द्रौपदीची थाळी

By Admin | Updated: September 12, 2015 17:56 IST2015-09-12T17:56:46+5:302015-09-12T17:56:46+5:30

एकीकडे कच:यात फेकलं जाणारं अन्न, तर दुसरीकडे त्याच कचराकुंडीत अन्न शोधणारा माणूस! त्यातूनच जन्माला आली फूड बँक! रस्त्यावरच एक भलामोठ्ठा फ्रीज ठेवला गेला. नको असलेलं, जास्त झालेलं, उरलेलं चांगलं अन्न या फ्रीजमध्ये ठेवायचं आणि ज्यांना अन्नाची गरज आहे त्यांनी कोणीही या फ्रीजमधून हवं ते घ्यायचं, मात्र गरजेपुरतंच. एक साधी कल्पना, पण भुकेली हजारो माणसं आज समाधानानं तृप्तीचा ढेकर देताहेत.

Draupadi plate | द्रौपदीची थाळी

द्रौपदीची थाळी

>अर्चना राणे-बागवान
 
तुम्ही अन्नाची नासाडी करता का किंवा तुमच्या घरातले किती पदार्थ कच:यात जातात? - या प्रश्नावर थोडंसं वरमून नाही नाही म्हणत काही गोष्टी आपल्या नजरेसमोरून जातातच. जसं, शिळं अन्न, बरेच दिवस फ्रीजमध्ये पडून राहिलेलं एखाद दुसरं फळ, कीड लागलेलं धान्य आणि आणखीही बरंच काही..
युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामनुसार भारतात निर्माण होणारं 40 टक्के अन्न वाया जातं, तर जवळपास 21 लाख टन गहू दरवर्षी वाया जातो. याचा अर्थ इतर देशांत यापेक्षा वेगळी स्थिती आहे असं नाही.
जगभरात निर्माण होणा:या एकूण 50 टक्के अन्नाची नासाडी होते. ते गरीब गरजूंपर्यंत पोहोचतच नाही. ‘टन’, ‘टक्क्या’तली ही आकडेवारी पैशांत सांगायचीच झाली तर वर्षाला भारतात 50 हजार कोटींचे अन्न कच:यात जाते!  
आपण इथे फक्त विचार करत असतानाच तिकडे, अल्वारो सैझ नावाच्या व्यक्तीनं एक अभिनव योजना राबविण्यास सुरुवात केलीय. बास्क देशातील (उत्तर स्पेन) गल्डाकाव या छोटय़ाशा शहरात राहणारा हा तरुण. उरलेलं अन्न भुकेल्यांच्या पोटी जाण्यासाठी त्याने ‘फूड बँक’ सुरू केलीय. 
स्पेनवर आर्थिक संकट ओढवले असताना, वृत्तपत्रत अन्नासाठी कच:याच्या कुंडय़ा धुंडाळणा:या माणसाचा फोटो छापून आला होता. एकीकडे लोक उरलेलं शिळं अन्न फेकून देतात, तर दुसरीकडे अन्नान्नदशा.. ही दोन टोकाची चित्रं. गरजूंपर्यंत असं अन्न कसं पोहचवता येईल, यावर उपाय शोधत असतानाच त्याच्या नजरेस जर्मनीतली एक योजना आली. ही ऑनलाइन योजना होती. जिथे लोक त्यांच्याकडील उरलेल्या, नको असलेल्या पदार्थांबद्दल, फळ, भाज्या, धान्यांबद्दल पोस्ट टाकत होते. ती वाचून ज्यांना त्याची गरज आहे, असे लोक संबंधित व्यक्तीकडून त्या गोष्टी घेत असत. 
सैझला मात्र त्याच्या छोटय़ाशा 30 हजार लोकवस्ती असलेल्या गावासाठी असा ऑनलाइन फंडा नको होता. शिवाय जे इंटरनेटचा वापर करत नसतील त्यांचं काय? त्यांच्यापर्यंत आपण कसं पोहोचणार? या प्रश्नातूनच फूड बँक जन्माला आली. आपल्याकडील उरलेले पदार्थ, अन्न एका ठिकाणी जमा करायचे. ही योजना प्रत्यक्षात राबवण्यासाठी त्याला फ्रीजची आवश्यकता होती. त्यासाठी त्याला तिथल्या मेयरकडून 5 हजार 580 डॉलरची मदत मिळाली आणि तिथल्या मध्यवर्ती भागातील पदपथावर हा फ्रीज विराजमान झाला. या योजनेला नाव दिलं गेलं, सॉलिडॅरिटी फ्रीज. या फ्रीजमध्ये हॉटेल्स, रेस्तराँ आपल्याकडे उरलेले अन्न, पदार्थ आणून ठेवत होते. इतकेच नाही तर घरी बनवलेले उरलेले अन्नही इथे ठेवले जाऊ लागले. 
शिळे, खराब झालेल्या अन्नामुळे उद्भवणा:या आरोग्यविषयक समस्या लक्षात घेऊन या फ्रीजमध्ये कोणताही पदार्थ ठेवताना त्यावर उत्पादनाची तारीख (मग ते घरी शिजवलेले अन्न का असेना) आणि एक्सपायरी डेटचा स्टिकर लावणं बंधनकारक केलं गेलं. तसंच या फ्रीजमध्ये कच्चं अन्न, कच्चं मांस, मासे, अंडी ठेवण्यास मनाई केली गेली. या फ्रीजमधून कोणीही काहीही घेऊ शकतं. पण त्याने त्याला आवश्यक असेल तितकंच घ्यावं, इतका साधा सोपा नियम. सैझचा हा उपक्रम स्पेनपासून 400 मैलांच्या अंतरावर असलेल्या मर्सिया शहरातही राबवण्यास सुरुवात झाली. 
आपल्याकडे असे उपक्र म आहेत का?
गेल्या काही वर्षांमध्ये आपल्याकडेही लग्न समारंभ, मेजवान्यांमधून तसेच हॉटेलमधून होणारी अन्नाची नासाडी टाळण्यासाठी ते अन्न गरीब गरजूंपर्यंत पोहचवण्यासाठी काही संस्थांनी पुढाकार घेतला आहे. मुंबईत समर्पण फाउंडेशन, अरहम युवा ग्रुप, रॉनी अँड ओबैद, शेल्टर डॉन बॉस्कोसारख्या संस्था पार्टी, लग्न, हॉटेल्समधून उरलेले अन्न घेऊन ते झोपडपट्टय़ांमधील गरजूंना तसेच बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी कामगारांना दिले जाते. इंडिया फूड बँक ही अशाच पद्धतीने काम करते.
 
87 कोटी लोक रोज उपाशीपोटी!
 
जगभरात दरदिवशी 87 कोटी लोक उपाशी झोपतात. भारतात 12 टक्के लोक उपाशी राहतात. अन्नाच्या नासाडीचा परिणाम हवा, पाणी आणि जमिनीवरही होतो. वाया जाणा:या अन्नाची विल्हेवाट लावण्यासाठी तितक्याच मोठय़ा प्रमाणावर पाण्याचाही वापर करावा लागतो. 
खराब झालेल्या पदार्थांमधून 3.30 अब्ज टन कार्बन डायआक्साईड गॅस बाहेर पडतो. धान्याच्या गुदामांमध्ये, अन्ननिर्मिती करताना 54 टक्के अन्न, धान्य वाया जाते. साठवणूक, वितरण करताना तसेच ग्राहकांकडून 46 टक्के अन्न, धान्य वाया जाते. सर्वाधिक अन्नाची नासाडी आशियात होते. मांस, फळे, भाज्या खराब होण्याचे प्रमाण आशिया, युरोप, दक्षिण अमेरिकेत अधिक आहे. 
 
अन्नाची नासाडी कशी टाळाल?
अन्नधान्य खरेदी करताना आपल्याला आवश्यक असेल तितकंच खरेदी करा. खरेदी केलेले पदार्थ फ्रीजमध्ये वा डब्यांमध्ये भरून ठेवताना शिल्लक असलेले पदार्थ पहिल्यांदा नजरेस पडतील असे ठेवा, जेणोकरून शिल्लक वस्तूंची ‘एक्सपायरी डेट’ संपायच्या आत त्या वस्तू वापरता येतील. नंतरच दुस:या वस्तू, पदार्थ वापरण्यासाठी घ्या. आपल्या आवश्यकतेनुसारच अन्नपदार्थ शिजवा. दुस:या दिवशी खाता येण्यासारखे असतील तर ते योग्यरीतीने पॅक करून फ्रीजमध्ये ठेवा. आवश्यकतेपेक्षा अधिक वस्तू, भाजी, धान्य आणल्यास शेजा:यांबरोबर ते एक्सचेंज 
(बार्टर सिस्टिम) करता येईल. अन्नपदार्थ उरल्यास, नको असल्यास कच:यात टाकण्यापेक्षा गरीब, गरजूंना देता येतील. हॉटेल, रेस्तराँमध्ये गेल्यानंतरही असेच करता येईल. उरलेले पदार्थ पॅक करून घेऊन ते गरजूंना देता येतील.
 
झीरो वेस्ट, नो प्लॅस्टिक, नो ब्रॅण्ड!
 
अन्नधान्याच्या नासाडीबरोबरच आणखी एक समस्या समोर येते, ती आपल्या सामानाबरोबर घरात येणा:या  प्लॅस्टिक पिशव्या, ब्रॅण्डेड कंपन्यांच्या उत्पादनांची वेष्टणं, छोटे मोठे बॉक्स.. प्रत्येकाच्या घरातून निघणारा हा कचरा.. वाढत्या कच:याची आणि त्यामुळे निर्माण झालेल्या डम्पिंग ग्राउंडच्या समस्येबद्दल वेगळं सांगायला नकोच. यावर उपाय म्हणून बर्लिनमधल्या सारा वोल्फ आणि मिलेना ग्लिम्बोस्की या दोघींनी ‘ओरिजिनल अनव्हरपॅक्ट’ नावाचं सुपरमार्केट सुरू केलंय. रिलायन्स फ्रेश, बिग बझार, डी मार्ट येण्यापूर्वीच्या किराणा मालाच्या दुकानांचं हे नवं स्वरूप.
इथे तुम्हाला प्लॅस्टिक बॅग्ज मिळणार नाहीत. ब्रँडेड वस्तू दिसणार नाहीत. त्याऐवजी ऑरगॅनिक उत्पादनांना इथे स्थान मिळालेलं दिसेल. त्याशिवाय धान्य, भाज्या, फळांच्या साठवणुकीसाठी बल्क बिन सिस्टिम त्यांनी उपयोगात आणलीय. बिग बझार, डी-मार्टसारख्या कुठल्याही मोठय़ा स्टोअरमध्ये गेल्यावर अर्धा किलो वा एक किलोच्या मापातच धान्य, फळं आपल्याला घ्यावी लागतात. 
पण सारा आणि मिलेनाच्या सुपरमार्केटमध्ये आपल्याला हव्या असणा:या धान्यांसाठीचा कंटेनर (डबा) वा भाज्यांसाठीची पिशवी आपली आपणच घेऊन जायची आणि आपल्याला हवे तितकेच धान्य, सामान आपण घ्यायचे. 
एखाद्याने कंटेनर आणलं नाही तर त्याला रिसायकल करता येईल असा कागदी टब वा बॅग पुरवली जाते. त्याची किंमतही आपण घेतलेल्या वस्तूच्या वजनाच्या तुलनेतच आकारली जाते. 
पुन्हा जुन्या पद्धतीने शॉपिंगचा अनुभव देणा:या  या सुपरमार्केटचं एकच गणित आहे, पॅकेजिंगच्या माध्यमातून होणारे वेस्टेज (कचरा) कमी करणं.
 
(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)
 
archanaarane@gmail.com 
 
 
 

Web Title: Draupadi plate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.