व्याघ्र प्रकल्पातला मोठा साहेब
By Admin | Updated: November 28, 2015 18:03 IST2015-11-28T18:03:47+5:302015-11-28T18:03:47+5:30
तारुबंद्याला नवा साहेब, मग धारणी आणि अमरावतीला छोटा साहेब अशा भूमिका पार पडल्यावर माझी पदोन्नती होऊन मोठे साहेब म्हणून माझी अलिबागला बदली झाली.

व्याघ्र प्रकल्पातला मोठा साहेब
>मेळघाटातल्या जंगलात पदोन्नतीनं दिलेला एक यादगार अनुभव
प्रकाश ठोसरे
अनुवाद : अरविंद आपटे
तारुबंद्याला नवा साहेब, मग धारणी आणि अमरावतीला छोटा साहेब अशा भूमिका पार पडल्यावर माझी पदोन्नती होऊन मोठे साहेब म्हणून माझी अलिबागला बदली झाली. त्यानंतर मंत्रलय, विभागीय वन अधिकारी अकोला आणि जळगाव जिल्ह्यातील पाल येथील वनरक्षक प्रशिक्षण विद्यालयाचा संचालक म्हणून माङया नेमणुका होत गेल्या आणि माझा मेळघाटशी संबंध तुटला. पाल हे अगदी छोटंसं, दुर्गम भागातलं गाव होतं. शाळेची सोय नव्हती. त्यामुळे साहजिकच माङया मुलांच्या शिक्षणासाठी कुटुंबाला जिल्ह्याच्या ठिकाणी जळगावला ठेवावं लागलं होतं. ऑगस्ट 1991 मध्ये वनसंरक्षक म्हणून माझी पदोन्नती झाली आणि संचालक, व्याघ्र प्रकल्प म्हणून परतवाडा मुख्यालयी माझी पदस्थापना झाली. पूर्ण राज्यात जिल्ह्याच्या ठिकाणी मुख्यालय नसणारं वनसंरक्षकाचे हे एकमेव पद होतं. राज्यातील हव्याहव्याशा वाटणा:या इतर कार्यकारी प्रादेशिक वनसंरक्षक पदांच्या तुलनेत हे पद तसं दुय्यमच मानलं जायचं. त्यामुळे माङया पदोन्नतीचे आदेश आल्यावर मला अभिनंदनाऐवजी सांत्वनाचेच फोन जास्त आले. पालसारख्या दुर्गम जागी काम केल्यावर मला चांगल्या जागी पदस्थापना मिळेल असं माङया मित्रंना वाटत होतं.
परतवाडय़ाला रुजू न होता मोठय़ा शहरात / चांगल्या जागी पदस्थापना बदलून घेण्याचा सल्ला त्यांनी दिला होता. पण मी तसं काही न करता परतवाडय़ाला रुजू झालो. पुढे दोन वर्षांनी मी व्याघ्र प्रकल्पाचे मुख्यालय जिल्ह्याच्या ठिकाणी अमरावतीला बदलून घेतले. हा निर्णय माङया वैयक्तिक स्वार्थासाठी नव्हता. कारण तशीही मला दोन वर्षं होऊन गेली होती. पण मला आलेल्या अडचणी विचारात घेऊन भविष्यात वरिष्ठ अधिका:यांनी व्याघ्र प्रकल्पात जायला काकूं करू नये हा त्यामागचा उद्देश होता.
माङया आधीचे प्रकल्प संचालक गोगटेसाहेब होते. ते माङो गुरू, मार्गदर्शक आणि कामात वाघ होते. ते माङयापेक्षा दहा वर्षानी वरिष्ठ होते. त्यामुळे रुजू होण्यापूर्वी त्यांनी वडीलकीच्या नात्याने अक्षरश: माङया हाताला धरून मेळघाटात चालू असलेल्या व मला पुढे चालू ठेवायच्या महत्त्वाच्या कामांची माहिती दिली. त्यातलंच एक काम मृदसंधारणाचं होतं. त्याकरता त्यांनी एक वेगळं तंत्र वापरलं होतं. उन्हाळ्यातल्या टंचाईच्या काळात वन्यप्राण्यांना पिण्याचं पाणी उपलब्ध व्हावं हा त्या कामाचा उद्देश होता. त्यादिवशीच्या आमच्या पाहणीतलं हे शेवटचं काम होतं. हे काम बघायला ‘पिपलपडाव’ या जागेवर सूर्यास्ताच्या सुमारास आम्ही पोचलो. इथल्या पिंपळाच्या झाडाजवळ इमारती लाकडाचा तात्पुरता डेपो केला जात असे म्हणून त्याला पिपलपडाव असं नाव पडलं होतं. ऑगस्ट महिना होता आणि पावसाळा अगदी जोमात होता. त्यामुळे आमची अॅम्बॅसिडर कार जंगलातल्या कच्च्या रस्त्यावर जाऊ शकणार नव्हती. गाडी पिपलपडावला सोडली. ड्रायव्हर हसन गाडीतच थांबला. गोगटेसाहेब पायी निघाले. मीही त्यांच्या मागोमाग जाऊ लागलो. पायवाटेच्या दुतर्फा उंच गवत वाढलं होतं. चालता चालता गोगटेसाहेब मला वाघाच्या पायाचे ताजे ठसे दाखवत होते. बहुधा वाघ आमच्यासमोरच चालत गेला असावा.
बिबटय़ाचा हा प्रसंग मी संचालक म्हणून पदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वीच घडला होता. पण भविष्यात काय वाढून ठेवलं आहे याची चांगलीच कल्पना आली. उपविभागीय वनाधिकारी म्हणून धारणीला केलेल्या कामाच्या बरोबर उलटी भूमिका आता मला घ्यावी लागणार होती. इमारती लाकूड उत्पादकांचा चष्मा बाजूला ठेवून वन्यप्राणी व्यवस्थापकाचा चष्मा घालावा लागणार होता. किती घनमीटर लाकूड काढलं, किती महसूल गोळा केल्याची भाषा बंद करून वन्यप्राण्यांच्या अधिवासातून वृक्षतोड होऊ नये यासाठी प्रयत्नशील राहावं लागणार होतं. आधी एखादं झाड बघितल्यावर त्याची छाती उंचीवर गोलाई किती असेल, किती माल निघेल असे हिशेब चालत. आता त्याच झाडाकडे बघताना यात पक्ष्यांसाठी ढोली असू शकते का, घरटं असू शकतं का किंवा एखाद्या पडलेल्या झाडाचा प्राण्यासाठी काय उपयोग होऊ शकतो हे तपासावं लागणार होतं. थोडक्यात, उत्पादन वानिकीकडून वन्यजीव व्यवस्थापनाकडे वळावं लागणार होतं. अर्थात माझं पहिलं प्रेम वन्यप्राण्यांवर असल्याने आधीही इमारती लाकूड उत्पादन करताना त्यातल्या त्यात वन्यप्राण्यांच्या अधिवासाच्या दृष्टीने उपयुक्त कामं कशी करता येतील हे पाहत असे. वन्यजीव व्यवस्थापन हा एक कामाचा भाग म्हणून पुढील 4-5 वर्षे काम करणो आणि तेही मेळघाटात या विचारानेच मी उत्तेजित झालो होतो आणि त्यामुळे कार्यभार स्वीकारण्याकरता उत्सुकतेने वाट पाहत होतो.
दुस:या दिवशी मी गोगटेसाहेबांकडून पदभार स्वीकारला. वन्यजीव व्यवस्थापनाच्या दृष्टीने व्याघ्र प्रकल्पाचे कोअर क्षेत्र व बफर असे दोन भाग केले आहेत. गाभा क्षेत्र 361 चौ.कि.मी. असून, त्यात एकही गाव नसल्याने पूर्णत: जंगली आहे. बफरचे क्षेत्र जवळपास 16क्क् चौ.कि.मी. असून, त्यात पन्नासएक गावे आहेत. गाभा क्षेत्र पूर्णपणो माङया नियंत्रणाखाली असणार होतं आणि बफर क्षेत्रत प्रादेशिक वनाधिका:यांसोबतच दुहेरी नियंत्रण असणार होतं. (आता हा प्रकार बंद झाला असून, पूर्ण क्षेत्र वन्यजीव विभागाकडेच आहे.)
माङयाकडे 1क्क् जणांचा कर्मचारी वर्ग असणार होता. हा कर्मचारी वर्ग गोगटेसाहेबांच्या आधीचे संचालक घाणोकरसाहेबांनी निवडलेला होता. घाणोकरसाहेबांच्या भेदक नजरेने निवडलेला हा कर्मचारी वर्ग तरुण, धाडसी, कर्तव्यतत्पर होता. गोगटेसाहेबांनी कार्यभारात मला ब:याचशा बंदुकी, काडतुसं दिली होती. ही स्वसंरक्षणार्थ होती. पण मेळघाट मला इतकं सुरक्षित वाटलं की कधी जंगलात घेऊन जायची वेळ पडली नाही. मी ज्या दिवशी कार्यभार स्वीकारला त्यादिवशी गोगटेसाहेबांना निरोप समारंभ व माङयासाठी स्वागत समारंभ आयोजित केला होता. गोगटेसाहेबांनी त्यांच्या भाषणात विनोदाने मला असंही सांगितलं होतं की, इतर कार्यभारासोबतच 7क् वाघांचा कार्यभार घ्यावा आणि माङया कार्यकाळात त्यांची संख्या वाढावी. गोगटेसाहेब निघून गेले आणि मी संध्याकाळी उशिरापर्यंत फाईलींच्या ढिगा:यात बुडून गेलो. जेव्हा पूर्ण काळोख झाला तेव्हा घुबडाच्या कर्णकटू आवाजाने मी भानावर आलो. माङया खोलीला खेटून असलेल्या एका झाडावर त्याचं घरटं होतं. मी परतवाडय़ाला असेर्पयत त्याने मला साथ दिली. कामाच्या नादात वेळेचं भान राहत नसे अशावेळी त्याने घडय़ाळाचं काम बजावलं होतं.
माझं काम आटोपून मी खोलीच्या बाहेर आलो तेव्हा माङया जुन्या विश्वासू ड्रायव्हरने हसनने हसून स्वागत केलं. आता त्याच्याकडे जीपऐवजी अॅम्बॅसिडर कार होती. लवकरच मी दोन पेट्रोल जिप्सी घेतल्या. एकाला फायबरची टणक बॉडी होती, तर दुसरीला कॅनव्हासची बॉडी होती. दोन्ही गाडय़ा अतिशय कमी आवाज करत आणि मेळघाटच्या डोंगराळ प्रदेशाकरता उपयुक्त अशा फोर व्हील ड्राइव्ह होत्या. वन विभागात अशा प्रकारच्या जीप पहिल्यांदाच आल्या होत्या आणि इतर सहका:यांकरता असूयेचा विषय ठरल्या होत्या. कॅनव्हासच्या जीपमध्ये मी काही सुधारणा केल्या. त्यात वायरलेस सेट लावला, कॅमॉफ्लाज करणारा रंग लावून घेतला, सर्च लाईटसाठी जास्तीची बॅटरी लावली, ड्रायव्हरच्या सीटखाली जास्तीची पेट्रोलची टाकी बसवली, काढता घालण्याजोगी खास सीट बसवली, जंगलातला रस्ता साफ करण्यासाठी टूल कीट घेतला. अशा प्रकारे जीप सुसज्ज करून कोणत्याही प्रसंगाला तोंड देता येईल अशी दक्षता घेतली. या जिप्सीची खासियत अशी होती की, त्यावर थोडय़ाफार काटक्या, फांद्या टाकून त्याचा मचाण म्हणून वापर केला जाऊ शकत होता. मी या जिप्सीचा पुरेपूर उपयोग करून घेतला.
थोडय़ाच दिवसांत मी माङया खुर्चीवर स्थिरावलो, अर्थात इथे खुर्चीवर स्थिरावण्याचा शब्दश: अर्थ घेता कामा नये, कारण व्याघ्र प्रकल्प संचालकाकरता जंगलात फिरणं हे खरं काम होतं. माझा पहिला दौरा प्रादेशिक विभागीय वनाधिका:यासोबत बफर क्षेत्रच्या पाहणीचा होता. मध्य प्रदेशच्या हद्दीवरील संवेदनशील क्षेत्रला भेट देणो याला माङया दृष्टीने प्राधान्य होतं. वन्यप्राण्यांच्या शिकारीला प्रतिबंध घालण्यासाठी संयुक्तपणो उपाययोजना करावयाच्या होत्या. आम्ही सीमावर्ती जंगलात जात असताना मला एक व्यक्ती संशयास्पदरीत्या फिरत असताना दिसली. मी हसनला कारचा वेग कमी करायला सांगितलं. आमच्या कारचा वेग मंदावल्याबरोबर त्या माणसाने जंगलात पळ काढायला सुरुवात केली. त्यासरशी मीही जीपमधून उडी घेत मोठय़ा मोठय़ा ढांगा टाकत त्याचा पाठलाग सुरू केला. माङयासोबतच्या इतरांनी त्या माणसाला पाहिलं नसल्याने मी असं का करतो आहे याचं त्यांना आश्चर्य वाटलं. त्या माणसासोबत काहीतरी जड वस्तू होती त्यामुळे त्याला वेगाने पळता येत नव्हतं. त्याच्या लक्षात आलं की लवकरच तो माङया तावडीत सापडणार आहे. त्यामुळे त्याने त्याच्या हातातली जड वस्तू पटकन एका झुडपात लपवली आणि जीव मुठीत घेऊन तो पळत सुटला. मी त्याचा नाद सोडला, त्याने त्या झुडपामागे काय दडवलं याची मला उत्सुकता होती.
ती जड वस्तू म्हणजे एक बंदूक आहे आणि तीही भरलेली हे पाहिल्यावर मला आश्चर्याचा धक्का बसला. तो माणूस ती भरलेली बंदूक घेऊन एखाद्या प्राण्याच्या शोधात फिरत होता. मी पटकन ती बंदूक उचलली आणि कारच्या दिशेने निघालो. अध्र्या रस्त्यात कारमधली इतर मंडळी मला भेटली. नेमकं काय घडलं असावं याची त्यांना कल्पना आली आणि त्यांनी माङया प्रयत्नांची तारीफ केली. पण आता त्या भरलेल्या बंदुकीचं काय करावं हा आमच्यापुढे प्रश्न होता. कारण आम्हाला अजून बरंच दूर जायचं होतं. माङयासोबतच्या डीएफओंना भरलेली बंदूक सोबत घेऊन जाणं बरोबर वाटत नव्हतं. त्यांनी त्यांच्या वनरक्षकाकडे ती बंदूक दिली आणि जवळच्या रेंज कार्यालयात जमा करून प्रथम गुन्हा अहवाल द्यायला सांगितलं. तो वनरक्षक पाच किलोमीटरवर असणा:या रेंज कार्यालयाकडे पायी निघाला. मला नंतर असं कळलं की आम्ही गेल्यावर दहा मिनिटांनी पाच-सहा जणांनी त्या वनरक्षकाला घेरून त्याच्याकडून बंदूक हिसकावून घेतली. हे कळल्यावर त्या डीएफओंना फार ओशाळल्यागत झालं. त्यांनी पुढच्याच पंधरवडय़ात मध्य प्रदेशमधल्या त्या खेडय़ात बराच फौजफाटा पाठवून त्या शिका:याला पकडलं आणि बंदूक परत हस्तगत केली.
(लेखक महाराष्ट्राचे सेवानिवृत्त
प्रधान मुख्य वनसंरक्षक आहेत.)
pjthosre@hotmail.com