शहरं
Join us  
Trending Stories
1
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
2
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
3
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
4
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
5
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
6
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
7
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
8
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
9
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
10
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
11
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
12
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
13
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
14
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
15
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
16
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
17
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
18
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
19
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
20
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक

आय काण्ट ब्रीद..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 06:10 IST

हातात बेड्या घातलेला एक हतबल कृष्णवर्णीय  आणि त्याच्या मानेवर पाय ठेवून मग्रुरीने बसलेला  एक गोरा पोलीस. या आशयाचे प्रसंग  अमेरिकेत नवीन नाहीत, पण यावेळी  घटनास्थळी काही जण प्रत्यक्ष उपस्थित होते,  पोलिसांनी कायद्याच्या आडून खून करू नये  असेही ते निक्षून सांगत होते.  तरीही त्याचा काहीच उपयोग झाला नाही.  जॉर्ज फ्लॉइडच्या खुनामुळे अमेरिकेतला  वर्णद्वेषाचा चारशे वर्षांचा भयंकर इतिहास  पुन्हा एकदा चर्चेत आला आहे..

ठळक मुद्देजॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूचा शोक करणे आणि शक्य त्या मार्गांनी ह्या घटनेचा निषेध करणे एवढेच आपल्या हातात आहे.

- राहुल बनसोडे

मिनीयापोलीस. अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यात पश्चिमेकडे वसलेले एक शांत आणि सुंदर शहर. हे शहर आपल्या सुंदर तळ्यांसाठी, इथल्या हिरवळीसाठी आणि निसर्गरम्य परिसरांसाठी ओळखले जाते. ह्या ओळखीशिवाय मिनीयापोलीसची आणखी एक ओळख आहे ती अमेरिकेतील सर्वात प्रागतिक विचारांचे शहर असल्याची. मिनीयापोलीसमधली एक चतुर्थांश लोकसंख्या स्थलांतरित लोकांची बनलेली आहे. गेल्या वीस वर्षांत ह्या शहराने एक लाखाहून अधिक लोक आपल्यात सामावून घेतले आहेत, इतकेच नाही तर शहरात नव्याने दाखल होणार्‍या लोकांसाठी रोजगाराच्या संधी तयार करणे, लोकांना नवीन जॉब शोधण्यासाठी सहकार्य करणे आणि त्यांना शहरात सेटल होण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यासाठी हे शहर प्रसिद्ध आहे. 2014 साली जॉर्ज फ्लॉइडने पहिल्यांदा ह्या शहरात पाऊल ठेवले तेव्हा त्याला आपला पूर्वइतिहास विसरून आयुष्य नव्याने सुरू करायचे होते. त्याचा जन्म टेक्सास राज्यातला आणि संगोपन नॉर्थ कॅरोलिना राज्यातले. अमेरिकेत कृष्णवंशीय म्हणून जन्म घेतल्यानंतर ज्या कुठल्या त्रासातून जावे लागते त्या सर्व त्रासांमधून जॉर्ज गेला होता. तो आपल्या बास्केटबॉल टीममधला सर्वोत्कृष्ट खेळाडू होता आणि पोटापाण्यासाठी गाड्यांच्या कस्टमायझेशनचे काम करीत असे. कुठल्याश्या अवचित क्षणी तो ड्रग्जच्या गुन्ह्यात पकडला गेला आणि कोर्टकचेर्‍यांच्या त्रासातून वाचण्यासाठी आपला गुन्हा कबूल करून त्याने शिक्षाही भोगली. शिक्षा संपल्यानंतर तो जेव्हा बाहेर आला तेव्हा त्याने आयुष्य नव्याने जगायचे ठरविले. तो पूर्वीपेक्षाही जास्त मेहनत करू लागला, नियमित चर्चला जाऊ लागला आणि स्थानिक स्वयंसेवी संस्थांबरोबर कामही करू लागला. मिनीयापोलीसमध्ये आल्यानंतर तो ट्रकड्रायव्हरचे काम करू लागला आणि फावल्या वेळात रेस्टॉरंटचा सिक्युरिटी गार्ड म्हणूनही त्याने काम केले.दिनांक 25 मे रोजी संध्याकाळी आठच्या सुमारास कपफूड ह्या जनरल स्टोअरमध्ये जॉर्ज सिगारेट्स विकत घेण्यासाठी गेला होता. अमेरिकेत कोविड-19 मुळे मृत पावलेल्यांच्या संख्येने लाखाचा आकडा पार केलेला होता आणि कोरोनाने आणलेल्या आर्थिक संकटामुळे कोट्यवधी लोकांच्या नोकर्‍या गेल्या होत्या, ज्यात जॉर्जचा जॉबही गेला होता. काहीश्या विमनस्क अवस्थेत तो स्टोअरमध्ये शिरला आणि सिगरेट विकत घेऊन बाहेर पडला. जॉर्जने दिलेली वीस डॉलरची नोट नकली आहे असे स्टोअरमध्ये काम करणार्‍या कॅशियरला वाटले आणि त्याने जॉर्जला सिगरेट परत करायला सांगितल्या; ज्याला जॉर्जने नकार दिला. त्यानंतर आठ वाजून एक मिनिटानी स्टोअर कर्मचार्‍याने पोलिसांना फोन करून जॉर्जकडे खोट्या नोटा आहेत, तो खूप दारू प्यालेला आहे आणि त्याचे स्वत:वरचे नियंत्रण सुटले आहे असे सांगितले. ह्या कॉलनंतर अवघ्या सात मिनिटात मिनीयापोलीस शहराचे कुएंग आणि लेन हे दोन पोलीस तिथे पोहचले आणि त्यांनी जॉर्जच्या अल्पशा प्रतिरोधानंतर त्याला अटक केली. त्याला बेड्या घालून रस्त्याच्या कडेला बसविण्यात आले आणि नंतर पोलिसांच्या व्हॅनकडे घेऊन जाण्यात आले. न उघडल्या जाणार्‍या कार किंवा गाड्यांच्या मागच्या भागात बसण्याची अनेकांना भीती वाटते ज्याला क्लास्ट्रोफोबिया असे म्हणतात. जॉर्जने पोलिसांना आपल्याला क्लास्ट्रोफोबिया असल्याचे सांगितले, ज्याचा सरळ अर्थ त्याला व्हॅनमध्ये पुढे बसवावे असा होता. त्याच्या ह्या विनंतीला न जुमानता तो पोलीस व्हॅनमध्ये बसण्यास नकार देतो आहे अशा स्वरूपाचा गुन्हा त्याच्या नावाने नोंदविण्यात आला. आठ वाजून तेरा मिनिटांनी तिथे पोलिसांची आणखी एक कार आली, ज्याद्वारे फ्लॉइड ज्या कारमध्ये बसलेला होता त्या कारवर पहारा लावला गेला. आठ वाजून सतरा मिनिटांनी तिथे आणखी एक पोलीस व्हॅन आली ,ज्यात डेरेक मायकेल चॉविन आणि टौ थाऊ हे दोन पोलीस अधिकारी होते. आठ वाजून अठरा मिनिटांनी कुएंग आणि जॉर्जमध्ये अल्पशी झटापट झाली आणि त्यानंतर चॉविनने त्याला व्हॅनमधून खेचून बाहेर काढले आणि बेड्या घातलेल्या जॉर्जला जमिनीवर पाडले.यानंतरचा इतिहास सर्वांना माहीत आहे. 8 वाजून वीस मिनिटांनंतर जे काही झाले त्याची कल्पना करून आणि त्याचे व्हिडीओ पाहून कोट्यवधी लोक आजही अस्वस्थ आणि दु:खी आहेत. जमिनीवर पालथ्या पडलेल्या जॉर्जचे पाय लेनने धरले, कुएंगने त्याची पाठ दाबून धरली आणि डेरेक चॉविनने खाली बसून आपला एक गुडघा जॉर्जच्या मानेवर दाबला. ह्यावेळी तिथे उपस्थित असणार्‍या लोकांनी ह्या घटनेचे मोबाइलमध्ये चित्रण करण्यास सुरुवात केली. जॉर्जचा श्वास अडकत होता आणि तो चॉविनला आपल्या मानेवरून पाय काढण्याची कळकळून विनंती करीत होता, पण भावनाशून्य चॉविनला त्याचे काहीही वाटले नाही. खाली पडलेला तो माणूस आता पूर्णत: हतबल झाला आहे. त्यामुळे त्याला अजून त्रास का दिला जातो आहे, असा प्रश्न तिथे उपस्थित असलेल्या एकाने चॉविनला केला. चॉविनच्या सहकार्‍यांनी त्याला गप्प बसण्यास सांगितले. इकडे श्वासावाचून जॉर्ज तडफडत ‘आय काण्ट ब्रीद’ असे म्हणत होता, त्याचा श्वास जसा आणखी अटकू लागला, तसे तो ‘मम्मा’ अशी निर्वाणीची हाक देऊ लागला. ह्या क्षणाला नेमके काय होणार आहे ह्याचा अंदाज जॉर्जला होता. माझ्या पोटात दुखतेय, माझी मान दुखतेय, खूप दुखतेय, माझा जीव घेऊ नका अशी विनवणी त्याने केली. ह्यानंतर चॉविनने जॉर्जच्या मानेवरचा गुडघा अधिक जोरात दाबला, तो दाबत असताना आपण जॉर्जला मारतो आहोत असेच भाव त्याच्या चेहर्‍यावर होते, त्याचा हा क्रूर आनंद गर्दीतल्या लोकांना स्पष्टपणे दिसून येत होता आणि गर्दीतल्या एकाने त्याला तसे सांगितलेही. जॉर्ज अजून काही सेकंद तडफडत राहिला आणि आठ वाजून पंचवीस मिनिटांनी त्याचा प्राण गेला. थोड्याच वेळात तिथे अँम्बुलन्स आली, पण जॉर्जची नाडी वा ठोके चेक न करता त्याचे निचेष्ट शरीर स्ट्रेचरवर ठेवण्यात आले आणि अँम्बुलन्स इस्पितळाकडे निघून गेली.हतबल झालेला एक काळा माणूस आणि त्याच्या मानेवर पाय ठेवून मग्रुरीने बसलेला एक गोरा पोलीस हा प्रसंग अमेरिकेत तसा अनेकवेळा घडला आहे, पण ह्यावेळी हा प्रसंग घडताना तिथे काही लोक प्रत्यक्ष उपस्थित होते, ह्या प्रसंगाचं व्हिडीओ शूटिंग करीत होते. जिथे हा प्रसंग घडला तिथे काही सिक्युरीटी कॅमेरे लावलेले होते आणि पोलिसाने दिवसाढवळ्या कायद्याच्या आडून खून करू नये असेही काही जण निक्षून सांगत होते. तरीही मायकेल चॉविन आपला गुडघा जॉर्ज फ्लॉइडच्या मानेवर दाबतच राहिला, पार त्याचा जीव जाईपर्यंत.  प्रागतिक विचारांचे शहर मिनीयापोलीससाठी ही घटना अतिशय संतापजनक होती तशीच ती अमेरिकेतल्या इतर परिवर्तनवादी लोकांसाठीही संतापजनक होती. ह्या घटनेमुळे गेली काही वर्षे सातत्याने गोर्‍या पोलिसांकडून कायद्याच्या आडून काळ्या लोकांच्या घडणार्‍या अत्याचाराच्या घटनांचा पाढा पुन्हा एकदा वाचावा लागला. गोर्‍या पोलिसांच्या अत्याचारात काळ्या माणसांचे  ‘आय काण्ट ब्रीद’, मला श्वास घेता येत नाहीये, मला मारू नका हे शब्द जगभरातल्या लोकांच्या जिव्हारी पुन्हा पुन्हा घाव करीत आहेत. हे प्रकरण आता न्यायप्रविष्ट असले आणि त्याची एफबीआयमार्फत रितसर चौकशी सुरू असली तरी प्रत्यक्षदर्शींचे अनुभव आणि व्हिडीओ फुटेज पाहता हा अतिशय थंड डोक्याने केला गेलेला खून आहे ह्याबद्दल प्रागतिक माध्यमांमध्ये एकमत आहे. डेरेक चॉविनवर सेकंड डिग्री र्मडरचा आरोप निश्चित करण्यात आला असून, तो फस्र्ट डिग्री र्मडरमध्ये बदलण्यात यावा ह्यासाठी जगभरातले सामाजिक कार्यकर्ते आणि माध्यमकर्मी प्रय}शील आहेत.जॉर्ज फ्लॉइडच्या खुनाने अमेरिकेतला वर्णद्वेषाचा चारशे वर्षांचा भयंकर इतिहास पुन्हा एकदा चर्चेत आला आहे जो एका लेखापुरता र्मयादित राहू शकत नाही. जगज्जेत्या अमेरिकेच्या काळ्या गुलामीचा इतिहास सांगण्याचा प्रय} पुढच्या रविवारी करण्यात येईल, तोपर्यंत जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूचा शोक करणे आणि शक्य त्या मार्गांनी ह्या घटनेचा निषेध करणे एवढेच आपल्या हातात आहे.  (संदर्भ : द वॉशिंग्टन पोस्ट, द न्यू यॉर्क टाइम्स आणि बीबीसी न्यूज)   (पूर्वार्ध)

rahulbaba@gmail.com(लेखक मानववंशशास्त्राचे अभ्यासक आहेत.)