शंभर वर्षे!
By Admin | Updated: November 8, 2015 18:57 IST2015-11-08T18:57:07+5:302015-11-08T18:57:07+5:30
तीस दिवस? नव्वद दिवस? एकशे आठ दिवस? छे! त्यात काय अर्थ? त्यानं काय होणार?

शंभर वर्षे!
- धनंजय जोशी
तीस दिवस? नव्वद दिवस?
एकशे आठ दिवस?
छे! त्यात काय अर्थ?
त्यानं काय होणार?
शंभर वर्षाच्या शिबिरामध्ये
नाव घालायला हवं!
माङया एका मित्रची गोष्ट !
माझा साधक बंधू तो ! आम्ही एकमेकांबरोबर पुष्कळ ध्यान शिबिरांना गेलो होतो.
तो मला सांगत होता की, आमचा एक दुसरा साधक मित्र त्याला सारखं विचारत होता, ‘तू आपली साधना आणखी खोल का नाही जाऊ देत? तीस दिवसांचं शिबिर कर.
किंवा नव्वद दिवसांचं शिबिर कर.
किंवा एकशे आठ दिवस एकांत-शिबिर का नाही करत तू?
माङया मित्रनं हे एकदा ऐकून घेतलं, दोनदा ऐकून घेतलं! कंटाळला बिचारा ! सारखं ऐकून ऐकून.! कंटाळून तो आमच्या ङोन गुरूंकडे गेला. म्हणाला, ‘काय करू? त्याला काय सांगू?’
ङोन गुरू हसले आणि म्हणाले, ‘तीस दिवस? नव्वद दिवस? एकशे आठ दिवस? छे ! त्यात काय अर्थ? त्याला सांग की, तू शंभर वर्षाच्या शिबिरामध्ये नाव घातलं आहेस म्हणून !’
मला खूप आवडलं ते उत्तर !
‘शंभर वर्षाचं शिबिर’ म्हणजे आपण कायमच शिबिरात आहोत, असं समजून राहायचं!
मग त्याचा खरा अर्थ काय?
खरा अर्थ असा की, किती दिवसांचं शिबिर आणि किती वर्षाची साधना ह्याचा विचार न करता प्रत्येक क्षण ‘विलक्षण लक्ष’ देऊन जगणो!
आपण ‘जिवंत’ असतो पण आपली साधना ‘जिवंत’ असते का? हा प्रश्न आपण प्रत्येक क्षणी विचारायला हवा!
एक ङोन संवाद खूप सुंदर आहे.
संन्यासी आपल्या ङोन गुरूला : ध्यान-साधना म्हणजे काय?
ङोन गुरू : त्याला ध्यान-साधना नाही म्हणायचं.
संन्यासी : त्याला ध्यान-साधना का नाही म्हणायचं?
ङोन गुरू : तू आधी विचारायला पाहिजे की, तुझी साधना ‘जिवंत’ आहे का? इज इट अलाइव्ह? इज इट अलाइव्ह??.
‘जिवंत’ साधना म्हणजे प्रत्येक क्षणाला लक्ष देणारी!
माझा मित्र नील हा नंतर ङोन गुरू झाला.
त्याच्या एका भाषणामध्ये तो म्हणाला, ‘समहाऊ वुई हॅव टु मेक थीस थिंग अलाइव्ह..!’
त्या वाक्यात सगळ्यात महत्त्वाचा शब्द म्हणजे ‘समहाऊ’!
त्याचा अर्थ कसंही करून नव्हे,
तर ‘काही होवो तरी’ असा आहे!