शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

छोटी मूर्ती, छोटं डेकोरेशन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 06:05 IST

अभ्यासाशिवाय कुठल्याच उपक्रमात सहसा भाग न घेणारा कार्तिक आज अचानक सोसायटीच्या गणपती मंडळाच्या मीटिंगला येऊन बसला. कार्यकर्त्यांच्या प्रत्येक गोष्टीला तो नाही म्हणत होता. कोणीच ऐकत नाही आणि वाद वाढायला लागल्यावर ‘तुम्हाला पाप लागेल.’, असं म्हणून तो शांत बसला. त्यानंतर मात्र सगळ्यांची मतं बदलत गेली.

ठळक मुद्देधड ना लहान, धड ना मोठे अशा ‘मधल्या’ मुलांसाठी नवी ‘विण्डो’

- गौरी पटवर्धन

‘ए, चल निघ इथून!’‘जास्त शाणा बनू नकोस. समजलं ना? लगेच फुटायची घ्यायची.’‘जा तू छोट्या मुलांमध्ये क्रि केट खेळ जा.’‘किंवा एक काम कर. नंतर ये. आपण तुझं चमचा-लिंबू स्पर्धेत नाव घेऊ.’मोठी मुलं आठवीतल्या कार्तिकला त्यांच्या गटातून हाकलून द्यायचा प्रयत्न करत होती आणि तो मात्र निगरगट्टपणे तिथेच उभा होता. तो मुळात तिथे का आलाय हेच त्यांना समजत नव्हतं. कार्तिक म्हणजे चष्मा लावणारा, सायकलवर सगळीकडे जाणारा, पुस्तकं वाचणारा, शाळेतले प्रकल्प वगैरे उत्साहाने करणारा, वर्गात पहिला येणारा, वेळ मिळाला की लायब्ररीत जाणारा असा. त्यांच्या दृष्टीनं एक अत्यंत ‘रटाळ’ मुलगा होता. तो कधी सोसायटीच्या आवारात खेळायलासुद्धा यायचा नाही. संध्याकाळी पण त्याचे कसले कसले क्लास असायचे. आणि असा हा कार्तिक, आज अचानक सोसायटीतल्या गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये येऊन बसला होता. एवढंच नाही, तर त्याचं मत मांडत होता. बरं, त्याचं मत ऐकण्यासारखं असतं तर इतर मुलांनी कदाचित ते ऐकलं असतं. पण कार्तिकचं म्हणणं होतं, की मूर्ती एक फुटाची आणि शाडूमातीचीच घ्यायची.‘एक फुटाची मूर्ती? तुला कळतं का एक फूट म्हणजे केवढी मूर्ती ते? बावळट! तुझ्या घरचा गणपती नाहीये हा. संपूर्ण सोसायटीचा गणपती आहे.’‘सोसायटीचा असला तरी मूर्ती लहान असायला काय हरकत आहे?’ कार्तिकने अतिशय प्रामाणिकपणे प्रश्न विचारला होता.‘अरे याला कोणीतरी समजावून सांगा रे.’ मंडळाचा पंचवीस वर्षांचा अध्यक्ष खरंच इरिटेट झाला होता. एक तर अजून पुरेशी वर्गणी गोळा झालेली नव्हती. अजून डेकोरेशनची थीम ठरत नव्हती, कारण त्यासाठी किती पैसे गोळा होतील तेच कळत नव्हतं आणि त्यात हा ढापण्या फालतूची बडबड करून डोकं फिरवत होता.मग कॉलेजला जाणार्‍या दोन कार्यकर्त्यांनी कार्तिकला समजवायला घेतलं. ते म्हणाले, ‘अरे कार्तिक, आपल्या सोसायटीच्या आरतीला सगळे येतात. तीनशेच्या वर माणसं येतात. त्या सगळ्यांना एक फुटाची मूर्ती दिसेल तरी का?’‘मग आपण ती उंचावर बसवू.’‘आणि मग आरती कशी करायची? शिडीवर चढून?’‘एवढी उंच नाही. आपण स्टेजवर गणपती बसवतो ना? त्याच्यावर टेबलवर मूर्ती ठेवली तरी चालेल.’‘पण लोकांना दर्शन घ्यायचं असतं.’‘मग आरती झाल्यावर सगळे जण दर्शन घेऊ शकतात रांगेत.’‘साडेतीनशे माणसांची रांग?’‘पण सगळ्यांना कुठे दर्शन घ्यायचं असतं? लोकं आरतीला येतात, प्रसाद घेतात आणि जातात.’‘बरं, मग तुझं म्हणणं काय आहे?’ आता ते दोन कार्यकर्तेपण इरिटेट झाले होते.‘माझं म्हणणं एवढंच आहे, की मूर्ती छोटी आणि शाडूमातीची आणायची.’‘ठीक आहे. आम्ही विचार करतो. तू जा आता.’ - दुसर्‍याने कार्तिकला कटवलं.‘नाही. मी थांबतो ना मदतीला. माझ्या ओळखीचे आहेत एक जण, शाडूच्या मातीची मूर्ती बनवणारे. त्यांच्याकडे जाऊया का?’‘ए बाबा जा ना इथून.’‘जातो तुम्ही म्हणत असलात तर; पण मूर्ती छोटी केली तर त्याचा अजून एक फायदा होईल.’‘काय???’‘मूर्ती छोटी केली तर त्याचं डेकोरेशनपण छोटं करता येईल.’‘अरे ए! मूर्ती छोटी, डेकोरेशन छोटं, ते पण सोसायटीच्या गणपतीचं?’‘सोड ना.’ एक कार्यकर्ता दुसर्‍याला म्हणाला, ‘कुठे या येड्याशी बोलण्यात वेळ वाया घालवतोस?’ असं म्हणून ते दोघं कार्तिकला तसंच सोडून तिथून निघाले, तर तो म्हणाला,‘पण तुम्ही जर मोठ्ठी मूर्ती आणलीत तर तुम्हाला पाप लागेल हे विसरू नका.’या वाक्यावर मात्र त्या दोघांचा पेशन्स संपला होता. मोठी मूर्ती आणलीत तर पाप लागेल? स्वत: गणपतीसाठी काहीही न करता हा इथे उभं राहून अक्कल शिकवेल आणि आपण ऐकून घ्यायचं? त्या मुलांचा आवाज चढायला लागला. कार्तिक अजूनही शांतपणे बोलत होता.हळूहळू त्यांच्या आजूबाजूला सोसायटीतले मोठी माणसं गोळा झाली. त्यांना कळेना की कार्तिकचं कोणाशी तरी भांडण का झालं असेल? सोसायटीतल्या गणपती मंडळाचे कार्यकर्ते आता चिडून त्याला तिथून हाकलून द्यायच्या प्रयत्नात होते. त्यांची पद्धत चुकीची असली तरी त्यांचं म्हणणं बरोबर आहे असं जमलेल्या अनेक लोकांना वाटत होतं. सोसायटीचा गणपती बसवताना छोटी मूर्ती आणायची याला काही अर्थच नव्हता. कार्तिक बिचारा काहीतरी सांगायचं प्रयत्न करत होता; पण आता त्याचं म्हणणं कोणीच ऐकत नव्हतं.शेवटी चौथीतली किमया त्या गर्दीतून पुढे आली आणि कार्तिकला मोठय़ा आवाजात म्हणाली, ‘‘कार्तिकदादा, तुझं म्हणणं बरोबर आहे. पण हे कोणी तुझं ऐकत नसतील तर जाऊदे. आपण आपला आपला वेगळा गणपती बसवू.’ किमया त्याच्या बाजूने बोलायला लागल्यावर कार्तिकला एकदम धीर आला. कारण ती बिनधास्त आणि बडबडी होती. त्याला त्याचं म्हणणं नीट मांडताच येत नव्हतं. आणि किमयाला मात्र तो काय म्हणतोय ते बरोबर समजलं होतं. इतक्या वेळात अनायासे तिथे पन्नास-साठ माणसं गोळा झाली होती. किमयाने तिथल्या तिथे त्यांच्या गणपती मंडळाची स्थापना करून टाकली. ती कम्पाउंडवर उभी राहिली आणि म्हणाली,‘काका-काकू, मावशी, दादा-ताई, कार्तिकदादाचं म्हणणं कोणीच ऐकून घेतलं नाही. ते मी आता सांगणार आहे. तो म्हणतोय की सोसायटीच्या गणपतीची मूर्ती एक फुटाची आणि शाडूमातीची असली पाहिजे. मला त्याचं म्हणणं पटलं आहे. कारण माझी आजी पण असंच म्हणते की मूर्तीच्या आकारापेक्षा मनातली र्शद्धा महत्त्वाची असते. मोठी प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती नंतर बुडत नाही. ती म्हणते की अशी मूर्ती अर्धी बुडलेली ठेवणं हे चूक आहे. शिवाय त्यामुळे प्रदूषण होतं असं आम्हाला शाळेत शिकवलं आहे. आणि आम्हाला शाळेत असं पण शिकवलं आहे की आपल्या देशाच्या खूप राज्यांमध्ये पूर आलेला असताना आपण इथे मजा करणं बरोबर नाही. म्हणून आम्ही शाळेतला एक प्रोग्रॅम कॅन्सल करून त्याचे पैसे पुरात अडकलेल्या लोकांच्या मदतीला दिले आहेत. तिकडे लोकांना गरज असताना आपण इथे मोठा गणपती उत्सव केला तर आपल्याला पाप लागेल असं मलापण वाटतं आहे.’ आणि मग तिच्या एकदम लक्षात आलं की ती चक्क भाषण करत होती आणि सगळे लोक ऐकून घेत होते. हे लक्षात आल्यावर ती पटकन खाली उतरली. पण एव्हाना सोसायटीचे सेक्रेटरी तिथे आले होते.ते म्हणाले, ‘आपण सगळा आनंद सोडून दिलेला कोणालाच पटणार नाही. त्यामुळे आपण सगळ्या स्पर्धा घेऊया. पण मलाही असं वाटतंय की आपण मूर्ती लहान आणि डेकोरेशन साधं करून ते पैसे आपल्या देशातल्या इतर लोकांना देऊया. कारण त्याच्यामुळे बाप्पा जास्त खुश होईल हे किमयाचं म्हणणं मला पटलेलं आहे.’त्यांनी किमया आणि कार्तिकच्या मंडळाला त्यांची पहिली वर्गणी देऊन टाकली. lpf.internal@gmail.com(गौरी ‘लिट्ल प्लॅनेट फाउण्डेशन’ची समन्वयक आहे.)