श्वास

By Admin | Updated: November 8, 2015 18:34 IST2015-11-08T18:34:36+5:302015-11-08T18:34:36+5:30

पं. हरीप्रसाद चौरसिया लखलख सोन्याचा सण उंबरठय़ावर आला असताना भेटूया सोन्यासारख्या तीन सुहृदांना!

Breathing | श्वास

श्वास

पं. हरीप्रसाद चौरसिया

लखलख सोन्याचा सण 
उंबरठय़ावर आला असताना भेटूया
सोन्यासारख्या तीन सुहृदांना!
- एक लक्ष प्रतींचा टप्पा ओलांडणारा 
‘लोकमत’चा दिवाळी अंक ‘दीपोत्सव’! 
यावर्षीच्या अंकातल्या तीन विशेष लेखांमधले 
हे संक्षिप्त तुकडे.
नारायण मूर्ती, पं. हरिप्रसाद चौरसिया 
आणि राजश्री बिर्ला यांच्या 
ऐन दिवाळीतल्या सविस्तर, 
दिलखुलास भेटींची ही पहिली 
पणतीच जणू!
माङो वडील अलाहाबादमधले नामवंत कुस्तीपटू. त्यामुळे आपल्या मुलांनीही याच मातीत उतरावे असे त्यांना वाटणो स्वाभाविक होते. 
- पण मला समजत नव्हती ती संगीताच्या स्वरांशी असलेली त्यांची कट्टर दुष्मनी. ‘गाना एक तो कोठेवाली गाती है, नही तो बॅण्डवाले बजाते है.’ असे ते मोठय़ा त्वेषाने म्हणत, तेव्हा माङया मनात सतत रेंगाळत असणा:या सुरांची सावली त्यांना दिसणार तर नाही ना, अशी धास्ती मला बेचैन करायची. 
 माझी आई फार अकाली गेली आणि त्यानंतर आम्हा तीन मुलांना सावत्र आईचा जाच होऊ नये म्हणून बहुधा त्यांनी दुसरे लग्न केले नाही. वाढीच्या वयातल्या मुलांना सांभाळताना होणारी दमछाक आणि घरात आई व वडील अशा दोन्ही भूमिका निभावताना होणारी कोंडी यांमुळे माङया वडिलांच्या आयुष्यात जी रखरख आली तिच्यात स्वरांची कोवळीक जळून गेली असेल का? की कुस्तीच्या आक्र मक चढायांखाली हे स्वर चिरडून गेले असतील?.. कोण जाणो!
- गाण्याबद्दल असलेला आणि वारंवार व्यक्त होणारा त्यांचा तिरस्कार बघून मी मात्र सावध झालो आणि एक निर्णय घेतला. कोणत्याही क्षुल्लक कारणासाठीसुद्धा वडिलांची नाराजी ओढवून घ्यायची नाही. किंबहुना, ते खूश राहावेत यासाठी ते म्हणतील, सांगतील ते-ते करायचे. 
..मग मी वडिलांना बरे वाटावे (किंवा मीही त्यांच्याप्रमाणोच कुस्तीपटू होण्यास उत्सुक आहे हे त्यांना पटावे) म्हणून पहाटे पहाटे आखाडय़ात जाणो सुरू केले. चांगली तीनचार तासांची कसून मेहनत झाल्यावर मातीने आणि घामाने थबथबलेले आम्ही सगळे बाल कुस्तीपटू अलाहाबादच्या संगमात उडय़ा मारायचो. त्यावेळी स्पर्धा असायची ती नदीचा दुसरा तीर गाठण्याची, कारण त्या तीरावर काकडीचे खूप वेल होते. दुसरा तीर गाठताच पळतपळत जाऊन मिळतील तेवढय़ा काकडय़ा खायच्या हा रोजचा कार्यक्र म. सकाळपासून रिकाम्या असलेल्या पोटात एव्हाना कावळ्यांची शाळाच भरलेली असायची..! मग दुपारी शाळा, अभ्यास, घरातील कामे. या सर्व धांदलीत माङया आवडत्या गाण्यासाठी चिमूटभर वेळही उरायचा नाही. 
जे करणो मला अगदी अप्रिय होते, त्याच्या मागे मी दिवसभर फरफटत जात होतो आणि मन ज्या स्वरांकडे सतत धाव घेत होते, ते स्वर जणू माङया आयुष्यातून पूर्ण वजा झाले होते. अगदी हद्दपारच . 
स्वरांचा दुष्काळ अशी माङया जिवाची तलखी करीत असताना एकदम वा:याची सुगंधी झुळूक अंगावर यावी तसे गाणो माङया आयुष्यात आले ते आमच्या शेजारी राहणा:या राजाराम यांच्यामुळे. राजारामजी स्वत: एक चांगले गवई होते. त्यामुळे असेल कदाचित, पण माझी संगीताबद्दलची अनिवार ओढ त्यांना कळत होती. त्यांच्याकडे माङो संगीताचे शिक्षण सुरू झाले आणि पहिल्या काही दिवसांतच माङया या गुरूंना एक शोध लागला - माङया आवाजाची रेंज फारच मर्यादित असल्याचा!  
मला माङया आनंदापुरते गाता आले असते, पण  व्यावसायिक कलाकार म्हणून त्या तोडीचे गाणो आत्मसात करणो शक्य नव्हते. पण म्हणून निराश होण्याची गरज नव्हती. कारण माङया गुरूंकडे त्याचे उत्तर होते. 
त्यांनी मला सल्ला दिला, तो संगीत साधनेसाठी एखादे वाद्य निवडण्याचा. 
बासरी हे स्वरयंत्रच्या सर्वात जवळ असलेले वाद्य त्यांना माङयासाठी योग्य वाटत होते. बासरीचे एक बरे होते, ती विकत घेण्यासाठी सतार, सरोद या वाद्यांप्रमाणो खूप पैसे लागणार नव्हते. आता बासरी घेण्यापुरते पैसेही माङयाजवळ नव्हते ही बात वेगळी..! पण कदाचित देवालाच माझी काळजी असावी. नाहीतर साक्षात जमदग्नीचा अवतार असलेले माङो वडील मला बासरी खरेदी करण्यासाठी चार आणो पण देण्याची शक्यता नसताना हा प्रश्न सुटलाच नसता.! 
एक दिवस मी शाळेतून घरी येत असताना माङया  पुढेच पावा वाजवत एक गुराखी मुलगा चालला होता. पाणी पिण्यासाठी म्हणून एका सार्वजनिक नळापाशी तो थांबला. ओंजळीत पाणी भरून घेण्यासाठी त्याला त्याच्या हातातील पावा खाली ठेवणो गरजेचे होते. माङो सगळे लक्ष त्या पाव्याकडे होते. तो ओंजळ पुढे करून पाणी पिण्यासाठी वाकताच मी मागच्या मागे त्याचा पावा घेऊन धूम पळालो. ही चोरी त्याला कळेपर्यंत मी खूप दूरवर पोचलो होतो. 
रोज आखाडय़ात मारलेल्या जोरबैठका त्यावेळी माङया  उपयोगी पडल्या. त्या व्यायामाने माझा दमसांस चांगलाच वाढला होता.! तर अशा रीतीने चोरी करून मिळवलेल्या बासरीवर माङो शिक्षण सुरू झाले.. 

Web Title: Breathing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.