शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
2
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
3
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
4
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
5
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
6
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
7
France Gen-Z Protest: फ्रान्समध्ये Gen- Z चा संताप! लिमामध्ये DINA विरोधात बंड, दगडफेक आणि पोलिसांशी झटापट
8
...तर पतीच्या प्रेयसीकडून पत्नीला मिळेल भरपाई; हायकोर्टानं नोंदवली निरीक्षणे
9
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
10
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
11
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
12
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
13
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
14
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
15
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
16
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
17
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
18
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण
19
विशिष्ट समुदायासाठी उभारली जाते इमारत; गृहनिर्माण संस्थांना सदस्य निवडीचा अधिकार आहे का?
20
धगधगत्या ज्वालेतून आली जगन्माता, भक्ती दाटते नाव घेता...; कुलस्वामिनीच्या उत्सवाचे विविध रंग

सजग कृती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2018 07:14 IST

माइंडफुलनेस ‘सजग असण्या’साठी मनाला प्रशिक्षण देण्याचे तंत्र आणि मंत्र

- डॉ. यश वेलणकर

आपण सायकल चालवायला शिकतो, त्यावेळी ती सजगतेने चालवावी लागते. पण एकदा का सायकल चालवता यायला लागली,की यांत्रिकपणे आपण ती चालवतो. त्याचवेळी मनात विचारही सुरू असतात. माणसाचा हाच तर मोठा प्रॉब्लेम.. सतत विचार करीत असल्यामुळे वर्तमानाचा आनंद तो घेऊ शकत नाही. प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायचा, तर ते शिकावंच लागतं!

आपले मन नेहमी विचारात मग्न असते. त्यातील बरेचसे विचार हे भूतकाळातील आठवणी आणि भविष्याची स्वप्ने किंवा चिंता या प्रकाराचेच असतात. माणसाचा मेंदू उत्क्रांत झाला आहे तोच भूतकाळातून शिकत भविष्याचा विचार करण्यासाठी. त्यामुळेच तो बरीचशी शारीरिक कामे त्याच्या लोअर सेन्टर्सना डेलीगेट करतो, हस्तांतरित करतो. त्यामुळेच सायकल चालवायला शिकत असताना ती जाणीवपूर्वक चालवावी लागते. त्यावेळी मेंदूची उच्च केंद्रे त्यामध्ये काम करीत असतात. पण एकदा सायकल चालवणे सवयीचे झाले की मेंदूची उच्च केंद्रे सायकल चालवण्याचे काम मेंदूतील अन्य भागांकडे सोपवतात. आणि ती त्यांचे विचार करण्याचे महत्त्वाचे काम करू लागतात. त्यावेळी अन्य केंद्रे सायकल चालवतात. त्यामुळे सायकल चालत असते, तुम्ही वळणे घेत असता, पेडल मारत असता आणि त्याचवेळी मेंदूत विचारही चालू असतात. माणसाचे वैशिष्ट्य तो विचार करतो हेच आहे. इतर कोणताही प्राणी विचार करून भविष्याची तजवीज करीत नाही.

कोणत्याही कुत्र्याला तुम्ही दोन भाकरी दिल्यात तर एक भाकरी रात्रीसाठी म्हणून तो ठेवत नाही. भूक असेल तर दोन्ही भाकरी खाऊन टाकतो. मधमाशी मध साठवते किंवा मुंगी साखरेचा कण तिच्या बिळात घेऊन जाते, तो भविष्यासाठी उपयोगात येत असला तरी ते कार्य सहज प्रेरणेने होत असते. हा मध कशासाठी गोळा करतो आहोत याचे भान मधमाशीला नसते. त्यामुळेच मधमाश्यांची अंडी नष्ट केली तरीदेखील ती त्यांच्यासाठी लागणारा मध गोळा करीत राहतेच. माणसाला मात्र हे भान असते म्हणून तो काही उद्देशाने बचत करतो, भविष्याचे नियोजन करतो, ते केलेच पाहिजे. त्यासाठी खास वेळ दिला पाहिजे. असा वेळ काढून त्यावेळी भविष्यातील सर्व शक्यता लक्षात घ्यायला हव्यात. आपल्याला नक्की काय मिळवायचे आहे, काय साधायचे आहे, कोणत्या दिशेने जायचे आहे ते ठरवायला हवे. आपल्या प्रायोरिटीज नक्की करायला हव्यात. हेदेखील मानवी मेंदूतील प्रीफ्रंटल कोरटेक्सचे काम आहे. विचार करायला हवाच; पण आजच्या माणसाचा प्रॉब्लेम हा आहे की तो सततच विचार करीत राहतो किंवा विचार त्याच्या मनात सतत येत असतात. त्यामुळे तो वर्तमानाचा आनंद घेऊ शकत नाही. तो अंघोळ करताना नंतर काय करायचे याचा विचार करीत असतो. त्यामुळे त्याला अंघोळीचा आनंद मिळत नाही. तो जेवताना, समोरील पदार्थ चाखत असतानाच त्याची दुस-या पदार्थांशी तुलना करीत असतो. असे करू नका, वर्तमानाचा आनंद घ्या असा उपदेश करणारे अनेक मेसेज सध्या व्हॉट्सअ‍ॅपवर वाचायला मिळतात. ते चांगले आहेत, पण ते केवळ बुद्धीला पटून फारसा फरक पडत नाही. कारण त्यामुळे मेंदूचे प्रोग्रामिंग बदलत नाही. ते बदलण्याची गरज असते.

माइंडफुलनेस नेमके तेच करीत असते. सजग राहण्याचा सराव चालताना, जेवताना, अंघोळ करताना, कोणतंही काम करतानादेखील करता येतो. बºयाच वेळा आपण अ‍ॅटो पायलट मोडवर असतो. आपल्या कृती, हालचाली यांत्रिकतेने होत असतात.आपण अंघोळ करीत असतो, पण मन तिथे नसते. ते विचारात गुंग असते. सजगतेचा अभ्यास करायचा म्हणजे शरीराच्या सर्व हालचाली जाणीवपूर्वक करायच्या, प्रत्येक क्षणाचा अनुभव पंचज्ञानेंद्रियांनी समरसून घ्यायचा. अंघोळ करताना अंगावर पाणी जाणीवपूर्वक घ्यायचे, पाण्याचा सर्वांगाला होणारा स्पर्श अनुभवायचा, साबणाचा वास अनुभवायचा, जेवताना प्रत्येक घास जाणीवपूर्वक घ्यायचा.Knowing what you are doing is mindfulness.. शरीर काय करीत आहे याची मनाला जाणीव असणे म्हणजे सजगता. प्रत्येक कृतीचे अवधान ठेवणे म्हणजे सजगता.

असे करतानादेखील मनात विचार येत राहतात. पण त्याकडे दुर्लक्ष करून आपण मन पुन:पुन्हा ठरवलेल्या आलंबनावर म्हणजे आवाजावर, श्वासाच्या स्पर्शावर, श्वासामुळे होणाºया हालचालींवर किंवा करीत असलेल्या कृतीवर आणतो आणि त्यामुळे मेंदूची सतत भूतकाळात किंवा भविष्यात भटकायची सवय बदलू शकतो. त्या क्षणाचा आनंद घेऊ शकतो. माइंडफुलनेसचा उद्देश अधिकाधिक काळ अवधान राहावे हा आहे. अवधान अनाहूत विचारांमुळे जाते. आध्यात्मिक माणूस हातात जपमाळ घेऊन नामजप करीत असतो, पण थोड्याच वेळात मुखी नाम हाती माळा, मन भटकतसे दाही दिशा अशी अवस्था होते. म्हणजेच त्याचे अवधान राहत नाही. अवधान ठेवण्यासाठी वेगळे काहीच करावे लागत नाही, अवधान सतत शक्य असते, फक्त त्याचे स्मरण होणे आवश्यक असते. ते झाले की माणूस त्याचे मन वर्तमानात आणू शकतो. तो करतो आहे ते काम जाणीवपूर्वक करू शकतो. बीइंग इन दी झोन राहू शकतो. फक्त त्यासाठी आत्ता माझे मन विचारात गुंग आहे हे जाणवायला हवे. ते जाणवले की मन पुन्हा पुन्हा वर्तमानात आणता येते. क्षणस्थ राहणे हेच अवधान. त्याक्षणी आजूबाजूला काय आहे, मनात काय आहे, हातात काय आहे, आपण काय करतो आहोत याचे भान म्हणजेच अवधान. ते राहत नाही, सतत जाते, ते आणण्यासाठी स्मरण लागते.

अवधान म्हणजेच सजगता, पूर्ण भान, माइंडफुलनेस. फार पूर्वीपासून अनेक संत, तत्त्वज्ञ यांनी हेच सांगितलं आहे. अवधानाचे स्मरण व्हावे यासाठी अनेक उपाय त्यांनी सांगितले होते. उपनयन संस्कारात दिले जाणारे यज्ञोपवीत म्हणजे जानवे, बसवेश्वरांनी दिलेले शिवलिंंग, वारक-यांच्या गळ्यातील तुळशीची माळ, गुरु बांधत असलेला गंडा हे सर्व अवधानाचे स्मरण करून देणारे उपाय असावेत. ती वस्तू पाहिली की अवधान आणावे अशी अपेक्षा होती आणि त्यासाठी ती गोष्ट सतत जवळ बाळगायची. पण त्या वस्तूचाच अहंकार झाला आणि अवधान विसरले गेले. आधुनिक काळात जे कृष्णमूर्ती, ओशो रजनीश, रमण महर्षी, निसर्गदत्त महाराज अशा अनेकांनी या अवधानाचाच उपदेश केला आहे. पण हे सर्वजण आध्यात्मिक असल्याने, आपण अवधान हे अध्यात्माशी जोडले आणि रोजच्या व्यवहारात त्याचा काही उपयोग नाही असे समजू लागलो.

आधुनिक तंत्रज्ञान विकसित झाले आणि मेंदूतील डिफॉल्ट मोड नेटवर्कसमजले. ते सतत सक्रिय राहिले तर होणारे त्रास, आजार समजू लागले. आणि असे लक्षात आले की हा मेंदूतील डिफॉल्ट मोड अवधान असते त्यावेळी बदलतो, त्यावेळी त्या भागाला थोडी विश्रांती मिळते. त्यामुळे आरोग्य चांगले राहते, ग्रहणक्षमता सुधारते. मन शांत आणि आनंदी राहू लागते. अवधान ठेवणे हे आपले आयुष्य अधिक चांगले करण्याचा मार्ग आहे. म्हणून अवधान ठेवण्याचे प्रशिक्षण बाल्यावस्था संपली की सर्वांना द्यायला हवे. प्रत्येक तासात एक सजग श्वास हा अवधान ठेवण्याचा एक उपाय आहे, तो अंगीकारायला हवा. जानवे, शिवलिंग, माळा, गंडा ही सर्व साधने आहेत.. साध्य आहे अवधान म्हणजेच माइंडफुलनेस.

(लेखक मनोविकासाच्या तंत्रांचे अभ्यासक आहेत. yashwel@gmail.com)