मंथनच्या लेखातील चुकीबद्दल दिलगिरी
By Admin | Updated: November 29, 2015 18:44 IST2015-11-29T16:49:24+5:302015-11-29T18:44:54+5:30
लोकमत रविवार मंथन पुरवणीच्या २९ नोव्हेंबरच्या पहिल्या पानावर प्रसिद्ध झालेल्या इसिसचा पैसा या लेखासोबत ग्राफिक डिझाईनमध्ये वापरल्या गेलेल्या अरबी भाषेतील शब्दांमुळे तमाम मुस्लिम बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या.

मंथनच्या लेखातील चुकीबद्दल दिलगिरी
>लोकमत रविवार मंथन पुरवणीच्या २९ नोव्हेंबरच्या पहिल्या पानावर प्रसिद्ध झालेल्या इसिसचा पैसा या लेखासोबत ग्राफिक डिझाईनमध्ये वापरल्या गेलेल्या अरबी भाषेतील शब्दांमुळे तमाम मुस्लिम बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. लोकमत या गंभीर चुकीबद्दल दु:खी असून त्याबद्दल आम्ही मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. केवळ अनावधानाने ही चूक झाली असून कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा लोकमतचा हेतू कधीही नव्हता आणि नसेल. लोकमतने नेहमी सर्वधर्म समभाव यावर विश्वास ठेवला आहे. झालेल्या चुकीसाठी जबाबदार असलेल्यांवर तातडीने कारवाई करण्यात आलेली आहे.
- संपादक