शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

 जागरूक मुलं !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 06:05 IST

निवडणुकीआधी उमेदवारानं आश्वासन दिलं होतं, निवडून आल्यानंतर आपल्या भागातल्या सगळ्या बागांमध्ये मी खेळणी बसवीन आणि  दहा हजार झाडं लावीन. पण कसलं काय? मुलांनीच मग चंग बांधला आणि पिच्छाच पुरवला. लोकांना गोळा केलं, ठिय्या आंदोलन केलं ! मुलांच्या या आंदोलनाची दखल घ्यावीच लागली !

ठळक मुद्देधड ना लहान, धड ना मोठे अशा ‘मधल्या’ मुलांसाठी नवी ‘विण्डो’

- गौरी पटवर्धन

‘ये ! हे बघा मला काय सापडलं !’ 
मिताली हातातला कागद नाचवत म्हणाली.
‘या कागदाचा काही उपयोग नाही आपल्याला. हा फार जाड आहे. कोलाजमध्ये कसा वापरणार?’ ईशान हातातल्या कागदाचे बारीक तुकडे करत म्हणाला. त्यांना शाळेतून हस्तकलेचा प्रकल्प करायला सांगितला होता आणि ते दोघं रद्दीतली जुनी पातळ रंगीत माहितीपत्नकं फाडून त्याचे तुकडे करून चिकटवून कोलाज बनवत बसले होते. पण आत्ता मितालीने शोधलेला कागद जाड आणि गुळगुळीत होता. त्याचा प्रकल्पाला काहीच उपयोग नव्हता. पण तो कागद बाजूला ठेवून द्यायचं सोडून मिताली मात्न तो एकाग्रपणे वाचत होती. ईशान हातातल्या कागदाचे तुकडे करत म्हणाला, ‘काय वाचतीयेस त्यात एवढं?’
‘अरे हे बघ ना.’ मितालीने हातातला कागद त्याच्यासमोर धरला. तो कुठल्यातरी उमेदवाराचा जाहीरनामा होता. ईशानला कळेना की यात आपण काय बघायचंय? मिताली जरा इरिटेट होऊन म्हणाली,
‘अरे बघ ना. यात लिहिलंय की मला निवडून दिलंत तर प्रभागातल्या सगळ्या बागांमध्ये मुलांसाठी खेळणी बसवीन आणि एकूण दहा हजार झाडं लावीन.’
‘मग?’
‘अरे हे आपल्या भागातून नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत सहा महिन्यांपूर्वी.’
‘मग???’ अजूनही ईशानला हे कळत नव्हतं की या सगळ्याचं आपण काय करायचंय?
‘अरे, सगळा पावसाळा संपला. त्यांनी अजून एकपण झाड लावलेलं नाही.’
‘माझे आजोबा म्हणतात की, हे लोक असेच असतात.’
‘माझेपण आजोबा तसंच म्हणतात. पण आपल्याला नागरिकशास्रात काय शिकवलंय? की आपल्या लोकप्रतिनिधींनी काम केलं नाही तर आपल्याला ते करून घेण्याचा अधिकार असतो. आपल्या भागात किती ट्रॅफिक असते. आणि एकपण चांगली बाग नाहीये. मग यांनी ते करायला पाहिजे ना.’
‘करायला तर पाहिजे. पण त्यात आपण काय करणार?’
‘आपण त्यांना भेटू आणि सांगू की तुम्ही कबूल केलं होतं तशी झाडं लावा म्हणून.’
‘ही भारी आयडिया आहे.’ ईशानला एकदम पटलंच. ‘आणि आपण त्यांना भेटायला जाताना पत्न लिहून घेऊन जाऊ.’
‘परफेक्ट.’ असं म्हणत मितालीने एक स्वच्छ कागद शोधून काढला आणि दोघं मिळून नगरसेवकाला पत्न लिहायला बसले. बरीच चर्चा आणि खटपट केल्यावर त्यांचं पत्न लिहून झालं. पण ते नेऊन कुठे द्यायचं हे त्यांना कळेना. मोठय़ा कोणाला तरी विचारण्यात धोका होता. नववीतल्या मुलांनी असं काही तरी करायला कोणीच परवानगी दिली नसती. शेवटी ईशानच्या लक्षात आलं. तो म्हणाला, ‘अगं, त्या माहितीपत्नकावर असेल ना पत्ता!’ आणि खरंच त्या माहितीपत्नकावर पत्ता होता, इतकंच नाही तर सायकल काढून पटकन जाऊन येता येईल इतक्या जवळचा होता. मग काय? दोघांनी सायकली काढल्या, पत्न घेतलं, आम्ही ग्राउण्डवर खेळायला जातोय असं घरी सांगितलं आणि संध्याकाळी साडेपाच वाजता त्यांच्या प्रभागाच्या नगरसेवकाच्या ऑफिसमध्ये जाऊन पोहोचले.. 
तर तिथे फक्त एक कार्यकर्ता होता. त्याने सांगितलं की साहेब साडेसहा वाजता येतील. काय पत्न असेल ते माझ्याकडे देऊन टाका. मिताली आणि ईशानने एकमेकांकडे बघितलं. दोघांच्या नजरेत एकच प्रश्न होता,
‘याने आपलं पत्न त्यांना दिलंच नाही तर?’
आणि मग आपापसात काहीच न बोलता दोघांनी एकाच वेळी सांगितलं, ‘नको. आम्ही थांबतो.’ ते जरा वेळ तिथे बसून राहिले. मग सायकलवर एक चक्कर मारून आले आणि परत येऊन बसले. साडेसहा वाजले. सात वाजले. सव्वासात होऊन गेले. इतरही काही माणसं तिथे येऊन बसली. पण तरी साहेबांचा पत्ता नव्हता. शेवटी मिताली आणि ईशान उठणार होते, कारण त्यांना घरी जायला उशीर झाला असता आणि त्यावरून बोलणी खायला लागली असती. पण ते उठणार तेवढय़ात स्वच्छ पांढरे कपडे घातलेले, बोटात अंगठय़ा घातलेले, हातावर मोठ्ठं घड्याळ बांधलेले एक काका भारीतल्या फोनवर बोलत आत आले. माहितीपत्नकावर त्यांचा फोटो असल्यामुळे दोघांनी त्यांना लगेच ओळखलं. इतर कोणाच्याही आधी ते घाईघाईने त्यांच्या केबिनमध्ये शिरले. नगरसेवक काकांचा फोन झाल्यावर त्यांनी मुलांना बसायला सांगितलं. कुठल्या शाळेत शिकतात वगैरे सगळं कौतुकाने विचारलं, त्यांच्याकडून पत्न ठेवून घेतलं आणि त्यांना सांगितलं की झाडांसाठीचा निधी आत्ताच मंजूर झाला आहे. त्यामुळे महिन्याभरात ते काम होऊन जाईल.
ईशान आणि मिताली खूश होऊन घरी परत आले. एक महिना झाला, दोन महिने झाले, तरी कुठल्याच बागेत झाडं लावलेली दिसेनात. शेवटी ते दोघं परत नगरसेवक काकांना भेटायला गेले. त्यांनी परत थातुरमातुर उत्तरं देऊन त्यांना वाटेला लावलं. ते वार्षिक परीक्षा होईपर्यंत दर पंधरा दिवसांनी तिथे जात राहिले. तिथे येणारी माणसं त्यांच्याकडे बघून मनातल्या मनात हसायची. परीक्षा होईपर्यंत मिताली आणि ईशान दोघांचाही पेशन्स संपला. कारण हे काका काही झाडंबिडं लावणार नाहीयेत हे त्यांना समजलं होतं. शेवटी ते कंटाळून नाद सोडून देणार अशा वेळी त्यांना तिथे एक कॉलेजला जाणारी ताई भेटली. ती म्हणाली, की ती आणि तिचे मित्नमैत्रिणीसुद्धा याच कामासाठी सहा महिने चकरा मारत होते. आणि आता त्यांनी ते काम करण्यासाठी एक वेगळी आयडिया वापरायचं ठरवलं होतं. ती आयडिया मिताली आणि ईशान दोघांना सॉलिड आवडली. ते दोघंही परीक्षा संपल्यावर ठरलेल्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता नगरसेवक काकांच्या ऑफिसच्या बाहेर सायकली घेऊन पोहोचले, तर तिथे बरीच गर्दी जमलेली होती. 
तिथे वेगवेगळ्या वयाची माणसं आलेली होती. आजी-आजोबा त्यांच्या ऑफिसमधल्या बाकांवर पुस्तकं वाचत, गप्पा मारत बसले होते. ऑफिसला जाणारे लोक ठिकठिकाणी लॅपटॉप उघडून काम करत बसले होते. कॉलेजच्या वयाची मुलं जागा मिळेल तिथे अभ्यासाची पुस्तकं उघडून खाली बसली होती. नगरसेवक काकांचे कार्यकर्ते या लोकांना बाहेर काढायचा निष्फळ प्रयत्न करत होते. ‘साहेब येतील पाच मिनिटात.’ असं सांगत होते. पण त्यांच्याकडे कोणीच लक्ष देत नव्हतं. मिताली आणि ईशानला बघितल्यावर ती ताई आणि तिचे दोन मित्न आले आणि त्या तिघांनी मिळून त्या ऑफिसच्या एका भिंतीवर कोळशाने तीन स्टंप काढले. आणि मग ते पाच जण मिळून तिथे चक्क क्रि केट खेळायला लागले. आजूबाजूचे लोक त्यांना चिअरिंग करत होते. सगळा आरडाओरडा चालला होता. आणि हे सगळं न्यूजवाले लोक शूट करत होते. ‘साहेब’ आले त्यावेळी त्यांच्या ऑफिसच्या बाहेर एक काका चॅनेलवाल्यांना मुलाखत देत होते.
‘आमच्या प्रभागात नागरिकांना बसण्यासाठी, फिरायला जाण्यासाठी, मुलांना खेळण्यासाठी एकही चांगलं सार्वजनिक उद्यान नाही. आमचे सन्माननीय नगरसेवक ते काम करतील असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. ते काम ते निश्चितपणे पूर्ण करतील. मात्न काम पूर्ण होईपर्यंत आम्ही सगळे रोज संध्याकाळी इथे येऊन बसणार आहोत. कारण आम्हाला इतर कुठे जागाच नाहीये. बघा, त्या मुलांना क्रि केट खेळायलासुद्धा चांगली जागा नाही.’
मग चॅनेलवाल्यांनी त्यांच्या क्रि केटचं शूटिंग घेतलं. नगरसेवक साहेबांची मुलाखत घेतली. ती सगळ्या चॅनेलवर प्रसारित झाली. त्यातल्या मिताली आणि ईशानच्या सहभागाचं खूप कौतुक झालं !.
आणि एक महिन्यात त्यांच्या प्रभागातल्या सगळ्या बागांचं काम पूर्ण झालं !
lpf.internal@gmail.com
(गौरी ‘लिट्ल प्लॅनेट फाउण्डेशन’ची समन्वयक आहे.)