क्राउड फंडिंग!

By Admin | Updated: April 25, 2015 14:41 IST2015-04-25T14:41:07+5:302015-04-25T14:41:07+5:30

भारताची आइस हॉकी टीम. स्पर्धेला जाण्यापुरतेही पैसे त्यांच्याकडे नव्हते. - मूकबधिर मुलं. ‘व्यक्त’ होण्यासाठी त्यांना हवा होता थोडा निधी. - गरीब घरातली मुलं. पण पुस्तकंच नाही! - कोणाकडेच प्रत्यक्ष हात न पसरताही गोष्टी मार्गी लागल्या! कसं झालं हे?.

Crowd funding! | क्राउड फंडिंग!

क्राउड फंडिंग!

>- पवन देशपांडे
 
बोलता येत नाही, व्यक्त होता येत नाही आणि ऐकताही येत नाही!
काय करायचं अशांनी?
- किंजल चौधरी या विद्यार्थिनीनं ठरवलं याच मुलांसाठी आपण काहीतरी करायचं!
तिच्यापुढेही स्पष्ट दिशा नव्हतीच! पण त्याच ध्यासानं मार्ग दिसला आणि ती पुढे पुढे जात राहिली.
साइन लँग्वेज सा:यांनाच शिकायला मिळते असं नाही. तिनं त्याचाच प्रसार करायचं ठरवलं. काम करण्याची जिद्द उराशी होतीच, अडथळा होता तो त्यासाठी लागणा:या आर्थिक पाठबळाचा. काहीतरी करण्याची महत्त्वाकांक्षा असली की मार्ग आपोआप सापडतो.. किंजलच्या बाबतीतही तसंच घडलं. तिला मार्ग सापडला इंटरनेटचा. ‘साइन स्पीकचं’ एक अॅप तयार करण्यासाठी तिनं इंटरनेटद्वारे तब्बल दीड लाख रुपयांहून अधिक निधी जमवला!..
पैशाची वानवा असलेल्या कोटय़वधी गरीब मुलांना अभ्यासाच्या महागडय़ा पुस्तकांपासून वंचित राहावं लागतं. अशा मुलांसाठी एका गरीब घरातून आलेल्या मुलानं पुस्तकांची रिसेल करणारी, पुस्तके भाडय़ाने देणारी आणि पुस्तके दान देणारी वेबसाइट सुरू करण्याचं ठरवलं. 
कल्पना भन्नाट होती, पण ती सुरू करण्याइतपत पैसा नव्हता. त्यानं इंटरनेटवरून आपली ही आयडीया असंख्य लोकांर्पयत पोहोचवली आणि या विधायक कार्यासाठी भरपूर पैसे मिळाले. 
तिसरं आणि ताजं उदाहरण.. भारताच्या आइस हॉकी टीमचं. क्रिकेटधर्मवेडय़ा देशात हॉकीच काय क्रिकेट वगळता इतर कोणत्याही खेळाला फारसं महत्त्व नाही.. क्रिकेट सामन्याची गल्लोगल्ली चर्चा.. पण  हॉकी आणि इतर कोणत्याही खेळाच्या सामन्याची कल्पनाही नसते. अशा स्थितीत इतर खेळांची आबाळ होणारच. ही काळ्या दगडावरील पांढरी रेघ.
आईस हॉकी टीमच्या निमित्तानं इतर खेळांची होणारी अवहेलनाही ‘सोशल’ झाली. भारताच्या आइस हॉकी टीमला एका स्पर्धेसाठी परदेशी जायचं होतं. पण पैशांची चणचण. प्रत्येक खेळाडूसाठी लागणारे केवळ 2क् हजार रुपयेही संघटनेकडून मिळण्याची मारामार. मग खेळाडूंनी शक्कल लढवली. त्यांनी ऑनलाइन मदत मागायची ठरवलं. त्यांनी नेटमोहीम उघडली. त्यावर कळकळीनं सांगितलं, आमच्याकडं पैसाच नाही. त्यामुळे आमचं टॅलेंट बर्फासारखं विरघळत पाण्यात जातंय. आणि बघता बघता मदतीचा ओघ वाढला. आश्चर्य म्हणजे महिंद्रा समूहानं त्यांना स्पॉन्सर करायचं ठरवलंय. फेसबुक, ट्विटर आणि इतर साइट्सच्या माध्यमातून त्यांनी निधी जमवला. देशाला नृत्याद्वारे सुदृढ ठेवण्याची शपथ घेतलेल्या आकाश कर्नाटकी या नृत्यवेडय़ा तरुणानंही काही दिवसांपूर्वी हेच केलं. 
पैसा जमवण्याचं हे माध्यम होतं.. क्राउड फंडिंग. 
विधायक कार्यासाठी पुढे येणा:या दात्यांर्पयत ‘रिकामे हात’ घेऊन पोहोचायचं. डोक्यातल्या भन्नाट कल्पना मांडायच्या आणि हातभार मिळवायचा. असं हे सोप्या भाषेतलं क्राउडफंडिंग म्हणजेच समूहदान !
ज्याला जितकं वाटेल, जितकं शक्य असेल तेवढं एखाद्या गोष्टीसाठी केलेलं दान. 
तशी ही संकल्पना जुनी. पार चार शतकांपूर्वीची. अर्थविषयांची माहिती प्रसिद्ध करण्यास समाजातून पैसा जमवण्याचा प्रयत्न 17 व्या शतकात झाला. नंतर ती ‘सहकार’ चळवळीच्या रुपात आली. 1997 मध्ये तिनं ‘इंटरनेट सहकार’ असं रूप धारण केलं. समाजात पोहोचून दान मिळवण्यासाठी पहिल्यांदाच इंटरनेट माध्यमाचा वापर झाला. मारिलिओन या ब्रिटिश रॉक बॅण्डच्या चाहत्यांनी या बॅण्डसाठी पैसा जमवण्यासाठी इंटरनेटवर मोहीम हाती घेतली आणि तब्बल 6क् हजार डॉलर जमवले. त्यानंतर हा फंडा वापरण्याचं प्रमाण वाढत गेलं. एका महाभागानं तर गेमिंगसाठी तयार केलेल्या प्रोजेक्टवर 7 कोटी अमेरिकन डॉलर म्हणजेच आजच्या दराप्रमाणो जवळपास 435 कोटी रुपये समूहदानातून जमविल्याचा विक्रम केला आहे. 
आज क्राउड फंडिंग ही एक प्रकारची सेवा झाली आहे आणि अशा सेवा देणा:या असंख्य वेबसाइट जगभरात कार्यरत आहेत. तुम्हाला नावीन्यपूर्ण काम करण्यासाठी या वेबसाइट मदत करतात आणि पैसा मिळवून देण्यासाठी मदत केल्याच्या बदल्यात काही अंशी पैसाही कमावतात. भारतातही अशा वेबसाइट्स मोठय़ा प्रमाणावर आहेत. त्या आपल्या देशातील गुणवत्तेला आर्थिक हातभार देण्यासाठी सोशल मीडियावर सातत्याने विविध प्रकल्पांचे सतत आयोजनही करत असतात. 
क्राउड फंडिंगसाठी दात्यांना आकर्षित करण्यासाठी काहीजण अफलातून कल्पनाही लढवतात. दात्यांची नावं सोशल मीडियावर प्रसिद्ध करतात. त्यांना प्रसिद्धी मिळवून देतात. काही त्यांच्यासाठी गिफ्ट्सही ठेवतात. ती घरपोच पाठवतात. 
भारतातील अशा वेबसाइट्सवर एक फेरफेटका मारला तर भन्नाट कल्पनांच्या दुनियेची एक नवी ओळख होते आणि त्यासाठी धडपडणा:या तरुणांचे नवनवे प्रकल्प देशासाठी बरंच काही करू शकतात याचीही जाणीव होते. 
आपल्या महाराष्ट्रातही अशा भन्नाट डोकेबाज आहेत. पण त्यांना म्हणावं तसं पाठबळ मिळत नाही. काहीतरी करून दाखवण्याची.. समाजात सकारात्मक बदल घडवण्याची आणि देशासाठी काहीतरी करण्याची सुप्त इच्छा असणा:या तरुणांची हा नवा प्लॅटफॉर्म वाट पाहतोय.
 
डोक्यापासून हातार्पयत!
 
1. एखादी चांगली कल्पना डोक्यात आली, पण निधीवाचून घोडं अडलंय. काय कराल? आधी ही कल्पना डोक्यात शिजवायची. लोकांना ती समजेल आणि त्याचा काय फायदा, उपयोग आहे हे कळेल अशा भाषेत ती कागदावर उतरवायची. 
2. क्राउड फंडिंगच्या साइट्स, सोशल नेटवर्किग साइट्सवर ही डोकेबाज कल्पना टाकायची. आपल्या कल्पनेबद्दल सोशल साइट्सच्या माध्यमातून लोकांना सांगायचं. त्यांना निधीसाठी आवाहन करायचं. 
3. क्राउड फंडिंग साइट्स तुमची कल्पना दात्यांर्पयत पोहोचवतात. एक ठरावीक कालावधी व निधीचं टार्गेट ठरवून घेतलं जातं आणि त्यानंतर उभा राहतो तुमच्या प्रकल्पासाठीचा निधी. 
4. अनेक हात पुढे आल्यानंतर आता लागा कामाला! पैशावाचून, आपल्याला कोणी मदत करत नाही, यामुळे निराश होण्याची गरज नाही!
 
हात सैल सोडायचा?
 
1. विधायक कार्याचा बनाव करून लोकांकडून पैसा उकळणा:यांचे प्रमाण कमी नाही. अशा लोकांसाठी खरं तर क्राउड फंडिंगचा हा प्लॅटफॉर्म एक संधी असते, पण काही वेबसाइट्स अशा लोकांवर लक्ष ठेवून असतात आणि त्यांना निधी देताना सजग असतात. 
2. अव्वाच्या सव्वा निधी जमवण्याच्या हव्यासाने काही लोक क्राउड फंडिंगचा वापर करण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांच्यापासून दात्यांनी सावध असणं गरजेचं आहे. नीट चौकशी करून, पाहून, पारखून मगच आपला हात सैल सोडणं केव्हाही हितावह.
 
कोणाकोणाला 
झाली मदत?
 
समाजाकडून घेतलेली मदत अर्थात सामाजिक कामांसाठीच किंवा विधायक, गरजू, समाजघटकांसाठीच असायला हवी. 
आतार्पयतचा इतिहास पाहिला तर गायक, साहित्यिक, चित्रपट, लघुपट, नृत्य, फोटोग्राफी, खेळ, प्रशिक्षण, आरोग्यविषयक समस्येने ग्रस्त व्यक्ती, समाजासाठी सकारात्मक प्रकल्प राबवण्यासाठी धडपणारी व्यक्ती, एखादा उपक्रम राबवण्याचा आणि जनजागृतीचा एखादा प्रकल्प राबवणारी व्यक्ती अशांना क्राउड फंडिंगचा हातभार मोठय़ा प्रमाणात लागलेला आहे. 
 
(लेखक ‘लोकमत’च्या मुंबई आवृत्तीत 
मुख्य उपसंपादक आहेत.)

Web Title: Crowd funding!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.