शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

व्याकुळ जगण्याची ‘इफ्फी’ सैर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2021 06:05 IST

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातले या वर्षीचे सगळेच चित्रपट त्यांच्या अत्युच्य निर्मितीमूल्यांमुळे ओळखले जातील.

ठळक मुद्देया वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रंगलेल्या इफ्फीमध्ये मानवी जगण्याचे रंग अधिकच व्याकुळ करून गेले

-संदीप आडनाईक

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातले या वर्षीचे सगळेच चित्रपट त्यांच्या अत्युच्य निर्मितीमूल्यांमुळे ओळखले जातील. अतिशय आटोपशीरपणे निवडलेल्या यंदाच्या इफ्फीने वेगळी ओळख निर्माण केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या महोत्सवात खऱ्या अर्थाने दर्दी सिनेरसिकांनी गर्दी केली होती.

‘विंडो बाय वुड ऑल्सो लाइक टू हॅव सबमरीन’ हा चित्रपट एक तरुण खलाशी समुद्रपर्यटन करताना माँटेव्हिडीओ येथील अद्भुतरम्य घराकडे जाणारा दरवाजा कसा शोधून काढतो, या विषयी आहे. त्या मुलाला आशियातील शेतकऱ्यांच्या समूहाला सामोरे जात खोऱ्यातील वाळीत टाकलेले घर सापडते, ज्यातून त्याला पारलौकिक सामर्थ्य प्राप्त होते. या चित्रपटात वरवर पाहता एकमेकांशी संबंध नसलेल्या विलक्षण जागा आणि प्रसंगांतून विस्मयकारक गोष्टींचे सौंदर्यपूर्ण आणि गूढरम्य चित्रण केले आहे. एखाद्या व्यक्तीला दुसरीकडे राहताना अचानक गाठ पडणाऱ्या, चमत्कृतीपूर्ण गोष्टींबाबत हा चित्रपट आहे. तुम्हाला एखादा दरवाजा दिसला, तुम्ही तो उघडून बाहेर आलात की तुम्हाला कळते की, पलीकडे काहीच नाही. म्हणजेच जे आपल्या सभोवताली आहे, ते आपल्याशिवाय दुसरे कुणीच नसते, हे समजल्यानंतर येणाऱ्या निराशाजनक, पण मुक्त करणाऱ्या भावनेबद्दलचा हा चित्रपट!

या वर्षीचा विशेष ज्युरी पुरस्कार मिळालेल्या फेब्रुवारी या बल्गेरियन दिग्दर्शक कामिन कालेव यांच्या चित्रपटात आठ, अठरा आणि ब्याऐंशी या तीन वेगवेगळ्या वयोगटांतील व्यक्तींची जीवनकथा सांगण्यात आली आहे. आयुष्य म्हणजे विविध अवतारांतील सातत्य असून, माणसे म्हणजे केवळ विस्तीर्ण आकाशाच्या खाली असलेल्या मोकळ्या धरतीवरील ठिपके आहेत, हा जीवनाचा दृष्टिकोन काव्यमय रूपकातून हा चित्रपट मांडतो.

तैवानच्या दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्या चेन-नियन को यांना मँड्रिन भाषेतील चित्रपट ‘द साइलेंट फॉरेस्ट’साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा रौप्य मयूर पुरस्कार प्राप्त झाला. गतिमंद मुलांच्या शाळेत घडणाऱ्या लैंगिक अत्याचाराचे वास्तववादी आणि हृदयस्पर्शी चित्रण या चित्रपटात आहे. पीडितांना सावज बनवून त्यांचा कसा बळी जातो, याविषयीची ही वेदनादायक कहाणी तैवानमधील एका शाळेतील सत्यघटनेवर आधारित आहे.

ज्या महिलेने आयुष्यात कोणाशीही प्रेमसंबंध जोडण्याचा प्रयत्नही केला नाही आणि ७०व्या वर्षीच कुमारी म्हणून मरण पावली, अशा महिलेच्या गूढ आयुष्याचा शोध घेण्याचा अफलातून प्रयत्न पोर्तुगीज दिग्दर्शक क्रिस्टियान ऑलिव्हिरा यांनी ‘द फर्स्ट डेथ ऑफ जोना’ या चित्रपटातून केला आहे. इफ्फीत या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर झाला. हा चित्रपट एका स्त्री कलाकाराच्या खऱ्या कथेवर आधारित आहे. या महिलेने स्वत:च्या अटीवर आपले जीवन व्यतित केले आणि कोणाबरोबरही प्रेमसंबंध न ठेवता तिचा मृत्यू झाला. तिचे आयुष्य कायम गूढ राहिले.

संदीप कुमारच्या ‘मेहरुनिसा’ या चित्रपटाचा जागतिक प्रीमियर या महोत्सवादरम्यान झाला. या चित्रपटात उमराव जान फेम फरुख जाफर यांनी ८0 वर्षांच्या अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे. केवळ भारतीय चित्रपट उद्योगातच अभिनेत्रींच्या वयाला महत्त्व असते. वयस्कर पुरुष चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारू शकतात, मग महिला का नाहीत, असा प्रश्न लखनौमध्ये चित्रित झालेला हा चित्रपट विचारतो.

इफ्फीमध्ये युद्धपट आणि लघुपटांचीही मेजवानी होतीच. आत्महत्येच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या एका तरुण नायिकेची कथा महोत्सवातील भारतीय ‘पॅनोरामा’ विभागात दाखविण्यात आलेल्या ‘स्टील अलाइव्ह’ हा मनोनाट्य लघुपट सांगतो. व्यावसायिक प्रवासी छायाचित्रकार असणाऱ्या ओंकार दिवाडकर यांचा हा लघुपट आहे. या लघुपटातील मुख्य पात्र औदासिन्य आणि भावनिक गोंधळामुळे आत्महत्येचा प्रयत्न करते, परंतु ती अयशस्वी होते आणि पुन्हा आपले आयुष्य जगू लागते. ३० मिनिटांच्या या मराठी लघुपटात २७ मिनिटांचा अनकट शॉट आहे. आत्महत्या करण्याच्या वृत्तीने झपाटलेल्या त्या व्यक्तीचा प्रवास यातून दाखविलेला आहे. प्रेक्षकांना कथा सांगण्याऐवजी त्याचा प्रभावी अनुभव देणे हा या लघुपटाचा उद्देश!

- अशा किती कहाण्या सांगाव्यात? काय पाहू, त्यातले काय मनात साठवून ठेवू, असे प्रश्न प्रत्येकच फिल्म फेस्टिव्हलमध्ये चाहत्यांना पडतात. या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रंगलेल्या इफ्फीमध्ये मानवी जगण्याचे हे रंग अधिकच व्याकुळ करून गेले हे मात्र खरे!

(उपमुख्य उपसंपादक, लोकमत, कोल्हापूर)