संघर्षाची जातकुळी एकच

By Admin | Updated: November 8, 2015 18:59 IST2015-11-08T18:59:05+5:302015-11-08T18:59:05+5:30

विविध क्षेत्रंत मदरुमकी गाजवणा:या आणि स्वकर्तृत्वाने उजळून निघणा:या महिलांना लोकमतने नुकतेच व्यासपीठ दिले.

Junket of struggle is the only one | संघर्षाची जातकुळी एकच

संघर्षाची जातकुळी एकच

 - हिनाकौसर खान-पिंजार

विविध क्षेत्रंत मदरुमकी गाजवणा:या आणि स्वकर्तृत्वाने उजळून निघणा:या महिलांना लोकमतने नुकतेच व्यासपीठ दिले. 
त्यांनी त्यांचे जगणो उलगडत, मनमोकळा संवाद साधला. 
 त्या सा:यातून संघर्षाचा समान प्रवास उलगडत गेला. 
त्यातून त्यांच्या जगण्याचा एक नवा आयाम समोर आला. 
तिच्या नजरेतून दिसणा:या त्या जगाविषयी..
डॉक्टर, वकील, पोलीस, प्रशासकीय अधिकारी, राजकीय, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक, साहित्यिक अशा विविध क्षेत्रंतील महिलांना अर्थात दुर्गाना नवरात्रीनिमित्त लोकमतने पाचारण केले आणि त्यांच्याशी संवाद साधला. विविध स्तरांतील या महिलांच्या जगण्यातून, त्यांच्या संघर्षातून विविध प्रकारची माहिती, मते, विचार समोर येतील अशी अपेक्षा होती. मात्र आवजरुन अधोरेखित करावी अशी बाब म्हणजे म्हणजे या महिलांचे क्षेत्र विविधांगी असले, व यशांच्या कथा निराळ्या असल्या तरी त्यांच्या लढायांची, संघर्षाची जातकुळी एकसारखीच होती. एकाच मुशीतून तयार होऊन निघाव्यात अशाच या सा:या कर्तृत्वशालिनी! त्यांनी सांगितलेले अनुभव आणि संघर्षाच्याच वाटचालीचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.  
सिद्ध करण्याची धडपड
करिअरमध्ये आपली घडी बसविलेल्या या महिलांकडून वारंवार कळत होतं, की आजही प्रत्येक क्षेत्रत स्वत:ला सिद्ध करावं लागतं. खरतर आयुष्यात पुढे जायचे असल्यास स्त्री असो वा पुरुष, दोघांनाही स्वत:ला सिद्ध करावेच लागते. मग महिलांना का बरं असं सिद्ध करण्याविषयी पोटतिडकीनं सांगावसं वाटतंय. 
त्या जे सांगत होत्या ते काही इतकं साधं सरळं नक्कीच नव्हतं आणि प्रत्येक जण जेव्हा सांगत होतं की हो सिद्ध करावं लागतं तर त्याचा खोलात जाऊन विचार करणं भागच होतं. खोलात गेल्यावर लक्षात आलं, की स्त्री आणि पुरुषांना एकाच वेळी समान संधी दिली असेल तर पुरुषांना त्याच्या कनिष्ठांना काहीही सांगावं लागत नाही. तो नियुक्त असलेल्या पदावरून त्याला तातडीने स्वीकारले जाते. 
याउलट ‘तिची’ जर त्याच पदावर नियुक्ती केली असेल तर त्या पदानुसार येणा:या जबाबदा:या पेलण्याआधी तिला तिच्या कनिष्ठांना हे पटवून द्यावे लागते, की या पदासाठी ‘केपेबल’ आहोते.  
 
‘सुपरवूमन’ सिंड्रोम
करिअर बनू लागले तरी तिच्यावरील घराची जबाबदारी सुटत नाही.  कितीही दमल्या-भागल्या तरी घरासाठी त्यांना सगळी तयारी ही करावीच लागते. मुळात आपल्याकडे ‘वर्किंग वूमन’साठी सुसज्ज ‘सपोर्ट सिस्टिम’च नाही. त्याचा फटका अर्थात तिलाच अधिक बसतो. 
करिअर आणि घराची सांगड घालताना आजही स्त्रियांना खूपच तारेवरची कसरत करावी लागते. ‘सुपरवूमन व्हायचं म्हणून बायका अहोरात्र धावत असतात, मेहनत करत असतात. स्वत:ची काळजी विसरून घरासाठी झोकून देण्याची वृत्ती तर जुनीच आहे पण आता करिअरमध्येही ‘बेस्ट’ आणि घरातही ‘बेस्ट’ देण्याच्या धांदलघाईत त्या स्वत:ची पुरती आबाळ करतात. आपल्याला ‘सुपरवूमन सिंड्रोम’च झालाय हे लक्षातच येत नाही.   
 
जबाबदारी टाळणारी पुरुषीवृत्ती
काळ बदललाय तस तसा स्त्री-पुरुषांकडे पाहण्यातही बदल होत चालला आहे. दोघे दोन टोकावर नाही दिसणार. त्या अर्थी स्त्री-पुरुष भेद हा ब:याच अंशी कमी झाल्याचे संवादातून जाणवत होते. तरीही अजून लांबचा पल्ला गाठायचा आहेच! घरातही हा भेद तितकासा गळून पडला नाही. 
 
खोटय़ा पुरुषार्थाच्या आहारी
आजकालच्या तरुणीही पुरुषांसारखे वागण्यालाच समानता मानतात. सिगारेटी फुंकल्या, दारू प्यायले, नववारी नेसून बाईक्स फिरवल्या, की पुरुषांशी केवळ बरोबरी होऊ शकते. समता आणि समानता या शब्दांतच फरक आहे. मुळात पुरुषांनीही या बाबी केल्या तरीही तो खोटाच पुरुषार्थ आहे त्यामुळे खोटेपणाशी बरोबरी करण्यापेक्षा, शिक्षण, विचार या अंगाने स्त्रियांनी सक्षम व समर्थ होण्याची गरज आहे. आपल्या जगण्यात ‘अर्थ’ आला म्हणून लगेच अर्थपूर्ण जगणो होत नाही त्यासाठी मेहनत घ्यावीच लागेल. 
 
बट गाईज आर चेंजिंग
करिअर करणा:या स्त्रियांना हे पक्कं जाणवू लागले आहे, की गाईज आर चेंजिंग! ऑफिस, कंपन्यांमध्ये तर स्त्री-पुरुष हा भेद फारसा गळून पडला नसला तरीही तरुण-पुरुष बदलू लागले आहेत आणि हे प्रत्येक क्षेत्रत घडत आहे. त्यांच्या ऊर्मीला पंख मिळालेले आहेत आणि त्यासाठी आकाश मोकळे करून देण्यासाठी पुरुषांनीही सुरुवात केली आहे. 
या बदलाचा फक्त वेग वाढविण्याची गरज आहे. 

Web Title: Junket of struggle is the only one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.