डेल वेबची किमया!

By Admin | Updated: August 22, 2015 18:41 IST2015-08-22T18:41:14+5:302015-08-22T18:41:14+5:30

आयुष्यभर कष्ट करून निवृत्त झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना एकत्र राहाता येईल, अशा सर्व सोयींनी युक्त वसाहती बांधल्या पाहीजेत,ही कल्पना अमेरिकेत पहिल्यांदा सुचली ती डेल वेब या धनिकाला. पन्नास-पंचावन्न वर्षापूर्वी हे असं काही सुचणं नवलाचंच होतं. डेलचं वैशिष्ठ्य असं, की तो लगोलग कामालाच लागला.

Dell web kimaya! | डेल वेबची किमया!

डेल वेबची किमया!

>- दिलीप वि. चित्रे
 
आम्ही राहतो त्या फ्लोरिडा राज्यातील वसाहतीचं नाव आहे ‘सन सिटी सेंटर’.
बारा हजार एकर क्षेत्रफळावर वसलेल्या जवळजवळ दहा हजार घरांमधील रहिवाशांची सरासरी वयोमर्यादा आहे 75 वर्षे.
आयुष्यभर कष्ट उपसून निवृत्त झाल्यानंतर सुखात दिवस घालवण्याचे स्वप्नं बघणा:यांसाठी खास तयार केलेली ही वसाहत. असे संपूर्ण गावच निर्माण करण्याची कल्पना त्यावेळी, म्हणजे 196क् च्या सुमारास अमेरिकेत नवीनच होती. 
‘डेल वेब’ नावाच्या एका धनिक बुद्धिवंताच्या डोक्यात ही कल्पना आली आणि त्याने प्रथम अॅरिझोना राज्यातील स्वत:च्या राहत्या गावात आणि नंतर कॅलिफोर्नियात अशा दोन वसाहतींची निर्मिती केली. त्या दोन वसाहतींच्या यशानंतर आणि लोकप्रियतेमुळे त्याने निर्माण केलेली फ्लोरिडा राज्यातील ही तिसरी वसाहत.
गायी-गुरं चरण्यासाठी राखून ठेवलेल्या या 12क्क्क् एकर जमिनीचं रूपांतर सुंदरशा वसाहतीत करणं, निवृत्ती उपभोगणा:या समाजाच्या सोयींसाठी जवळच उपाहारगृह, थिएटर्स, होटेल्स, सुंदर तळी, कारंजी, लॅण्डस्केपिंग इत्यादि गोष्टींची योजना करणं हे काम तसं सोपं नव्हतंच. पण या निर्मितीच्या ध्यासानं पछाडलेला डेल वेब स्वस्थ बसूच शकत नव्हता.
1क् मे 1961 या दिवशी ‘सन सिटी सेंटर’च्या पायाभरणीच्या कामाला सुरुवात झाली. त्यावेळी डेल वेब स्वत: उपस्थित होता की नाही हे कोणालाच ठाऊक नाही. पण त्याच्या अटी मात्र अशा होत्या की कुठलेही घर बांधून पूर्ण झाल्यावर ते विक्रीला लावण्याअगोदर जनतेच्या सोयीसाठी पोस्ट ऑफिस, शॉपिंग सेंटर, रस्ते, करमणूक केंद्रे, उच्च दर्जाची रेस्टॉरण्ट्स इत्यादि सर्व गोष्टी उपलब्ध असायला हव्यातच. त्याने जाहीरही करून टाकले की जानेवारी 1, 1962 रोजी घरांचे  बांधकाम (फक्त आठ महिन्यांत) पूर्ण होईल!.
हे ऐकून त्याच्या स्वत:च्याच मॅनेजर लोकांचे धाबे दणाणले नसते तरच नवल. अर्थातच या 1क्,क्क्क् घरांचे बांधकाम टप्प्याटप्प्याने झाले हे वेगळे सांगायला नकोच.
मे 1961 च्या अखेरीस ‘सन सिटी सेंटर’ नजीकच्या स्थानिक कंत्रटदारांचे डेल वेबच्या हुकुमांनुसार प्रथम रस्ते तयार करण्याचे काम सुरू झाले. त्या काळात ‘सन सिटी सेंटर’ची जमीन केवळ गुरं चारण्यासाठी उभारलेले कुरण आणि पाईनच्या झाडांचे जंगल होते. जमिनीवर साठलेली, साचलेली तळी साफ करणो, जमिनीखालील पाण्याची उंचावलेली पातळी कमी करणो हीच मुख्य कामे होती. पावसाच्या पाण्यानं ठिकठिकाणी साचलेली तळी ही फक्त गुरांना पाणी पिण्यासाठी उपयोगात आणली जात. डेल वेब मात्र जमिनीवरची दलदल-चिखल साफ करून बांधकाम शक्य तेवढे लवकर सुरू करण्यासाठी उतावीळ झालेला होता. त्याने मोठमोठे बुलडोझर्स जमीन सपाट करण्यासाठी आधीच आणून ठेवलेले होते. त्याचा कंत्रटदार म्हणतो की, ‘फक्त पाच मजुरांना घेऊन आम्ही सोमवारी कामाची सुरुवात केली, पण गुरुवार्पयत आणखी 27 मजुरांची भरती करावी लागली. जमिनीवर साठलेली तळी काढण्यासाठी मोठमोठे चर खोदून साठलेल्या पाण्याला वाट मोकळी करून द्यावी लागली. चर खोदून उपसलेले मातीचे ढिगारे घराभोवती करायच्या लॅण्डस्केपिंगसाठी साठवून ठेवावे लागले. बांधकाम प्रत्यक्ष सुरू होण्याआधी, लॅण्डस्केपिंग, सुरुवातीला बांधावी लागणारी मॉडेल होम्स आणि अन्य कामांसाठी पाण्याची उपलब्धता हवी म्हणून 15 एकर क्षेत्रफळाचा एक तलाव बांधावा लागला.’ 
आज ‘स्वॅन लेक’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या तलावाचे त्याकाळी नाव होते ‘बास लेक’. कारण ‘बास’ नावाचे बारा हजार मोठी तोंडं असलेले मासे त्यात सोडण्यात आले होते. आज काळ्या-पांढ:या हंस पक्ष्यांच्या जोडय़ा त्यात स्वच्छंदानं फिरतात, म्हणून त्याचे नाव आपोआपच ‘स्वॅन लेक’ झाले. 
तलावाचे काम पूर्ण झाल्याबरोबर लगेचच टाऊन हॉल बांधण्यात आला, त्यापाठोपाठ ‘मॉडेल होम्स’ बांधली गेली आणि लगेचच एक सुंदरसे शॉपिंग सेंटर बांधले गेले. टाऊन हॉलचे बांधकाम फक्त पाच आठवडय़ात पूर्ण झाले. आर्ट अॅण्ड क्राफ्टच्या क्लब रूम्स बांधल्या गेल्या. टाऊन हॉलचा उपयोग कम्युनिटी मीटिंग्जसाठी होऊ लागला. 3क्क् लोकांना बसता येईल एवढे नाटय़गृह, सिनेमा थिएटर बांधले गेले.
नोव्हेंबर 1961 मध्ये नजीकच्या परिसरात एक हॉटेल बांधण्यात आले, उपाहारगृहे तयार झाली. एवढय़ा झपाटय़ानं भराभर कामं झाली याचं एकमेव कारण म्हणजे ‘डेल वेब’नं अॅरिझोना राज्यात उभारलेल्या ‘सन सिटी’मधील इमारतींचे आर्किटेक्चरल प्लॅन्स जसेच्या तसे वापरण्यात आले. नुसत्या इमारतीच नाही, तर सर्वच ले-आऊट कॅलिफोर्निया आणि अॅरिझोना राज्यांमधील ‘सन सिटी’शी इतके मिळते जुळते झाले की एका राज्यातून दुस:या राज्यात गेलेल्या व्यक्तीला इमारती अथवा रस्ते शोधायला कुठलाच त्रस होऊ नये. मुद्दाम फ्लोरिडामधून संत्र्यांची निर्यात करण्यासाठी तयार केलेल्या मालगाडय़ांमधून बांधकामाच्या सामानाची आयात होऊ लागली. आता त्या मालगाडय़ा एकेकाळी अस्तित्वात होत्या याची एकच खूण म्हणजे, जवळजवळ 55 वर्षानंतरसुद्धा आमच्याच घराजवळ असलेली ‘रेल रोड अव्हेन्यू’ या नावाची पाटी. आता रस्त्यामधून जाणारे गाडीचे जुने रूळही नाहीत. कारण रस्त्यांमधून सुधारणा झाल्या. हायवेज तयार झाले आणि बहुतांश दळणवळण ट्रक्सद्वाराच होऊ लागले. पण ‘सन सिटी’चे नशीब बलवत्तर होते. कारण शेजारच्या गावात तयार झालेल्या नवीन हायवेवरून ट्रक्सचा ट्राफिक सुरू झाला आणि ‘सन सिटी’ची शांतता अबाधित राहिली.
समोरासमोर घरांची मागची बाजू असलेल्या भल्यामोठय़ा वतरुळाकार रचनेच्या मधल्या जागेत मोठमोठे तलाव आणि गोल्फ कोर्सेस तयार झाली. लोकांसाठी ‘इन-डोअर’, ‘आऊट डोअर’ स्विमिंग पूल्स बांधण्यात आले. रस्त्यांचे काम पूर्ण झाले. शॉपिंग सेंटरमधील दुकानांचे अनावरण होऊन लोकांची ये-जा वाढीला लागली. दिवसेंदिवस ‘सन सिटी सेंटर’ची शान वृद्घिंगत व्हायला लागली. सन सिटी सेंटरमध्ये घर विकत घेण्यासाठी लोकांची बिल्डर्सच्या ऑफिससमोर रांग लागू लागली. डेल वेब हा माणूस नुसतीच स्वप्ने पाहणारा नव्हता, तर ती प्रत्यक्षात आणणाराही होता हे नि:संशय. काम सुरू होण्याअगोदरच त्याने जानेवारी 1, 1962 ही तारीख जाहीर केली तेव्हा सारेच साशंक होते. पण नोव्हेंबर 1961च्या अखेरीस जेव्हा सन सिटी सेंटरच्या उद्घाटनाच्या जाहिराती वर्तमानपत्रत झळकू लागल्या तेव्हा लोक आश्र्चयचकित झाले नसते तरच नवल!
‘किंग्ज इन’ नावाच्या हॉटेलचे बांधकाम सुरू झाले नोव्हेंबर 1961 च्या मध्यावर आणि सन सिटी सेंटरच्या जानेवारी 1, 1962 या उद्घाटनाच्या दिवसाअगोदरच ते पूर्ण झाले ही घटना आश्चर्यकारकच नाही का?
‘डेल वेब ङिांदाबाद!’
 
(दीर्घकाळ अमेरिकेत वास्तव्याला असणारे ज्येष्ठ मराठी लेखक. ‘कुंपणापलीकडले शेत’ हा कथासंग्रह,  ‘अलिबाबाची हीच गुहा’ या सांगीतिकेसह विदेशातील अनेक मराठी उपक्रम / संस्थांचे संपादक, 
संयोजक, संघटक)
dilip_chitre@hotmail.com
 

Web Title: Dell web kimaya!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.