ये है बॉम्बे मेरी जान..

By Admin | Updated: August 29, 2015 14:57 IST2015-08-29T14:57:08+5:302015-08-29T14:57:08+5:30

‘शहर की ओर’ निघालेला पारंपरिक प्रादेशिक पुरु ष, हा जसा पुस्तकांचा, तसाच सिनेमांचाही नायक. तो शिक्षित आणि स्वप्नाळू आहे. या नायकाला शहरात दुटप्पीपणा, शोषण, फसवणूक, निराशा आणि वैयथ्र्यताच जास्त दिसते. या सा:यातून उभे राहते आधुनिक शहराचे मिथक!

This is Bombay my dear .. | ये है बॉम्बे मेरी जान..

ये है बॉम्बे मेरी जान..

>विश्राम ढोले
 
स्मार्ट सिटी योजनेबद्दल सध्या बरीच चर्चा सुरू आहे. या योजनेमुळे देशातील अनेक शहरांचा स्मार्ट सिटीमध्ये अर्थात चतुरनगरीमध्ये कायापालट व्हावा, अशी अपेक्षा आहे. ही शहरे स्मार्ट किंवा चतुर होतील म्हणजे नेमके काय होईल, ते भविष्यात कळेलच. पण त्यानिमित्ताने शहराचा स्मार्टनेसशी किंवा चतुराईशी लावला जाणारा जुनाच संबंध नव्याने समोर येतो आहे, हे मात्र नक्की.
 शहरांचे वस्तुरूप दर्शन स्मार्ट असेल-नसेल, पण शहरी व्यक्ती आणि संस्कृती मात्र स्मार्ट किंवा चतुर असते, हा समज बहुधा शहरांइतकाच जुना आहे. अर्थात इथे स्मार्टचा अर्थ फक्त नीटस, चकचकीत, सफाईदार, शैलीदार, हुषार, कार्यकुशल एवढय़ापुरताच मर्यादित नाही. इथल्या स्मार्ट शब्दाला फसवा नीटसपणा, उथळ चकाकी, सफाईदार लबाडी, मुखवटय़ांची शैली, जबाबदारी टाळण्यातील हुषारी आणि स्वार्थ साधण्याचे कौशल्य अशाही अर्थछटा येऊन चिकटतात. हा स्मार्टनेस ‘चलाखी’ला ‘चातुर्य’ म्हणून खपवतो.
 ‘सीआयडी’तल्या ‘ए दिल है मुश्कील जीना यहाँ’ या सुप्रसिद्ध गाण्यातल्या ओळीचा आधार घेऊन सांगायचे तर हा स्मार्टनेस ‘खुद काटे गले सब के, कहे इस को बिझनेस’ अशा प्रकारचा असतो. 
‘सीआयडी’मधील (1956) हे गाणो केवळ शहरी संस्कृतीतील चलाखीवरच बोट ठेवते असे नाही, तर ‘ये है बॉम्बे मेरी जान’ असे म्हणत आधुनिक शहराचे दुहेरी मिथकच परिभाषित करते.
 रफीच्या आवाजात आधी हे गाणो मुंबईतील जगणो कसे कठीण आहे, ते सांगते. नंतर हेच गाणो इथले जगणो ‘मुश्कील’ नाही तर ‘आसाँ’ आहे असे गीता दत्तच्या आवाजात प्रत्युत्तरही देते. आधी ‘ही मुंबई आहे मित्र, सांभाळ’ असा इशारा देते आणि मग ‘ही मुंबई म्हणजे एक मित्रच आहे, यारा’ असे आश्वस्तही करते. ‘ये है बॉम्बे मेरी जान’ या ओळीमधून जाणवणारी संदिग्धता हीच आधुनिक शहराची खरी ओळख आहे, असे हे गाणो सुप्तपणो सुचवीत जाते. मुंबईच्या निमित्ताने येणारे आधुनिक शहराबद्दलचे हे दुहेरी मिथक आपल्या सामूहिक मानसिकतेत खूप खोलवर रुजलेले आहे. कथा, कादंब:या, नाटक आणि कवितांमधून त्याची अनेक प्रकारे अभिव्यक्ती होत असते. हिंदी चित्रपट आणि त्याच्या गाण्यांमधून तर अनेकदा. 
अर्थात इथे एक लक्षात घेतले पाहिजे की, चित्रपटांमध्ये ही दुहेरी, संदिग्ध ओळख मुंबई, कोलकातासारख्या आधुनिक बहुरंगी, बहुढंगी शहरांच्या संदर्भात येते. दिल्ली, लखनौ यांसारख्या ऐतिहासिक शहरांबाबत नाही. या शहरांवरही गाणी आहेत. काही चित्रपटांमध्ये ही शहरे मध्यवर्तीही आहेत. पण आकर्षण ते दुरावा किंवा आशा ते हताशा अशा टोकाच्या प्रतिक्रिया या ऐतिहासिक शहरांच्या संदर्भात येत नाहीत. त्या येतात आधुनिकतेसोबत जन्माला आलेल्या, उद्योगव्यवस्थांच्या आधारे वाढलेल्या, बहुरंगी-बहुढंगी, सेक्युलर वळणाच्या आणि स्मार्ट संस्कृतीच्या मुंबईसारख्या शहरांबाबत.
 डोली (1947) या चित्रपटातील ‘दिल्ली की गलियों मे जिया नही लागे’ या मजेशीर गाण्यात त्यादृष्टीने एक मार्मिक टिपणी आहे. मुंबईला जाण्याचा हट्ट करणा:या आपल्या दिल्लीकर पत्नीला समजावताना पती म्हणतो की, दिल्ली हा ‘आपला देश’ आहे, इथेही खूप गोष्टी चांगल्या आहेत. इथेच तुङो आईवडील नि भाऊबहीण आहेत. त्यावर ती फणका:याने प्रत्युत्तर देते,
‘‘वहाँ इज्जत भी है, रु पय्या भी है.. 
सैगल भी है, सुरैय्या भी है.’’
या ओळी सवंग असतीलही. पण मुंबईविषयीचे आकर्षण त्या बरोब्बर व्यक्त करतात. 
‘गाव हमारा शहर तुम्हारा’ (1972) या चित्रपटाच्या सुरुवातीलाच गावाहून शहराकडे निघालेला नायकाचे गाणो येते- 
‘‘नई हवा में उडने देखो 
बन का मोर चला. 
अपना गाँव संभालो यारो 
मै तो शहर की ओर चला’’ 
केवळ चित्रपटच नव्हे तर एकूणच भारतीय साहित्यातील एका खूप मोठय़ा भागाचा नायक म्हणजे ही ‘शहर की ओर’ निघालेला किंवा शहरात आलेला पारंपरिक प्रादेशिक पुरुष. तो शिक्षित आणि स्वप्नाळू आहे. स्वत:ची काहीतरी ओळख राखून आहे. अभिव्यक्त होण्यास सक्षम आणि उत्सुकही आहे. शहरी अनुभवांना तो बधीरपणो, यांत्रिकतेने सामोरा जात नाही.  
मुंबईचे किंवा आधुनिक शहराचे मिथक उभे राहते ते मुख्यत्वे या पुरुषाच्या दृष्टिकोनातून. हिंदी गाण्यांपुरते बोलायचे झाले तर या पुरुषाला शहरात दुटप्पीपणा, फसवणूक, शोषण, कुचंबणा, वंचना, दुरावा, अनामिकता, निराशा आणि वैयथ्र्यताच जास्त दिसते. या सा:यातून तो आधुनिक शहराचे प्रस्थापित मिथक उभे करतो. 
शहर की रात और मै नाशाद नाकारा फिरू (ए गमे दिल क्या करू / ठोकर- 1953), तेरे शहरों मे बिल्डिंगे उंची है इन्सान छोटे है (तेरे शहरों से राजा / नाच घर 1959), इस अजनबी से शहर मे जाना पहचाना ढुंढता है (एक अकेला इस शहर मे / घरौंदा- 1977), यहाँ हकिकत भुलाके हर कोई भागता है (बंबई शहर हादसों का शहर है / हादसा- 1983), सोने की राहों मे सोने को जगह नही (बंबई नगरीया / टॅक्सी नं. 9211- 2006) अशा अनेक ओळींमधून उभे राहते ते याच मिथकाचे वर्णन.
‘सीने मे जलन आँखो में तुफान सा क्यूँ है’ 
ही गमन (1979) मधील शहरयार यांची सुरेश वाडकरांनी उत्कटपणो गायलेली गझल म्हणजे तर या मिथकाचा अतिशय सुंदर काव्यात्म आविष्कार. परंपरेने दिलेली, नातेसंबंधातून जोपासलेली, सांस्कृतिक मूल्यांमधून साकारणारी स्वओळख जेव्हा महानगरीय जनप्रवाहात पार वाहून जाते तेव्हा निर्माण होणारी खोलवरची अस्वस्थातच ही गझल ‘आईना हमे देख के हैरान सा क्यों है’ अशा शब्दांत व्यक्त करते. 
या तुलनेत ‘ये है बॉम्बे मेरी जान’मधील ‘ए दिल है आसाँ जीना यहाँ’ हे उत्तरार्धातील मिथक गाण्यांमध्ये कमीच आढळते. स्ट्रीट सिंगर (1966) मधील बंबई हमारी राजदुलारी बंबई हे गाणो त्याचे एक ठळक उदाहरण.
‘भुकों के पेट को पाले. 
नंगो के तन को ढाके, गिरतों को तू ही संभाले. 
मजदुरों के दिल में झांके’ 
- असे म्हणत हे गाणो मुंबई म्हणजे कल्याणकारी आधुनिक अवकाश असे मिथक उभे करते. ‘इस नगरी में ना भेद भाव है सब से तेरा नाता’ अशा शब्दांत हे गाणो कोणाला मुंबईचे रूप कल्याणकारी वाटते हे सुचवते.
ज्यांच्या वाटय़ाला गावाकडे भेदभाव आला, शोषण आले, नकोशी ओळख किंवा भूमिका ज्यांच्या वाटय़ाला आली किंवा गावगाडय़ात ज्यांना काही ओळखच नाही अशांना मुंबईचे म्हणजे समानतेचे, संधीचे, उन्नतीचे हवेहवेसे अवकाश वाटल्यास नवल नाही. मुंबईत येणारी अनामिकता त्याला काचत नाही. उलट गावाकडे वाटय़ाला आलेल्या नकोशा ओळखीपासूनची ती सुटका वाटते. अशांना मुंबईबद्दल प्रेम वाटते. 
जगणो शिकवणा:या, आपले म्हणणा:या मुंबईला ‘स्ट्रीट सिंगर’मधील हे गाणो तर ‘ये जान से भी प्यारी मुंबई’ असे म्हणते. मुंबईत जगता यायला लागले की अशा पात्रंची ‘ये हसीन बंबई हम को जम गई’ (हॉलिडे इन बॉम्बे- 1963), ‘बम बम बंबई. बंबई हम को जम गई’ (स्वर्ग- 1990) अशी आनंदगाणीही येतात. आणि ‘ये हे बॉम्बे मेरी जान’ मध्ये स्त्रीआवाजातून व्यक्त होणारा ‘दादागिरी नही चलने की यहाँ’ असा आत्मविश्वासही येतो. हिंदी चित्रपट आणि गाण्यांमध्ये परंपरा आणि आधुनिकता यांच्यातील गुंतागुंतीच्या संघर्ष प्रेमाच्या प्रांताखालोखाल जर कुठे दिसत असेल तर तो आधुनिक शहर नावाच्या अवकाशात. 
- मुंबई हे त्या अवकाशाचे नाव आणि ‘ये है बॉम्बे मेरी जान’ हा त्याचा सूत्रबद्ध मिथकात्मक आविष्कार.
 
‘श्री-420’ ते ‘बंटी और बबली’
मुंबई नावाच्या चुंबकाचे आकर्षण
केवळ पोटापाण्यासाठीच नव्हे, तर पैसा, प्रतिष्ठा, प्रसिद्धी, चमकधमक यासाठीही दररोज हजारो लोक आपले घरदार, समुदाय, संस्कृती वगैरे पारंपरिक धागे सोडून मुंबईत येतात. कधी आशेने, तर कधी असहायतेने. गावखेडय़ातून त्यांचे मुंबईला येणो, तिथल्या वस्तूरूप दर्शनाने मुग्ध होणो, विरोधाभासाने चक्रावून जाणो, विशालतेने भांबावणो, तिथल्या जगण्याशी, संस्कृतीशी झगडणो आणि नंतर त्यामध्येच इच्छे-अनिच्छेने  विसजिर्त होत जाणो ही सारी प्रक्रि याच मुळी विलक्षण नाटय़मय. त्यामुळे साहित्याप्रमाणोच चित्रपटांनाही त्याचे आकर्षण. आपली आधुनिकता सिद्ध करण्यासाठी मुंबईसारख्या शहरामध्ये कर्तृत्व दाखवणो, ही तर हिंदी चित्रपटातल्या प्रादेशिक नायकाची अनेक वर्षे जणू एक प्रमुख गरजच बनून गेली होती. 
अगदी साठ वर्षांपूर्वीच्या ‘श्री-420’ पासून अलीकडच्या ‘बंटी और बबली’पर्यंत त्याची अनेक उदाहरणो देता येतील.
 
(लेखक माध्यम, तंत्रज्ञान आणि संस्कृती 
या विषयाचे अभ्यासक आहेत.)
vishramdhole@gmail.com
 

Web Title: This is Bombay my dear ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.