ओळख इतिहासकारांची - विल्यम हंटर
By Admin | Updated: December 18, 2014 23:33 IST2014-12-18T23:28:32+5:302014-12-18T23:33:44+5:30
विल्यम हंटर यांच्या (William Hunter) History Of british india, Rulers Of India, ' The Annals of Rural Bengal, The Indian Muslman'

ओळख इतिहासकारांची - विल्यम हंटर
प्रा. श्रुती भातखंडे ,(लेखिका इतिहासाच्या अभ्यासक आहेत.) -
विल्यम हंटर यांच्या (William Hunter) ्History Of british india, Rulers Of India, ' The Annals of Rural Bengal, The Indian Muslman' या ग्रंथांमध्ये सातत्याने ब्रिटिशांच्या भारतावरील सत्तेचे सर्मथन आहे. विल्यम हंटर याचे साम्राज्यवादी इतिहास-लेखकांमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. History Of British India या ग्रंथात तो म्हणतो, की इंग्लंड हे एक प्रगत आणि चारित्र्यसंपन्न राष्ट्र असल्यानेच इंग्लंडने भारतावर वर्चस्व प्रस्थापित केले. भारतावरील इंग्लंडचा विजय हा राष्ट्रीय विजय असल्याचे तो मानतो. RularsOf India या ग्रंथमालिकेत त्याने २८ व्यक्तींच्या जीवनकार्याचे वर्णन केले. त्यात क्लाइव्ह, हेस्टिंग्ज यांनी परिश्रमपूर्वक, धडाडीने, मुत्सद्देगिरीने, शासनकौशल्याने भारतात ब्रिटिश साम्राज्याचा कसा पाया रचला, याची माहिती आहे. The Annals Of rural Bengal या ग्रंथात ब्रिटिश शासन स्थापनेपूर्वीच्या बंगालचे वर्णन असून, बंगालमध्ये अनाचार, अनागोंदी कारभार व अराजक होते, प्रजा त्रस्त झाली होती.
या स्थितीचे वर्णन असून, ब्रिटिश शासकांनी तिथे कायद्याचे राज्य प्रस्थापित केले, असे त्याने म्हटले आहे. The Indian Muslaman यात ब्रिटिश कूटनीतीची बिजे दिसतात. भारतातील मुस्लिम हे हिंदूहून सर्वस्वी भिन्न आहेत, हे सांगून हंटर याने मुसलमानांना झुकते माप दिले आहे. ब्रिटिश शासकांनी मुस्लिम समाजाकडे अधिक लक्ष दिले पाहिजे, असेही तो सूचित करतो.