शहरं
Join us  
Trending Stories
1
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
2
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
3
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
4
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
5
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
6
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
7
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
8
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
9
भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
10
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
11
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
12
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
13
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
14
Sports Events Schedule 2026 : क्रीडा प्रेमींसाठी नवे वर्ष आहे एकदम खास! कारण...
15
मराठी की हिंदू, महापौर कोण होणार? भाजपा नेते कृपाशंकर सिंह पुन्हा बोलले; "मुंबईचा महापौर..."
16
Arjun Tendulkarचा विजय हजारे स्पर्धेत फ्लॉप शो; ३ सामने खेळून झाले, तरी एकही विकेट मिळेना
17
केवळ १६ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा १ कोटींहून अधिक परतावा; SIP ठरतेय वरदान, सोपं गणित पाहा
18
KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ३ उमेदवार बिनविरोध विजयी; प्रभाग २४मध्ये जल्लोष
19
Beauty Jha : संघर्षाची गाथा! वडिलांची नोकरी गेली; मोमोज विकत लेकीने NEET क्रॅक केली, आता होणार डॉक्टर
20
२७ जागांवर वंचित कुणाचा करणार 'गेम', महापालिका निवडणुकीत ५३ उमेदवार उतरवले रिंगणात
Daily Top 2Weekly Top 5

पक्षी जाय माहेरा..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 06:05 IST

विदर्भातल्या रानावनात रमून गेलेले चितमपल्ली सोलापूरला, त्यांच्या जन्मगावी निघालेत! माहेराची ओढ आहे, पण म्हणतात  ‘तिथे जंगल नाही हो!..’

ठळक मुद्देगेली साठ वर्षे मारुती चितमपल्ली सोलापूरबाहेर आहेत. 1960 साली त्यांनी सोलापूर सोडलं. आता जिथे जन्म झाला त्या सोलापुरातल्या जुन्या वाड्यात त्यांना राहता येणार नाही. अक्कलकोट रोडवरच्या नव्या वस्तीत ते इथून पुढे राहतील.

- श्रीमंत माने

असं म्हणतात की, नदीचं मूळ अन् ऋषीचं कुळ शोधू नये. दोहोंचा संबंध निसर्गाशी अन् दोन्ही हातांनी, दोन्ही तीरांनी देण्याशी, दातृत्वाशी व त्यागाशीही आहे. अशाच एका अरण्यऋषीचं कुळ अन् मूळ शनिवारी नागपुरात चर्चेत राहिलं. आठरस्ता चौकातल्या अभिरिका वसाहतीच्या दुसर्‍या माळ्यावरच्या छोटेखानी सदनिकेत सकाळपासूनच सामानाची आवराआवर, बांधाबांध सुरू होती. खाली फाटकाजवळ मालमोटार उभी होती. सामान तरी काय, तर पुस्तकेच पुस्तके. आतल्या दोन्ही शयनकक्षातली फडताळं पुस्तकांनीच भरलेली. ते भरलेले बॉक्स बाहेर दिवाणखान्यातून खाली उतरवले जात होते. ही सदनिका पक्षितज्ज्ञ, अरण्यव्रती मारुती चितमपल्ली यांची़ नागपूर सोडून सोलापूरला जाण्याची त्यांची तयारी़ वर्धेवरून नागपूरला येणार होत़े, तिथून एक-दीड किलोमीटर अंतरावर या अरण्यऋषीला द्यायच्या निरोपाची तयारी सुरू होती. चितमपल्ली यांचा हा निरोप समारंभ ज्या घरी होता ते घर आशुतोष शेवाळकर यांचे. साडेअकराच्या सुमारास मारूती चितमपल्ली वर्धेहून शेवाळकरांच्या घरी पोचले. 88 वर्षाचे चितमपल्ली थोडे थकलेले. कोरोना विषाणूपासून बचावासाठी डोक्यावर शिल्ड घातलेले. हळूहळू चालत कोचावर येऊन बसल्यानंतर सहज गप्पांना सुरूवात झाली.सोलापूर हे चितमपल्ली यांचे जन्मगाव. विजापूर वेस भागात, तेलंगी पच्छीपेठमधल्या वाड्यात 1932 मध्ये त्यांचा जन्म झाला त्याच शहरानं, विशेषत: आईनं व लिंबामामा, हणमामामानं त्यांच्यावर निसर्ग निरीक्षणाचे संस्कार केले. आईमागे धावत रानवाटा, अरण्यवाटा फिरले. पुढे त्या रानवाटांचाच प्रदीर्घ जंगल भटकंती, निरीक्षण,  अभ्यासानं प्रशस्त महामार्ग बनला. ‘पक्षिकोश पूर्ण झालाय. वृक्षकोशाचं महाराष्ट्रापुरतं काम झालंय. मत्स्यकोशाचं बरंच काम कोकण किनार्‍यावर पूर्ण झालंय, थोडं बाकी आहे ते आता सोलापुरात पूर्ण करायचंय,’- चितमपल्ली सांगत होते.तब्बल साडेचार दशकं  विदर्भातल्या जंगलांनी चितमपल्लींना अन् त्यांनी जंगलांना, वन्यजीव, तसेच अरण्यात राहणार्‍या माणसांना सांभाळलं. वनाधिकारी म्हणून 36 वर्षे वनखात्यात काम करताना जसा जंगलाचा संबंध आला तसाच ती जंगलं सांभाळणार्‍या माणसांशीही त्यांचा संबंध आला. 1990 मध्ये ते अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाटमधून निवृत्त झाले. तोवर पक्षी जाय दिगंबरा, जंगलाचं देणं, केशराचा पाऊस, अनुभवून व लिहून झाला होता. नंतर तीस वर्षांपैकी बहुतेक काळ त्यांनी नवेगावबांध, नागझिर्‍यात काढला. जंगलाचं देणं अधिक जवळून अनुभवलं. माधवराव पाटील व व्यंकटेश माडगूळकरांच्या सोबतीनं तिथं त्यांनी जल, जमीन, जंगल, जीवनातले बारकावे टिपले होते. ते पुढे शब्दबद्ध केले. झाडं, पानंफुलं, पक्षी, प्राणी, रानातल्या वाटा, त्यातलं गुह्य व गूढ पानापानांवर उमटलं. एकाहून एक र्शेष्ठ साहित्यकृतींनी मराठीचं निसर्गलेखनाचं दालन समृद्ध होत गेलं. लोकसाहित्यातली गूढ निळावंतीही शब्दात गुंफली. पन्नास-साठ वर्षांचा आपला अरण्यप्रवास ‘चकवा चांदण’ या रुपानं शब्दात मांडला. हे त्यांचं वनोपनिषद. अरण्यऋषीचं  आत्मकथन. नागपूरवरून सहाशे-साडेसहाशे किलोमीटरवरच्या, महाराष्ट्राच्या दक्षिण टोकावरच्या सोलापूरच्या जन्मभूमीची ओढ सहज गप्पा मारतानाही चितमपल्लींच्या चेहर्‍यावर जाणवत होती. पण, सोबतच एक खंत, की सोलापूरला जंगल नाही! माळढोक अभयारण्याचा उल्लेख केला तर म्हणतात की ते ठीक आहे. पण, जंगल नाही. माळढोक तर गवताळ माळरानावर वावरतात. विदर्भासारखं जंगल कुठंच नाही. ते इथल्या माणसांनी, आदिवासींनी जपलंय. जंगलाशी एकरुप झालेली माणसंच तसं करू शकतात. अर्थात, नागपूरच्या सिमेंट काँक्रीटच्या जंगलातून चितमपल्ली पहिल्यांदा बाहेर चाललेत असं नाही़ 2007 मध्येही ते असेच शहरातलं घर सोडून नवेगाव बांधजवळच्या धाबे पवनी या खेड्यात राहायला गेले होत़े पण, ते गाव विदर्भातच होतं़ नागपूर, विदर्भाबाहेर ते पहिल्यांदा चाललेत़ म्हणत होते, ‘जंगल सांभाळणं सोपं नाही. चंद्रपूर-गडचिरोलीच्या जंगलाचं नष्टचर्य असं की, मूळ बहुवृक्षीय, बहुरंगी जंगल जागतिक बँकेच्या पैशाच्या लोभाला बळी पडून आपण संपवलं. तुमचा अभिजात निसर्ग संपवा, आम्ही पैसा देतो, त्याचा वापर आम्ही सांगतो तशा जंगलाची लागवड करा, असं बँकेनं सांगितलं. आपण ते ऐकलं अन् निसर्गाचा ठेवा गमावला. हा र्‍हास अजूनही सुरूच आहे.’ मेळघाटाबद्दल मात्र ते खूप आशादायी आहेत. चंद्रपूर-गडचिरोलीसारखा घातकी प्रयोग तिथंही झाला खरा. पण तो सगळा डोंगराळ भाग असल्यानं अजूनही व्हजिर्न जंगल टिकून आहे. कोरकू आदिवासींचं ते जंगल टिकविण्यात मोठं योगदान आहे. तरीदेखील इंग्रजांनी रेल्वेलाईन जंगलातून नेली. नंतर हायवे झाला. त्यामुळं जंगलाची मोठी हानी झाली. आता तो साधारणपणे सोळाशे चौरस किलोमीटरचा टापू म्हणजे आपलं वैभव आहे व ते टिकवायला हवं. प्राणी-पक्ष्यांना मुक्त वावर करता येईल, असा इतका मोठा जंगलाचा टापू इतरत्र कुठेच नाही. कसंही करून हा ठेवा जपायला हवा़ कारण, जंगलाचा संबंध केवळ हिरवेपणाशी नाही़ अगदी कुपोषणासारख्या समस्येवरचा उपायही जंगलातच आहे - मारुती चितमपल्ली सांगतात.विदर्भातली 45 वर्षे आणि वनखात्यातल्या नोकरीमुळं आधीची 15 वर्षे अशी साठ वर्षे मारुती चितमपल्ली सोलापूरबाहेर आहेत. 1960 साली सोलापूर सोडलं. आता जिथे जन्म झाला त्या सोलापुरातल्या जुन्या वाड्यात त्यांना राहता येणार नाही. अक्कलकोट रोडवरच्या नव्या वस्तीत ते इथून पुढे राहतील. वृक्षकोशाचं अन् मत्स्यकोशाचं उरलेलं काम ते सोलापूरमध्ये पूर्ण करतील़ म्हणूनच जन्मभूमीतला एकांत त्यांना खुणावत असावा.  हा निसर्गवेडा शब्दपूजक आयुष्याचे शतक ओलांडेल, पुढच्या दीडेक दशकात मराठी निसर्गसाहित्याच्या खजिन्यात आणखी मोलाची भर टाकील. नव्या पिढय़ांना निसर्ग अभ्यासाची, निरीक्षणाची अन् निसर्गातल्या सौंदर्य, गूढ, रंजकता, अद्भुतता असं सारं काही कागदावर उतरवण्याची नक्की प्रेरणा देत राहील!shrimant.mane@lokmat.com    (लेखक लोकमत नागपूर आवृत्तीचे कार्यकारी संपादक आहेत.)