शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
4
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
5
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
6
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
7
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
8
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
9
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
10
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
11
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
12
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
13
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
14
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
15
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
16
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
17
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
18
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
19
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
20
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!

प्राण्यांची सोसायटी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 06:05 IST

मुलांना सुट्या लागल्यामुळे अख्ख्या सोसायटीत त्यांचा दंगा सुरू होता. मोठी माणसंही वैतागली होती. एका शिक्षक आजोबांनी मग या मुलांचा ताबा घेतला एक भन्नाट आयडिया त्यांना सांगितली. त्यानंतर सोसायटीत कुत्नी, मांजरं, कबुतरं,  कावळे, चिमण्यांपासून ते घोड्यापर्यंत  काय काय येणं सुरू झालं!  मुलांना प्रतीक्षा आहे पालीची, पण अजून तरी तिनं मुलांकडे मदत मागितलेली नाही!

ठळक मुद्देधड ना लहान, धड ना मोठे अशा ‘मधल्या’ मुलांसाठी नवी ‘विण्डो’

- गौरी पटवर्धन

र्शीरंग सोसायटीच्या आवारातल्या जुन्या चिंचेच्या झाडाखाली फार महत्त्वाची मीटिंग चालू होती. उन्हाळ्याची बरीचशी सुटी संपत आली होती. त्यामुळे सगळ्या घरातली मोठी माणसं घरात सतत चालू असलेल्या मुलांच्या दंग्याला कंटाळलेली होती. कोणालाही दुपारी झोपता येत नव्हतं, पुस्तक वाचता येत नव्हतं. कारण सगळ्या सोसायटीभर सुटी लागलेली मुलं खेळत असायची. लपाछपी, पकडापकडी, कॅरम, पत्ते, सापशिडी अशा सगळ्या गोष्टींना ऊत आला होता. कारण यावर्षी उन्हाळ्याच्या सुट्या सुरू होता होता सगळ्या मुलांनी मिळून ठरवलं होतं की यावर्षी सुटीत कोणीच सारखा सारखा मोबाइल घेऊन बसायचं नाही. किंवा सारखा टीव्ही, लॅपटॉप पण मागायचा नाही. त्यामुळे त्यांना खेळायला सॉलिड मजा येत होती. पंचाईत झाली होती ती मोठय़ा माणसांची..म्हणजे मुलांनी मोबाइल किंवा टीव्हीपेक्षा असेच खेळ खेळावेत हे त्यांना मान्यच होतं; पण त्यामुळे मुलं सतत जो आरडाओरडा करत होती त्याचा त्यांना त्नास होत होता. आणि म्हणूनच शेवटी त्यांच्यातल्या एका रिटायर झालेल्या शिक्षक आजोबांनी आज सगळ्या मुलांना घेऊन शांतपणे काहीतरी अँक्टिव्हिटी करायची ठरवली होती. त्याप्रमाणे त्यांनी सोसायटीतली बालवाडी ते नववीच्या वयाची जवळजवळ बावीस मुलं गोळा केली होती. ती सगळी मुलं मोठय़ा अपेक्षेने शिक्षक आजोबांकडे बघत होती. आता हे आपल्याला काहीतरी अभ्यासाला बसवतील याची भीती जरा मोठय़ा मुलांच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होती. त्यामुळे मोठी मुलं चुळबुळ करत होती. शिक्षक आजोबांना ते माहिती होतं, पण त्यांच्या मनात अभ्यासाचा काहीच विषय नव्हता. ते म्हणाले, ‘मी तुम्हाला सगळ्यांना इथे बोलावलं, कारण मला तुमची जरा मदत पाहिजे आहे. माझ्या ओळखीची काही कॉलेजची मुलं जखमी झालेल्या प्राण्यांसाठी काम करतात. त्यांना घेऊन जातात, औषध लावतात आणि बरं करून त्यांच्यासाठी घर शोधतात किंवा पक्षी वगैरे असेल तर त्याला सोडून देतात. त्यांना आपल्या भागात एक प्रथमोपचार केंद्र सुरू करायचं आहे. तुम्ही सगळे मला मदत करणार असाल तर आपण आपल्या सोसायटीत ते सुरू करू शकतो.’अरे! ही भारी आयडिया होती. आता मोठय़ा मुलांचे पण डोळे चमकले. त्यांनी विचारलं, ‘म्हणजे रस्त्यावर एखाद्या कुत्र्याला बाइकचा धक्का लागला तर त्याला इथे आणायचं का?’‘हो.’‘पण त्याला आपण कसं औषध लावणार?’‘ती कॉलेजची मुलं येऊन आपल्याला शिकवून जातील. आपण एखाद्या प्राण्यांच्या डॉक्टरकडूनपण समजून घेऊ शकतो.’‘आणि मांजा लागून जखमी झालेले पक्षीपण आपण इथे आणू शकतो का?’‘हो हो. आणू शकतो.’‘पण आमचे आईबाबा नाही म्हणतील.’‘तुमच्या आईबाबांशी मी बोलतो. कारण मीपण तुमच्या बरोबर असेन, त्यामुळे ते नाही म्हणणार नाहीत.’‘त्या प्राण्यांना आपण इथेच ठेवून घ्यायचं का? आपण त्यांना पाळायचं का?’‘नाही नाही.. आपण त्यांना फक्त प्रथमोपचार द्यायचा. पाणी द्यायचं. आणि ती मोठी मुलं त्यांना घेऊन जाईपर्यंत सांभाळायचं.’‘पण आपण त्यांना कुठे ठेवणार? माझ्या घरी ठेवू शकतो. माझं घर ग्राउंड फ्लोअरवरच आहे.’ एकाने उदारपणे ऑफर दिली. त्यावर इतर सगळे काहीतरी म्हणणार एवढय़ात आजोबांनी ती चर्चा बंद पाडली.‘नाही नाही. कोणाच्याही घरात नाही. आपण त्यासाठी छोटी पत्र्याची केबिन बांधून घेऊ.’आणि मग आपण ते सेंटर इथे सुरू केलं तर कसे आपल्याकडे वेगवेगळे प्राणी येतील. कुत्नी, मांजरं, कबुतरं, कावळा, चिमण्या इथपासून ते घोडापण येईल का? सर्कशीत जखमी झालेल्या हत्तीला आपण मदत करू शकतो का? दोन कुत्र्यांची मारामारी झाली तर त्यांना आपण मदत करायची का? असे अनेक प्रश्न मुलांना पडले होते. शिक्षक आजोबा त्यांच्या परीने मुलांना उत्तरं देत होते.हे सगळं चालू असताना पहिलीतली मिहिका गप्प बसून काहीतरी विचार करत होती. सगळ्यांचे सगळे प्रश्न विचारून झाल्यावर शिक्षक आजोबा म्हणाले, ‘अजून कोणाला काही विचारायचं आहे का?’इतका वेळ गप्प बसलेल्या मिहिकाने हात वर केला आणि म्हणाली, ‘आजोबा, आपल्याकडे जर पाल आली तर तिलापण आपण मदत करायची ना?’मिहिकाच्या या प्रश्नावर काहीजण ‘ईईईईई’ करून ओरडले तर काहीजण हसायला लागले. मिहिकाने मात्न तितक्याच शांतपणे आजोबांना परत विचारलं,‘आपण पालीला मदत करायची ना?’त्यावर एक मोठी मुलगी म्हणाली, ‘मिहिका.. उगीच काहीतरी विचारू नकोस. पालीला का मदत करायची आपण?’‘का नाही करायची?’‘शी.. पाल किती घाणेरडी असते.. ईईईईई!’ त्या मुलीला कल्पनेनेच किळस वाटली. आजोबा शांतपणे हे सगळं ऐकत होते. त्यांनी मिहिकाला विचारलं, ‘पण तुला पालीला मदत का करावीशी वाटली, ते तरी सांग.’मिहिका म्हणाली, ‘कारण परवा आमच्या समोरच्या काकांनी एका पालीला खराट्याने मारलं. ती मेली पण नाही आणि तिला चालता पण येत नव्हतं. मग तिला कोण मदत करणार? आणि पालपण प्राणीच असते ना? तिला दुखत नसेल का?’मिहिकाच्या या प्रश्नावर एकदम शांतता पसरली. पालीला पण दुखत असेल असा विचारच तोवर कोणी केलेला नव्हता. दोन सेकंद थांबून आजोबा म्हणाले, ‘हे केंद्र चालू करण्याबद्दल मी सोसायटीच्या सभासदांशी बोलीन. पण आत्ता एक गोष्ट मी नक्की सांगीन की तुम्हा सगळ्यांमध्ये प्राण्यांबद्दल मिहिकाला सगळ्यात जास्त आपुलकी आहे. त्यांचं दु:ख तिला सगळ्यात जास्त समजतं. मोठी होऊन ती नक्कीच प्राण्यांसाठी चांगलं काम करेल अशी मला खात्नी वाटते. कारण एखादा प्राणी फक्त दिसायला चांगला नाही म्हणून त्याच्याशी वाईट वागायचं हे काही बरोबर नाही. किंवा आपल्याला भीती वाटते म्हणून एखाद्या निरुपद्रवी प्राण्याला मारायचं हेही योग्य नाही. आज छोट्या मिहिकामुळे मीही एक महत्त्वाची गोष्ट शिकलो. यापुढे घरातल्या पाली, कोळी यांच्याशी वागताना मी ते लक्षात ठेवीन.’र्शीरंग सोसायटीत प्राण्याचं प्रथमोपचार केंद्र नंतर चालू झालं; पण अजून तरी तिथे कुठली पाल मदत मागायला गेलेली नाही..lpf.internal@gmail.com

(गौरी ‘लिट्ल प्लॅनेट फाउण्डेशन’ची समन्वयक आहे.)