शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Education: उच्च शिक्षणासाठीच्या शिष्यवृत्ती योजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2022 10:08 IST

Education: १०वी तसेच १२वीला चांगले गुण मिळूनदेखील पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेताना फी कशी भरायची ही विवंचना मध्यमवर्गीय पालकांसमोर असते.  महाराष्ट्र सरकारने राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे.

- आनंद मापुस्कर,करिअर मार्गदर्शकराजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना१०वी तसेच १२वीला चांगले गुण मिळूनदेखील पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेताना फी कशी भरायची ही विवंचना मध्यमवर्गीय पालकांसमोर असते.  महाराष्ट्र सरकारने राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी जातीची अट नाही. या अभ्यासक्रमांसाठी ही योजना लागू आहे.

१) उच्च शिक्षण विभागn पारंपरिक अभ्यासक्रमांची १०० टक्के टयूशन फी (शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित संस्था) सरकार देते.n व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी  वार्षिक उत्पन्न रू २.५० लाख किंवा त्याहून कमी असलेल्या पालकांच्या पाल्यांची शासकीय व अनुदानित महाविद्यालयामधील १००% ट्यूशन फी, तर विना अनुदानितमधील ५० % टयूशन फी सरकारकडून दिली जाते. n वार्षिक उत्पन्न रु. २.५ लाख ते रु. ८ लाख असलेल्यांच्या पाल्यांची व्यावसायिक अभ्यासक्रमांची ५०% टयूशन फी (सर्व महाविद्यालयांसाठी)सरकारकडून दिली जाते.n परीक्षा फी - व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी ५० टक्के परीक्षा फी तर पारंपरिक अभ्यासक्रमांची १०० टक्के परीक्षा फी सरकार देते.

२) तंत्र शिक्षण विभागखालील अभ्यासक्रमांची ५० टक्के टयूशन फी व ५० टक्के परीक्षा फी दिली जाते. कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न वार्षिक रु. ८ लाखांपेक्षा कमी असावे. तसेच प्रवेश कॅप (केंद्रीय प्रवेश प्रक्रिया) मधून आवश्यक आहे. पदविका - इंजिनीयरिंग डिप्लोमा, १२ वीनंतरील फार्मसी डिप्लोमा, १२ वीनंतरील हॉटेल मॅनेजमेंट डिप्लोमापदवी - इंजिनीयरिंग, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट व केटरिंग टेक्नोलॉजी, आर्किटेक्चरपदव्युत्तर पदवी - एम.बी.ए. / एम.एम.एस., एम.सी.ए.

३) वैद्यकीय शिक्षण विभागपदवी - एम.बी.बी.एस., बी.डी.एस., बी.ए.एम.एस., बी.एच.एम.एस., बी.यू.एम.एस., बॅचलर ऑफ फिजिओथेरपी, बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी, बॅचलर ऑफ ऑडिओलॉजी व स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी, बॅचलर ऑफ प्रोस्थेटिक्स व ऑर्थ्रोटिक्स, बी.एस्सी. (नर्सिंग) शासकीय अनुदानित, महापालिका संचालित तसेच खासगी महाविद्यालयांमधील वरील अभ्यासक्रमांची ५० टक्के फी (शिक्षण शुल्क व विकास शुल्क) दिली जाते. कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न वार्षिक रु. ८ लाखांपेक्षा कमी हवे.

ही वेबसाईट बघावी-https://mahadbtmahait.gov.in/ 

टॅग्स :Educationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्र