शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

सीमेवरचे सैन्य धरणांवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 06:05 IST

82 टक्के कोरडवाहू गावांमध्ये पाणीटंचाईचा संघर्ष आह़े, तर संरक्षित धरण क्षेत्रातील गावांमध्ये पाण्याचा अपव्यय मोठय़ा प्रमाणात होतो़ पाणी नाही म्हणून टाहो फोडणारे ग्रामस्थ एकीकडे आणि डोळे, तोंड बंद करून आलेल्या आवर्तनाचा दुरुपयोग होताना पाहणारे दुसरीकड़े अशी परिस्थिती आह़े त्यास सामाजिक शिस्त नसणे हे कारण आह़े 

ठळक मुद्देजमिनीतले पाणी उपसण्याची हाव थांबली नाही, तर आपल्या सैन्याला सीमेवरुन पाण्याच्या संरक्षणासाठी धरणांवर पाठवण्याची वेळ फार दूर नाही- राज्याच्या आदर्शगाव कृती समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्याशी संवाद

- पोपटराव पवार* आजचा दुष्काळ नेमका कशामुळे उद्भवलेला आहे?मागच्या दहा वर्षांत तीन वेळा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली़ या पूर्वीचा म्हणजे 1972 सालचा दुष्काळ सर्वांच्या लक्षात राहिला़ 1972 पूर्वी जन्मलेल्या लोकांनी तो दुष्काळ अनुभवला आह़े अन्नधान्य आणि रोजगाराच्या टंचाईसाठी तो दुष्काळ ओळखला गेला़, तर आजचा दुष्काळ पाणीटंचाईचा आह़े यापूर्वी दुष्काळी गाव म्हटले की कमी पाऊस पडणारी (अवर्षणप्रवण) गावे म्हटली जात़; परंतु आता अतिवृष्टीची गावेही टंचाईग्रस्त दिसतात़ 1972 ते 2019 या मधल्या काळात दीर्घकालीन उपाययोजनांची कमतरता व सामाजिक शिस्तीचा अभाव यामुळे उद्भवलेली ही परिस्थिती आह़े * वारंवार उपाययोजना करूनही तीच परिस्थिती का?82 टक्के कोरडवाहू गावांमध्ये पाणीटंचाईचा संघर्ष आह़े, तर संरक्षित धरण क्षेत्रातील गावांमध्ये पाण्याचा अपव्यय मोठय़ा प्रमाणात होतो़ पाणी नाही म्हणून टाहो फोडणारे ग्रामस्थ एकीकडे आणि डोळे, तोंड बंद करून आलेल्या आवर्तनाचा दुरुपयोग होताना पाहणारे दुसरीकड़े अशी परिस्थिती आह़े त्यास सामाजिक शिस्त नसणे हे कारण आह़े आतापर्यंत विहीर पाण्याचा शाश्वत उद्भव होता़ पुढे विंधन विहिरींची (बोअरवेल) खोली वाढत गेली़ त्यामुळे विहिरी संपल्या़ आता बोअरवेलही कोरडे पडले आहेत़ मागच्या तीन दुष्काळात आपण आजचे मरण फक्त उद्यावर ढकलण्याची दक्षता घेतली़ मागची दुष्काळी स्थिती मार्चनंतर उद्भवायची व एप्रिल, मे हे दोनच महिने उपाययोजनेचे असायच़े नंतर पाऊस पडला की सर्व शांत होऊन जायच़े आता ऑगस्ट, सप्टेंबरमध्येच टंचाईची स्थिती दिसत़े त्यामुळे टंचाईचा कालखंड वाढला अन् उपाययोजना करणंही अवघड गेलं़ * त्या उपाययोजना तात्पुरती मलमपट्टी ठरल्या का?तात्पुरत्या उपाययोजनांचे दिवस आता संपले आहेत़ आता दीर्घकालीन उपायांशिवाय पर्याय नाही़ त्यामध्ये पीक नियोजन, पाणी व्यवस्थापनाला प्राधान्य हव़े पाणी अडवणे आणि जिरवणे ही दुष्काळावरील कायमस्वरूपी उपाययोजना नाही़ तर तो उपचाराचा एक भाग आह़े पाणी अडवणे आणि जिरवणे यासाठी आपण रोजगार हमी योजनाच थकवली़ जलसंधारणाचं मोठं काम केलं़ आता जलयुक्त शिवार आलं़, पानी फाउण्डेशन, नाम फाउण्डेशन आले आणि इतर काही घटकही त्यामध्ये सहभागी झाल़े एव्हढं करूनही टंचाईग्रस्त गावं समृद्ध करण्यात आपण अपयशी ठरलो़ * वाळू उपसाही टंचाईला कारणीभूत ठरत आहे?ओढय़ांमध्ये जोपर्यंत वाळू होती, तोपर्यंत गावं पाणीदार होती़ नदीतील वाळू उपसा बेसुमार वाढला़ त्यामुळे नदीकाठ आटला़ गावं कोरडी झाली़ काही गावांनी स्वयंप्रेरणेने नदीतील वाळू उचलू द्यायची नाही, असा ठराव घेतला़ पिकांचे नियोजन करून पाणी व्यवस्थापन करणारी गावं आजही पाणीदार आहेत़ या गावांनी एकत्र येऊन सामाजिक शिस्तीतून निर्णय घेतला़ यामुळे ती गावं यशस्वी झाली़; पण काही गावांत राजकीय पाठबळामुळे वाळू उपाशाला असणारा विरोध तकलादू ठरत आह़े कायदे, त्यांची अंमलबजावणी आणि मतपेटी यावर चिंतनाची गरज निर्माण झाली आह़े * टंचाईबाबत राजकीय नेते गंभीर नाहीत का?या निवडणुकीत कुठल्याही राजकीय पक्षाच्या अजेंड्यावर पाणी नियोजन, पीक नियोजन, पर्यावरण, व्यसनमुक्ती हे विषय नव्हत़े सत्ताधारी असो की विरोधक, मतपेटीची नाराजी कोणालाच घ्यायची नाही़ कारण नीती आणि मूल्यांच्या राजकारणाला घरघर लागली आह़े त्यामुळेच निवडणुकांमधील वाढता खर्च हा दुष्काळी उपाययोजनेतील गुणवत्तेवर सर्वात मोठा परिणाम करीत आह़े त्यामुळे दुष्काळापुरत्या उपाययोजना हा एकमेव उपचार आता ठरत आह़े कारण या दुष्काळात रोजगार हमीच्या योजनांपेक्षा पाण्याचा टँकर आणि जनावरांच्या चारा छावण्या या दोनच मागण्या जास्त दिसतात़ त्यात चारा छावण्या जनावरांसाठी की चालकांसाठी आणि टँकर माणसांसाठी की मालकांसाठी, असा प्रश्न उपस्थित होत आह़े म्हणून आता दुष्काळी उपाययोजनांमध्ये शिस्तीची गरज आह़े * दुष्काळाबाबत चिंतन होत नाही का?यावर आता चिंतन कोणी करायचे? राज्यकर्त्यांनी, प्रशासनाने का समाजातील जाणत्या नेतृत्वाने? चार्‍याची जबाबदारी सरकारची की शेतकर्‍यांची येथून ही सुरुवात आह़े कारण आता दूध व्यवसायावरच कुटुंबं उभी आहेत़ शेतमालाची परिस्थिती अत्यंत दयनीय आह़े दूध व्यवसायामुळे कुटुंबं तग धरून आहेत़ एकदा का दूध व्यवसाय उद्ध्वस्त झाला तर अराजक परिस्थिती निर्माण होईल़ दूध व्यवसाय परवडतो की नाही, यापेक्षा रोज हातात पैसे येतात़ त्यातून प्रापंचिक अडचणी सुटतात़ पतसंस्था, सहकारी सेवा सोसायट्या उद्ध्वस्त होत आहेत़ शेतीसंबंधी आर्थिक नाड्याच कमकुवत झाल्या आहेत़ त्यामुळे आत्महत्येचे सत्र विदर्भ, मराठवाडामार्गे समृद्ध अशा पश्चिम महाराष्ट्रात आले आह़ेदुष्काळी उपाययोजनांचे नव्याने मूल्यमापन आवश्यक आहे का? सतत येणारा दुष्काळ, त्यामुळे उद्भवणारी परिस्थिती आणि पाऊस पडल्यानंतर पुन्हा आलेल्या समृद्धीमुळे समाधानी राहणारी व्यवस्था जास्त काळ टिकणार नाही़ 1972 ते 2019 या 47 वर्षांत झर्‍याचं पाणी इंधन विहिरींमुळे 400 फूट खोल नेऊन घातलं़ मी महाबळेश्वरच्या पायथ्याला जावळी खोर्‍यात जाऊन आलो़ 200 इंच पाऊस पडूनही 54 गावे आज पाण्याच्या शोधात आहेत़ म्हणून धरणांचे पाणी, त्यांचे व्यवस्थापन महत्त्वाचे आहे आणि त्यावर ठरणारी पीकपद्धती बदलणे गरजेचे आह़े मागील 30 वर्षांत पीक व्यवस्थापनाकडे झालेले दुर्लक्ष आज आपल्याला त्रासदायक ठरत आह़े जे विकेल तेच पिकवायचे ही पद्धती धोकादायक आह़े आता दीर्घकालीन उपाययोजना म्हणून या सर्व परिस्थितीचे उघड्या डोळ्यांनी मूल्यमापन करायची वेळ आली आह़े * धरणातील पाणीसाठे आणि त्याचे फेरवाटप गरजेचे आहे का?यापूर्वी झालेल्या चुकांचे दुसर्‍यांवर आरोप करून सत्तेचे मार्ग शोधण्यापेक्षा आपल्याकडे किती पाणी उपलब्ध आहे, याचा अभ्यास होणे आवश्यक आह़े जर धरण बांधताना ठरलेला पाणीसाठा आणि त्यावर झालेले पाणीवाटप यामध्ये तफावत असेल तर धरणाच्या कार्यक्षेत्रातील गावांनाही पाणी मिळणार नाही़ त्यामुळे उपसासिंचन योजना आणि कार्यक्षेत्रातील गावांमध्ये संघर्ष वाढत आह़े पुढचा संघर्ष टाळण्यासाठी पाण्याचं फेरवाटप होणं गरजेचं आह़े* दुष्काळावर उपाययोजना काय आहेत?दुष्काळी गावांत उपाययोजनांच्या गुणवत्तेकडे आणि आयुष्यमानाकडे लक्ष देण्याची गरज आह़े जर पाच वर्षांतच उपचार करूनही पाणीसाठा पुन्हा शून्यावर जात असेल तर नवीन उपचारांसाठी निधी आणायचा कोठून? केवळ जलसंधारणाची चळवळ करून भागणार नाही़ वनसंवर्धन, मृदसंवर्धन, जलसंवर्धन आणि पशुसंवर्धन याच क्रमाने उपचार करणे गरजेचे आह़े पाणीटंचाई ही निव्वळ वाढत्या लोकसंख्येमुळे नाही, तर वेगाने वाहून गेलेली माती हेदेखील एक मोठे कारण आह़े मागील काही वर्षांत निव्वळ ओढय़ावर लक्ष केंद्रित केल़े ओढय़ांच्या कडेला केवळ 25 ते 30 टक्के जमिनी आहेत आणि सर्वात जास्त पाणी उपसा ओढय़ांच्या कडेने झाला आह़े वृक्षलागवड, चराई बंदी, मृदसंधारणाच्या उपाययोजना यामुळे पाणी जमिनीत मुरते, तर ओढय़ांवरील बंधार्‍यात साठलेले पाणी डोळ्यांत भरत़े; पण हे दिसणारं पाणी मुरतं किती आणि बाष्पीभवन किती होतं, याचं कोणतही मोजमाप होत नाही़ ओढय़ांच्या खोलीकरणामुळे मुरुमाचे स्तर संपले आणि खडक उघडे केल़े त्यामुळे जमिनीत पाणी मुरणे थांबले आह़े जमिनीखाली पाणीसाठेच राहिले नाहीत़ कारण पुनर्भरण करण्याचे सर्व मार्गच बंद करून टाकले आहेत़ हा सर्वात मोठा धोका आहे पर्यावरणाला आणि मानवालाही़ पाणी उपसण्याची स्पर्धा विकोपाला गेली आह़े जमिनीच्या पोटातच पाणी जाऊ द्यायला कोणी तयार नाही़ जमिनीच्या खालच्या पाण्यावरची सामाजिक मालकी इंधन विहिरी आणि शेततळ्यांच्या नव्या सोयरिकीमुळे खासगी, वैयक्तिक होत आह़े आणि याला शिस्त लावण्याची धमक आता राजकीय व्यवस्थेत राहिली नाही़ त्यामुळे वाहून जाणार्‍या पाण्याची साठेबाजी होण्याऐवजी जमिनीत जिरलेल्या पाण्याची साठेबाजी करण्याची स्पर्धा निर्माण झाली आह़े त्यामुळे पुढच्या 20 वर्षांंत सीमेवरची आर्मी पाणीसाठय़ावर आलेली असेल़ संरक्षण विभागात प्रथमच पाणीसंरक्षण आर्मी तयार करावी लागेल़मुलाखत : साहेबराव नरसाळे