शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पुण्याचं काम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 06:05 IST

जलसंधारणाच्या कामात गावकर्‍यांकडून पुरेसं सहकार्य मिळत नाही म्हणून तो सरळ शेजारच्या गावात गेला. घरदार सोडून दीड महिना तिथेच राहिला. त्या गावाला पानी फाउण्डेशनचा तालुक्यातला पहिला पुरस्कार मिळाला. घरी यायला निघाला, तेव्हा बसलाही पैसे नव्हते. बायको फक्त डाळ भात शिजवून मुलांना घालत होती;  पण तिनंही नवर्‍याला फोन करून बोलवून घेतलं नाही. - का? तर नवरा पाण्याचं, पुण्याचं काम करतोय !.

ठळक मुद्देचंद्रशेखर गोडघाटेने हार मानली नाही. त्याने एकट्याने काम करायला सुरुवात केली.

- नम्रता भिंगार्डे

‘हे  7000 रु पये ! पुढचे 45 दिवस यातच भागव.’ बायकोच्या हातात आठ दिवसांच्या कामाचा मोबदला ठेवून चंद्रशेखर गोडघाटेने थेट वाई पिंपळधरी हे गाव गाठलं. जलसंधारणाच्या कामात मदत करण्यासाठी हा पठ्ठय़ा स्वत:चं गाव, घरदार, बायको, मुलं सोडून घरापासून 38 किलोमीटरवर असलेल्या वाई पिंपळधरी गावात गेला आणि सत्यमेव जयते वॉटरकप 2018ची स्पर्धा संपेपर्यंत तिथेच राहिला. फेब्रुवारी 2018 पर्यंत आर्वी तालुक्यातल्या दहेगाव गोंडी गावात चंद्रशेखर गोडघाटे सामान्य आयुष्य जगत होता. मिस्री असल्याने बांधकामाच्या साइटवर मिळणारं काम तसंच लग्नात किंवा सप्ताहात ऑर्गन वाजवून होणार्‍या कमाईत त्याचा संसार टुकीनं चालला होता. शेतकरी कुटुंबातला असल्याने वारसाहक्काने मिळालेली शेतीची जबाबदारीही तो पेलत होता. मात्न 2018 हे वर्ष त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारं ठरलं. पानी फाउण्डेशनचं पाणलोट विकासाचं ट्रेनिंग घेतल्यानंतर आपल्या गावातला पाण्याचा प्रश्न मिटावा यासाठी त्याने झपाटून कामाला सुरुवात केली होती. र्शमदानासाठी गावाला एकत्न करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. पण गावकरी काही साथ देईनात. हे पाहून गावातले इतर प्रशिक्षणार्थी निराश झाले व चंद्रशेखरला एकटं सोडून शांत झाले. पण चंद्रशेखरने हार मानली नाही. त्याने एकट्याने काम करायला सुरुवात केली होती.दरम्यान, पानी फाउण्डेशनचे आर्वी तालुका समन्वयक भूषण कडू चंद्रशेखर यांना भेटायला गेले. त्याच्या दहेगाव गोंडी गावात काहीच काम होत नाहीये हे पाहून त्याला आपलेपणाने म्हणाले, ‘चंदूभाऊ, तुमच्या गावात तर काई काम होऊन नाई राह्यलं. तुम्ही एकटेच किती प्रयत्न करणार? इथून 38 किलोमीटरवर असलेलं वाई पिंपळधरी हे गाव एकत्न येऊन काम करत आहे. पण पूर्ण वेळ तांत्रिक नियोजन करून देणारी कोणतीही व्यक्ती गावाकडे नाही. तू जर त्या गावी गेलास तर खूप चांगलं काम त्या गावात उभं राहू शकते. त्यांना फक्त मार्गदर्शक पाहिजे आहे.’चंद्रशेखर हा मिस्री काम करीत होता. त्यामुळे लेवल काढणे व सर्व तांत्रिक बाबतीत तो सक्षम आहे हे भूषण कडू यांनी ओळखलं; पण त्याची किंमत त्याच्या स्वत:च्या गावाला नव्हती. चंद्रशेखरने एक अविश्वसनीय निर्णय घेतला. सत्यमेव जयते वॉटरकप 2018 स्पर्धा सुरू व्हायला सात दिवस बाकी होते. या दिवसात रात्नंदिवस काम करून, भागवत सप्ताहमध्ये ऑर्गन वाजवून त्याला 7000 रु पये मिळाले. हे पैसे पत्नीच्या हाती सुपूर्द करून ‘आता पुढचे 45 दिवस गावात फक्त आणि  फक्त पाण्याचे काम करणार’, असं म्हणत चंद्रशेखर थेट वाई पिंपळधरी गावात पोहोचला होता.चंद्रशेखर यांच्या राहण्याची आणि जेवणाची जबाबदारी गावातील माजी सरपंच गणेशभाऊ गाजकेश्वर आणि शंकर राड्डी परिवार यांसह संपूर्ण गावाने उचलली. मोजमाप करण्याच्या त्याच्या कुशलतेमुळे वाई पिंपळधरीमधील जलसंधारणाचं काम तांत्रिकदृष्ट्या अचूक झालं आणि हे गाव वॉटरकप स्पर्धेत तालुक्यात पहिल्या क्रमांकाने जिंकलं !चंद्रशेखर सांगत होता, ‘‘स्पर्धेनंतर जवळपास दीड महिन्याने मी माझ्या गावाला जायला निघालो. भूषणसरांनी मला एस.टी. स्टॅण्डला सोडलं. बसकडे न जाता मी तिथंच थांबून राहिलो. भूषणसरांनी विचारलं,‘‘गाडी उभी आहे जात का नाई? ’’‘‘नको सर, भेटेल कोणीतरी गावातलं. त्यांच्यासोबत जाईन.’’‘‘चंद्रशेखरभाऊ, पैसे नाहीत का खिशात?’’मी शांत बसलो. दुसर्‍याच क्षणाला भूषणसरांनी हजार रुपये माझ्या हातात ठेवले आणि मी बसमध्ये जाऊन बसलो. त्या दिवशी मी घरी पोहोचलो ते मला रडू आवरलं नाई. माझ्या घरातलं सगळं किराणा सामान संपलं होतं. माझी बायको 15 दिवस मुलांना फक्त डाळ-भात शिजवून घालत होती; पण एवढं असतानाही तिनं फोन करून मला बोलावून घेतलं नाई.. का? तर मी पाण्याचं. पुण्याचं काम करतोय.’’ आज चंद्रशेखर गोडघाटे पानी फाउण्डेशनचे ‘टेक्निकल ट्रेनर’ म्हणून अनेक गावांना पाणलोट विकासाचं तांत्रिक ज्ञान देत आहेत. सामान्य गावकरी ते टेक्निकल ट्रेनर हा पल्ला गाठण्यासाठी त्यांनी बरीच मेहनत घेतली. त्यांनी वाई गावात केलेल्या कामापासून धडा घेत त्याच्या स्वत:च्या गावकर्‍यांनी 2019च्या वॉटरकप स्पर्धेत संपूर्ण ताकदीनिशी जलसंधारणाचं काम करण्याची तयारी दाखवली आहे.टेक्निकल ट्रेनर म्हणून गावकर्‍यांना सामोरं जात असतानाचा चंद्रशेखर आणि पूर्वीचा चंद्रशेखर काय फरक आहे? असं विचारल्यावर हसत ते म्हणतात..‘‘शाळा सोडली त्याला बराच काळ लोटला. शिकणं मात्न थांबलं नव्हतंच. पोटापाण्यासाठी मिस्री काम शिकलो. छंद आणि थोडी मिळकत होईल म्हणून ऑर्गन वाजवायला शिकलो. तसंच वॉटरकप स्पर्धेत पाणलोट विकास म्हणजे काय हे शिकलो. हे सगळंच मनापासून शिकलो होतो म्हणून ते डोक्यात फिट्ट बसलंय. आता जेव्हा मी पूर्ण जिल्ह्यातल्या गावांमधील गावकर्‍यांना ट्रेनिंग देतो तेव्हा समोर असलेल्या गावकर्‍यांच्या डोळ्यांत तसेच कुतूहल दिसते जसे माझ्या डोळ्यांत होते. माझ्याकडून जमेल तितकं मी त्यांना तांत्रिकदृष्ट्या सक्षम करायचा प्रयत्न करत राहाणार.’’namrata@paanifoundation.in(लेखिका पानी फाउण्डेशनच्या सोशल मीडिया मॅनेजर आहेत.)