शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
2
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
3
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
4
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
5
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
6
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
7
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
9
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
10
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
11
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
12
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
14
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
15
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
16
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
17
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
18
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
19
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
20
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते

औद्योगिकीकरण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2020 6:03 AM

माणसानं वाफेच्या इंजिनाचा शोध लावला आणि  मानवी उत्क्र ांतीच्या प्रवासाला एक अद्भुत वळण मिळालं.  डिझाइनचा प्रवासही एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचला.  याआधी दोन महत्त्वाच्या वस्तूंचं डिझाइन माणसानं केलं होतं, ते म्हणजे घड्याळ आणि प्रिंटिंग मशीन.  ज्यामुळे माणसाची वाटचाल यांत्रिकतेच्या दिशेने सुरू झाली. औद्योगिकीकरणाचा वेगही त्यामुळे झपाट्यानं वाढला. 

ठळक मुद्देघडणार्‍या, मोडणार्‍या, नव्याने घडणार्‍या,  सतत बदलणार्‍या ‘आकारां’च्या दुनियेतला  विचार आणि शास्र

- हृषिकेश खेडकर

कारखान्याच्या चिमण्यांमधून येणारा धूर, यंत्रांचा आवाज, कारखान्यांमधून बाहेर पडणारे दूषित पाणी, औद्योगिक वसाहतींच्या बाजूला तयार झालेल्या झोपडपट्टय़ा, तर दुसरीकडे काम मिळण्याच्या अनेक संधी, सर्व प्रकारच्या वस्तूंनी भरून वाहणार्‍या बाजारपेठा आणि आधुनिक जीवनशैलीला पूरक उद्योगधंदे, अशा विरोधाभासी दोन रंगात रंगवलेलं औद्योगिकीकरणाचं हे चित्र आज जगातील कुठल्याही शहरात पहायला मिळतं. फरक दिसतो तो फक्त उद्योगधंद्यांच्या प्रकारात आणि संख्येत. प्रगतीचा मूलमंत्र म्हणजे औद्योगिकीकरण, असा एक समज गेल्या शतकात संपूर्ण जगात उदयाला आला आणि माणसाच्या जगण्याला एक अद्भुत वळण मिळालं. आजची आपली डिझाइनची गोष्ट प्रगतीच्या या मूलमंत्राचा शोध घेत आपल्या भोवतालच्या भौतिक संस्कृतीचे विविध पैलू मांडण्याचा प्रयत्न करेल. चला तर मग बघुयात डिझाइन आणि औद्योगिकीकरण यांचं नक्की नातं तरी काय आहे?.डिझाइनची आजची गोष्ट सुरू होते अठराव्या शतकात इंग्लंडमधून. त्या काळातील सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती या गोष्टीमागचं मुख्य कारण म्हणता येईल. शेती करत स्थिरावलेल्या डिझाइनच्या गोष्टीतील माणसाच्या गरजा आता वाढायला लागल्या आहेत आणि म्हणूनच सतराव्या शतकात माणसाने शेतीसाठी कृत्रिम खतांचा वापर चालू केला. यामुळे कृषिक्र ांती घडून आली आणि सतराव्या शतकात इंग्लंडमध्ये मोठय़ा प्रमाणात धान्य उत्पादन केले गेले. प्राथमिक गरजेची निकड इतक्या मोठय़ा प्रमाणात भागली गेल्यामुळे तेथील नागरिक स्थिरावले आणि सर्जनशील उद्यमाकडे कल वाढू लागला. अठराव्या शतकात इंग्लंडची लोकसंख्या दुपटीने वाढली आणि लोकांचा शहराकडे ओघ सुरू झाला. वाढणार्‍या या लोकसंख्येबरोबर भौतिक गरजांचं प्रमाण वाढलं आणि त्या पूर्ण करण्यासाठी पारंपरिक पद्धतीने हस्तकौशल्य वापरून वस्तू बनवणारे उद्योग कमी पडू लागले. कमी किमतीत, कमी वेळेत आणि मोठय़ा प्रमाणात वस्तू बनवणे ही काळाची गरज बनली. त्याचबरोबर उपलब्ध असणारे नवीन शक्तिस्रोत, नवीन साधनसामग्री, यंत्रसामग्री आणि मानवसंपत्ती या सगळ्याचा एकत्रित परिपाक बनून औद्योगिकीकरणाची मुहूर्तमेढ रोवली गेली.औद्योगिकीकरणात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारे यंत्र म्हणजे माणसाने डिझाइन केलेले वाफेवर चालणारे इंजिन. 1710साली लोखंडी सामानाची खरेदी-विक्र ी करणार्‍या थॉमस न्यूकॉमन नावाच्या एका  ब्रिटिश माणसाने कोळशाच्या खाणीत साठणारे पाणी काढण्यासाठी कमी क्षमतेच्या पाण्याच्या वाफेवर चालणार्‍या इंजिनाची निर्मिती केली. 1763 ते 1774 या काळात प्रसिद्ध शास्रज्ञ जेम्स वॉटने जास्त क्षमतेचे वाफेवर चालणारे इंजिन बनवण्याचे अनेक असफल प्रयत्न केले. अखेरीस 1776 चाली मॅथ्यू बोल्टन नावाच्या उद्योजकाच्या मदतीने जेम्स वॉटने केलेले प्रयत्न फळाला आले आणि अतिशय शक्तिशाली आणि उत्तम कार्यक्षमता असणारे वाफेचे इंजिन बनवले गेले. या इंजिनाने मानवी उत्क्र ांतीच्या प्रवासाला एक अद्भुत वळण दिले आणि डिझाइनची गोष्ट एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचली. ही गोष्ट पुढे नेण्यापूर्वी याआधी घडलेल्या दोन महत्त्वाच्या वस्तूंचा उल्लेख इथे प्रकर्षाने केला पाहिजे. एक म्हणजे घड्याळ आणि दुसरे प्रिंटिंग मशीन. औद्योगिकीकरणाला सुरु वात होण्यापूर्वी ही दोन यंत्रे मानवी उत्क्र ांतीच्या इतिहासात बर्‍याच आधी आलेली आढळतात. वेळ मांडण्याचे शास्र आणि पद्धती जरी माणसाला अनेक शतकांपासून अवगत असली तरी यांत्रिक पद्धतीने वेळेची मांडणी करणारे घड्याळ साधारण तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात बनवले गेले. तर 1440 साली जोहानस गटेनबर्ग नामक र्जमन भिक्षूने बायबल ग्रंथाच्या प्रती छापण्यासाठी लाकडात कोरलेल्या अक्षरांची जुळणी करून कागद आणि शाईच्या वापराने यांत्रिक छपाईचे तंत्रज्ञान विकसित केले. या दोन गोष्टी निव्वळ वस्तू किंवा शोध नसून मानवी उत्क्र ांतीच्या इतिहासातले दोन महत्त्वाचे टप्पे आहेत; ज्यामुळे माणसाची वाटचाल यांत्रिकतेच्या दिशेने सुरू झाली.औद्योगिकीकरण घडून येण्यासाठी तीन महत्त्वाच्या गोष्टी कारणीभूत होत्या असे म्हणता येईल - 1. माणसाची जागा यंत्रांनी घेतली. 2 इंधनशक्ती इतक्या मुबलक प्रमाणात उपलब्ध होती की माणसांचा उपयोग कारखान्यांमध्ये केवळ मजूर म्हणून करणे शक्य झाले आणि 3. शक्तीची उपलब्धता वाफेच्या इंजिनामुळे प्राणी आणि पाण्यावर अवलंबून न राहता गरजेच्या ठिकाणी सहज पोहोचवता येऊ शकली. या घटनेमुळे लंडन, शिकागो, न्यू यॉर्क, बोस्टन यांच्यासारख्या शहरांचा कायापालट झाला आणि पुढे जागतिकीकरणाचे पर्व सुरू झाले. अठराव्या शतकाच्या शेवटी वाफेवर चालणार्‍या इंजिनामध्ये अनेक सुधारणा होत गेल्या आणि त्याचा वापर अनेक कारणांसाठी केला जाऊ लागला. जसा की कापूसकताईसाठी बनवलेल्या मागावर या इंजिनाचा उपयोग करून माग अधिक कार्यक्षम बनवला गेला आणि हातमाग चालवणारा कुशल कारागीर शेवटी आधुनिक यंत्रमागाचा मजूर बनून राहिला. दुसरा महत्त्वाचा उपयोग म्हणजे रेल्वे इंजिन; ज्यामुळे अंतराची परिभाषा बदलली आणि जग खर्‍या अर्थाने जवळ येऊ लागले. औद्योगिकीकरणाचा आणखी एक महत्त्वपूर्ण फायदा म्हणजे त्याने जगाला दिलेले दोन मौलिक साहित्य  लोखंड आणि स्टील. स्टीलचा उपयोग अनेकविध प्रकारांनी पुढच्या शतकात सतत चालूच होता; पण परिचित असलेलं लोखंड अब्राहम डार्बीने जसे वापरले त्याने या साहित्याबद्दलच्या परिसीमा बदलल्या. उच्चतापमानाला वितळलेले लोखंड मेणाच्या साच्यांमध्ये घडवून अतिशय उत्तम प्रकारची स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारी भांडी त्याने बनवली. ओतीव लोखंडापासून बनवलेल्या या पद्धतीला ‘कास्ट आयर्न’ असे नाव दिले गेले आणि इतकेच नाही तर कोलब्रुकडेल येथे राहणार्‍या अब्राहम डार्बीने लोखंडापासून वस्तू बनवण्याच्या पद्धतीचे हक्क म्हणजेच पेटंट स्वत:च्या नावावर करून घेतले.औद्योगिकीकरणाच्या या काळात इंग्लंडच्या वसाहती एका बाजूला वाढत होत्या, तर दुसरीकडे इंग्लंडची सगळ्यात मोठी परदेशी वसाहत राणीच्या जाचातून मुक्त होऊ पाहत होती आणि आठशेच्या शतकात एका नव्या राष्ट्राचा उदय झाला; तो देश म्हणजे आजची जागतिक महासत्ता  युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. औद्योगिकीकरणाचं हे वारं अमेरिकेत लवकर पोहोचलं आणि म्हणता म्हणता अख्खा देश या वार्‍यात वाहू लागला. सत्तेचे विकेंद्रीकरण सुरू झाले आणि औद्योगिकीकरणाचा उपयोग सीमासुरक्षेसाठी बनवण्यात येणार्‍या बंदुका आणि काडतुसांच्या उत्पादनात केला जाऊ लागला. एली व्हीटनी नामक एका अमेरिकी शोधक आणि उद्योजकाने कनेक्टिकट येथील त्याच्या कारखान्यात दोन वर्षांत दहा ते पंधरा हजार बंदुका बनवून एक मापदंड तयार केला. त्याने लढवलेल्या शकलेत बंदुकीचे विविध भाग राज्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी बिनचूकरीत्या बनवून न्यू हेवन, कनेक्टिकट येथील त्याच्या कारखान्यात एकत्र म्हणजेच असेम्बल केले गेले. या काम करण्याच्या पद्धतीने कामाचे विकेंद्रीकरण होऊन मोठय़ा प्रमाणात वेळेची बचत साधली गेली, ज्यामुळे उत्पादन अनेक पटींनी वाढले. त्याच्या या पद्धतीला आजही निर्मितीची अमेरिकी पद्धत म्हणून संबोधले जाते. डिझाइनच्या जगावर निर्मितीच्या या निष्णात पद्धतीचा प्रभाव आजही आपण अनुभवतो. (क्र मश:)hrishikhedkar@gmail.com(लेखक वास्तुरचनाकार आणि प्रॉडक्ट डिझायनर आहेत)