शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

जय हिंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 6:04 AM

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये ‘इंडिया’ला रिप्रेझेण्ट करणाऱ्या ‘भारता"च्या आई-वडिलांशी गप्पा

ठळक मुद्देऑलिम्पिक स्पर्धा प्रत्यक्ष सुरू होण्यापूर्वी हा खास मानाचा सलाम, चिवट जिद्द आणि जगण्याला भिडण्याची सच्ची कळकळ असणाऱ्या ऑलिम्पिकपटूंना, त्यांच्या पालकांना आणि प्रशिक्षकांनाही..!

- मंथन टीम

गावखेड्यातला-छोट्या शहरातला-मध्यमवर्गीय घरातला-नन्नाचा पाढा ऐकतच जगणारा हा ‘भारत’. तो त्याच्याही नकळत पाहू लागतो स्वप्न. ती स्वप्नं ‘जिंकण्याची’ नसतात, ती असतात मनासारखं जगण्याची.

जो खेळ, जी आव्हानं आपल्याला हाका मारतात, आपली रग जिरवतात त्या साऱ्याला भिडायची जिद्द एवढ्याच भांडवलावर सुरू झालेला असतो हा प्रवास..

त्याला ना मोटिव्हेशनल भाषणांचं ग्लॅमर असतं, ना ‘फोकस्ड’ राहून, प्लॅन एबीसीडीची बाराखडी कळलेली असते.

 

तिथं असतं फक्त त्या त्या क्षणातलं जगणं, आहे तो क्षण ‘आपला’ करण्याची साधी-निरागस हाक..

त्या हाकांना ‘ओ’ देणारे हे तरुण. ‘भारतातले’. ते आज ऑलिम्पिकमध्ये ‘इंडिया’चं प्रतिनिधित्व करायला टोक्योत दाखल झाले आहेत..

हा ‘भारत’ तिकडे ‘इंडिया’ला रिप्रेझेण्ट करायला सज्ज झालेला असताना इकडे त्यांच्या जगण्याचा एक तुकडा, या खेळाडूंचे पालक, भाऊ, प्रशिक्षक हे सारे ‘वर्तमानात’च आहेत. कुणी आजही शेतात राबतं आहे, पावसाळी कामांना वेग आला आहे. कुणी नाकासमोर नोकरीला जातं आहे आणि आपलं लेकरू जिंकून आलं की निदान चार दिवस तरी त्यानं आपल्यापाशी रहावं, त्याला गोडाधोडाचे चार घास करून खाऊ घालावेत या आशेवर लेकराची वाट पाहतं आहे..

ऑलिम्पिक खेळायला गेलेल्या पथकातल्या खेळाडूंची यादी काढून पहा, तुम्हाला हा ‘भारत’ दिसेल. जिथं तीन लेकरांची आई, मणिपूरची मेरी कोम आपली सारी जिद्द एकवटून पुन्हा ऑलिम्पिक पदकावर दावा सांगत भारतीय पथकाचं नेतृत्त्व करणार आहे. मणिपूर ते टोक्यो या प्रवासात तिच्यातली पुन्हा पुन्हा कमबॅक करायला लावणारी आग इम्फाळमधल्या गारढोण कर्फ्युवाल्या अंधाऱ्या रात्रींनी अजूनही कायम ठेवलेली आहे. आणि पाठीशी उभा आहे तिचा नवरा, "तीन मुलांकडे मी पाहतो तू हो पुढे " म्हणणारा..आणि आपण कसे बायकोला ‘सपोर्ट’ करतोय याचं कुठलंही प्रदर्शन कधीच न मांडणारा !

आसामची लव्हलीना बोरगोहीन लॉकडाऊन काळात आईवडिलांसह भातशेतीत राबत होती. आईची तब्येत बिघडली तर दवाखान्याच्या वाऱ्या करत, तिला आराम देत स्वयंपाक करत होती. म्हणाली," प्रॅक्टिस तर करणारच पण आईसाठी भातकालवण रांधते आधी !" तिच्या आईवडिलांना तर आपली बॉक्सर लेक ऑलिम्पिक क्वालिफाय झाली हे माहीत होतं, पण त्यांचं साधं-शांत घर. तिथं ना कसला ‘शो-शा’, ना कसला रुबाब.

- ही अशी कहाणी ऑलिम्पिकला गेलेल्या प्रत्येक खेळाडूची सांगता येईल. पण त्या कहाण्या म्हणजे टीपीकल ‘यशोगाथा’ नव्हेत. नाहीतच. तर त्या आहेत ठेचा लागत, पाय रक्ताळले तरी पुन्हा पुन्हा उभ्या राहत, बोटाला चिंध्या बांधून अपयशाच्या धाग्यातून विणलेल्या कष्टाच्या कहाण्या.

पण फक्त हिरो-हिरॉइन म्हणून या कहाण्या या खेळाडूंच्याच कशा असतील?

त्या त्यांच्या पालकांच्या आहेत, त्यांच्या प्रशिक्षकांच्या, भावाबहिणीच्या, अगदी मदतीला धावणाऱ्या शेजाऱ्यांच्या, प्राथमिक शिक्षकांच्याही आहेत.

महाराष्ट्रातून ऑलिम्पिक पात्र ठरलेल्या खेळाडूंच्या पालकांशी म्हणून ‘लोकमत’ने हा खास संवाद साधला..

टीव्ही चॅनल्स आणि पेपरवाल्यांना चमकदार बाइट द्यायला सरावलेले नाहीत हे पालक, ते आजही आपल्या रोजच्या जगण्यातलं रुटीन चालवतात. ना आपल्या लेकरांविषयी फार बोलतात, ना कर्तबगारीविषयी.

त्यांना भेटलो, फोन केले. तर उत्तरं तुटक मिळतात, काय बोलावं कळत नाही सांगतात.. आजवरच्या कष्टांचं भांडवल करत नाही की, आम्ही किती सोसलं हेही सांगत नाहीत.

सांगतात एवढंच की, मुलांनी त्यांची वाट निवडली.. आम्ही सोबत होतो, कधी लांबून पाहिला प्रवास..कधी कमी पडलो, चिडलो-रडलो-भांडलोही.

काही घरांना तर आपल्या मुलानं कुठली स्पर्धा जिंकली, हे ऑलिम्पिक काय फार मोठंसं असतं हेच माहिती नाही, विदेशातल्या स्पर्धेला नेहमीसारखं पोर गेलंय, असंच त्यांना वाटतं आहे. मुलांनी मेडल जिंकून आणावं असं वाटतं, पण त्याचं प्रेशर नाही.. ना अट्टहास.

म्हणून तर ऑलिम्पिकहून परत आल्यावर पहिलं काम काय करणार असं विचारल्यावर एक वडील म्हणाले, खांद्यावर घेऊन गावभर फिरणार त्याला !

- अशी साधी ही माणसं.

ऑलिम्पिक स्पर्धा प्रत्यक्ष सुरू होण्यापूर्वी हा खास मानाचा सलाम, चिवट जिद्द आणि जगण्याला भिडण्याची सच्ची कळकळ असणाऱ्या ऑलिम्पिकपटूंना, त्यांच्या पालकांना आणि प्रशिक्षकांनाही..!

ऑलिम्पिकमध्ये एक्सलन्स, आणि तिथं पदक जिंकणं म्हणजे एक्सलन्समधलं परफेक्शन. त्याहीपलीकडे जात जगण्यावर आणि मानवी क्षमतांवरच्या अखंड विश्वासाचं प्रतीक..म्हणजे ऑलिम्पिक !

‘इंडिया’ला रिप्रेझेण्ट करणाऱ्या ‘भारता"चं रूप तरी याहून वेगळं काय आहे?

त्यांना शुभेच्छा !

जय हिंद !