जपान घाईतल्या गर्दीत भेटलेले स्वस्थतेचे क्षण
By Admin | Updated: August 1, 2015 15:50 IST2015-08-01T15:50:32+5:302015-08-01T15:50:32+5:30
जपानमध्ये दहा दिवस होतो. त्या कालावधीतला आमचा बहुतांशी प्रवास ट्रेनने होता. ट्रेनला सकाळी सहा वाजतासुद्धा मुंबईप्रमाणो प्रचंड गर्दी. लोक घामाघूम झालेले तरीही संपूर्ण सूट घालूनच ऑेफिसचा प्रवास करीत होते. स्टेशनवर गर्दी झाली की लोक आपसूक रांगा करून धक्काबुक्की न करता आत शिरत होते.

जपान घाईतल्या गर्दीत भेटलेले स्वस्थतेचे क्षण
>कल्याणी गाडगीळ
जपानमध्ये दहा दिवस होतो. त्या कालावधीतला आमचा बहुतांशी प्रवास ट्रेनने होता. ट्रेनला सकाळी सहा वाजतासुद्धा मुंबईप्रमाणो प्रचंड गर्दी. लोक घामाघूम झालेले तरीही संपूर्ण सूट घालूनच ऑेफिसचा प्रवास करीत होते. स्टेशनवर गर्दी झाली की लोक आपसूक रांगा करून धक्काबुक्की न करता आत शिरत होते. लहान मुलेही शाळेत ट्रेनने एक-एकटीच जात होती. माणसे गर्दीत एका हाताने ट्रेनमधली दांडी पकडून, पायात ऑफिसची बॅग ठेवून, एका हातात पुस्तक घेऊन वाचत असतात. हे वाचनाचे विलक्षण वेड लक्षवेधी होते. देश अत्यंत सुरक्षित, चोरी-मारी, खिसेकापूगिरी नाही. देश श्रीमंत असला तरी अमेरिकेसारखी श्रीमंती किंवा चकचकाट येथे दिसला नाही. गल्ली, बोळ लहान लहानच. रस्त्यावर इलेक्ट्रिकल वायर्सची जाळीही सर्वत्र दिसत होती. रेल्वे स्टेशनवरील काही ठिकाणी चढउतार करायला एस्केलेटर्स होते. पण बहुतांशी सर्वत्र लोक पायीच चढउतार करतात. दुसरी लक्षणीय गोष्ट म्हणजे तिथले सायकलींचे प्रचंड प्रमाण. रेल्वे स्टेशनजवळ तीन-चार मजली सायकल स्टॅण्ड होते. बहुतांशी लेडीज सायकलीच आणि त्या घेऊन लोक तीन-तीन चार-चार मजले चढ-उतरही करीत असतात.
जपानी संस्कृती एकूण पुरुषप्रधान. त्यामुळे हल्ली येथील मुलींना लग्नच करायचे नसते. एकही पुरुष लहान बाळाला पोटाशी व पाठीशी घेतलेला दिसला नाही. येथील बायकाही घरी स्वयंपाकाच्या भानगडीत पडत नाहीत. चांगल्या दर्जाचे पदार्थ विकत घेऊन घरी आणून गरम करून खाण्याची पद्धत सर्रास आहे. लोकांचे एकंदरीत इंग्रजी बोलण्याचे प्रमाण कमीच. पाटय़ाही सर्वत्र जपानी भाषेतच. वक्तशीरपणा या देशातील लोकांचा अविभाज्य गुण. ट्रेन सेकंदावारी वेळेवर सुटतात. विनयाने वागणो हाही यांचा अंगभूत गुणधर्म. ट्रेनमधे तिकीट चेकर अथवा डब्यात खाद्यपदार्थ विक्रीला आलेल्या मुलीसुद्धा आल्यावर प्रथम खाली वाकून अभिवादन करतात.
शिनकानसेन (रँ्रल्ल‘ंल्ल2ील्ल म्हणजे ठी6 ळ14ल्ल‘ छ्रल्ली) या ताशी 32क् किलोमीटर वेगाने धावणा:या गाडय़ा प्रथमत: जपानमधेच 1964 साली निर्माण केल्या गेल्या.
कोणतीही व्यक्ती पैसे देता-घेताना, पास घेताना दोन्ही हात पुढे करते व ओंजळीतून वाकून वस्तू देते कारण सर्वांचा आदर करण्याची पद्धत. जपानी लोक अत्यंत आपापल्यात राहणारे. तुम्ही बोलावलेत तर घरी येतील, पण स्वत:च्या घरी कधीही बोलावीत नाहीत, हा तिथे राहणा:या भारतीयांचा अनेक वर्षांचा अनुभव. ऑफिस किंवा वाढदिवसाच्या पाटर्य़ाही ते हॉटेलातच देतात.
वाहतुकीला प्रचंड शिस्त. ङोब्रा क्रॉसिंग करताना तिथे हिरवा दिवा लागतो आणि पक्ष्यांच्या आवाजाची शिट्टी वाजते. मगच रस्ता ओलांडायचा. एखादा प्रश्न विचारल्यावर त्याचे उत्तर ‘हो’ असेल तर जपानी लोक मान खाली घालून ‘हाइ’ किंवा ‘है’ असे म्हणतात. कोलकात्यासारख्याच माणसांनी ओढलेल्या सायकल रिक्षा दिसल्या - पण ते फक्त पर्यटकांसाठीचे आकर्षण म्हणून - त्याची फीही भरपूर. देशाला भूमी कमी असल्याने अक्षरश: इंचा इंचाचा वापर केलेला दिसतो. घरातील अंगणासारखी छोटी छोटी भातशेते दिसली. घरेही अनेकमजली आणि अगदी छोटीशी. अनेक ठिकाणी धुण्याचे मशीन, चपला-बुटांचे स्टॅण्ड घराबाहेच्या जागेत ठेवलेले दिसले. गाडी ठेवण्यासाठीची जागा इतकी लहान की कौशल्याशिवाय गाडी तिथे ठेवणो अशक्यच. अनेक जपानी घरांच्या दरवाजावर भाताच्या ओंब्याची पेंढी लावलेली दिसली. प्रवासात गिंगको, जाई, ङोंडू, गुलबक्षी, कण्हेर, अबोली, मोगरा, कर्दळ, सदाफुली, अळू अशी अनेक ओळखीची झाडे-फुले दिसली.
जपान कमालीचा स्वच्छ देश - सिंगापूरसारखे कडक नियम नसतानाही! रेल्वे स्टेशनवर कुंकवाच्या टिकलीच्या आकाराचा कागदाचा कपटा दिसताक्षणी स्वच्छता करणा:या बाईने तो टिपला. स्टेशनच्या पाय:यांच्या कडेला पाणी जाण्यासाठी केलेला रस्ता ती बाई चक्क ब्रशने साफ करीत होती।. बुद्ध धर्मामुळे काहीशी परिचित, तरीही संपूर्णपणो वेगळ्या धर्तीवर बांधलेली मंदिरे, तेथील घंटा, उदबत्त्या, दिवे, देवांच्या मूर्ती व विशेषत: देवांची संस्कृत नावे पाहून जपानशी धार्मिक जवळीक वाटली, हे मात्र खरे.
जपानी तीर्थयात्रेची सांगता फुनाबोरीमधील हरे कृष्ण मंदिराच्या दर्शनाने आणि त्यांच्या ‘गोविंदा’ रेस्टॉरंटमधील वडा, डोसा, भात, ताक, पापड अशा पदार्थांच्या भरपेट पोटपूजेने व्हावी हाही जपान-भारत जवळकीचा साक्षात्कारच म्हणायला हवा.
(उत्तरार्ध)
‘दर्पण तळ्या’चे देऊळ
क्योटोजवळील किंकाकू (्रल्ल‘ं‘4) हे क्योको-ची तळ्याकाठी असलेले तीन मजली सोन्याचे मंदिर पाहत राहावे असे सुंदर आहे. तळ्याच्या नावाचा अर्थच ‘मिरर पॉण्ड’ म्हणजे ‘दर्पण तळे’. तळ्यात पडलेले मंदिराचे प्रतिबिंब अनिमिष नेत्रंनी पाहत राहावे व हाती कला असेल तर कागदावर उतरवावे असेच. तीन प्रकारचे आर्किटेक्चर यात दिसते - पहिला मजला राजवाडय़ासारखा, दुसरा सामुराईंच्या घरासारखा, तर तिसरा ङोन मंदिरासारखा. मंदिराच्या परिसरातील बागही अत्यंत रमणीय आहे.
‘मी समाधानी व्हायला शिकतो’
क्योतोजवळील :योअन-जी (फ8ंल्ल-A्र) मंदिर हा ङोन मंदिराचा उत्कृष्ट नमुना आहे. येथील रॉक गार्डन पाहणो हा विलक्षण अनुभव होता. ही गार्डन म्हणजे जमिनीवरील 25 मीटर लांब व 1क् मीटर रुंद चौरसात पसरलेल्या पांढ:या खडीत 15 लहानमोठे खडक बसविलेले आहेत. जवळच्या चबुत:यावर उभे राहून त्याकडे पाहायचे. कुठूनही पाहिले तरी एकावेळी जास्तीत जास्त 14 खडकच दिसतात. बुद्ध धर्मानुसार 15 आकडा पूर्णत्वाचा निदर्शक असून, या रॉक गार्डनचा संदेश आहे- ‘या जगात पूर्णत्व अशक्य आहे’. देवळाच्या मागे पाण्याचे पिटुकले कुंड असून, त्यावर कोरलेला मजकूर आहे- ‘मी समाधानी व्हायला शिकतो’.
थोडक्यात काय, जो समाधानी असतो तो आध्यात्मिकतेत श्रीमंत, तर जो समाधानी नसतो तो आध्यात्मिकतेत गरीबच राहतो. ही ङोन तत्त्वज्ञानातील महत्त्वाची शिकवणूक. या अत्यंत साधेपणाने सांगितलेल्या महान गोष्टी मनावर कायमचा परिणाम करून गेल्या.
(लेखिका न्यूझीलंडमधील ऑकलंडच्या रहिवासी आहेत)
kalyani1804@gmail.com