गडकरी योग्य तेच बोलले!
By Admin | Updated: May 16, 2015 14:26 IST2015-05-16T14:26:41+5:302015-05-16T14:26:41+5:30
मुंबईच्या मॉलमधले मूत्र जमवण्याची योजना तुम्ही मांडली आहे. तुम्ही सतत वादग्रस्त बोलता असे वाटत नाही का?

गडकरी योग्य तेच बोलले!
>- एकनाथ खडसे, महसूल आणि कृषीमंत्री
मुंबईच्या मॉलमधले मूत्र जमवण्याची योजना तुम्ही मांडली आहे. तुम्ही सतत वादग्रस्त बोलता असे वाटत नाही का?
मी वादग्रस्त बोलतो यापेक्षा काय बोलतो हे पहा. मला आणि नितीन गडकरींना काय दुसरी कामे नाहीत का? आम्ही वेगळ्या विषयावर मुद्दाम काही (भलते) विचार मांडलेच पाहिजेत असे तरी आमच्यावर कोणाचे बंधन आहे का?
..पण थेट मुंबईच्या मॉलमधले मानवी मूत्र गोळा करून खतासाठी वापरण्याचा मुद्दा कसा काय..
मुंबईत सव्वा ते दीड कोटी लोक राहतात. शेकडो मॉल्स आहेत. त्यात रोज येणारे लोक किती? मूत्रविसजर्न आणि त्यानंतर स्वच्छतेसाठी सोडले जाणारे पाणी एकटय़ा मुंबईत लाखो लिटर भरेल. असे पाणीयुक्त मूत्र जर टँकरद्वारे भरून नेले गेले आणि त्याचा सेंद्रीय खतांसाठी वापर केला गेला तर शेतीचा कस वाढेल असे संशोधन आहे. टँकरमधील मूत्रचा वासही घालवण्याचे तंत्रज्ञान आता उपलब्ध आहे, मग का नको? आपल्याकडे हॉटेलांमधून किंवा अन्य ठिकाणाहून फेकून दिले जाणारे अन्न किती असेल याची तुम्ही कल्पना करू शकत नाही. एकटय़ा मुंबईत हजारो टन पालेभाज्यांचा कचरा जमतो. शेकडय़ानी ट्रक भरून हा कचरा वाहून नेतात. यापासून तयार होणारा गॅस स्वयंपाकासाठी वापराला जाऊ शकतो. तसेच घनकच:यासह मलमूत्रचा वापर करून आपल्याही देशात अनेक प्रयोग झाले आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात गांधीवादी आश्रमांमधून असे प्रयोग झाले. अकोल्यात उमरीला गांधीजींनी राष्ट्रीय विद्यालय स्थापन केले. तेथे मुलांना मैला वाहून नेणो, शौचालय साफ करणो शिकवले जात होते. तेथे सेफ्टी टँकद्वारे गॅसची निर्मिती केली गेली आणि 2क्क् मुलांपुरते ते विद्यालय स्वयंपूर्ण झाले.
.पण मानवी मूत्रचा प्रत्यक्ष वापर करणो लोक कितपत स्वीकारतील?
आमच्या जळगावात बाफनांकडे जवळपास चार हजार गायी आहेत. तेथे गोमूत्र नेण्यासाठी गर्दी होत असते. आपल्याकडे युरियाच्या अतिवापराने शेतजमिनीचा कस अत्यंत कमी झाला आहे. गायी म्हशींच्या मूत्रपासून जे खत तयार होते, त्यापेक्षा अधिक प्रभावी खत मानवी मूत्रपासून होते. गडकरी काहीही चुकीचे बोलले नाहीत. अशा खतापासून जमिनीचा कस वाढेल. शहरात ऑरगॅनिकच्या नावाखाली तुम्ही लोक ज्या गोष्टी विकत घेता त्याचा अभ्यास करा. गरज पडली तर जळगावी या, मी शेतीतले वेगवेगळे प्रयोग दाखवतो; मात्र सगळ्याच गोष्टी चेष्टेवर नेऊ नका. आपल्याकडे मर्यादित साधनसंपत्ती आहे अशावेळी वेगळे प्रयोग केले नाहीत तर कालांतराने आपल्याला सगळ्याच गोष्टींसाठी दुस:यांवर अवलंबून रहावे लागेल. हा दूरगामी विचार आहे आणि टिंगलटवाळी सोडून याकडे बघायला शिकले पाहिजे असे माङो मत आहे.
(मुलाखत : अतुल कुलकर्णी)