शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

आदिवासींच्या आरोग्याची चिंताजनक स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 06:20 IST

डॉ. अभय बंग यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा देशव्यापी अभ्यास अहवालाने दाखवलेलं आदिवासींच्या आरोग्याचं चित्रं

-अश्विनी कुलकर्णी

समजा, तुमच्या अंगात गेले काही दिवस ताप आहे. तुम्ही डॉक्टरांकडे जाता. ते विचारतात,  ‘कधीपासून येतोय ताप? किती आहे?’

तुम्हाला यातले काहीच सांगता येत नाही. कारण ताप मोजण्यासाठी आवश्यक तो थर्मामीटरच तुमच्याजवळ नाही.

- तर तुमचे रोगनिदान डॉक्टर कसे करतील? ते कितपत (आणि कसे) अचूक असेल?

- भारताच्या आदिवासी भागातील आरोग्याच्या प्रश्नांची स्थिती नेमकी ही अशीच आहे.

सगळे अंदाजाने, अनमानधपक्याने चाललेले. नेमके मापन नाही. पुरेशा नोंदी नाहीत. संदर्भ नाहीत.बालमृत्यूसारखी अरिष्टे ओढवली की आगीच्या बंबाने भडका विझवायला धावावे, तशा यंत्रणा जातात आणि तात्पुरते उपचार होतात. 

भारतातील इतर समूहांपेक्षा आदिवासी समूहांच्या आरोग्याचे प्रश्न बिकट आहेत, याचा अंदाज सर्वांनाच आहे; पण नेमकेपणाने माहीत नाही. आरोग्यमापनाचीे जगन्मान्य परिमाणे वापरून जमवलेली आकडेवारी, आजारांचे प्रकार, त्यांचे प्रमाण  अशा अत्यंत आवश्यक संदर्भांचा अभ्यास करून नुकताच प्रसिद्ध झालेला  The Expert Committee on Tribal Health हा अहवाल म्हणूनच अत्यंत महत्त्वाचा आहे. असा अभ्यास पहिल्यांदाच होत आहे, हेही विशेष. 

साधारण पाच वर्षांपूर्वी आदिवासी मंत्नालय व महिला-बाल कल्याण मंत्रालय या दोन्हींच्या पुढाकाराने ही तज्ज्ञ समिती नेमण्यात आली. त्याचे अध्यक्ष आहेत डॉ. अभय बंग. 

देशातील आदिवासी समूहांच्या आरोग्यस्थितीचा अभ्यास करताना या समितीला जाणवलेली सर्वात मोठी आणि गंभीर अडचण अशी की आदिवासींच्या संदर्भातील आकडेवारी वेगळी गोळा करणे, त्याचे जतन करणे, विश्लेषण करणे हेच मुळात आजवर झालेले नाही. आदिवासी मंत्नालय स्थापन होऊन दोन दशके झाली. आरोग्य मंत्रालय तर त्याही आधीचे तरीही ही स्वतंत्न आकडेवारी उपलब्ध नाही. सध्या आहेत त्या ग्रामीण भागातील सेवा आणि आदिवासी मंत्नालयाच्या आकडेवारीतून अत्यावश्यक ते संदर्भ शोधून ते जुळवण्याचा आणि त्या विश्लेषणावरून निष्कर्षांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न या तज्ज्ञ समितीने हाती घेतला. निधी नेमका कशावर किती खर्च होतो हेही कळणे कठीणच. आदिवासी समूहातील आरोग्याची परिस्थिती नेमकेपणाने समजण्यातील ही अडथळ्याची शर्यत पार करत एक मोठे आव्हान समितीने पेलले आहे हे लक्षात येते.

या अहवालातली एक दिलासादायक बाब म्हणजे आदिवासी समूहामधील स्त्री-पुरुष प्रमाण! 1000 पुरुषांमागे 990 महिला आदिवासी समाजात आहेत. इतर समूहांमध्ये हे प्रमाण 933 इतकेच आहे. तसेच मूल जन्मल्याबरोबर स्तनपान करण्याचे प्रमाणही आदिवासींमध्ये सर्वाधिक आहे. या जमेच्या बाजू. 

- पण अशा काही मोजक्या बाबी वगळता इतर आकडेवारी निराशाजनक आहे. 

 

या पार्श्वभूमीवर आदिवासी भागातील आरोग्यसेवा यंत्रणेतील मनुष्यबळाची कमतरता पाहून मन विषण्ण होते. एवढय़ा मोठय़ा लोकसंख्येच्या देशात डॉक्टर, विशेषज्ञ यांची कमतरता आदिवासी भागातील दवाखान्यांत सदैव असते. पूर्णवेळ सेवा उपलब्ध आहे ती ‘आशा’ची! इतर समाजघटकात 72 टक्के बालकांपर्यंत लसीकरण पोहोचते आहे तर आदिवासी भागातील फक्त 56 टक्के बालकांना याचा लाभ मिळतो.

ही सर्व विदारक परिस्थिती मांडणार्‍या या अहवालात  परिस्थिती पूर्वीपेक्षा सुधारत आहे हेही वेळोवेळी नमूद केलेले आहे. या सुधारणांना वेग आणि दिशा मिळावी म्हणून काही नेमक्या उपाययोजनाही हा अहवाल सुचवतो.

1. आदिवासी विखुरलेल्या छोट्या-छोट्या वस्त्यांमध्ये राहतात. या भागात दळणवळणाची साधने, रस्ते, वीज यांची पुरेशी उपलब्धता करणे.

2. लोकसंख्येनुसार आरोग्यसेवेतील मनुष्यबळ ठरवण्याचे निकष आदिवासींपुरते बदलणे.

3.  गावागावातून आरोग्यमित्र , आरोग्यदूत नेमणे.

4. गावातील युवक-युवतींना प्राथमिक/प्रतिबंधात्मक उपचारांसाठीचे प्रशिक्षण देणे.

5.   भाषा समजणे, चालीरिती माहीत असणे, हवामान माहीत असणे, लोकांचा त्यांच्यावर विश्वास असणे हे आरोग्यसेवा गावातच असण्याचे फायदे आहेत. 

6. निदान व औषध-उपचार याबरोबर आरोग्य संबंधातील समज वाढवणे, नवीन उपकारक सवयी आत्मसात करण्यास मदत करणे हेही महत्त्वाचे आहे. 

आदिवासी युवक-युवती आरोग्य शाखेचे विद्यार्थी होऊन, आरोग्यसेवेतील विविध जबाबदा-या घ्यायला लागले तर मनुष्यबळाचा कमतरतेवर एक शाश्वत उपाय असू शकतो. ते आदिवासी भागात येऊन आत्मीयतेने काम करतील म्हणून त्यांना या विद्यालयातून शिक्षण घेण्यास विशेष प्रोत्साहन मिळावे असेही सुचवलेले आहे.

आरोग्यसेवा आदिवासी भागात पोहोचवण्यासाठी यंत्रणा काय असावी, त्यात कोणकोणत्या प्रकारचे मनुष्यबळ असावे, त्यांच्या जबाबदा-या काय असाव्या व त्यासाठीचा निधी कसा उपलब्ध आहे, हे या अहवालात सविस्तर मांडले आहे. 

मुळात आदिवासी भागातील आरोग्यासंबंधीची आकडेवारी वारंवार गोळा करून त्याच्या आधारे निर्णय घेण्याची व्यवस्था हवी, असे हा अहवाल म्हणतो.. म्हणजे आधी थर्मामीटर हवा!

आदिवासी आरोग्याचे प्रश्न स्थानिक, तत्कालिक उपाययोजनेतून सुटणार नाहीत, तर त्यासाठी समग्र बदल आवश्यक आहे. तो बदल का हवा, कसा व कोठे करता येईल हे या अहवालातून स्पष्ट होते. आता पुढची लढाई आहे त्यातील उपाययोजना प्रत्यक्षात आणण्याची. 

आदिवासींच्या आरोग्याची ‘स्थिती’* 15-19 वयोगटातील 50 टक्के युवतींचे वजन कमी

* 15-49 वयोगटातील 65 टक्के महिलांना अनिमिया

* अन्य समूहाच्या तुलनेत चढा बालमृत्युदर 

* जन्माच्या वेळेचे बाळाचे वजन 2.5 किलोपेक्षा कमी असण्याचे प्रमाण सर्वाधिक* गेल्या वीस वर्षांत आदिवासी आहारातील कोबरेहायड्रेट, प्रोटीन, जीवनसत्त्वांच्या प्रमाणाला गळती* फक्त 25 टक्के गरोदर आणि स्तनदा महिलांना पुरेसा व पौष्टिक आहार * बालकांमध्ये कमी वजन, वाढ खुंटणे आणि अकाली मृत्यू हे कुपोषणाचे परिणाम सर्वाधिक* मलेरिया, क्षयरोग, कुष्ठरोग यासारख्या आजारांचे प्रमाण अधिक. मलेरियामुळे मृत्यू पावणा-या रुग्णांमधले निम्मे रुग्ण आदिवासी * चारपैकी एका आदिवासीस उच्च रक्तदाबाचा त्नास *याच बरोबर सीकलसेल, अनिमियासारखे आदिवासी समूहातील विशेष आजार आहेतच.* व्यसन हा एक मानसिक आजार!    

(लेखिका प्रगती अभियान या स्वयंसेवी संस्थेच्या सचिव आणि आदिवासी प्रश्नांच्या अभ्यासक आहेत.)

pragati.abhiyan@gmail.com