शरीरशुद्धी

By Admin | Updated: March 23, 2015 20:16 IST2015-03-23T20:16:35+5:302015-03-23T20:16:35+5:30

आयुर्वेदातील निसर्गाेपचारामुळे अनेक जुनाट विकारांवर आराम तर मिळतोच, पण शरीरातील अनेक विषारी घटक बाहेर गेल्याने शरीर-मनाला टवटवीही येते. काय करायचं त्यासाठी?

Body wash | शरीरशुद्धी

शरीरशुद्धी

>वैद्य विजय कुलकर्णी
 
आयुर्वेदातील निसर्गाेपचारामुळे अनेक जुनाट विकारांवर आराम तर मिळतोच, पण शरीरातील अनेक
विषारी घटक बाहेर गेल्याने शरीर-मनाला टवटवीही येते. काय करायचं त्यासाठी?
--------------
डोक्याभोवती मफलर गुंडाळलेली. आजूबाजूला कायम गर्दी. एकीकडे ते लोकांशी बोलताहेत, प्रचार करताहेत, मीटिंगा घेताहेत, भाषणं करताहेत, निवडून आल्यानंतर आणि पुन्हा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर निरनिराळे निर्णय घेताहेत, ‘आप’ल्यातल्या भांडणाबद्दल मीडियावाल्यांना बाईट देताहेत, सगळ्यांना तोंड देताहेत आणि दुसरीकडे आपल्याच प्रकृतीशी लढताहेत. सारखे खोकताहेत. शुगरही पार वर गेलेली.
अरविंद केजरीवाल यांचं हे रूप अलीकडच्या काळात अनेकांनी पाहिलं. आपल्या जुनाट खोकल्यानं आणि मधुमेहानं त्रस्त झालेल्या अरविंद केजरीवालांनी त्यातून मुक्ती मिळवण्यासाठी आणि शरीर शुद्धिकरणासाठी शेवटी बंगळुरूच्या निसर्गाेपचार केंद्राची वाट धरली. दहा दिवस ते तिथे राहिले, शरीरशुद्धिकरणाच्या सा:या प्रक्रिया केल्या आणि आता पुन्हा नव्या उत्साहानं आणि नव्या दमानं ते परत आपल्या कामावर रुजू झालेत. निसर्गोपचार आणि शरीरशुद्धिकरणाचा मुद्दा त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला. अर्थात बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांच्यासारख्या दिग्गजांनीही पूर्वी निसर्गाेपचाराच्या मदतीनं शरीरशुद्धी केल्याच्या बातम्या आपण वाचल्या आहेतच.
पण कशी करतात ही शरीरशुद्धी? कुठलीही ‘औषधं’ न घेताही आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर कसे टाकले जातात? निसर्गोपचार आणि शरीशुद्धीविषयी आयुर्वेदानं अतिशय सखोल आणि विस्तारानं अभ्यास केला आहे.
आपल्या शरीरात तीन दोष असतात. वात, पित्त आणि कफ. यातला एखादा जरी दोष वाढला तरी शरीराचं आरोग्य बिघडतं. त्यासाठी आयुव्रेदात दोन प्रकारे चिकित्सा केली जाते. शोधन चिकित्सा आणि शमन चिकित्सा. शोधन चिकित्सेत शरीरात वाढलेले दोष बाहेर टाकून शरीरशुद्धी केली जाते, तर शमन चिकित्सेत आयुव्रेदिक औषधांद्वारे वाढलेल्या दोषांचे शमन केले जाते. वातदोष वाढल्यास बस्ती हा विधी केला जातो. पित्तदोष वाढल्यास विरेचन हा शोधन उपक्रम करतात. कफदोष वाढल्यास वमन हा उपक्रम केला जातो. रक्तधातू दुष्ट झाल्यास त्याचे शोधन करण्यासाठी रक्तमोक्षण केले जाते, तर शिरोभागातील दोष बाहेर काढण्यासाठी ‘नस्य’ केले जाते.
बस्ती
वातदोषावर बस्ती उत्तम काम करते. तेल, काढा किंवा अन्य द्रवपदार्थ रुग्णाच्या शरीरात गुद मार्गातून आत सोडले जातात. निरुह बस्ती आणि अनुवासन बस्ती असे बस्तीचे दोन मुख्य प्रकार. निरुह बस्तीसाठी विविध औषधी द्रव्याचे काढे वापरतात. अनुवासन बस्तीमध्ये तेलाचा उपयोग केला जातो. बस्ती देण्यापूर्वी रुग्णाच्या पाठीला आणि पोटाला थोडेसे तेल लावून शेक दिला जातो. वाताच्या अनेक तक्रारींवर बस्तीचा उपयोग होतो उदा. संधिवात, कंबरदुखी, मानदुखी, गुडघेदुखी, आमवात, डोकेदुखी, पोटसाफ न होणो, पक्षवध इत्यादी. बस्तींचा उपयोग रोगप्रतिकारासाठी होतो. ज्यांना कुठलाही त्रस नाही अशांनीही पावसाळ्याच्या सुरुवातीला बस्ती घेतल्यास खूप चांगला परिणाम दिसतो.
विरेचन
विरेचन ही पित्तदोषावरील उत्तम चिकित्सा आहे. पित्तदोषाचा प्रतिबंध होण्यासाठी शरद ऋतूमध्ये म्हणजे ऑक्टोबर महिन्यात विरेचन घेता येते. जुलाब होण्यासाठी औषध दिले जाते. त्यासाठी एंरडेलतेल, अभ्यादी मोदक इत्यादि औषधे वापरली जातात. विरेचन देण्यापूर्वी तीन, पाच किंवा सात दिवस औषधी तूप खायला देतात. विरेचनानंतर हळूहळू आहार वाढवावा लागतो. आम्लपित्त, हातापायाची जळजळ, पित्तामुळे होणारी डोकेदुखी, डोळे लाल होणो, मलावरोध, त्वचारोग, शित्पित, ईसब इत्यादि अनेक पित्तजन्य व्याधींवर विरेचन खूपच लाभदायी आहे. 
वमन
कफदोषात वमनप्रक्रियेद्वारे उलटीचे औषध देऊन कफ शरीरबाहेर काढला जातो. कफाच्या प्रतिबंधासाठी हिवाळा संपल्यावर वसंत ऋतूच्या सुरुवातीला वमन दिले जाते. विरेचन विधीप्रमाणोच तीन, पाच किंवा सात दिवस औषधी तूप दिले जाते. वमन होण्यासाठी ज्येष्ठमधाचा काढा, उसाचा रस, मदनफल चूर्ण, दूध इत्यादिचा उपयोग केला जातो. वमन पूर्ण झाल्यावर हळूहळू आहार वाढवला जातो.
जुनाट सर्दीपडसे, खोकला, दमा, फुफ्फुसाचे काही रोग, आम्लपित्त, त्वचेचे रोग, शरीराच्या खालील भागातील रक्तपित्त अशा अनेक रोगांवर वमनाचा उपयोग होतो.
रक्तमोक्षण
रक्तमोक्षण प्रक्रियेद्वारे शरीरातील दूषित रक्त काही प्रमाणात बाहेर काढून टाकले जाते. त्यासाठी सुई तसेच सिरींजचा उपयोग केला जातो. रक्तमोक्षण करण्यापूर्वी औषधी तूप दिले जाते. शरद ऋतूमध्ये रक्तमोक्षण करतात.
तोंड येणो, डोळ्यांचे काही रोग, रक्तप्रदर, रक्तपित, गळू होणो, वातरक्त, अंग गरम असणो, त्वचेचे रोग, आंबट  ढेकर येणो. रक्तदुष्टीच्या अनेक विकारांत रक्तमोक्षण अतिशय उपयोगी ठरते.
नस्य
नस्य प्रक्रियेमध्ये नाकात औषधी तेलाचे थेंब टाकले जातात. नाक हे डोक्याचे दात समजले जाते. त्यामुळे डोक्याच्या अनेक विकारांत त्याचा उपयोग होतो. नस्य करण्यापूर्वी कपाळ, गाल, मान, गळा आणि पाठीच्या काही भागाला तेल लावून शेक दिला जातो.
विविध शिरोरोग, जुनाट सर्दी, केस गळणो, केस पांढरे होणो, मानदुखी, खांदेदुखी इत्यादिंसाठी नस्य चांगलेच परिणामकारक आहे.
 
(लेखक आयुर्वेद चिकित्सक असून ‘आरोग्य भारती’च्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आहेत.)

Web Title: Body wash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.