गोफ!

By Admin | Updated: May 21, 2016 14:07 IST2016-05-21T14:07:44+5:302016-05-21T14:07:44+5:30

मित्र-मैत्रिणी अंगणात ‘डब्बा ऐसपैस’च्या आरोळ्या ठोकत धमाल करीत असत, तेव्हा मी मात्र मांडीवर तंबोरा घेऊन एखाद्या रागाचे पलटे घोकत असे. गुरुजींचा खूप राग यायचा, तेच-ते पलटे घोटायचा कंटाळा यायचा, पण म्हणून त्यातून सुटका मात्र नव्हती. शिकवतील ते गळ्यातून उतरेर्पयत पुढे जायचे नाही हा वडिलांचा आग्रह असायचा. याच प्रवासात मी गाण्यावर बेहद्द प्रेम कधी करायला लागले, ते माझे मलाही कळले नाही

Gough! | गोफ!

गोफ!

>
मित्र-मैत्रिणी अंगणात ‘डब्बा ऐसपैस’च्या आरोळ्या ठोकत धमाल करीत असत, तेव्हा मी मात्र मांडीवर तंबोरा घेऊन एखाद्या रागाचे पलटे घोकत असे. गुरुजींचा खूप राग यायचा, तेच-ते पलटे घोटायचा 
कंटाळा यायचा, पण म्हणून त्यातून सुटका मात्र नव्हती.  शिकवतील ते गळ्यातून उतरेर्पयत पुढे जायचे नाही हा वडिलांचा आग्रह असायचा. याच प्रवासात मी गाण्यावर बेहद्द प्रेम कधी करायला लागले, ते माझे मलाही कळले नाही. तो रियाज माझ्या रोजच्या दिवसाला प्रसन्नतेचे अत्तर लावू लागला.त्यातूनच विलक्षण खडतर मेहनत आणि रियाजाचे एक नवे पर्व पुन्हा सुरू झाले..
 
मंजिरी असनारे
 
रियाज या शब्दाभोवती माङो सगळे बालपण गुंफलेले आहे. घट्ट-मुट्ट विणलेल्या मोग:याच्या गज:यात चहूबाजूंनी फक्त अर्धमिटल्या कळ्याच दिसाव्या तसाच हा आठवणींचा गोफ आहे, माझ्या आजच्या वर्तमानाशी घट्टपणो बांधला गेलेला. 
या गोफात आहे माझ्या लहानपणातील कथक आणि त्याची घुंगरे, वडिलांच्या मांडीवर बसून ऐकलेला त्यांचा तबल्याचा रियाज, संध्याकाळी शाळेतून थकून आल्यावर सुरू होणारी गाडगीळ सरांची गाण्याची शिकवणी, मनातून उसळी मारीत येणारा त्याचा भला थोरला कंटाळा आणि घरात सतत कानावर पडणारे गाणो. कधी किशोरीताईंचे, कधी जसराजजींचे, तर कधी मालिनी राजूरकर यांचे. 
फ्रॉक घालण्याच्या वयात सर्वस्व वाटणारी भातुकलीची भांडी आणि त्यात दाणो-गूळ शिजवून  केलेला स्वयंपाक किंवा बाहुला-बाहुलीच्या लग्नातील साडीचा घोळ आवरीत केलेली लगबग हे या बालपणात होते का, ते नीटसे आठवत नाही. आठवते ती संध्याकाळी ऐन खेळण्याच्या वेळी असलेली गाण्याची शिकवणी आणि त्यानंतर म्हैसकरबुवांकडे कसून केलेला तानांचा रियाज.. 
सांगलीत राहणा:या माझ्या कुटुंबात वडील प्राध्यापक. पण घरातील चहाच्या टेबलावर कधीच कॉलेजमधील स्टाफरूम आले नाही. कारण आमच्या घराला वेड होते संगीताचे आणि त्यातून मिळणा:या अमाप आनंदाचे. हा आनंद मिळवायचा तर कष्टाला पर्याय नाही यावर या कुटुंबाची ठाम श्रद्धा होती. हे मूल्य या घराने मला रोजच्या जगण्यातून शिकवले. वडिलांच्या तरुणपणी ते कॉलेजमधून घरी येता-येताच आधी त्यांच्या मनात आणि मग प्रत्यक्षात तबल्याचा रियाज सुरू व्हायचा आणि तो भान हरपल्यासारखा कित्येक तास चालायचा. तबलावादनाचे हे वेड आणि शिक्षणही त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाले. अशा कुटुंबातील मी संगीताच्या त्या अखंड वाहत्या गंगेपासून दूर, कोरडी राहणो शक्यच नव्हते. संगीत माङया आयुष्यात नक्कीच येणार होते, पण ते आधी नृत्य होऊन आले आणि मग स्वर होऊन.!  
गाण्याच्याही आधी माङो कथकचे शिक्षण सुरू झाले, जे मला मनापासून आवडत होते. पण हळूहळू त्याचबरोबर, मलाही न समजता कधीतरी सहाव्या-सातव्या वर्षी गाण्याची शिकवणी सुरू झाली. त्यासाठी गाडगीळ सर माङया घरी येत. संध्याकाळी आसपासचे मित्र-मैत्रिणी अंगणात ‘डब्बा ऐसपैस’च्या आरोळ्या ठोकत धमाल करीत असत, तेव्हा मी मात्र मांडीवर तंबोरा घेऊन एखाद्या रागाचे पलटे घोकत असे. नेमक्या माङया खेळण्याच्या वेळी आलेल्या गुरु जींचा खूप राग यायचा, तेच-ते पलटे घोटायचा अगदी कंटाळा यायचा. पण म्हणून त्यातून सुटका मात्र नव्हती. एकतर, शेजारीच वडील ठेका धरायला बसलेले असत आणि सर शिकवतील ते गळ्यातून उतरेपर्यंत पुढे जायचे नाही हा त्यांचाही आग्रह असायचा. 
आधी गाडगीळ गुरु जी आणि त्यानंतर म्हैसकर बुवा या दोन गुरूंनी मला तालीम दिली आणि रियाजही करायला लावला, तो आकारयुक्त नितळ स्वर आणि माळेतील एकेक मोती टिपत पुढे जावे तशी सफाई असलेली तान गळ्यावर चढावी यासाठी. त्या गायनावर कोणत्याही घराण्याचा शिक्का नव्हता. होता तो कोणत्याही गाण्यात असावे लागते त्या मूलभूत सौंदर्याचा आग्रह. त्यामुळे झाले असे की ते सौंदर्य मला ज्या-ज्या गाण्यात दिसत गेले ते प्रत्येक गाणो मी अक्षरश: तोंडपाठ करू लागले. किशोरीताई, मालिनी राजूरकर यांच्या गायकीची अगदी तंतोतंत नक्कलच करीत होते म्हणा ना मी! 
त्यांनी म्हटलेल्या बंदिशी, त्यातील ताना, आलाप, त्यांचे तराणो. कानावर पडणा:या, आवडलेल्या प्रत्येक गोष्टींची मी स्वरलिपी, नोटेशन तयार करीत असे आणि एकदा सगळे गाणो असे वाचण्याच्या भाषेत समोर आले की ते पाठ करणो कितीसे अवघड असणार? अशा पाठ केलेल्या गाण्याची आणि त्याला लोकांकडून मिळणा:या वाहवाची एवढी ङिांग आली त्या वयात की एकदा मी खुद्द मालिनीताईंना त्यांनीच म्हटलेला टप्पा, तोही दणदणीत आत्मविश्वासाने ऐकवला..! 
आठवी-नववीमध्ये शिकत असलेल्या एका बारा-तेरा वर्षाच्या कोणत्याही मुलीसाठी हे दिवस मोठे मंतरलेले वाटावे असे होते. अनेक संगीत स्पर्धांमध्ये मी भाग घेत होते आणि त्यात बक्षिसे मिळवत होते. स्पर्धेची तयारी करण्याचा एक आखीव-रेखीव असा नेटका फॉम्यरुला माङया वडिलांनी बांधला होता. 
वीस मिनिटांच्या राग मांडणीतील तबल्याची आवर्तने मोजून त्यामध्ये मोठा ख्याल, छोटा ख्याल, त्यातील आलाप, ताना, बोलताना, सरगम या प्रत्येकाचे प्रमाण किती असावे याचे चोख गणित ते आखत आणि समोर काडय़ापेटीच्या काडय़ा मांडून त्या हिशेबाप्रमाणो ते माझी तयारी करून घेत. प्रत्येक स्पर्धेतील माङो सादरीकरण असे पक्क्या चौकटीत ठाकून-ठोकून बेतलेले आणि त्याचा कसून सराव करून घेतलेले असे. हे पाठांतर, वेगवेगळ्या स्पर्धांची तयारी, त्यात मिळणारे यश, त्याच्या पेपरमधून येणा:या बातम्या यामुळे आपल्याला नाव-बिव मिळाले असे त्या वयात मला वाटू लागले होते का हे नीटसे सांगता येणार नाही, पण एक गोष्ट मात्र नक्की घडली. या प्रवासात मी गाण्यावर प्रेम करायला लागले, अगदी बेहद्द! 
इतके दिवस संध्याकाळची शिकवणी कंटाळा आणणारी वाटायची, आता मात्र म्हैसकर बुवांकडे शिकून आल्यावर होणारा पहाटेचा रियाज माङया दिवसाला प्रसन्नतेचे अत्तर लावीत होता..! बुवांनी तयार करून घेतलेल्या तिन्ही सप्तकात सहज फिरणारा गळा, वडिलांच्या सतत साथीमुळे लयीची आलेली समज आणि पाठ केलेल्या अनेक बंदिशी-राग. गाणो-गाणो म्हणतात ते हेच असावे असा भ्रम व्हावा असेच हे दिवस होते. पण जे गाणो माङया वडिलांना दिसत होते ते हे नक्कीच नव्हते आणि ते त्यांना ठाऊक होते. 
त्या गाण्यापर्यंत मला घेऊन जाणा:या गुरूंचा त्यामुळे ते शोध घेत होते. अप्पा कानेटकर नावाचे गुरू माङया सांगीतिक आयुष्यात आले आणि विलक्षण खडतर मेहनत आणि रियाजाचे एक नवे पर्व पुन्हा सुरू झाले.
थोर ग्रीक विचारवंत प्लेटो एकदा म्हणाला होता, लय माणसाला काम करायला भाग पाडते, तर स्वर मात्र तुमचे मन वळवतात, रिझवतात. 
लयीचे बोट धरून येणा:या स्वरांच्या मदतीने रसिकांचे मन कसे जिंकायचे त्याकडे बघण्याचा एक नवा दृष्टीकोन देणारे हे पर्व होते, ज्यामध्ये कष्ट होते पण एका नितांत सुंदर गाण्याचे दर्शनही होते.. 
 
मला आठवतंय, एकदा ‘नाथ हा माझा’ हे नाटय़पद सर शिकवत होते. पदाच्या पहिल्याच शब्दाला एक झर्रकन येणारी, सोपी वाटणारी, पण गळ्यासाठी  अवघड अशी तान आहे. ती काही माङया गळ्याला मान्य होत नव्हती. सर निघून गेले तरी पप्पा शेजारी बसून होतेच. पाच, दहा, पंधरा वेळा प्रयत्न झाले असतील. आधीच कंटाळलेली मी अगदी रडकुंडीला आले, नव्हे रडलेच. पण रडून झाल्यावर पुन्हा तानेचा सराव करायचा होताच..! ‘तू एकदा ही तान बरोबर म्हण, मग आपण थांबवू शिकवणी’ हे आपले म्हणणो माङया वडिलांनी खरे केले..
 
मुलाखत आणि शब्दांकन
- वन्दना अत्रे
vratre@gmail.com

Web Title: Gough!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.