ड्रोन आर्मी
By Admin | Updated: July 25, 2015 18:36 IST2015-07-25T18:36:25+5:302015-07-25T18:36:25+5:30
उडत्या ‘ड्रोन’द्वारे हल्ले होण्याचा धोका वाढला आहे. आणि हे आक्रमण कोणत्या नियमांनी कसे रोखता येईल, याबद्दल जगभरातल्या यंत्रणा, तंत्रज्ञ अजूनही गोंधळातच आहेत.

ड्रोन आर्मी
- पवन देशपांडे
शत्रूच्या प्रदेशात टेहळणी करण्यासाठी वापरले जाणारे ड्रोन आता थेट हल्ला करणारी शस्त्रस्त्रे वाहून नेण्यात तरबेज झाले आहेत. अमेरिकेने तर हा वापर पूर्वीच सुरू केला होता, आता चीन स्वत:ची ड्रोन आर्मीच उभी करत असल्याच्या बातम्या आहेत. इतर देशही त्याच मार्गाने जाऊ पाहत आहेत आणि इतक्या स्वस्तात उपलब्ध होणारे हे तंत्रज्ञान वापरण्यात दहशतवादी संघटना तरी
मागे कशा राहतील?
मुंबईवर हवाई मार्गाने हल्ला होण्याची शक्यता.. तोही हवेतून.. दहशतवाद्यांकडून पॅराग्लायडर्स, रिमोटद्वारे उडणारे छोटे विमान किंवा ड्रोन यांचा वापर केला जाण्याचा कयास..- मुंबई पोलिसांनी 3 जुलै रोजी थरकाप उडवणारा हा इशारा दिला. त्यानंतर मुंबईच्या अकाशात कुठेही ड्रोन, रिमोटद्वारे चालणारे छोटे विमान उडविण्यास आणि पॅराग्लायडिंग करण्यास बंदी घालण्यात आली.
मुंबईसारख्या महानगरावर हल्ला होऊ नये यासाठी पोलिसांनी ड्रोनबंदी घालणो आणि त्यानंतर भारताच्या सीमापार पाकिस्तानात उडता ड्रोन पडण्यावरून हेरगिरीच्या आरोपांनी भारत-पाकिस्तानमध्ये गदारोळ माजणों हा योगायोग जरी म्हटला तरी टेहळणी आणि रेकी करण्यासाठी ड्रोनचा वापर होतो, हे आता काही गुपित उरलेले नाही. युद्ध, हल्ले, गनिमी काव्यांसाठी ड्रोनचा वापर वाढला आहे.
काही दिवसांपूर्वी भारताने म्यानमारमध्ये घुसून केलेली कारवाई हे त्याचे उत्तम उदाहरण म्हणता येईल. म्यानमारमधील बंडखोर दहशतवाद्यांवर हल्ला चढवण्याआधी भारताने ड्रोन कॅमे:याद्वारे त्या सर्व भागाची पाहणी केली होती. त्यानंतरच योजना आखली आणि फत्तेही केली. ड्रोनच्या यशाची अशी गाथा असल्यानेच कदाचित ड्रोनचा संरक्षण दलातही वापर करण्याचा विचार सारेच देश करत आहेत. आशियामध्ये भारत आणि चीन यासाठी मोठी पावले उचलताना दिसत आहेत.
तो वापर म्हणजे कुरापती राष्ट्राला लागून असलेल्या सीमेवर अविरत नजर ठेवणो. पाकिस्तान, बांगलादेश आणि चीनकडून होणारी घुसखोरी ही आपल्या देशासाठी मोठी डोकेदुखी. ती रोखताना अन् घुसखोरांचा कट मोडून काढताना रात्ररात्र सीमेवर नजर ठेवून असणो कठीण काम. ही कामगिरी यापुढे ड्रोन बजावू शकतील असा विचार आता पुढे येऊ घातला आहे.
पण याला जशी सुरक्षेची बाजू आहे तशीच दुसरी बाजूही आहे. एखाद्या तंत्रज्ञानाचा जितका चांगला वापर करण्याचा विचार होतो तसा दुरुपयोगही होतोच.
‘लष्कर ए तोयबा’, ‘इंडियन मुजाहिद्दीन’ आणि ‘जैश ए मोहम्मद’सारख्या दहशतवादी संघटनांचा भारताला सर्वाधिक धोका आहे. त्यात इसिस या इराक आणि सीरियामध्ये धुमाकूळ घालणा:या नव्या संघटनेचीही आता भर पडू लागली आहे. इसिसचे काही व्हिडीओ पाहिल्यास या दहशतवादी संघटनेकडे अत्याधुनिक ड्रोन असल्याचे स्पष्ट दिसते. हमस या दहशतवादी संघटनेकडेही अनेक ड्रोन आहेत.
लष्कर ए तोयबा किंवा जैश ए मोहम्मद या संघटना दिल्लीवर ड्रोनद्वारे हल्ला करण्याची शक्यता असल्याचा अॅलर्ट गुप्तचर खात्याने पोलिसांना देऊन काही महिन्यांपूर्वीच सतर्क केले होते; शिवाय ड्रोन विकणा:या कंपन्यांनी आपल्या ग्राहकांची सर्व माहिती घेऊनच ते विकावे, असा फतवाही निघाला होता तो दहशतवादी कट यशस्वी होऊ नयेत म्हणूनच.
ड्रोनद्वारे हल्ला करण्याचा कट 2क्11 पासून आतार्पयत जगभरात पाचवेळा उघडकीस आला आहे. सुदैवाने घातपात होण्याआधी दहशतवाद्यांचे मनसुबे धुळीस मिळाले. हे सारे अमेरिका, जर्मनी, स्पेन अशा
प्रगत देशांत शक्य झाले. मुंबई-दिल्लीसारख्या सदैव घाईत असलेल्या शहरांत अगदी मान वर करून न पाहणा:या लोकांची नजर ड्रोनवर जाईल तरच नवल! त्यामुळे भारतासारख्या देशासाठी हा धोका अधिक आहे.
हा धोका टाळता यावा म्हणून नियमांची चौकट बांधणो ही अत्यंत जिकिरीची गोष्ट आहे. ड्रोन उड्डाणाबाबत आणि त्यांच्या नियमांबाबत जगभरातील व्यवस्था आणि तज्ज्ञ अजूनही प्राथमिक स्तरावरच आहेत. जगभरात अनेक देशांनी तसे प्रयत्न सुरू केले आहेत
अमेरिका :
अमेरिकेचे आकाश आधीच विमानांनी खच्चून भरलेले आहे. त्यात आता नव्या छोटय़ा-छोटय़ा खेळण्यांची भर टाकणो जिकिरीचे ठरेल, याची त्यांनाही कल्पना आलेली आहे. म्हणूनच राष्ट्रीय धोरण तयार होण्याआधी परिस्थितीवर नियंत्रण असावे म्हणून अमेरिकेतील व्यवस्थेने सध्या काही ढोबळ नियम केले आहेत : 4क्क् फुटांर्पयतच ड्रोन उडवावे, नजरेसमोर राहील अशाच ठिकाणार्पयत पोहोचवावे, विमानतळाच्या पाच मैल परिघात ड्रोन उडवले जाऊ नये, स्टेडियमच्या किंवा गर्दीच्या परिसरात ड्रोन उडविले जाऊ नये, ड्रोन 25 किलोपेक्षा अधिक वजनाचे असू नये, असे हे नियम आहेत.
सध्या अमेरिकेने राजधानी वॉशिंग्टन डिसीला ‘नो फ्लाइंग झोन’मध्ये टाकले आहे.
न्यूझीलंड :
ड्रोनला न्यूझीलंडमध्ये रिमोटली पायलेटेड एअरक्राफ्ट सिस्टिम असे म्हणतात. इथे ड्रोन उडवण्यास परवानगी आहे, पण काही नियमांच्या आधीन राहून! दिवसाच उडवावे, सदहेतुसाठीच वापर व्हावा, केवळ व्यक्तिगत उपयोगसाठीचा वापर फोटो किंवा व्हिडीओ घ्यावा, योग्य त्याच रेडिओ लहरींचा वापर करावा, विमान वाहतूक नियंत्रण, दूरध्वनी आणि इतर आपत्ती व्यवस्थापनासाठी वापरल्या जाणा:या साधनांच्या रेडिओ लहरींमध्ये अडथळा येईल अशा लहरी वापरू नयेत, असे नियम घालून दिले आहेत़
थायलंड :
थायलंडमध्ये एका पत्रकाराने 2क्13 साली एका आंदोलनाचे ड्रोनद्वारे चित्रण केले. आंदोलनातील लाठीमार, दगडफेक, अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडणो, पाण्याचा मारा करणो अशा प्रकारांमुळे जमिनीवरून असे चित्रण करणो सहज शक्य नव्हते. त्यामुळे ड्रोनचा वापर करून ते चित्रण करण्यात आले. पण अशा चित्रणावर आता थायलंडने बंदी घातली आह़े कोणीही परवानगी न घेता अशा प्रकारचे चित्रण केल्यास त्याला एक वर्षार्पयत तुरुंगवासाची शिक्षा केली जाऊ शकते आणि 1229 डॉलरचा दंडही होऊ शकतो.
ऑस्ट्रेलिया
तुमच्याकडे परवाना प्रमाणपत्र असलेले ड्रोन नसेल तर ऑस्ट्रेलियात तुम्हाला ड्रोन उडवता येणार नाही. कारण तिथे सर्वसामान्यांना ड्रोन उडवण्यास बंदी आहे. परवाना असला तरी वाहनाच्या किंवा इमारतीपासून 3क् मीटर दूर ड्रोन उडवता येईल. इमारत मालकाची किंवा वाहन मालकाची आधीच परवानगी घ्यावी लागते. समुद्रकिनारे, मैदाने अशा जास्त लोक जमा होणा:या ठिकाणी ड्रोन उडवण्यावर बंदी आहे.
- याच वाटेने आता भारतालाही चालावे लागेल.
दहशतवाद्यांच्या क्रूर मनसुब्यांची शक्यता लक्षात घेऊनच डीआरडीओने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येच भारतात ड्रोन उडवण्यावर बंदी घातली होती.
पण केवळ बंदीने काम होणार नाही, हेही तितकेच खरे! या उडत्या दहशतीवर पोलिसांना आणि सर्वसामान्य नागरिकांनाही खडा पहारा द्यावा लागणार आहे, हे निश्चित.
काळजी घेतली,
तर उत्तम तंत्रज्ञान
ड्रोनने सध्या जगभरात एक वेगळी जादू केली आहे. त्याच्या वापरावर भारतात डीजीसीएने बंदी घातली असली, तरी त्याच्या वापराचे नियम केल्यास अनेक प्रकारे ड्रोनचा वापर केला जाऊ शकतो. मोठे शेत असल्यास निगराणी करण्यास, तेलांच्या पाइपलाइनवर नजर ठेवण्यास, रेल्वे, वीज अशा अनेक क्षेत्रंत त्याचा वापर होऊ शकतो. त्याचा मोठा फायदाही होऊ शकतो. डीजीसीएने नियम-परवान्यासंबंधी लवकर विचार केल्यास या तंत्रज्ञानाचा भारताला खूप उपयोग होईल. सुरक्षेच्या दृष्टीने विचार केल्यास त्यातील प्रोग्राममध्ये आपण ‘नो फ्लाइंग झोन’ मार्क करून त्या क्षेत्रत ड्रोन जाऊ नये अशी व्यवस्था करू शकतो. डीजीसीएने तसे झोन निश्चित करून द्यायला हरकत नाही.
- विपुल जोशी
मुख्य कार्यकारी अधिकारी,
आयडिया फोजर्ड्रोनची विमानाला धडक
विमानतळ परिसर आणि त्यावरील अवकाशात ड्रोन उडविले जाऊ नये, अशी बहुतेक सा:याच देशांत तंबी असते. पण ही बंदी जर पाळली गेली नाही तर विमान अपघाताचा धोका अधिक असतो. नुकत्याच घडलेल्या घटनेत हा धोका अधोरेखित झाला आहे. विमानतळापासून पाच किमी अंतरावर लुफ्तांसा एअरलाइन्सच्या विमानाला एक ड्रोन धडकले. सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही, पण त्या विमानाला इमजर्न्सी लँडिंग करावे लागले. विमानांना ड्रोन धडकावून अपघात घडविण्याच्या घटना टाळायच्या असतील तर अशा परिसरात ड्रोनबंदी कायमच आवश्यक करावी लागेल.
स्वीत्ङरलडमध्ये ‘ड्रोनपोस्ट’!
एखादे पत्र तुमच्या घरात थेट उडत उडत यावे, ही कल्पना तशी जुनीच. कबुतरांचा त्यासाठी वापर होत असे. पण आता पत्र किंवा पोस्टाने येणारी कोणतीही वस्तू तुमच्या दारी उडत उडत येऊ शकते. स्वीत्ङरलडमध्ये काही दिवसांत हे शक्य होईल. ड्रोनद्वारे पोस्टाची डिलिव्हरी करण्याचा प्रयोग स्वीत्ङरलडमध्ये महिनाभर सुरू आहे. एक किलो वजनार्पयत आणि 1क् किमी अंतरार्पयतची डिलिव्हरी या ड्रोनद्वारे केली जाणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास स्वीत्ङरलडमध्ये ड्रोनपोस्ट अस्तित्वात येईल.
संतप्त जमावाशी
‘ड्रोन’ मुकाबला
1. पोलिसांसाठी ड्रोनचा आणखी एक चांगला वापर म्हणजे जमावाला पांगवणो. जमावाला विरळ करून त्याची शक्ती कमी करणो.
2. हेच काम पोलिसांनी करायचे ठरवले तर लाठीमार, अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडणो आणि पाण्याचा मारा करणो अशा अस्त्रंचा वापर केला जातो.
3. पण कधीकधी त्यात पोलिसांचीही मोठी हानी होते. जमावातून होणा:या दगडफेकीचा मारा सहन करावा लागतो. पण हे टाळण्यासाठी ड्रोन हा उत्तम उपाय आहे.
4. दिल्लीत आणि उत्तर प्रदेशातही जमावाला पांगवण्यासाठी ड्रोन वापरण्याचा विचार झाला आहे.
5. याशिवाय दंगलसदृश स्थितीत शहराच्या कोणत्या भागात काय चालू आहे, हे टिपण्यासाठीही पोलिसांकडून ड्रोनचा वापर होऊ शकतो.
- पण त्यासाठी नियमांचे आकाश किमानपक्षी कायदा व सुरक्षा राखण्यासाठी तरी मोकळे व्हायला हवे.
हल्ला करणारी ड्रोन आर्मी
कोणतीही जीवितहानी होऊ न देता शत्रूच्या भागात पोहोचायचे आणि हल्ले चढवायचे हा गनिमी कावा आता ड्रोनच्या माध्यमातून केला जातोय. असे हल्ले करण्यात अर्थातच अमेरिका आघाडीवर आहे. अमेरिकेकडे विघातक अस्र सोबत नेण्याची आणि ते शत्रूच्या भागात सोडण्याची क्षमता असणारे अनेक ड्रोन आहेत. ते एकाचवेळी शेकडो लोकांचा जीव घेऊ शकतात.
इंग्लंडनेही अमेरिकेकडून पहिल्यांदाच 2क्क्7 मध्ये एमक्यू-9 हे ड्रोन विकत घेतले. ड्रोन निर्मितीत अमेरिका नि:संशय आघाडीवर आहे. आता या क्षेत्रत चीननेही उडी घेतली आहे. चीनही अशा प्रकारची आर्मी तयार करत आहे आणि अशा ड्रोनची निर्यात करण्याच्या व्यापारातही उतरलं आहे. भारत या क्षेत्रत अजून पहिल्या इयत्तेत असला तरी मंगळभरारी घेऊन जगाला चकित करणा:या भारतीय शास्त्रज्ञांसाठी ड्रोननिर्मिती ही गोष्ट फारशी अवघड नाही. ते येत्या काळात दिसेलच. भारताकडेही अशा ड्रोनची आर्मी असेल. दहशतवाद्यांकडेही आता अशा प्रकारच्या हल्ल्यांची क्षमता असलेले मोठ-मोठे ड्रोन असल्याची भीती देश-विदेशातल्या गुप्तचरांना आहे.
भारताचा ‘नेत्र’
पाकिस्तान, बांगलादेश आणि चीनकडून होणारी घुसखोरी ही देशासाठी मोठी डोकेदुखी. शेकडो मैल उंचीवर चोहोबाजूंनी बर्फ असणा:या ठिकाणी अशी शत्रूंवर पाळत ठेवणो अत्यंत कठीण. तरीही भारतीय जवान जिवाची बाजी लावत सीमेवर नजर ठेवून असतात. पण याकामी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा विचार भारतात रुजू लागला आहे. पाच-सात वर्षापूर्वीच याची सुरुवात झाली. डीआरडीओने ‘नेत्र’ नावाचे ड्रोन तयार केले आहे. हे ड्रोन भारतीय संरक्षण दलाला, अनेक राज्यांतील पोलिसांना वापरासाठी दिले गेले होते. त्याचा वापर करण्यासाठी आता पोलीस अधिक उत्सुक आहेत.
आयडिया फोर्ज नावाच्या मुंबईतल्या एका कंपनीच्या साहाय्याने डीआरडीओने ‘नेत्र’ची निर्मिती केली. आजवर अनेक ठिकाणी त्याचा वापरही झाला आहे. काठमांडूमध्ये झालेल्या भूकंपावेळी, उत्तराखंड आणि भूजमध्ये आलेल्या महापुरावेळीही या ‘नेत्र’ने बरीच मदत केली.
त्याचा वापर करण्यासाठी आता पोलीस अधिक उत्सुक आहेत. कारण कोणतीही मनुष्यहानी न होऊ देता हे उपकरण घडलेल्या घटनेच्या ठिकाणाची पाहणी करू शकते.