शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
4
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
7
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
8
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
9
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
10
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
11
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
12
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
13
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

रोजगार आटलेले नाहीत, बदलले आहेत ! - विजयशेखर शर्मा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 6:02 AM

नवतरुण, तंत्रज्ञानाच्या लाटेवर स्वार होऊन नवनिर्मिती करणारे "पेटीएम"चे संस्थापक, मुख्य कार्यकारी अधिकारी विजयशेखर शर्मा यांच्याशी लोकमत वृत्तसमूहाचे अध्यक्ष माजी खासदार विजय दर्डा यांनी संवाद साधला. निमित्त होते नुकत्याच पार पडलेल्या "लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर " या सोहोळ्याचे ! या वार्तालापाचे हे संपादित शब्दांकन.

ठळक मुद्देरोजगार निर्मिती ( जॉब क्रिएशन) बदललेली नाही तर जॉब्ज अपॉच्युर्निटीच-रोजगार संधीच बदलत चालल्या आहेत. त्यामुळे कोणतं काम लहानमोठं असं नाही तर त्याकडे संधी म्हणून पाहिलं पाहिजे !

- विजयशेखर शर्मा

(संस्थापक, मुख्य कार्यकारी अधिकारी, "पेटीएम")

हे पहा, आता रस्त्यावर गाड्या जास्त आल्या, चालक नवखे आहेत तर अपघातांचं भय वाढतं, अपघात वाढतात. पण म्हणून आपण म्हणतो का, रस्तेच नको, वाहनं नको? तसंच डिजिटल व्यवहारांचं आहे. सध्या डिजिटलायझेशनमध्ये जे आर्थिक घोटाळे होतात, त्यात व्यवस्थात्मक घोटाळे कमी आहेत. ग्राहकांच्या चुकांमुळे, माहिती नसल्याने फसवणुकीचे प्रकार जास्त घडतात. हळूहळू ग्राहकही त्यातून शिकतील. चुका कमी होतील. सध्या डिजिटल पेमेंट ही अगदी लहानातल्या लहान व्यवसाय करणाऱ्यालाही सोयीचे ठरते आहे. आज जी उलाढाल २०० मिलिअन्सची आहे ती येत्या काही काळात ५०० मिलिअन्सवर पोचेल. हा ‘रेट ऑफ चेंज’ आपल्या समाजात मोठा आहे.

ग्राहकांची सोय वाढली की व्यवहार कसे वाढतात, याचं एक उदाहरण सांगतो. हैदराबादमध्ये काही विद्यार्थी फेक स्क्रीन दाखवून पेमेन्ट झालं असं स्थानिक डोसेवाला, नाश्तावालांना दाखवित. पण यांच्याकडे पैसे आलेलेच नसत. हातातलं काम सोडून अनेकांना पैसे मिळाले की नाही हे पाहणंही जमत नसे. मग त्यांचं नुकसान व्हायचं. त्यावर आम्ही उपाय शोधला. ‘साउण्ड बॉक्स’. म्हणजे पैसे मिळाले हे सांगणारी एक डबी. आता छोल्यांची बशी भरता भरता ठेलेवाला ऐकतो की, २५० रुपये प्राप्त. पेटीएम झालेलं असतं. तो फक्त ऐकून मान डोलावतो, काम सुरू. त्याचा परिणाम असा झाला की जो छोटा व्यावसायिक महिन्याला ४०-५० पेमेंट डिजिटली स्वीकारायचा तो आता सरासरी ५०० पेमेंट्स स्वीकारतो. म्हणजे सोय वाढली की वापर वाढतो. ग्राहक आणि व्यावसायिक यांच्यातलं नेटवर्क आणि विश्वास असा वाढीस लागतो.

आता आम्ही पेटीएमचा आयपीओ आणायचं ठरवतो आहोत. बँकांवर विश्वास असला तरी आता बँकांच्या मुदत ठेवीतून पुरेसे व्याज, उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे जास्त परतावे देणारे पर्याय लोकही शोधतात, आम्हीही एक पाऊल पुढे टाकणार आहोत.

हा सगळा काळच ‘फॉरवर्ड लुकिंग’ विचार करणारा आहे. खेडोपाडीही मुलांसमोर हे पर्याय उपलब्ध व्हायला हवेत. मी स्वत: लहानशा शहरात अलीगडजवळच्या वाढलो. या जगात जो दिखता हैं, वो बिकता हैं. सरकारी नोकरी हीच मोठी गोष्ट असं आधी मुलांना वाटायचं कारण तेच दिसायचं. मग बँका, खासगी कंपन्या आल्या. पण त्याहून वेगळ्या संधी मुलांसमोर येत नाहीत. कॉर्पोरेट लॉयर, बँकर या संधी आहेत हे किती मुलांना कळतं? अगदी अलीकडच्या काळात मुलं स्टार्टअपच्या नोकऱ्या घ्यायला तयार नव्हते.

मात्र आता या काळात हे खेडोपाडीही हे पोहोचवलं पाहिजे की रोजगार निर्मिती ( जॉब क्रिएशन) बदललेली नाही तर जॉब्ज अपॉच्युर्निटीच-रोजगार संधीच बदलत चालल्या आहेत. त्यामुळे कोणतं काम लहानमोठं असं नाही तर त्याकडे संधी म्हणून पाहिलं पाहिजे !

फोटोओळी-

(नुकत्याच झालेल्या लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना पेटीएमचे संस्थापक विजयशेखर शर्मा. समवेत लोकमतचे सहव्यवस्थापकीय संचालक-संपादकीय संचालक आणि महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्काराचे संस्थापक ऋषी दर्डा, लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा, खा. भावना गवळी, खा. डॉ. विकास महात्मे, खा. श्रीकांत शिंदे, खा. प्रफुल पटेल आणि खा. श्रीरंग बारणे.)