शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल जाताे कुठे? अशी आहे प्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2022 11:18 IST

Crime News: गुन्हा घडल्यानंतर आरोपीला जेरबंद करण्यासोबतच गुन्ह्याशी संबंधित मुद्देमालही पोलीस जप्त करतात. प्रत्येकवेळी हा मुद्देमाल शस्त्रेच असतो, असे नाही

- मनोज गडनीस 

गुन्हा घडल्यानंतर आरोपीला जेरबंद करण्यासोबतच गुन्ह्याशी संबंधित मुद्देमालही पोलीस जप्त करतात. प्रत्येकवेळी हा मुद्देमाल शस्त्रेच असतो, असे नाही तर यामध्ये कधी गाड्या,  तस्करीतून पडकलेला इम्पोर्टेड माल, ड्रग्ज, उच्च श्रेणीचे मद्य, आलिशान घर, फर्निचर अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो. हा मुद्देमाल का जप्त केला जातो आणि त्याचे पुढे काय होते, या प्रश्नांचा हा सारांश! 

जप्त मुद्देमालाचा सर्वप्रथम साक्षीदारांच्या उपस्थितीत पंचनामा होतो आणि त्याची प्रत संबंधित व्यक्तीस दिली जाते. जप्त झालेल्या वस्तू संबंधित पोलीस स्टेशनमध्ये ‘मालखाना’ या विभागात ठेवल्या जातात. ज्यावेळी न्यायालयासमोर सुनावणीसाठी संबंधित केस येते, त्यावेळी या वस्तू कोर्टात सादर केल्या जातात आणि न्यायालयाच्या आदेशानुसार या वस्तू न्यायालयाच्या मालखान्यामध्ये जमा केल्या जातात. संबंधित आरोपीला जामीन झाला तर, त्याच्या गुन्ह्याच्या स्वरूपानुसार जी वस्तू जमा करण्यात आलेली आहे, त्याचा स्वतंत्र जामीन घ्यावा लागतो. उदाहरणार्थ, एखाद्या केसमध्ये जर गाडी जप्त झालेली असेल, तर गाडीचाही जामीन त्याला घ्यावा लागतो. हत्या, चोरी आदी गुन्ह्यांतील साहित्य नष्ट केले जाते. आर्थिक फसवणूक झाली असेल, तर जप्त मुद्देमालाच्या विक्रीतून फसवणूक झालेल्या लोकांची देणी देण्याचे आदेशही न्यायालय देते. विजय मल्ल्याच्या प्रकरणात त्याची स्थावर मालमत्ता जप्त केल्यानंतर त्याची विक्री करून आलेल्या पैशांतून देणी फेडण्यात आली.कोणत्याही प्रकारचा माल जप्त करण्यासाठी पोलिसांना न्यायालयाची परवानगी घ्यावीच लागते. त्यांना त्याची परस्पर विल्हेवाट लावता येत नाही. 

माल क्लेमच झाला नाही, तर त्याचे काय होते ? - जप्त मुद्देमाल घेण्यासाठी कुणी पुढे आलेच नाही, तर, त्या मालाच्या प्रकारानुसार त्याचा लिलाव केला जातो. - या लिलावामध्ये जप्त झालेले घर, फार्म हाऊस, फर्निचर, गाडी अशा वस्तूंचा समावेश असतो. याची जाहिरात प्रसिद्ध होते आणि सामान्य नागरिकांना यात सहभागी होऊन त्या विकत घेता येतात.

मद्य, ड्रग्ज, शस्त्रे पकडली तर...मद्य जप्त झाल्यानंतर ते सांडपाण्यात ओतून दिले जाते. बाटल्या फोडून टाकल्या जातात. ड्रग्ज जप्त झाल्यानंतर ते प्रामुख्याने जाळले जाते. पोलिसांमधील उपायुक्त दर्जाचा अधिकारी, प्रदूषण मंडळाचे अधिकारी यांच्या संमतीने निश्चित केलेल्या प्रकारांतर्गत हे अंमली पदार्थ जाळले जातात. शस्त्र जप्त झाल्यानंतर त्याची फायरिंग पिन काढून ते प्रथम निकामी केले जाते आणि त्यानंतर, शस्त्र भट्टीत टाकून वितळवले जाते. बनावट सीडी वगैरे बुलडोझरखाली चिरडल्या जातात. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस