दबंग, दिमाग आणि डोमेन!

By Admin | Updated: November 15, 2015 19:14 IST2015-11-15T19:14:25+5:302015-11-15T19:14:25+5:30

अमेरिकेला वगैरे न जाता इथे भारतातच राहावे आणि आपला आपला रस्ता धरावा, असे काहीतरी या देशाच्या मानसिकतेत शिजत घातले आहे.

Dabang, Mind and Domain! | दबंग, दिमाग आणि डोमेन!

दबंग, दिमाग आणि डोमेन!

 रश्मी बन्सल

 
अमेरिकेला वगैरे न जाता  इथे भारतातच राहावे  आणि आपला आपला रस्ता धरावा,  असे काहीतरी या देशाच्या  मानसिकतेत शिजत घातले आहे. तरुणांच्या डोक्यात एक नवा किडा घुसला आहे,
‘स्टार्ट अप’.
--------------------
तीन गोष्टींच्या बळावर देशभर फैलावत चाललेल्या ‘स्टार्ट अप’च्या  व्हायरसचा प्रवास : लेखांक-1
--------------------
घर बडे असो, नाहीतर पोकळ वाशांचे; जन्माला आलेल्या मुलाने शिस्तशीर लायनीत चालायचे. इतरांनी आधीच ठरवून ठेवलेले ध्येय आपले मानायचे. डॉक्टर-इंजिनिअर-एमबीए होऊन जमले तर अमेरिकेचा रस्ता धरायचा. अमेरिकन मोक्ष हुकला, तर मग इथेच बडय़ा पगाराची नोकरी धरायची. घरचा बिङिानेस असेल, तर ते रेडिमेड जू मानेवर घेऊन चाकोरीत पळत सुटायचे, असे ठरलेले होते सगळे. समाजात होते, मग बॉलिवूडमध्ये कसे नसणार?
- या चित्रतले रंग पहिल्यांदा विसकटले, ते आमीर खानने. 
पापा कहते है, बडा नाम करेगा,
बेटा हमारा, बडा काम करेगा,
मगर ये तो, कोई ना जाने,
की मेरी मंझील, है कहा..
- असे त्याच्या तोंडचे शब्द होते. वडीलधारे काय म्हणतात ते कानाआड टाकण्याची हिंमत करून, समाजमान्य प्रतिष्ठेचा मोह दूर सारून आपल्या मनाच्या हाका ऐकत निबिड अरण्यात घुसण्याचा आणि स्वत:च्या वाटा तयार करण्याचा किडा भारतातल्या तरुणांना चावला आहे, याची त्याने दिलेली ही कबुली तशी दुर्लक्षितच राहिली.
.. हा सिनेमा आला 1988 साली. त्याला आता सत्तावीस वर्षे उलटून गेली आहेत. पण एकटा आमीर ‘तेव्हा’ जे म्हणत होता, ते आज अनेकांच्या बाबतीत शब्दश: खरे ठरते आहे.
कोणत्याही ग्रॅज्युएशन पार्टीत जा, डिग्री घेऊन बाहेर पडणा:यांपैकी ब:याच मुलांकडे ‘पुढे काय?’ या प्रश्नाचे रेडिमेड उत्तर नसते.
लाइफमे कुछ करना है.. कुछ बनना है. अशा ऊर्मीने उसळणारे नवे गरम रक्त गेल्या दशकभरात ‘तरुण’ भारताच्या धमन्यांमधून वाहायला लागले.  
कुठल्याही कॉलेजच्या कॅम्पसमध्ये जाऊन पाहा. 
विशी-पंचविशीची मुले सरळ सांगतात, मला कुठल्याही बडय़ा कंपनीत, कुणाच्याही हाताखाली काम करायचे नाही. आय वॉण्ट टू बिकम माय ओन बॉस. 
आय वॉण्ट टू बिकम अॅन आंत्रप्रनर..
 
 

Web Title: Dabang, Mind and Domain!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.