..रट्टा मार!
By Admin | Updated: July 25, 2015 18:17 IST2015-07-25T18:17:32+5:302015-07-25T18:17:32+5:30
शिक्षणाच्या तणावपूर्ण, कोरडय़ा व्यवस्थेत फार फरफट वाटय़ाला आलेले एकतर स्वत:ला मिसफिट मानून कुढत राहतात किंवा मग बंडखोर होऊन व्यवस्थेच्या बाहेर पडतात. त्यांची म्हणून काही ‘खास’ गाणी आहेत.

..रट्टा मार!
>- विश्रम ढोले
आपल्याकडे जून-जुलै महिन्यात दोन प्रकारच्या पालव्या फुटायला लागतात. पाऊस आला असेल तर झाडांना हिरवी पालवी फुटायला लागते आणि दुसरी म्हणजे आधीच्या परीक्षेत पास झाले असेल तर शिकण्यासंबंधीच्या आकांक्षांना पालवी फुटू लागते. पण पावसाने खूप ओढ दिली की जशी कोवळी हिरवी लसलस वाळायला लागते, तशी शिक्षणाच्या व्यवस्थेने स्पर्धेचा जास्त ताण दिला की शिकण्याची आस घटायला लागते. मात्र, शिक्षणाच्या व्यवस्थेतून असे मध्येच बाहेर पडणो मुश्कील असते. मग अशावेळी शिकणो संपते आणि शिक्षण संपण्याची वाट पाहणो सुरू होते. मग शिकण्याची जागा घेते ते ‘रट्टा मार’ नावाचे प्रकरण. पुढे ढकलले जाण्यासाठी मागे लावून घेतलेला एक कोरडा, निर्बुद्ध खटाटोप.
याच रट्टा मार प्रकरणावर 2012 साली एक मजेशीर गाणो आले होते- करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटामधील हे गाणो सांगीतिकदृष्टय़ा ‘ग्रेट’ वगैरे नसले तरी ‘इंटरेस्टिंग’ आहे.
चित्रपटाची कथा एका बडय़ा कॉलेजमधील प्रतिष्ठेच्या शैक्षणिक स्पर्धेभोवती गुंफली आहे. कॉलेजच्या नव्या दिवसांसोबतच ही स्पर्धाही सुरू होते. आणि सुरू होते ते स्पर्धा जिंकण्यासाठीचे रट्टा मार नावाचे प्रकरण. गाण्यामध्ये त्याचेच मजेशीर उल्लेख येत राहतात.
‘प्रेशर कुकर जैसे
सर की न बज जाए सिटी
तबतक मार.
रट्टा मार’
अशा खास कट्टय़ावरच्या भाषाशैलीत हे गाणो सुरू होते. आणि पुढच्याच ओळीमध्ये
‘पटक पटक के सर गिरा दे
नॉलेज की दीवार.
रट्टा मार’
असे म्हणत शिकण्याच्या सध्याच्या व्यवस्थेला मस्त चिमटाही घेते. त्याच शैलीमध्ये मग किताबों के पहाड, जीत का टॉनिक, परफॉर्मन्स की तलवार अशा उपमा वापरत हे गाणो ‘एक ही सोल्यूशन तेरी मुश्कील का’ म्हणून रट्टा मारण्याचा (अपरिहार्य) सल्ला देत राहते. आता चित्रपटाची कथा, त्यातील पात्रं, त्यांचे संदर्भ वगैरे करण जोहरच्या एरवीच्या चित्रपटांसारखेच चकचकीत, सिंथेटिक, उथळ वगैरे आहेत हे खरे! गाण्याचे चित्रीकरणही तसेच आहे. पण रट्टा मार गाण्यातील वर्णन, उपहास आणि विनोदी शैलीआड झाकलेली व्यथा याकडे मात्र फक्त तशाच दृष्टिकोनातून बघता येणार नाही.
थोडी स्वस्तातली आणि सुलभ धाटणीची असली तरी ती आपल्या एकूण शिक्षण व्यवस्थेवर केलेली एक मार्मिक टिपणी आहे. या गाण्याचे खरे अपील चित्रपटापेक्षा चित्रपटाच्या बाहेरच जास्त आहे. कारण रट्टा मारच्या चक्रात अडकलेल्या अनेक विद्याथ्र्याची व्यथा त्यात व्यक्त झाली आहे.
आमीर खानचा ‘थ्री इडियट’ देखील हीच व्यथा मांडतो. शिक्षणातील घाऊक स्पर्धेत अपरिहार्यपणो ढकलला जाणारा विद्यार्थी, त्यातून शिकण्याच्या आनंदाऐवजी वाटय़ाला येणारी एक तणावपूर्ण पण पोकळ ढोर मेहनत आणि शेवटी वंचना हा सारा प्रवास थ्री इडियट्समध्ये आला होता. त्यातील
‘सारी उम्र हम
मर मर के जी लिए,
एक पल तो अब हमे
जीने दो’
- हे त्यातून सुटू पाहणा:यांचे गाणो आहे.
‘कंधों को किताबों के बोझ ने झुकाया.
रिश्वत देना तो खुद पापा ने सिखाया’
असे म्हणत हे गाणो एकाचवेळी शिक्षण देणा:या व्यवस्थेचे आणि त्या व्यवस्थेचे निर्बुद्ध पाईक बनविणा:या पालकांचे वाभाडे काढते.
कॉन्सण्ट्रेटेड एचटूएसओफोर ने
पुरा बचपन जला डाला
या ओळीमागचे वास्तव तर त्या जळजळीत आम्लाप्रमाणोच पार भाजून काढते. लहानपण करपले, तारु ण्यही करपू पाहते आहे अशी व्यथा मांडत हे गाणो पालकांकडे, शिक्षणव्यवस्थेकडे
गिव्ह मी अनदर चान्स
आय वॉन्ना लिव्ह अगेन
अशी विनवणीही करते. अधूनमधून येणा:या गद्य ओळींना सामावून घेत रॉकबीट्सवर मनस्वी सुरात गायलेले गाणो मनाचा ठाव घेते.
शिक्षणाच्या अशा व्यवस्थेत फार फरफट वाटय़ाला आलेले एकतर स्वत:ला मिसफिट मानून कुढत राहतात किंवा मग बंडखोर होऊन व्यवस्थेच्या बाहेर पडतात. रंग दे बसंती (2क्क्6) मधील ‘मस्ती की पाठशाला’ हे गाजलेले गाणो अशा बंडखोरांचे गाणो. गाण्याची सुरुवातच ‘लूज कंट्रोल’ अशा आव्हानात्मक आरोळीने होते आणि मग दिली जाते ती ‘आय अॅम ए रिबेल’ ही तितकीच आव्हानात्मक ओळख. अर्थात नियंत्रण झुगारून देण्याची, बंडखोर होण्याची गाण्यातून व्यक्त होणारी भावना शिक्षणव्यवस्थेपुरतीच मर्यादित आहे. शिकण्या-शिकविणा:या शाळा-कॉलेजला त्यांचा विरोध आहे. त्यांच्या पाठशाळेत शिकणो-शिकविणो नाही. फक्त मौजमस्ती आहे. ती अर्थातच हसा, खेळा, उडय़ा मारा अशी बाळबोध मस्ती नाही. ती इश्काची मस्ती आहे. टल्ली होऊन पडण्याची मस्ती आहे. एरवीच्या शिक्षणातील अनेक संकल्पना त्यांनी या सा:या मस्तीशी जोडल्या आहेत. त्यांचे शिकणो असे मस्तीच्या अनुभवातून शिकणो आहे. नियंत्रणात ठेवू पाहणा:या, मस्तीपासून दूर ठेवणा:या, फक्त लिहिण्या-वाचण्यावर भर देणा:या शिक्षणाशी आपली नाळ जुळू शकत नाही असा या रिबेल्सचा सूर आहे.
असा रिबेल सूर फक्त अलीकडेच दिसू लागला आहे असे नाही. अगदी 1962 च्या अनपढमधील
‘सिकंदर ने पोरस से की थी लडाई.
तो मैं क्या करू’
मध्येही तो ऐकू येतो. खरंतर ‘अनपढ’ मध्ये शिक्षणाचे विशेषत: स्त्रीशिक्षणाचे महत्त्व सांगितले आहे. शिक्षणाअभावी होणारी परवड दाखवली आहे. पण तसे करताना कथेच्या ओघात या गाण्याच्या माध्यमातून शिक्षणपद्धतीतील आणि समाजातील विसंगतीवर बोटही ठेवले आहे. चित्रपटामध्ये मोहन चोटीनी रंगविलेल्या उनाड मुलाच्या तोंडी हे गाणो येते खरे; पण शाळेमध्ये घोटवून घेतल्या जाणा:या गोष्टींवर त्याचा ‘तो मैं क्या करू?’ हा पालुपदवजा प्रश्न वाटतो तेवढा उनाड नाही. मूर्ख घसीटाराम रोज गोडाधोडाचे खातो पण बी.ए., एम.ए. केलेल्यांवर मात्र जगण्यासाठी ठेला चालविण्याची, कारली विकण्याची वेळ येते ही विसंगती पाहिल्यानंतर त्याने ‘मग हे सारे शिकून मी काय करू?’ हा प्रश्न विचारला आहे. चित्रपटाच्या चौकटीबाहेर विचार केला तर ‘मैं क्या करू?’ हा वास्तवापासून दुरावणा:या शिक्षणाला आणि शिक्षणाला पुरेसे महत्त्व न देणा:या समाजालाच वेडावून विचारलेला प्रश्न आहे.
एरवी ‘आओ बच्चो तुम्हे दिखाए झाँकी हिंदुस्थान की’ किंवा ‘इन्साफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के’ अशा ‘श्यामची आई’ धाटणीच्या आदर्शवादी, बोधप्रद वगैरे गाण्यांच्या पाश्र्वभूमीवर ‘तो मैं क्या करू?’ हा उनाड पण रोखठोक प्रश्न भंबेरी उडवून देतो.
आता या उनाड, बंडखोर, उपहासगर्भ किंवा जळजळीत वळणाच्या गाण्यांतील शब्द किंवा संगीत फार उच्च दर्जाचे नाही, हे खरे. या गाण्यांच्या माध्यमातून हिंदी चित्रपटसृष्टी शिक्षणव्यवस्थेवर साचेबद्धतेचे, उथळपणाचे, जगण्यापासून तुटल्याचे, अतिरेकी स्पर्धेचे जे आरोप करते ते खुद्द चित्रपटसृष्टीवरही उलटून करता येऊ शकतात, हेही खरेच!
एकूणच औपचारिक शिक्षणाविषयी हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकांचा दृष्टिकोन मर्यादित आणि काहीसा नकारात्मकच राहिला आहे हेदेखील नाकारता येत नाही.
पण असे असले तरी त्यामुळे या गाण्यांचे महत्त्व कमी होत नाही. कारण सौंदर्यशास्त्रीय कसोटय़ांपेक्षा समाजमनातील सूक्ष्म स्पंदने आणि बदल टिपणो आणि हे सारे सहजसोपेपणो मांडणो हे गाण्यांप्रमाणोच कोणत्याही जनप्रिय कलाविष्काराचे महत्त्वाचे कार्य असते. त्यादृष्टीने पाहिले तर प्रेमाच्या समुद्रात आकंठ बुडालेल्या हिंदी चित्रपटगीतांनी त्याच्या बाहेर येऊन शिक्षणासारख्या विषयावरही समाजमनातील काही वेगळी स्पंदने टिपावी हे महत्त्वाचे ठरते.
- शिक्षणाचा नवा सिझन सुरू होत असताना गाण्यांमधून मारलेल्या या रट्टय़ाची नोंद घेणो म्हणूनच औचित्याचे ठरते.
मुश्कील का सोल्यूशन
किताबों के पहाड, जीत का टॉनिक, परफॉर्मन्स की तलवार अशा उपमा वापरत करण जोहरच्या सिनेमातले हे ‘रट्टा मार’ गाणो ‘एक ही सोल्यूशन तेरी मुश्कील का’ म्हणून रट्टा मारण्याचा (अपरिहार्य) सल्ला देते!
गिव्ह मी सम सनशाईन.
शिक्षणातील घाऊक व्यवस्था व स्पर्धा, त्यात अपरिहार्यपणो ढकलला जाणारा विद्यार्थी, मग त्यातून शिकण्याच्या आनंदाऐवजी त्यांच्या वाटय़ाला येणारी एक तणावपूर्ण पण पोकळ ढोर मेहनत आणि शेवटी वंचना हा सारा प्रवास ‘थ्री इडियट्स’मध्ये आला होता.
चाहिए प्यार की पढाई
1993 साली आलेल्या ‘संतान’ या चित्रपटामध्ये ‘कॉलेजमें होनी चाहिए प्यार की पढाई’ नावाचे मजेशीर गाणो आहे. कॉलेजात उगाच इतिहास, गणित वगैरे विषय शिकविण्यापेक्षा प्रेमाचेच शिक्षण द्यावे अशी गमतीदार मागणी हे विद्यार्थी करतात. शब्द, संगीत, चित्रीकरण अशा निकषांवर हे गाणो तसे सवंगच आहे. पण
‘यारो ये डिग्रीया है किस काम की.
कहना मानो ये तो है बस नाम की’ असा टोमणा त्यातही मारलेला आहेच.
(लेखक माध्यम, तंत्रज्ञान आणि संस्कृती
या विषयाचे अभ्यासक आहेत.)
vishramdhole@gmail.com