शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ श्वासाचा धडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 06:05 IST

स्वच्छता म्हणजे नुसते संडास नव्हे,  स्वच्छ तर श्वासही हवा! - हे कोरोनाने पहिल्यांदा लक्षात आणून दिले. व्यसनमुक्ती शक्य नाही म्हणणार्‍यांना पर्याय मिळवून दिला आणि जीवाणूंवर विजय मिळवलेल्या माणसाला विषाणूंशी लढायला बळही दिले!

ठळक मुद्देकोरोना विषाणूने जगाला शिकवलेल्या  दहा धड्यांची चर्चा करताना.. माझे कोरोना विद्यापीठ : लेखांक दुसरा

- डॉ. अभय बंगकोरोना व्हायरसचे विश्वव्यापी वादळ घोंगावत आहे. गेल्या चार महिन्यात त्याने जवळपास 30 लक्ष लोकांना संसर्ग, दोन लक्ष मृत्यू व अब्जावधी लोकांना लॉकडाउनमध्ये बंद केले आहे. याची प्रचंड मोठी मानवीय व आर्थिक किंमत सर्व जगाला मोजावी लागेल त्याचे हिशोब अर्थशास्री करत आहेत.हे सर्व खरं असूनही या काळोखाला एक सकारात्मक चंदेरी किनारदेखील आहे. या लेखमालिकेतून मी तीच बघण्याचा प्रय} करतो आहे. विद्यापीठं चार भिंतींत पुस्तकी शिक्षण देतात. पण आयुष्यात एकदाच येणार्‍या या वैश्विक संकटाने आपल्याला काय शिकवले?माझ्या कोरोना विद्यापीठातून मी जे महत्वाचे धडे शिकलो आहे, त्यातल्या तीन महत्वाच्या धड्यांचं विवेचन मी गेल्या रविवारच्या लेखात केलं आहे. हे तीन धडे होते :1. प्रश्न सोडविण्यासाठी त्याचे नेमके मोजमाप अतिशय महत्त्वाचे आहे. त्यासाठी निव्वळ अधिकृत आकडेवारीवर विसंबून राहू नका. ती आंशिक असू शकते. स्वतंत्रपणे शास्रीय मोजमाप केल्यानेच सत्य कळू शकते, हा दृष्टीकोन समाजात रुजवण्याचे मोठे काम कोरोनाच्या संसर्गाने केले आहे.2. या साथीला थट्टेवारी नेणार्‍या डोनाल्ड ट्रम्प आणि बोरिस जॉन्सनची काय छी थू झाली हे आपण पाहिलं. कोरोना विश्वविद्यालयात प्रत्येक पाऊल, प्रत्येक आकलन, प्रत्येक निर्णय हा लाखोंच्या जिवाची किंमत वसूल करतो. सत्य सर्व अंगांनी बघावे, तपासावे. आणि तरीही पूर्ण सत्य कधीच कळत नाही; हा कोरोनाने शिकवलेला दुसरा धडा3. समाजाच्या आरोग्य रक्षणासाठी निव्वळ खासगी वैद्यकीय उपचारांवर विसंबून राहता येणार नाही. बाजाराचे तत्त्व आरोग्य रक्षणासाठी अपुरे आहे. आरोग्यसेवांच्या क्षेत्रात खासगी आवडती, सार्वजनिक नावडती व सामुदायिक (कम्युनिटी) तर बहिष्कृत असा भेदभाव व एकांगीपणा भारतासाठी अयोग्य आहे. खासगीला सोबत घेऊन, सार्वजनिक आरोग्यसेवेला प्रोत्साहन देऊन व सर्वात महत्त्वाचे, गावागावात लोकांच्या सहभागाने ‘आरोग्य-स्वराज्य’ व ‘सर्वांसाठी आरोग्य’ (युनिव्हर्सल हेल्थ केअर) अशी व्यवस्था करावी लागेल - हा कोरोनाने शिकवलेला सर्वात महत्वाचा धडा!- आता पुढे जाऊ : 

धडा चौथा : शुद्ध हवा आणि स्वच्छ श्वास : श्वास-स्वच्छतेचं नवं भान!

स्वच्छता म्हणजे रोज दात घासणे, आंघोळ करणे, परिसर स्वच्छ ठेवणे इत्यादी अशी आपली समजूत. ‘स्वच्छ-भारत‘मध्येदेखील मुख्य भर स्वच्छ पाणी, संडास, सांडपाणी इत्यादीवर आहे. आता कोरोनानंतर यात ‘श्वास स्वच्छता’ जोडावी लागेल. जर अनेक व्हायरस (कोरोना, फ्लू, सर्दी-पडसे, गोवर) हे श्वास-उच्छ्वासाद्वारे, हवेद्वारे पसरतात तर निव्वळ पाण्याचं क्लोरिनेशन करून किंवा मच्छर मारायला फवारणी करून भागणार नाही. जंतुदोषयुक्त हवा आपण इतरांवर सोडत नाही किंवा आपण तशी हवा आत घेत नाही याची काळजी घ्यावी लागेल. त्यासाठी आपसात शारीरिक अंतर ठेवणे (सहा ते वीस फूट), घराबाहेर वावरताना मास्क किंवा रुमालाने नाक-तोंड झाकून ठेवणे, खोकताना-शिंकताना नाक-तोंड झाकणे अशा सामाजिक रीती रुजवाव्या लागतील. शुद्ध, स्वच्छ व जंतुविरहित हवा ही माणसाची मूलभूत आवश्यकता आहे. ती पूर्ण करणारी घराची रचना, नगर-रचना, औद्योगिक संस्कृती तसेच सामाजिक चालीरीती व व्यक्तिगत सवयी अशी नवी संस्कृती घडवावी लागेल.इटलीमध्ये कोरोनाच्या साथीत एका म्हातार्‍याला गंभीर स्थितीत आयसीयूमध्ये भरती करण्यात आलं. तीन दिवस व्हेंटिलेटरने श्वास द्यावा लागला. दुरुस्त झाल्यावर रुग्णालयाच्या बिलामध्ये तीन दिवसांच्या व्हेंटिलेटरची भारी किंमत लावलेली बघून तो रडायला लागला. डॉक्टर म्हणाले, ‘आजोबा तुम्ही रडू नका. तुम्हाला परवडत नसेल तर आम्ही बिल कमी करू.’आजोबा उद्गारले, ‘नाही रे मुला. बिल तर मी देऊ शकतो. पण तीन दिवस कृत्रिम श्वास देण्याचं तुमचं बिल बघून मला वाटलं, अरे, आयुष्यभर मी छान सहज श्वास घेतो आहे. पण ईश्वराने मला कधी बिल पाठवलं नाही व मी त्याबद्दल त्याला कधी धन्यवादही दिले नाही. किती कृतघ्न मी !माणसाला निरोगी जगायला शुद्ध हवा व स्वच्छ श्वास आवश्यक आहे हे साधं; पण मूलभूत सत्य लक्षात आणून देण्यासाठी -  थँक यू कोरोना ! 

धडा पाचवा : नाईलाजापोटी सुटलेली दारू-तंबाखू : थुंकी-मुक्त भारत?थुंकीद्वारे कोरोना पसरतो. पान-तंबाखू खाऊन माणसं सर्वत्र थुंकतात. म्हणून शासनाने पानठेले बंद करविले. दारूच्या दुकानात, बारमध्ये माणसं गोळा होतात. घनिष्ठ संपर्क  येतो. दारूच्या नशेत माणसे नियम तोडतात, म्हणून दारूविक्रीदेखील बंद केली. 25 मार्चला अचानक देशभरात दारू- तंबाखूबंदी लागू झाली. व्यसनमुक्तीवाले, कॅन्सरमुक्तीवाले वर्षानुवर्षे जी मागणी करत होते व आर्थिक कारणांमुळे शासन दुर्लक्ष करत होते ती बंदी कोरोनामुळे एका झटक्यात लागू झाली. तळीरामांचा तळतळाट झाला. पण निकोटिन किंवा अल्कोहोलचं व्यसन असलेल्या कोट्यवधी लोकांचं तंबाखू-दारू सेवन जबदस्तीने व तात्पुरतं का होईना; पण थांबलं. या व्यसनांपासून महिनाभर दूर राहिल्याने अनेकांना फायदा जाणवेल, सवय सुटेल व सुटलेली दारू-तंबाखू कायमच सोडण्याचा पर्याय उपलब्ध होईल. कुणी सांगावं, ‘थुंकीमुक्त भारत’ हे वास्तव होईल.थँक यू कोरोना !

धडा सहावा: विषाणूंविरुध्दच्या लढ्यात नवी वैद्यकीय शस्त्रे सापडतील!

बिल गेट्स यांनी ‘द इकॉनॉमिस्ट’मध्ये लिहिलेल्या एका विशेष लेखात म्हटले आहे की, कोरोनाच्या वैश्विक आपत्तीला तोंड देण्यासाठी तीन क्षेत्रात विलक्षण गतीने संशोधन होईल. लाखो वैज्ञानिक उत्तर शोधायच्या कामाला लागले आहेत. त्यातून कोरोनाविरुद्ध लस निघेलच; पण नवी लस झपाट्याने विकसित करण्याच्या पद्धती शोधल्या जातील. पुढे येणार्‍या अनेक साथींच्या रोगांवर त्यामुळे लवकर लस बनवता येईल. दुसरे, कोरोना व व्हायरसमुळे होणार्‍या इतर रोगांसाठी सोप्या, तत्काळ निदान देणार्‍या, घरोघरी लोक वापरू शकतील अशा रोगनिदानाच्या टेस्ट निर्माण होतील. ग्लुकोज टेस्ट किंवा प्रेग्नेसी टेस्टसारख्या या डिपस्टिक टेस्ट कोरोना व इतर साथींच्या रोगांचें निदान व नियंत्रण सुलभ करतील व तिसरे, बॅक्टेरियाविरुद्ध जसे प्रभावी अँण्टिबायोटिक आहेत व त्यामुळे गेल्या शतकात कोट्यवधींचे प्राण वाचले, तशी या शतकात अँण्टिव्हायरल औषधे निघतील. कोरोना व सोबतच अनेक विषाणू-रोगांवर प्रभावी उपचार व्यापक उपलब्ध होईल.यात अजून चैथा बदल आपण जोडू शकतो. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी रोगी व डॉक्टर यांचा प्रत्यक्ष संपर्क  न येता डॉक्टरने फोनवर वैद्यकीय सल्ला देणे व औषधे प्रीस्क्राइब करणे हे सर्वसामान्य होईल. अमेरिकेने नुकताच एक फतवा काढून कोरोनाच्या काळात रुग्णांच्या छोट्या तक्रारींसाठी फोनवरून वैद्यकीय सल्ला कायदेशीर केला आहे. फोनऐवजी स्काइप-कॉल, व्हॉट्सअँप, झूम इत्यादींचा व अनेक अँप्सचा वापर करून ‘व्हचरुअल’ आरोग्यसेवा समाजात प्रचलित होईल. डॉक्टरकडे प्रत्यक्ष जाण्याची, वाट बघण्याची गरज कमी होईल. डॉक्टरलाही कमी वेळेत जास्त रुग्ण बघता येतील - संसर्गाचा धोका न घेता !थँक यू कोरोना !

धडा सातवा: गरज सरो, एकता मरो !- असे आता चालणार नाही!कोरोनाच्या साथीविरुद्ध 22 मार्चला जनता-कफ्यरू पालन करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले व आपली अखिल भारतीय लढाई सुरू झाली. पण सर्वप्रथम 31 डिसेंबरला चीनने हा नवा रोग जाहीर केल्यापासून 22 मार्चपर्यंत ऐंशी दिवस आपला देश कशात व्यस्त होता? आता विस्मरणात गेलेल्या सुधारित नागरिकता कायदा, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी, अयोध्येत राममंदिर, गोवधबंदी, अशा विविध राजकीय-शासकीय-धार्मिक विवादांमधून हिंदू विरुद्ध मुस्लीम असे विषारी विभाजन करण्यात भारत व्यग्र होता. भारतातील हिंदू व मुसलमानांना एकमेकांविरुद्ध उभे करण्यात आले होते. कोरोना पुढे सरकत होता, भारतात पसरत होता, त्यावेळी भारत आपसात लढण्यात व्यस्त होता. मार्चच्या शेवटी तबलिगी प्रकरणाने तीन गोष्टी लक्षात आणून दिल्या. एक, कोरोनाच्या काळात असे संमेलन घेण्यामागची अंधर्शद्धा व मूर्खपणा. सोबतच, प्रत्यक्ष दिल्लीत तसे संमेलन होऊ देण्याचा प्रशासकीय गलथानपणा. दुसरं, घटनेचे निमित्त करून जणू ‘तबलिगी मुसलमानांमुळे भारतात कोरोना पसरला’ असे चित्र निर्माण करणारा मीडिया. पण तिसरे, नुकतेच पंतप्रधानांनी अगदी या विरुद्ध जाणारे वक्तव्य केलें ते. ‘कोरोना जात-पात, धर्मभेद जाणत नाही, सर्व समान आहेत ! या साथीविरुद्ध सर्वांना एक व्हावे लागेल’.नरेंद्र मोदींची ही नवी मांडणी अगदी योग्य आहे. दिल्लीमध्ये गोळा झालेले तबलिगी किंवा कोरोनासाठी उपाय म्हणून शेण व गोमूत्र सेवनाचा प्रचार करणारी विश्व हिंदू परिषद - कोणीही अंधर्शद्ध किंवा मागासलेले राहिल्यास पूर्ण समाजाला धोका होऊ शकतो. एकाने गैरवर्तन केले तर त्यातून सर्व समाजाला धोका होऊ शकतो. कोरोना धर्माची बंधने पाळत नाही.कोरोनाविरुद्धच नव्हे तर सर्व संकटांमध्ये हिंदू, मुस्लीम, शीख, बौद्ध, ख्रिश्चन, दलित, आदिवासी, साधुमहंत-संत किंवा मुल्ला-मौलवी यापैकी कोणीही पूर्ण समाजाला धोक्यात टाकू शकतो. भारताला सुरक्षित राहायचे असेल तर केवळ कोरोना किंवा सर्जिकल स्टाइकच्या काळात तात्पुरती गरजेपुरती एकता ही पोकळ ठरेल. गरज सरो, एकता मरो ! हिंदू विरुद्ध मुस्लीम किंवा भारत विरुद्ध ईशान्य भारतीय अशी समाज तोडणारी प्रत्येक मांडणी देश विघातक आहे. ‘देशद्रोही’ आहे.कोरोनाची साथ आटोक्यात आल्यावरदेखील हे सत्य व ही नवी मांडणी सर्वांच्या, विशेषत: धर्माच्या आधारावर समाजाचे विभाजन करणार्‍यांच्या, लक्षात राहिल्यास आपण म्हणू  - थँक यू कोरोना !

- म्हणजे एकून धडे झाले सात!- तरीही हे संपलेले नाहीत.कोरोनाने दिलेली शहाणपणाची शिदोरी मोठी आहे.  आणखी तीन महत्वाचे धडे आहेत : भांडवलशाहीचे  पाप (लोभ व विषमता), पृथ्वीला आलेला ताप (ग्लोबल वार्मिंग) व धार्मिक हिंसेचा शाप - या तिन्हींपासून सुटकेची शक्यता कोरोनाने जगाला दाखवली आहे.त्याबद्दल पुढच्या रविवारी, या लेखमालेच्या शेवटच्या लेखात लिहीन. 

search.gad@gmail.com(लेखक आरोग्य विषयाचे तज्ञ आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आहेत.)