शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
3
कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ होणार! पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन
4
Axar Patel: विराट कोहली, ख्रिस गेलनंतर फक्त अक्षर पटेलच करू शकला 'अशी' कामगिरी!
5
Wife सोबत मिळून Post Office च्या या स्कीममध्ये ₹४ लाख जमा करा, पाहा महिन्याला किती मिळेल व्याज?
6
अजित पवारांचा घूमजाव, आधी म्हणाले कल्पना होती, आता म्हणतात, "पार्थच्या जमीन व्यवहाराची माहिती नाही"
7
‘तू बघत राहा, मी खोलीत गुदमरून मरेन’, पत्नीला  मेसेज पाठवून पतीने दरवाजा केला बंद, त्यानंतर...
8
महामार्गांवरून भटक्या कुत्र्यांना हटवा, त्यांचे लसीकरण आणि नसबंदी करून...; सर्वोच्च न्यायालयाचे तीन आदेश
9
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
10
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
11
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
12
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
13
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
14
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'
15
Astro Tips: काही जातकांच्या पत्रिकेत विवाह योगच नसतो; त्यांनी कोणता उपाय करावा? पाहू 
16
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
17
शनिवारी संकष्ट चतुर्थी, ३ राशींना साडेसाती; ‘हे’ ५ उपाय नक्की करा, शनिदोषातून मुक्तता मिळवा!
18
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
19
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
20
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल

आठवणींतला नाताळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 06:05 IST

हरणांची गाडी, ख्रिसमसचं झाड, त्यावर लटकलेली आभूषणं, झिरमिरणारा हिमवर्षाव आणि त्या सगळ्या वातावरणाला कवेत घेतलेला, प्रेमळ चेहऱ्याचा, लाल उबदार अंगरख्यातला, पांढºया स्वच्छ, लांब दाढी मिश्यांचा, थेट उत्तर ध्रुवावरून आलेला सांता.. लहानपणी पुस्तकातला धडा वाचताना मी रोमांचित झाले होते; पण मी प्रत्यक्ष अनुभवलेला पहिला ख्रिसमस काही खासच होता!

ठळक मुद्देशाळेच्या पुस्तकातल्या धड्यात वाचलेला, बघितलेला ख्रिसमस अजून आठवणीत आहे. म्हणून मनात आनंद आहे.

- नंदा मराठेबाहेर ख्रिसमसची धामधूम सुरू आहे. घराघरांवर दिव्याच्या माळा, घराच्या आत नटलेली ख्रिसमसची झाडं, त्याच्या खाली हळूच भेटवस्तू ठेवून जाणाºया सांताची वाट बघत बसलेली चिमुरडी निरागस मुलं आणि त्यांना चुकवून सांताचं काम हलकं करायला शॉपिंग सेंटर्समध्ये खरेदीसाठी जमलेली गर्दी... वातावरण कसं छान प्रसन्न आहे. सगळं शांत शांत आणि निवांत.अशा शांत वळणावर आठवणीचा पूर यावा,हृदयात जपलेल्या क्षणांना पुन्हा एकदा आवाज द्यावा.शाळेत पाचवी, सहावीत होते. मराठीच्या पुस्तकात एक धडा होता निबंध स्वरूपाचा. लंडनमधल्या कुठल्याशा चौकात साजºया होत असलेल्या नाताळाचं सुंदर वर्णन होतं. गहिरी थंडी, त्यावर भुरभुरणारा बर्फ, भलंमोठं ख्रिसमसचं नटलेलं झाड, गोंड्याची लाल टोपी, कोट, विजार घातलेला, पांढºयाशुभ्र दाढीचा मोठ्या पोटाचा, हो हो हो करत हसणारा सांता, त्याची हरणांची गाडी, सगळीकडे भरून राहिलेला वाद्यांचा आवाज, लहान-मोठ्या माणसांची उडालेली झुंबड, सांताचं ते बाळगोपाळांना खेळणी वाटणं, सगळ्या वातावरणात भरून राहिलेला सळसळता आनंद, सरत्या वर्षाच्या निरोपाचा आणि नव्या वर्षाच्या स्वागताचा तो उत्सव. त्या चिमुकल्या वयात ते अद्भुत वर्णन वाचताना थक्क झालेलं मन ढगांवर स्वार होऊन जगात दूर कुठेतरी असलेला तो कोपरा शोधायला बाहेर पडायचं; पण जडावलेल्या पापण्या केव्हाच मिटून जायच्या आणि मिटलेल्या डोळ्यांपुढे वर्षातून एकदा दारासमोर नाचवल्या जाणाºया भैरोबाच्या जत्रेतल्या पालखी पुढच्या काठ्या, त्याबरोबर वाजणारे ढोल-ताशे, गावातल्या मोठ्या रस्त्यावरून निघणारी मोहरमच्या ताबुतांची मिरवणूक, त्यांच्यापुढे नाचणारी चट्टेरी पट्टेरी वाघांची सोंगं, यांचा एकच जल्लोष सुरू व्हायचा, आणि गणेशोत्सवात साताºयातल्या पेठा-पेठांमध्ये वसणारा मुकुटधारी, लंबोदर लाल टोपीतल्या, मोठ्या पोटाच्या सांताची बरोबरी करत माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करायचा. आणि त्या हरणांच्या गाडीच्या घुंगरांच्या जागी दिवस उजाडता उजाडता दारावरून निघालेल्या बैलगाड्यांच्या खुळखुळ आवाजानं लंडनच्या दिशेनं तरंगत निघालेलं मन गावाच्या वेशीवरून परत आपल्या घरी यायचं.बाहेरच्या हॉलमध्ये आजोबांनी रेडिओ लावलेला असायचा आणि आकाशवाणीवरून सकाळच्या भूपाळ्या, व्यंकटेश स्रोत्र कानावर पडत असायचं, त्यानेच मन अगदी प्रसन्न व्हायचं. तेव्हाच्या आमच्या जगात उत्सवांची मर्यादा इथपर्यंतच होती.नवरात्रीतला गरबा, दहीहंडी, होळीचे रंग आणि भांगडा वगैरे गोष्टी आमच्या वेशीबाहेर दूरपर्यंतसुद्धा अजून पोहचल्या नव्हत्या. म्हणून नाताळ किंवा ख्रिसमस कसा असतो ते गाव सोडून, वयाच्या २३व्या वर्षी न्यू यॉर्कला येईपर्यंत कधी अनुभवलच नव्हतं. डिसेंबर १९७२ पहिला ख्रिसमस. मोरपंखी साडी, न पेलवेल इतका वजनदार विंटर कोट, हातमोजे, कानटोपी, पायमोजे, बूट अमेरिकेत अगदी नवीन असलेले आम्ही दोघं रेडिओ सिटीसमोर, लाखो मोगºयाची फुलं जमिनीवर उतरत यावीत तसं झिरमिरणारं पांढरं स्वच्छ बर्फ, लाल हिरव्या पांढºया सजावटीनी सजलेला आणि लक्षावधी रंगीबेरंगी, चमचमणाºया, झगमगणाºया दिव्यांच्या रोषणाईनं झळाळून गेलेला अवघा परिसर, बर्फावरून सरसर घसरत, तोल सांभाळत भिरभिरणारे आइस स्टिकर्स आनंदानं, उत्साहानं मुलाबाळांसह फिरत असलेले नागरिक आयुष्यात पहिल्यांदाच बघत होते मी. इतकं नितळ, प्रसन्न, उत्सवी वातावरण आणि लहानपणी शाळेच्या पुस्तकात वाचलेला तो ख्रिसमस, हरिणांची गाडी, ख्रिसमसचं झाड, त्यावर लटकलेली आभूषणं, झिरमिरणारा हिमवर्षाव आणि त्या सगळ्या वातावरणाला कवेत घेतलेला, प्रेमळ चेहºयाचा, लाल उबदार अंगरख्यातला, पांढºया स्वच्छ लांब दाढी मिश्यांचा, अगदी कल्पनेच्या पलीकडचा स्वप्नांच्या जगातला, थेट उत्तर ध्रुवावरून आलेला सांता.. लहानपणी पुस्तकातला धडा वाचताना केलेल्या कल्पनेच्या पलीकडची मी अनुभवलेली पहिली आनंद यात्रा, माझा पहिला ख्रिसमस. मग तो दरवर्षी येत राहिला. आधी छोट्याशा अपार्टमेण्टमध्ये छोट्या लेकीसाठी फायर प्लेस जवळ कुकीज आणि दुधाचा नैवेद्य घेऊन सांता एखादं दोन भेटवस्तू ठेवायला लागला. मग घराबरोबर ख्रिसमस ट्री, दिव्यांच्या माळा, सजावट, वाढता मित्रपरिवार, ख्रिसमस पार्ट्या, दिवाळीच्याच उत्साहानं होणारी खरेदी, अगदी दिवाळी, गणपतीसारखा नाताळपण आपलासाच वाटायला लागला बघता बघता !४६ वर्षांनंतर आता सण साजरा करायला मुलं घरी नाहीत. नात सुट्टीसाठी पुण्याला गेली, तेव्हा म्हणे नॉर्थ पोलवरून विमान जाताना दोन एल्फ विमानात शिरून हळूच तिच्या बॅगेत शिरले, बरोबर थोडे गेम्सपण घेऊन गेले. रात्री केव्हातरी उठून ते पुण्याच्या तिच्या घरी खेळत बसतात. सांता जमलं तर गिफ्ट्स घेऊन पुण्याला जाणारच आहे. पण त्यामुळे घरी थोडी शांतता आहे यंदा. पण सगळ्या जवळच्या, लांबच्या नातलगांच्या, मित्रमैत्रिणींच्या, त्यांच्या सहवासात रंगलेल्या पार्ट्यांच्या, हास्यविनोदांच्या आठवणींचा जल्लोष आजूबाजूला चालू आहे, शाळेच्या पुस्तकातल्या धड्यात वाचलेला, बघितलेला ख्रिसमस अजून आठवणीत आहे. म्हणून मनात आनंद आहे, चेहºयावर हास्य आहे आणि ओठावर सगळ्या सगळ्यांसाठी खूप खूप शुभेच्छा!(लेखिका अमेरिकेत दीर्घकाळ वास्तव्यास आहेत.)

manthan@lokmat.com