शहरं
Join us  
Trending Stories
1
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
2
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
3
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे
4
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
5
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
6
गाजलेल्या शिक्षक हत्येतील आरोपी कळंबा जेलमधून पसार, कावळेसादच्या दरीत सापडला होता मृतदेह
7
नवरत्न कंपनीला संरक्षण मंत्रालयाकडून मोठी ऑर्डर, 1060% वधारला आहे शेअर; गुंतवणूकदारांना केलंय मालामाल!
8
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
9
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
10
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
11
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
12
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
13
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
14
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
15
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
16
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
17
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
18
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
19
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
20
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान

मुंबईजवळ ग्रेटर सिरिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 10:53 IST

Crime: भिवंडीनजीकचे ते गाव सारेजण पडघा म्हणून ओळखत असले तरी काही जणांसाठी ते आहे अल-शाम. म्हणजे चक्क ग्रेटर सिरियाचा भाग. तरुणांना दहशतवादाचे प्रशिक्षण देणारी भारतातील इसिसची राजधानी.

- रवींद्र राऊळ भिवंडीनजीकचे ते गाव सारेजण पडघा म्हणून ओळखत असले तरी काही जणांसाठी ते आहे अल-शाम. म्हणजे चक्क ग्रेटर सिरियाचा भाग. तरुणांना दहशतवादाचे प्रशिक्षण देणारी भारतातील इसिसची राजधानी. अल-शाम या अरबी शब्दाचा अर्थ सिरिया, जॉर्डन, लेबनॉन, पॅलेस्टाइन, तुर्की हा टापू मिळून होणारे खलिफाचे राज्य आणि पडघा म्हणजे त्या अंतर्गत येणारी भारतातील इसिसची स्वतंत्र राजधानी घोषित झाली. जिचा भारताशी काहीच संबंध नाही. तिथे भारताचे कायदे नाहीत तर चालतो फक्त शरीयत ए अल शाम कायदा. 

२७ मार्च २००३ची ती रात्र मुंबई पोलिसांचे एन्काउंटर स्पेशलिस्ट अधिकारी कधीच विसरणार नाहीत. साकीब नाचन दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी असल्याची माहिती मिळाल्याने पोलिस पडघ्यात पोहोचले. साकीब नाचणला घराबाहेर काढेपर्यंत अख्खा गाव एकवटला. त्यांनी ज्या आक्रमकतेने पोलिसांना अडवले, घोषणाबाजी, शिवीगाळ करत हल्ला केला ते पाहून पोलिसही हबकले आणि कसाबसा तेथून काढता पाय घेतला.

दोन दिवसांनी मुंबई पोलिसांनी गोरेगाव हायवेवर दोन पाकिस्तानी आणि एक काश्मिरी अशा लष्कर-ए-तोयबाच्या तिघा सशस्त्र अतिरेक्यांना चकमकीत ठार केले तेव्हा त्यांच्या डायरीत साकीब नाचनच्या बॉम्बस्फोटातील सहभागाचा उल्लेख आढळला. याच अतिरेक्यांनी २००२-२००३ मध्ये मुंबई सेंट्रल, विलेपार्ले, मुलुंड आणि घाटकोपर येथे लोकलमध्ये बॉम्बस्फोट घडवण्यासाठी पाकिस्तानातून स्फोटके आणली होती. पोलिसांनी पुन्हा साकीब नाचनच्या अटकेसाठी पिच्छा पुरवला तेव्हा त्याने शरणागती पत्करली. नाचणने बॉम्बस्फोटातील सहभागाची कबुली देत घराजवळील विहिरीतून शस्त्रे काढून दिली.

साकीब नाचनच्या कारवाया जुन्याच आहेत. १९८०च्या सुमारास सिमी संघटनेत ताे पदाधिकारी हाेता. १९९० मध्ये पाकिस्तानला भेटी देत भारतीय मुस्लिम तरुणांना स्फोटके आणि गनिमी युद्धाचे प्रशिक्षण देण्याची जबाबदारी स्वीकारली. पाकिस्तानमधील शीख तरुणांना प्रशिक्षणही दिले. अतिरेक्यांसाठी भारतात सुविधा निर्माण करण्याच्या इसिसच्या कटात तो सहभागी होता. गुजरात सीमेवरून तस्करी केलेली शस्त्रास्त्रे सुरक्षित जागी लपवणे हे त्याचे मुख्य काम होते. 

१९९२ मध्ये नाचनला अहमदाबादमध्ये खलिस्तानी अतिरेकी लाल सिंग याच्यासह टाडाअंतर्गत दोषी ठरवण्यात आले. शिक्षा भोगून २००१ मध्ये नाचन पडघा येथे परतला आणि दोन वकिलांसह तिघांचे खून केल्याच्या प्रकरणात अडकला, परंतु निर्दोष सुटला. दरम्यान, दहा ते बारा तरुणांचे ब्रेन वॉश करून त्यांना त्याने दहशतवादी प्रशिक्षणासाठी इराक आणि सिरिया येथे पाठवले होते. 

२०२३ मध्ये एनआयएने पडघ्यात छापा घातला तेव्हा तेथे सापडले ते पॅलेस्टाइनचे झेंडे, जाळण्यासाठी इस्रायलचेही झेंडे, ४० ड्रोन, शस्त्रसाठा, रोख ६८ लाख रुपये आणि इसिसचे प्रशिक्षण साहित्य. याच ४० ड्रोनच्या साहाय्याने मुंबईवर हल्ला करण्याची तयारी सुरू होती. मुलगा शामिलसह साकीबला अटक करण्यात आली. अगदी परवाच पडघा येथे एटीएसने छापा घातला तेव्हाही त्याचे साथीदार पहलगाम दहशवादी हल्ल्यानंतर मुंबईवर हल्ला करण्याची तयारी करत होते.

कधी रशियाविरुद्ध लढणारा युक्रेन, कधी इस्रायलविरोधात लढणारा पॅलेस्टाइन तर कधी तुर्की, सिरिया हे कट्टरपंथी देश नाचणचे प्रेरणास्थान. हमासचे आतंकवादी त्याचे आयडॉल. भारताशी युद्ध पुकारून इसिसची राजवट आणायचे हे त्याचे स्वप्न.

ते पूर्ण करण्यासाठी तुरुंगातून बाहेर पडताच तो हिरिरीने पुन्हा कामाला लागतो. पोलिस त्याला गजाआड करण्यासाठी जीवाचे रान करतात. पण देशद्रोहाचे गंभीर आरोप वारंवार होत असतानाही देशाचे कायदे त्याला तुरुंगात ठेवू शकत नाहीत. उलट चांगल्या वर्तणुकीसाठी शिक्षेत पाच महिन्यांची सवलत मिळून तो आधीच कसा सुटतो, याचे  आश्चर्य पोलिसांना वाटत राहाते.

लोकल बॉम्बस्फोट प्रकरणात त्याला शिक्षा झाली. २०१७ मध्ये सुटका झाल्यानंतर तो पडघा येथे परतला. तोवर सिमीवर बंदी आल्याने तो इसिस मॉड्युलसाठी काम करू लागला. इसिसच्या या राजधानीत देशभरातून येणाऱ्या तरुणांना दहशतवादी प्रशिक्षण देण्याआधी बया म्हणजे वफादारीची शपथही दिली जाते. म्हणूनच पडघा बदनाम बस्ती मानली जाते. 

टॅग्स :terroristदहशतवादीbhiwandiभिवंडी