शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
3
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
4
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
5
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
6
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
7
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
8
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
9
त्या दहशतवादी महिला डॉक्टरचा माजी पती म्हणतो... ती प्रेमळ आई
10
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
11
एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
12
‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम
13
तुर्कीयेचे लष्करी मालवाहतूक विमान कोसळले; २० ठार
14
रोहित शर्मा ७ वर्षांनंतर खेळणार विजय हजारे करंडक, विराटबाबत संभ्रम
15
जुरेल घेणार रेड्डीचे स्थान, पहिल्या कसोटीत ऋषभ पंतही खेळणार, अक्षर पटेलला अंतिम संघात संधी
16
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
17
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
18
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
19
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
20
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा

सर्जनशीलता आणि सण-उत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 12:32 IST

आनंद शोधण्याच्या या आपल्या त-हा आहेत असं मानलं तरी पण मन कुठेतरी स्री सर्जनशीलता आणि सणांचा संबंध शोधत असतं.

सृजन (उत्पत्ती),सर्जन (निर्मिती), सर्जनशक्ती (नवनिर्माण सामर्थ्य), सर्जनशीलता (नवनिर्माण वृत्ती)...हे सगळे शब्द ज्या सणासाठी आपण सहजतेने वापरतो, तो नवरात्र उत्सव धूमधडाक्यात साजरा होतोय. टिपरीवर टिपरी आपटत, टाळीवर टाळी देत एकलयीचा फेर धरल्या जातोय. अगदी कालपरवा पर्यंत रूक्ष भासणारं वातावरण कसं जादूची कांडी फिरावी तसं बदललं आहे. हवेतच सणाचे आनंदकण जाणवतात नि आपलंही मन प्रफुल्लित होतं. नवा आनंद, नव्या प्रेरणा पेरणारा हा उत्सव साजरा करताना  नजरेसमोर असतो, घट! पृथ्वीच्या गर्भाशयाचे प्रतिक! घटाची पूजा म्हणजे पृथ्वीच्या सर्जनेंद्रियाची पूजा मानली गेली आहे. तशी आमच्या एकंदर सगळ्याच सणउत्सवात निसर्गाची पूजा अंतर्भूत आहे. आम्ही ते कधी समजून घेतलं आहे? केवळ परंपरा आहे, म्हणून आम्ही अमुक करतो किंवा तमुक करतो, असं किती काळ चालणार आहे? नवरात्र हा शक्तीचा उत्सव, असे आपण मानतो आणि खच्चीकरण करणारे व्रतं करत बसतो. याकाळात अनेक मुली कडक उपवास करतात. पायात चप्पल घालत नाहीत. अनेक स्रिया गादीवर झोपत नाहीत. पलंग वापरत नाहीत. असे अनेक प्रकार आजूबाजूला आपण बघत असतो. याला काही शास्राधार आहे का? गेल्या काही वर्षात विशिष्ट दिवशी ठराविक रंग घालण्याचा नवाच प्रघात सुरू झालाय. आनंद शोधण्याच्या या आपल्या त-हा आहेत असं मानलं तरी पण मन कुठेतरी स्री सर्जनशीलता आणि सणांचा संबंध शोधत असतं.भूमीतून उगवणा-या धान्य, फळं, कंदमुळांवर आपलं जगणं अवलंबून आहे, हे ज्यावेळी आदिमानवानं जाणलं त्यावेळेपासून भूमी पूजनाचे विविध विधी निर्माण होऊ लागले.  निसर्गातील विविध घटकांचे परस्पर नाते आणि साहचर्य जाणून हे सुफलनाशी संबंधित व्रत - विधी सुरू झालेत. अश्विन महिन्यातला नवरात्र उत्सव असाच पिकांच्या, धनधान्याच्या समृद्धीशी निगडीत आहे. याकाळात घट बसविले जातात. त्याचा विधी बघितला तरी त्यातील सर्जन आपल्या लक्षात येतं. पूर्वी घट बसविण्यासाठी, शेतातली-गोठा-वारूळ आणि चौरस्ता याठिकाणांची माती एकत्र  करून ती पत्रवाळीवर पसरवायचे. त्यानंतर त्यात सात किंवा नऊ प्रकारचे धान्य टाकत असत. पाणी सुद्धा सात विहिरींचे घालण्याची प्रथा होती. काय अर्थ होता याचा? शास्त्रज्ञांना विचारले तर ते सांगतात की दोन किंवा अधिक वेगळे पदार्थ एकत्र आले की सुफलनक्षमता वाढते अशी त्यामागे भावना होती. आज आम्ही हे करतो?आमचे हे उत्सव निसर्गाच्या जवळ नेणारे आहेत. यात आहे, कृषिसंस्कृतीशी जवळीकता साधणारी धानाची खोपडी आणि सजावटीची हौस पूर्ण करणारी फुलांची माळ! हे निसर्गाशी असलेलं आपलं नातं घट्ट करत नाहीत का? आज आम्ही करतो हे सगळं पण एक ओझं म्हणून करतो. खरंतर हे करताना त्यात आनंद असावा. ताण घेऊन किंवा केले नाही तर अनिष्ट होईल, या भ्रामक समजूतीने जीवाची ओढाताण करत करू नये. आमचे सण-उत्सव परंपरा जेंव्हा निर्माण झाल्यात तो काळ आणि आजचा काळ यात खूप फरक आहे. तो आम्ही लक्षात घ्यायला हवा.आम्ही विज्ञान मानतो. पण त्याच बरोबर नको त्या परंपराही पाळतो. परिणामी निसर्ग सान्निध्यात नेणारे आमचे सण-उत्सव हरवताहेत. त्यातील निखळ आनंद आम्ही गमावतोय. भारतीय परंपरेमध्ये निसर्ग आणि माणूस एकरूपतेची कल्पना आहे. ती कधी जाणण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे? आमचे प्रत्येक सण आम्हाला निसर्गाचे आभार मानायला शिकवितात. स्री आणि सृष्टी याभोवती ते गुंफलेले आहेत. भूमीतून उगवणा-या धनधान्यावर आपले जीवन अवलंबून आहे. तसेच स्रीच्या फलनशक्तीमुळे आपला वंशविस्तार होतो. हे कळल्यावर मानवानं स्त्री आणि भूमीशी निगडीत पूजाविधी बांधायाला सुरूवात केली, असे अभ्यासक मानतात. नवरात्र उत्सव हा असाच सुफलनाशी संबंधित उत्सव आहे. पूर्ण सृष्टीला जन्म देणा-या आदिमातेच्या पूजनाचा उत्सव! देवीची जशी तीन रूपं आज मानण्यात येतात. तशीच भूमीचीही तीन रूपं मानतात. एक निर्मीतीचं, दुसरं पोषणाचं आणि तिसरं संहाराचं! म्हणूनच जन्म देणारी आदिमाता, पोषण करणारी गौरी आणि अनिष्टाचा संहार करणारी काली, या रूपांची पुजा बांधली जाते. स्रीच्या सुद्धा वाढीच्या तीन अवस्था असतात की नाही? गौरी, कन्यका, आणि रजस्वला! त्याच रूपांचं पूजन या नवरात्रात केल्या जातं. (हे वाचलं नि सहज मनात आलं की, जिची रजस्वलावस्था थांबतेय, त्या स्रीचा विचार यात नाही. आता नव्या काळात आम्ही तो करायला हवा, नाही का?) खरंच आहे. संस्कृती आणि नव्याची सांगड घालत पुढे वाटचाल केली तर ती परंपरा प्रवाही नि प्रभावी ठरत असते. अन्यथा साचलेपण यायला वेळ लागत नाही. म्हणूनच अलिकडे मनात विचार येतो,आवाज कोणाचा? म्हणत धांडगधांडग दणदणाट करण्यापेक्षा निसर्ग स्नेही सण आम्हाला साजरे करता येणार नाही का? मोहमायेचं सीमोल्ल॔घन करणारी आदिमाया स्त्री शक्तीचं रूप आहे. तेव्हा आता घराघरातील दुर्गेनं प्रदूषणरूपी महिषाचा नित्पात करून  निसर्ग रक्षणासाठी सज्ज व्हायचं आहे. त्यासाठी प्रामाणिकपणे असं वाटतं की आपल्या मुलांना निसर्गप्रेम शिकवायला हवं. पर्यावरणाशी असलेलं जवळिकीचं भान जागवायला हवं. स्वार्थापलीकडे जाऊन निसर्गाचे संरक्षण करणे ही प्रत्येक व्यक्तींची जबाबदारी आहे किंबहुना तोच आपला मानवधर्म आहे. आपल्या लोकसंस्कृतीनं तो पाळला आहे. मग आम्ही का नाही? सर्जनक्षमता हाच जीवनाचा मूलाधार आहे. स्री मध्ये ती आहे. फक्त आपल्या सर्जक सामर्थ्याची जाणिव तिला नाही. ती यावी आणि मानवी जीवनाला समृद्धीची जरीकिनार लावत निसर्गसंवाद साधल्या जावा, हीच या नवोन्मेषी नवरात्रात घराघरातील शारदेकडून अपेक्षा!

- सीमा शेटे (रोठे ), अकोला

टॅग्स :AkolaअकोलाIndian Festivalsभारतीय सणNavratriनवरात्री