शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

‘डोन्ट फरगेट 2004’; काँग्रेस जिंकली त्याची गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2022 13:27 IST

‘निवडणुकीत काहीही होऊ शकते, जर ठरवले तर!’ असा विश्वास हे पुस्तक देते. निवडणुकीच्या राजकारणात रस असलेल्या प्रत्येकाने वाचायलाच हवे असे हे पुस्तक आहे.

राजू इनामदार, वरिष्ठ बातमीदार, पुणे -

काँग्रेस जिंकणे शक्यच नाही.’ २०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या दोन वर्ष आधीच, या निवडणुकीचा अंदाज भारतातील एखादा नुकताच वयात आलेला नवमतदारही वर्तवतो आहे. २००४ची लोकसभा निवडणूकही अगदी अशीच होती. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींची लोकप्रियता ऐन भरात होती. १९९९च्या निवडणुकीत स्वतंत्र १८२ आणि आघाडी करून (राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीए) २९८ जागा जिंकून भारतीय जनता पक्ष केंद्रात सत्तेवर आला होता. काँग्रेसला १९९९मध्ये मिळाल्या होत्या ११२ जागा आणि आघाडी करून (संयुक्त लोकशाही आघाडी अर्थात यूपीए) १३५! त्याआधीपासूनच काँग्रेसला घरघर लागली होती. केंद्रातील सत्तेबरोबरच राज्यांमध्येही सत्तेतून पायउतार व्हावे लागत होते.१९९९ ते २००४ या मधल्या पाच वर्षांत सत्ताधारी भाजपने काँग्रेसच्या विरोधात देशभर रान उठवत ‘इंडिया शायनिंग’ म्हणत जोरदार मुसंडी मारली होती. त्यामुळेच २००४च्या निवडणुकीत काँग्रेसला स्वतंत्रपणे देशभरात फार तर ७५ जागा मिळतील आणि त्यांच्या आघाडीला फार तर १२० वगैरे. भाजप आघाडीच सत्तेवर येणार आणि काँग्रेसला परत एकदा दारूण पराभवाचा सामना करावा लागणार, असेच बोलले जात होते.या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे काम एका जाहिरात संस्थेला मिळाले. फक्त ७ ते १५ दिवस त्यांनी काँग्रेसची प्रचार मोहीम राबवली. ‘इंडिया शायनिंग’च्या विरोधात त्यांनी ‘काँग्रेस का हात सबके साथ’ अशी एकदम साधी भूमिका घेतली. सर्वसाधारण माणूस, आम आदमी हा त्यांनी केंद्रबिंदू ठरवला आणि त्यावरच सगळा भर दिला.त्या निवडणुकीचे निकाल समोर आले त्यावेळी निवडणुकीत एखादी प्रचार मोहीम काय करू शकते, याचे दर्शन सगळ्या जगाला घडले. काँग्रेस स्वतंत्रपणे ११२ जागांवरून १४५ जागांवर आली तर त्यांची आघाडी १३५वरून २२० वर. त्याचवेळी भाजपची पूर्वीच्या १८२ जागांवरून थेट १३७ जागांवर गच्छंती झाली होती तर त्यांच्या आघाडीला २९८वरून १८५ वर आणले होते.हे सगळे कसे झाले, याची गोष्ट म्हणजे ‘डोन्ट फरगेट २००४, ॲडव्हर्टायझिंग सिक्रेट्स ऑफ ॲन इम्पाॅसिबल इलेक्शन हिस्टरी’ हे इंग्रजी पुस्तक. ते लिहिले आहे त्या मोहिमेत प्रत्यक्ष अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावलेल्या जयश्री एम. सुंदर यांनी. भारतीय निवडणुकांमधील अनेक लहान-मोठ्या गमती या पुस्तकात आहेत. शिवाय कोणत्याही निवडणुकीत कोणालाही कमी समजू नये हा धडाही! भारतीय जनमानस फार विलक्षण आहे. यांना काय कळतं, असे सर्वांनाच वाटत असताना सामूहिकपणे अशी काही भूमिका मतपेटीतून व्यक्त होते की, भल्याभल्यांना त्याचा धसका बसावा. इंदिरा गांधी यांचा आणीबाणीनंतरचा पराभव व जनता पार्टीच्या पतनानंतरचे त्यांचे दिमाखदार पुनरागमन याच भारतीय जनमानसाने घडवून आणले होते. जयश्री सुंदर यांनी पुस्तकात याचाही बारकाईने विचार केला आहे. त्यावेळच्या काँग्रेसच्या निवडणूक जाहिराती या करायच्या म्हणून केलेल्या नव्हत्या तर हा असा बारीकसारीक विचार करून प्रसारित करण्यात आल्या होत्या.

पुस्तकाचे लिखाणही केवळ एक गोष्ट सांगावी अशा गमतीने झालेले नाही. गंभीरपणे ते लिहिले गेले आहे. ‘डोन्ट फरगेट २००४’ या शीर्षकातूनच हा गंभीरपणा दिसतो. निवडणूक कॅम्पेनशिवाय आणखीही बरेच काही त्यात आहे. लहान-लहान प्रकरणे करून जयश्री यांनी आशय अधिक सुलभ करून वाचकांसमोर आणला आहे. समजणे सोपे व्हावे म्हणून पुस्तकात छायाचित्रेही दिली आहेत. 

निवडणूक कॅम्पेन नव्हे -पुस्तकाचे लिखाणही केवळ एक गोष्ट सांगावी अशा गमतीने झालेले नाही. गंभीरपणे ते लिहिले गेले आहे. ‘डोन्ट फरगेट २००४’ या शीर्षकातूनच हा गंभीरपणा दिसतो. निवडणूक कॅम्पेनशिवाय आणखीही बरेच काही त्यात आहे.  

टॅग्स :congressकाँग्रेसElectionनिवडणूकRahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधी