केवळ औषध म्हणून वापरलेली असते. कोल्हापूर-सांगलीसारख्या ऊस उत्पादक जिल्ह्यांमध्ये अशा ज्ॉगरी टूर्स सुरू करता येतील.
एखादा स्थानिक पदार्थ पर्यटकांना त्यांच्या वेळेनुसार व सोयीनुसार शिकवण्याचा समावेश त्या टूरमध्ये केला तर त्याचाही वेगळा आर्थिक लाभ होऊ शकतो. पुरणपोळी, मिसळ, उकडीचे मोदक नुसते खाण्यापेक्षा ते तयार करताना पाहायला व जोडीने शिकायलाही मिळेल.
होम-स्टे
आधुनिकीकरणाच्या थोडय़ा पुढच्या टप्प्यात गेलो की यंत्रे आणि त्याचत्याच खाण्याचा कंटाळा येतो. एकेकाळी लोक पर्यटनाला निघाले की तेथील हॉटेलांची मेनूकार्डे मागवत असत व तेथे काय खायचे हे आधीच ठरवत असत; मात्र त्यात वेगळेपण काहीच नसे. आता यात आमूलाग्र बदल होत आहेत. हॉटेलमध्ये राहण्याऐवजी स्थानिकांच्या घरातच राहण्याला खूपजण पसंती देतात. आपण जातो तिथल्या लोकांचे आचारविचार, राहण्याची पद्धती, आवडीनिवडी, वाचन-कला-संगीत, संस्कार समजून घेण्याचा किती छान मार्ग!
खुशियोंका काफिला
तुम्ही ‘स्वदेस’ चित्रपटातील शाहरूख खान आणि मकरंद देशपांडे यांच्यावर चित्रित झालेले ‘यूंही चला चल राही’ हे गाणो पाहिले असेल किंवा ‘शमिताभ’मधील सर्व सोयींनी सज्ज अशी व्हॅन पाहिली असेल. आजकाल अशा सर्व सोयी असलेल्या आरामदायी गाडीतूनही प्रवास केला जातो. त्याला कॅराव्ॉन टूरिझम असे म्हटले जाते. कॅराव्ॉन याचा अर्थ काफिला, तांडा. पूर्वीच्या काळी तांडे ज्याप्रमाणो आवश्यक गोष्टी घेऊन प्रवास करत, तशाच या गाडय़ाही आवश्यक ती सर्व साधने बरोबर घेऊन प्रवास करतात. परदेशी पर्यटक, वयोवृद्ध माणसे तसेच कुटुंबासहित प्रवास करायला आवडणारे लोक हा पर्याय निवडतात. टीव्ही, खाण्याच्या वस्तू, फ्रीज अशी साधने तसेच शौचकुपाची सोय असल्यामुळे रस्ता असेल तेथे कोठेही प्रवास करता येतो. त्यामुळे आता हळूहळू कॅराव्ॉन टूरिझमला मागणी वाढत आहे.
बाइक टूर्स
रेल्वेची, विमानाची तिकिटे मिळविण्याची कटकट सोडून मनाप्रमाणो हवे तेथे भटकता यावे यासाठी आता मोटरसायकलवरून दूरवर फिरायला जाणारे पर्यटक दिसू लागले आहेत. हे पर्यटक गंतव्य स्थानी जाताना वाटेतील गावांतील पाहुणचाराचा, स्थानिक खाद्यपदार्थाचा आस्वाद घेत तसेच संस्कृतीची ओळख करून घेत प्रवास करतात. आजकाल एखादा खंड किंवा जगभ्रमंतीला मोटरसायकलवरून जाणा:यांची संख्याही वाढली आहे. मोटरसायकल प्रवास एकटय़ाने, दोघांनी किंवा अनेक मोटरसायकलस्वारांचा गट असाही केला जातो.
हिरव्या जंगल-वाटा
पर्यावरणातील नवे बदल किंवा पर्यावरण रक्षणाच्या मोहिमा हेदेखील पर्यटनाचे नवे मार्ग झाले आहेत. पक्षी अभयारण्यात हंगामी पक्ष्यांना पाहण्यासाठी किंवा ऑलिव्ह रिडलेच्या नव्या चिमुकल्या पिढीचे स्वागत करण्यासाठी समुद्रकिना:यांवर हल्ली मोठी गर्दी होते. फ्लेमिंगो पाहण्याची संधीही विविध खाडय़ांजवळ पर्यटक घेतात. ठरावीक हंगामात उमलणारी फुले पाहणो, जंगल सफारी, स्कुबा डायव्हिंगसाठीही पर्यटक आवडीने जातात.
सिनेमा आणि कादंबरीच्या ‘गावा’त.
तुम्ही स्वित्ङरलडमध्ये गेलात तर यश चोप्रांच्या सिनेमातल्या कहाण्यांमधून शाहरूखच्या वाटा शोधत तुम्हाला घेऊन जाणा:या ‘बॉलीवूड टूर्स’ प्रसिध्द आहेत. सिनेमात दिसलेली ठिकाणो, कादंबरीत वर्णने झालेले प्रदेश प्रत्यक्ष अनुभवायला जाण्याची हौसही वाढते आहे.
मुंबईचे वर्णन असणारी ‘शांताराम’ सारखी जगप्रसिध्द कादंबरी वाचून मुंबईत येणारे आणि गेटवे ऑफ इंडियाच्या आधी कफ परेडच्या झोपडपट्टीत जाणारे पर्यटक खूप आहेत.
कान्ससारख्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांना जगभरातून लोक जातात. रामोजी फिल्म सिटीमध्ये चित्रपटाचे चित्रीकरण पाहण्यासाठी तसेच मोठ्ठाले सेट्स पाहण्यासाठीची टूर प्रसिध्द आहे.