गोव्याच्या मातीतला दीपोत्सव

By Admin | Updated: November 8, 2015 18:51 IST2015-11-08T18:51:10+5:302015-11-08T18:51:10+5:30

आजच्यासारखे जेव्हा गोव्यात विजेचे दिवे नव्हते त्या वेळेला तेल, तूप जाळून दिवे पेटवले जात़ करंजेल, खष्ट, उंडी, तीळ, शेंगदाणो, तूप, लोणी यांचा वापर

Deepa Festival at the soil of Goa | गोव्याच्या मातीतला दीपोत्सव

गोव्याच्या मातीतला दीपोत्सव

- पौर्णिमा केरकर

आजच्यासारखे जेव्हा गोव्यात विजेचे दिवे नव्हते त्या वेळेला तेल, तूप जाळून दिवे पेटवले जात़ करंजेल, खष्ट, उंडी, तीळ, शेंगदाणो, तूप, लोणी यांचा वापर 
दिव्यांच्या वातीला ऊर्जा पुरविण्यासाठी केला जायचा़  मंदिरांचे गाभारे, सभागृह समई, नंदादीप, पणत्या 
यांनी उजळून जायच़े आजही गोव्यातल्या प्रत्येक गावासरशी दिवाळीच्या रीतीभाती वेगळ्या आहेत. मात्र गोव्याच्या मातीत प्रसन्न उजळणारे दिवे नी दिवजे 
ही केवळ अनुभवण्याची गोष्ट आहे.
आश्विनातील घटस्थापनेपासूनच कष्टकरी समाजमनाला दिवाळीचे वेध लागलेले असतात़ भारतीय संस्कृती मुळातच प्रकाशपूजक. गोमंतकीय समाजाने दीडशे ते साडेतीनशे वर्षे गुलामगिरी सोसतही हा वारसा सांभाळला़
आजच्यासारखे जेव्हा गोव्यात विजेचे दिवे नव्हते त्या वेळेला तेल, तूप जाळून दिवे पेटवले जात़ करंजेल, खष्ट, उंडी, तीळ, शेंगदाणो, तूप, लोणी यांचा वापर दिव्यांच्या वातीला ऊर्जा पुरविण्यासाठी केला जायचा़ सकाळ-संध्याकाळी मंदिरांचे गाभारे, सभागृह  समई, नंदादीप, पणत्या यांनी उजळून जायच़े आयुष्यवर्धनाचे प्रतीक मानलेल्या या दिव्यांनी विविध आकारप्रकारातून गोमंतकीय समाजमनाला स्निग्धता पुरविलेली आह़े गोव्यातील सुवासिनी दिवजांच्या जत्रेला माती, पितळाची दिवजे धारण करून मंदिराला प्रदक्षिणा घालतात़ शेकडोंच्या समूहाने जमलेल्या स्त्रियांच्या कधी डोक्यावर, तर कधी हातात असलेली दिवजे एकाचवेळी प्रज्वलित होतात तो सोहळाच अनुपम्य असतो़ सारा परिसरच पिवळसर-सोनेरी प्रकाशाने तेजाळून जातो़ गोव्यातीलच काणकोणसारख्या तालुक्यात काही ठिकाणी तर निवडुंगाच्या काठीचा दिवजांच्या वाती पेटविण्यासाठी उपयोग करण्याचे वेगळेपण राखून ठेवलेले आह़े काही ठिकाणी तर कुमारिकासुद्धा दिवजे पेटवतात व त्यानंतर ती लगA करण्यास योग्य झाली असल्याचे मानले जात़े
गोव्यातील विविध सण-उत्सवांतही दीपप्रज्वलन, दिव्यांची आरास महत्त्वाची मानलेली आह़े जलाशयातील दीपदान पुण्यप्रद मानले जात़े देवीच्या सांगोडोत्सवात केली जाणारी दिव्यांची आरास लक्षवेधक़़, शरीर व मन रोमांचित करणारी असत़े डिचोलीसारखे शहर तर दिव्यांशी निगडित असून, इथल्या कासारांनी काश्यांपासून तयार केलेल्या दिव्यांनी गोव्याच्या राजचिन्हाचा सन्मान प्राप्त केलेला आहे. दिवाळीच्या कालखंडात दिव्यांची केली जाणारी आरास शेकडो वर्षापासून इथल्या लोकमानसाने महत्त्वाची मानलेली आह़े 
 नरकचतुर्दशीला नरकासुराची मोठी प्रतिमा करून आसुरीप्रवृत्तीचे दहन केले जात़े पूर्वी बांबूच्या कामटय़ा, शेतमळ्यातले गवत, रंगबिरंगी कागद यांचा वापर नरकासुराची प्रतिमा करण्यासाठी केला जायचा; परंतु आज यात खूपच बदल झालेला आह़े नरकासुराच्या प्रतिमांचे आकर्षण, हजारो रुपयांची खैरात बक्षीस रूपाने करण्यात येत असल्याकारणाने, वाढलेले आह़े त्यामुळे वैयक्तिक पातळीवर विविध संस्था या स्पर्धात सहभागी होतात़ अशा मिरवणुकीमुळे अपप्रवृत्तींना ऊत आलेला आह़े त्यामुळेच उत्साहाबरोबरीने इर्षा निर्माण होत़े हा असा अपवाद सोडला तर गोव्यात दिवाळीच्या सणाला वैविध्यपूर्ण परंपरांचे तोरण लाभलेले आह़े 
 अभ्यंगस्नान करून घरातील प्रत्येकजण तुळशीवृंदावनासमोर पायांनी कारीट फोडून गोविंदाùù गोविंदाùùù गोविंदाचा गजर करतात़ पूर्वी तर शेणाने सारवलेल्या अंगणात तांदळाच्या पिठाचा वापर करून, त्यात नैसर्गिक रंग घालून रांगोळीने अंगण सजिवंत केले जायच़े घरोघरी बांबूच्या कामटय़ांपासून आकाशकंदिलाचा साचा तयार करून त्यावर रंगीत कागद चिकटवून आपल्या पितरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ असे आकाशकंदील उंचावर चढवले जायच़े आकाशातील चंद्र, चांदण्यांशी स्पर्धा करू पाहणारे हे आकाशकंदील कधी अंगणातील एखाद्या आंब्या-फणसाच्या झाडावर, तर कधी मुद्दामहून पुरलेल्या लाकडी मेडीवर लावत. आत संथपणो तेवत ठेवलेल्या पणतीला सोबतीला घेऊन ते दिवाळीचा आनंद द्विगुणित करायच़े गोव्यातील खेडेगावात तर ‘सरंगे’ करून आकाशात स्वैर सोडले जायच़े कसल्याही आधाराविना हे सरंगे जमिनीवरून आतमध्ये पेटवलेला ‘काकडा’ ठेवला की आकाशात मुक्तविहार करण्यासाठी सज्ज व्हायच़े चौकोनी आकाराचे कागदी पतंग दो:यास बांधून सोडतानाचा आनंद तर अवर्णनीय असाच. असंख्य पतंगांनी व्यापलेले आकाश तर दिवाळी सणाची लज्जत अधिकच वाढवायच़े 
या प्रकाशपर्वात अंत्रुज महालातील नागेशाचे मंदिर असो अथवा महालक्ष्मीचे, दिवाळी दिवशी पहाटेला इथे तेवणा:या असंख्य मातीच्या पणत्या या प्रकाशपर्वाला वेगळी उंची मिळवून देतात़ कवळेच्या शांतादुर्गा देवीचे पाच सोनेरी मुखवटे याच दिवाळीच्या दिवशी पेटीतून बाहेर काढून भाविकांच्या दर्शनासाठी ठेवले जातात़ ही महासुखाची दिवाळी अनुभवण्यासाठी देवीचे गोव्यातील व गोव्याबाहेरील असंख्य भाविक मंदिरात येतात़ दिवाळीच्या एकाच दिवशी हा नेत्रसुखद सोहळा पार पडत असल्याने भाविकांची प्रचंड गर्दी होत़े 
फोंडय़ातील वरगावच्या माशेलमध्ये ‘गो-क्रीडोनोत्सव’ आणि तिसवाडी-फोंडा, सांगे या परिसरात ‘धेंडलो’ उत्सव साजरा केला जातो़ बाळकृष्णाला सजवलेल्या रथात किंवा लाकडाच्या चौकटीत बसवून उत्साहाने नाचवला जातो़ पोळ्याचा सण साजरा करून गुराढोरांच्या प्रती असलेली श्रद्धा व्यक्त केली जात़े शेणाचा गोठा तयार करून त्या दिवशी गुरांना मोकळीक देऊन पूजन करून त्यांना खाण्यासाठी ‘वडे’, ‘पोळे’ दिले जातात़ विविध भागांत या परंपरेत वैविध्य आढळत़े असाच एक ‘धिल्लोत्सव’ही साजरा होतो़ या कालखंडात सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या ब:याच गावांतील आदिवासी समाजातील कुमारिका - सोबतीला महिलाही येतात. शेणाच्या गोळ्याच्या ‘धिल्लो’ करून त्यांना भेडीच्या किंवा तत्सम पारंपरिक व इतर फुलांनी अलंकृत करून पुजतात. त्याच्यासमोर सामूहिक नृत्य केले जात़े ‘आकरी पाकरी पिल्ल्या तुझी चाकरी’ असे म्हणून हातात हात गुंफून तर कधी टाळ्यांच्या साथीने नृत्यांचा मनोहारी आविष्कार घडविला जातो़ 
‘भयण भावाचो काय वांगड पाखडाचो 
केरी नी गावात वड पिकलो साखरेचो़़़’ 
या प्रेमाचा साक्षात्कार घडविणारी ‘भाऊबीज’ तेवढय़ाच आत्मीयतेने साजरी केली जात़े याच दिवसांत सांगेतील नेत्रवळी, फोंडय़ातील बांदिवडे आणि बार्देसातील शिरसईची महालक्ष्मीची मंदिरे दिव्यांच्या उत्सवाशी समरस होऊन भाविकांना आशीर्वचन देतात़ डोंगरमाथ्यावरील सुर्ला गावात बायका भावस्पर्शी लोकगीतांचे ‘गीतीगायन’ करतात़ धारबांदोडेतील उधळशे, ओकामेला, कातयांचा उत्सव होतो़ ‘कातयो’ म्हणजे ‘नक्षत्रे’. सुर्लाला होणा:या कातयोत्सवात नव्या नवरीला होवसावणो होत़े आकाशातील नक्षत्रंशी स्पर्धा करू पाहणा:या पिठापासूनच्या पणत्या तयार करून त्यात तेलवाती प्रज्वलित करून ही सात नक्षत्रे तुळशीवृंदावनासमोर प्रज्वलित करून नृत्य-गायन केले जात़े रात्री जागवल्या जातात़ नव्या जोडप्यांना दिवाळसणालाच ओवाळले जात़े 
माणसामाणसांची नाती अभिवृद्ध करणारी दिवाळसणाची परंपरा गोमंतकीय लोकमानसाने आजही तेवढय़ाच आत्मीयतेने जतन करून ठेवलेली आह़े 

Web Title: Deepa Festival at the soil of Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.