गौरव सारस्वतांचा!
By Admin | Updated: November 22, 2015 17:53 IST2015-11-22T17:53:16+5:302015-11-22T17:53:16+5:30
मराठी साहित्यविश्वात साकारणा:या दज्रेदार व उत्तमोत्तम मराठी साहित्याचा गौरव करण्यासाठी आणि त्याला सुजाण, रसिक साहित्यप्रेमींचे पाठबळ मिळवून देण्यासाठी ‘लोकमत साहित्य पुरस्कार’ सोहळा आज 22 नोव्हेंबर रोजी पुण्यात रंगणार आहे. मराठी सारस्वतांच्या कलाकृतींना मानाचा मुजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने..

गौरव सारस्वतांचा!
>- विजय बाविस्कर
समाजाप्रति नवा दृष्टिकोन देण्याची साहित्याची जबाबदारी असते. वृत्तपत्रे समाज घडविण्याचे काम करत असतात. त्यामुळे दोघांनी हातात हात घालून काम केल्यास ही प्रक्रिया अधिक सशक्त व प्रभावी होत जाते. लोकमत वृत्तपत्र समूहाने नेहमीच ही भूमिका अंगीकारली आहे. मराठी साहित्याला समाजमान्यता मिळावी, सकस आणि दर्जेदार साहित्य समाजापुढे यावे, यासाठी ‘लोकमत’चा नेहमीच पुढाकार राहिला आहे. ही प्रक्रिया अधिक गतिमान करण्यासाठी गेल्या तीन वर्षापासून ‘लोकमत साहित्य पुरस्कार’ सुरू करण्यात आले आहेत.
भाषासंवर्धनाची जबाबदारी केवळ शासन आणि साहित्य संस्थांची नसून, आपल्या प्रत्येकाची आहे, ही लोकमतची भूमिका आहे. मराठी साहित्याला पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या वृत्तपत्रंचे कर्तव्यच आहे. या भूमिकेतून ‘लोकमत’ स्थापनेपासून काम करीत आहे. ‘लोकमत’चे संस्थापक श्रद्धेय जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांना मराठी साहित्याबाबत आदर व अतिव प्रेम होते. मराठीतील कसदार साहित्य समाजासमोर आणावे यासाठी ते स्वत: लेखक, कवींना भेटत असत. चर्चेतून त्यांना लिहिते करत असत. ‘लोकमत’च्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राला अनेक चांगल्या साहित्यिकांचा परिचय करून दिला. हीच परंपरा ‘लोकमत’चे अध्यक्ष विजय दर्डा आणि एडिटोरियल चीफ राजेंद्र दर्डा जाणीवपूर्वक पुढे नेत आहेत. विजयबाबूंच्या संकल्पनेतून आणि प्रोत्साहनातून ‘लोकमत’चा ‘दीपोत्सव’ हा मराठी दिवाळी अंक राष्ट्रीय पातळीवरील ओळख बनला आहे. आशय आणि विषयाच्या वेगळेपणाबरोबरच देशातील सर्वाधिक खपाचा मराठी दिवाळी अंक म्हणून त्यास अधिकृतपणो गौरविण्यात आले आहे. ‘जिथे मराठी तिथे लोकमत’ हे ब्रीदवाक्य घेऊन महाराष्ट्र व गोव्यातील गावागावांत आणि तळागाळातील सामान्यांर्पयत ‘लोकमत’ पोहोचला आहे. शहरी - ग्रामीण असे सारे भेद दूर करीत मराठी वाचकांनी ‘लोकमत’ला आपलेसे केले. रोज शब्दांतून संवेदनांचा आणि समाजातील वास्तवाचा जागर मांडणा:या ‘लोकमत’ समूहाने मराठी भाषेला आणखी एका उंचीवर घेऊन जाण्यासाठी पुढाकार घेतला. ‘लोकमत’चे संपादकीय संचालक ऋषी दर्डा यांनी ‘लोकमत साहित्य पुरस्कारा’ची संकल्पना मांडली व आग्रहपूर्वक पाठपुरावा करत ती कृतीत आणली. हे पुरस्कार केवळ शहरांपुरतेच मर्यादित न ठेवता महाराष्ट्राच्या ग्रामीण व दुर्गम भागातीलही साहित्यिक समाजापुढे यावेत या दृष्टीने त्यांची रचना आणि निवडप्रक्रिया राबविण्यात आली. त्यामुळेच ‘लोकमत साहित्य पुरस्कार’ हा केवळ रकमेच्याबाबतीतच नव्हे, तर लोकाश्रयातही सर्वाधिक मोठा पुरस्कार बनला आहे.
मराठीत वर्षाला सुमारे तीन हजार पुस्तके प्रसिद्ध होतात. त्यामध्ये विषयाचे वैविध्य तर असतेच, परंतु त्याचबरोबर वेगळे प्रयोग करून पाहण्याची वृत्तीही असते. अनेक वर्षे साहित्याच्या मुख्य प्रवाहाबाहेर असलेला, मात्र नव्याने लिहू-वाचू लागलेला लेखकांचा आणि वाचकांचा वर्ग आज महाराष्ट्रात निर्माण झाला आहे. सर्व भारतीय भाषांमधल्या साहित्याच्या तुलनेत मराठी साहित्य अधिक समृद्ध होत आहे. नवी पिढीही मोठय़ा प्रमाणात लिहीत आहे. ती आपलं जगणं, अनुभवविश्व साहित्यातून मांडत आहे. वेगवेगळ्या क्षेत्रंतून रूढार्थाने लेखक नसलेले, परंतु काहीतरी व्यक्त करण्याची इच्छा असणारे अनेकजण लेखन करत आहेत. लेखनाच्या आणि लेखकांच्या कक्षा जशा रुंदावल्या आहेत, तशा वाचकांच्याही रुंदावल्या आहेत. मात्र, तरीही भाषेतील विविधतेपासून ते भौगोलिक स्थान यामुळे काही पुस्तकेवाचकांपयर्ंत म्हणावी तशी पोहोचू शकत नाहीत. सकस, दर्जेदार लेखनाला लोकाश्रय मिळून ते वाचकांसमोर यावे यासाठी वाटाडय़ाप्रमाणो काम करण्याची आवश्यकता होती. हे वाटाडय़ाचे काम ‘लोकमत साहित्य पुरस्कारां’च्या माध्यमातून सुरू झाले आहे. यातही केवळ कथा, कादंबरी, ललित गद्य, कवितेपुरत्याच साहित्य प्रकारांत मराठी वाचकाला अडकविण्यापेक्षा ललितेतर गद्य, चरित्र - आत्मचरित्र, वैचारिक आणि समीक्षा, विज्ञान, अनुवाद हे साहित्यप्रकारही पुरस्कारांच्या कक्षेत आणले आहेत. मुखपृष्ठ म्हणजे तर पुस्तकाचा आरसा, त्यामध्ये मराठीत विविध प्रयोग होत आहेत. यासाठी सर्वोत्कृष्ट मुखपृष्ठ हा पुरस्कारांचा विभाग आवजरून ठेवण्यात आला आहे.
मराठी साहित्यविश्वाच्या पसा:यातून दज्रेदार ते निवडण्याचे आणि त्यातील वेगळेपण वाचकांर्पयत घेऊन जाण्याचे काम ख:या अर्थाने आव्हानात्मक असते. त्यातून व्यक्तिगत मत-मतांतरे, कल टाळून पारदर्शक पद्धतीने उत्तमोत्तम साहित्यकृतींची निवड जाणकार व अनुभवी नजरेने होणो आवश्यक असते. हे शिवधनुष्य ‘लोकमत’ने उचलले आहे. आज महाराष्ट्रात सर्वाधिक वाचकसंख्या आणि त्याचबरोबर वार्ताहर- विक्रेत्यांचे सर्वात मोठे जाळे असलेले ‘लोकमत’ हे एकमेव वृत्तपत्र आहे. आपल्या या सगळ्या शक्तीचा विधायक वापर करून चांगले साहित्य समाजापुढे आणण्याचा ‘लोकमत’चा मानस आहे. यासाठी पुरस्कार निवडीसाठी अभिनव पद्धत अवलंबिण्यात आली. मराठीतील विविध विभागांतून तज्ज्ञांचे परीक्षक मंडळ दरवर्षी स्थापन केले जाते. जाणकार व अधिकारी परीक्षक मंडळाने विविध कलाकृतींचा बारकाईने अभ्यास करून त्यातून ही निवड करण्यात येते. एकूण दहा साहित्य प्रकारांचा गौरव या पुरस्कारातून होतो.
पहिल्या वर्षीच्या पुरस्कार वितरण सोहळ्याला साहित्य संमेलनाच्या सर्व आजी - माजी साहित्य संमेलनाध्यक्षांना निमंत्रित केले. विशेष सन्माननीय उपस्थिती होती गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांनी शब्दांना स्वरांचा साज चढवत त्यांनी ‘लोकमत’च्या या नावीन्यपूर्ण अशा उपक्रमाचे मुक्तकंठाने कौतुक केले. आखून दिलेल्या वाटांनी न जाता स्वत:ची वेगळी पायवाट आखत साहित्यप्रवास करणा:या श्याम मनोहर यांना पहिल्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दारिद्रय़, दु:ख घेऊन जगणारी माणसे जिवाला चार घटका विरंगुळा मिळावा म्हणून हसत असणा:या माणसांना जिवंत करत ग्रामीण जीवनातील हास्य-विनोद शोधण्याचा प्रयत्न करणारे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा. द. मा. मिरासदार यांना दुस:या वर्षी जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्रीय संस्कृतीचा शोध घेणारे प्राचीन व मध्ययुगीन मराठी साहित्याचे संशोधक, संत साहित्याचे अभ्यासक, लोकसंस्कृती व लोकसाहित्याचा एकूण जीवनानुबंध शोधणारे संशोधक रा. चिं. ढेरे यांना यंदाचा जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांच्या समर्पित जीवनाचा गौरव केला जाणार आहे.
महाराष्ट्र आणि गोव्यातील गावागावांत आणि तळागाळातील सामान्यातील सामान्यांर्पयत पोहोचलेल्या ‘लोकमत वृत्तपत्र समूहाने साहित्य पुरस्काराच्या रूपाने मराठी सारस्वताला अभिनव प्रकारची दाद देण्याचा हा उपक्रम सुरू केला आहे. वर्षभरातील दज्रेदार साहित्यकृती निवडून त्यांना सन्मानित करायचे आणि हे सारे करत असताना तमाम रसिक, साहित्यप्रेमी वाचकांनाही यात सहभागी करून घेत सर्वाना साहित्यवर्षावात चिंब करायचे हा विचार प्रत्यक्ष कृतीतून साकारणो याला फार मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे.
मराठी साहित्य आणि साहित्य संमेलन ही मराठी मनाच्या मर्मबंधातील ठेवच. साहित्य पुरस्काराचा सोहळा एखाद्या साहित्य संमेलनाप्रमाणोच रंगावा, तो विचारोत्सव व्हावा ही लोकमत साहित्य पुरस्कारांमागची भूमिका आहे.
विचार करण्याची विवेकवादी शक्ती हवी असेल, तर साहित्याशिवाय पर्याय नाही. साहित्यामुळे मानवी जीवन उन्नत करता येते. समभावाचा विचार रुजवता येतो, ही ‘लोकमत’ची नेहमीच भूमिका राहिली आहे. अखिल महाराष्ट्र यातून एका सूत्रत जोडून प्रमाणभाषा आणि बोली भाषेतील विषमता नष्ट करण्याचा प्रयत्नही या निमित्ताने होत आहे. कुठल्याही चळवळीला जिवंत ठेवण्याचे कार्य साहित्य करते. साहित्याचा गौरव करून या चळवळींनाही पुढे नेण्याचे काम ‘लोकमत’ करीत आहे. आजर्पयत दिल्या गेलेल्या पुरस्कारांची यादी पाहिली तरी त्याची प्रचिती येते. विदर्भ, खान्देश, मराठवाडा-कोकण, पश्चिम महाराष्ट्र या सर्व भागांतून लेखक उत्साहाने या पुरस्कार सोहळ्यात सहभागी होत आहेत. आपल्या साहित्यकृती पाठवित आहेत. लेखकांवर व्यवस्थेचा परिणाम होत असतो. लेखन करण्याचे काम जबाबदारीने पार पाडत असताना मिळालेली कौतुकाची थाप त्याच्या विचारप्रवर्तकतेला आणखी पुढे घेऊन जाते. गेल्या दोन वर्षापासून ‘लोकमत’ने ही सुरुवात केली आहे. ‘लोकमत साहित्य पुरस्कार’ सोहळ्यातून एक आनंददायी असा अनुभव प्रत्येकालाच अनुभवायला मिळावा. वाचकांनाही साहित्य विचारांची पर्वणी लाभावी. उत्तमोत्तम साहित्यकृती समाजासमोर आणून त्यांचा गौरव करावा आणि माय मराठीतील साहित्यिकांच्या शब्दवैभवाचा तितक्याच शानदार पद्धतीने सन्मान करावा या भूमिकेतून हा नवा पायंडा ‘लोकमत’ने निर्माण केला आहे. तो आदर्शाचा वस्तुपाठ ठरावा यासाठी लोकमत समूह कृतिशील राहील. मराठी साहित्य अधिक दज्रेदार करण्यासाठी, लोप पावत असलेली वाचनसंस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी, माय मराठीला सन्मान्य दर्जा मिळवून देण्यासाठी ‘लोकमत’ माध्यम समूहाने उचललेले हे सांस्कृतिक पाऊल निश्चितच स्पृहणीय आहे याचा आम्हाला आनंद आणि अभिमान आहे.