शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
13
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
14
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
15
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
16
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
17
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
18
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
20
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"

जाहिरात आणि प्रबोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 6:00 AM

जाहिरातींचा आपल्यावर इतका भडिमार होतो की,  टीव्ही बघताना जाहिराती लागल्या की बर्‍याचदा  आपण टीव्हीचा आवाज बंद करतो. कर्मशियल ब्रेक  अनेकदा टीव्ही बघण्याचाच मूड ब्रेक करतो.  असं असतानाही काही जाहिराती आपल्याला बघाव्याशा वाटतात. त्या आपल्याला खिळवून ठेवतात.  ‘मिले सुर मेरा तुम्हारा’, ‘पूरब से सूर्य उगा’,  ‘स्कूल चले हम’, ‘एक चिडिया’ यांसारख्या  प्रबोधनात्मक फिल्म-वजा जाहिराती आठवतात? आणि अमिताभनं केलेल्या पोलिओ डोसच्या जाहिरातीतील ‘दो बूंद जिंदगी की’ ही टॅगलाइन? या मोहिमेला अद्भुत यश मिळालं आणि  भारत पोलिओमुक्त झाला !

ठळक मुद्देएखादा ब्रॅण्ड किंवा उत्पादन लोकांपर्यंत पोहोचवणं, त्याचे फायदे-तोटे सांगणं आणि लोकांना ते विकत घेण्याच्या निर्णयापर्यंत पोहोचवणं हे सगळं जाहिरातीतून परिणामकारकरीत्या घडत असतं.

- स्नेहल जोशीगेले काही दिवस आपण ब्रॅण्ड, त्याची ओळख, टॅगलाइन्स, जाहिराती, जाहिरातींचे संदेश, त्यातली सृजनशीलता, या सगळ्यांविषयी बरच काही बोललो. एखादा ब्रॅण्ड किंवा उत्पादन लोकांपर्यंत पोहोचवणं, त्याचे फायदे-तोटे सांगणं आणि लोकांना ते विकत घेण्याच्या निर्णयापर्यंत पोहोचवणं हे सगळं जाहिरातीतून परिणामकारकरीत्या घडत असतं. पण माध्यम म्हणून तिच्याकडे बघितलं तर लक्षात येतं की उत्पादनाच्या विक्रीपलीकडे बरंच काही करायला जाहिरात सक्षम आहे. पण या जाहिरातींचा आपल्यावर इतका भडिमार होत असतो की, टीव्ही बघताना जाहिराती लागल्या की बर्‍याचदा आपण टीव्हीचा आवाज बंद करतो. किंबहुना कर्मशियल ब्रेक बर्‍याचदा टीव्ही बघण्याचाच मूड ब्रेक करतो. असं असतानाही एखादी जाहिरात बघण्यासाठी टीव्हीचा आवाज पुन्हा चालू केल्याचं आठवतं का? कुठल्याही मालिकेचं शीर्षक गीत नसलेलं, सिनेगीत नसलेलं गाणं टीव्हीवर लागण्याची आतुरतेने वाट पाहिली आहे का? माझा रोख ‘मिले सुर मेरा तुम्हारा’, ‘पूरब से सूर्य उगा’, ‘स्कूल चले हम’, ‘एक चिडिया’ यांसारख्या प्रबोधनात्मक फिल्म-वजा जाहिरातींकडे आहे. गेलात ना भूतकाळात? मला खात्री आहे आजही बर्‍याच जणांना ही गाणी आणि चालीच काय; पण त्यातली दृश्यसुद्धा पक्की आठवत असणार.मला अजूनही आठवतंय मी लहान असताना दूरदर्शन हे एकच टीव्ही चॅनल होतं. त्यावर रविवारी रंगोली संपलं की काटरून लागायचं. पण या दोन्ही कार्यक्रमांच्या मध्ये ‘एक चिडिया’ची गोष्ट असायची. दर रविवारी तीच गोष्ट असली तरीही आम्ही ती न चुकता बघत असू. झाडाखाली बसलेली दीदी आमच्या वयाच्या मुलांना गोळा करून ‘एक’, ‘अनेक’ आणि ‘एकता’ या कल्पना समजावून सांगण्यासाठी एक गोष्ट सांगते. खरं तर प्रबोधनपर मजकूर बर्‍याचदा कंटाळवाणा वाटतो. तरीही ‘एक अनेक और एकता’ वारंवार बघाविशी का वाटते? काय ताकद होती या कलाकृतीमध्ये? सर्वप्रथम राष्ट्रीय एकात्मतेसारखा खोल संदेश लहान मुलांना द्यायचा म्हणजे कठीण काम आहे. 6 ते 9 वर्ष वयोगटातल्या मुलांची आकलनशक्ती लक्षात घेता कथाकथनाची पद्धत प्रभावी ठरते. इतक्या लहान मुलांना प्राण्यांची प्रतीकं लवकर समजतात तेव्हा गोष्टीत चिमणी आणि उंदीर आले. गोष्टीची पद्धत पंचतंत्रासारखी सोपी आणि निरागस आहे. ती निरागसता दर्शवण्यासाठी चित्राची शैलीसुद्धा बालचित्रकलेतून प्रेरित आहे. सरळ सोपे आकार, ठळक रेषा आणि आकर्षक रंग यांनी लहान मुलांनाच काय; पण मोठय़ांनाही भुरळ घातली. विजया मुळेंनी हलक्या-फुलक्या भाषेत लिहिलेले सकस संवाद, कथा आणि काव्य; त्याच्या जोडीला वसंत देसाईंचं गोड संगीत हा सुंदरच मिलाफ होता.या सगळ्याला बहार आणली ती मुलांच्या अतिशय मोहक आवाज आणि शब्दोच्चारानं. ही अजरामर निर्मिती घडवणारे, भारतात अँनिमेशनचं बीज रोवणार्‍यांपैकी एक - भीमसेन खुराणा. ‘एक अनेक और एकता’ प्रमाणेच कुटुंब नियोजन, वृक्ष लागवड, सरकारी धोरणं आणि प्रकल्प अशा अनेक फिल्म्स त्यांनी जनजागृतीसाठी डिझाइन केल्या. ‘एक अनेक और एकता’ मात्र उपदेश, शिक्षण आणि मनोरंजन एकत्र केल्याचं आजवरचं सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे.लहान मुलांमार्फत केलेलं प्रबोधन जास्त परिणामकारक आणि दीघार्युषी असतं यात शंकाच नाही; पण तरीही काही विषय असे असतात की, ज्यासाठी मोठय़ा माणसांना उपदेश करणं आवश्यक असतं. लहान मुलांना एखादी शिकवण देताना ती सोपी करण्यासाठी भाषेचं आव्हान असतं हे खरं; पण मोठय़ांच्या बाबतीत सांगायचं झालं तर एखादी कल्पना सांगणं सोपं असलं तरीही ती पटवणं आणि वठवणं मात्र कठीण असतं. ‘सरकार द्वारा जनहितार्थ’ संदेश असलेल्या जाहिराती आपण सतत पाहतो; पण त्याचा परिणाम व्हायला खूप वेळ लागतो. स्वतंत्र भारतात सर्वप्रथम राबवली गेलेली जाहिरात मोहीम कुटुंब नियोजनाचीच होती. ‘एकच मूल, सुंदर फूल’, ‘एक या दो, बस्स!’, ‘हम दो, हमारे दो, और एक गोद लो’ असे बरेच प्रय} करूनही 70 वर्षात भारताची लोकसंख्या दुप्पट झालीच आहे. यावरून ‘जनहितार्थ’ जाहिरात मोहीम परिणामकारक करणं किती कठीण आहे हे लक्षात आलंच असेल. हे कठीण काम पूर्णत्वाला नेलेल्या एका मोहिमेबद्दल बोलूया.

पोलिओ - आज आपला देश या रोगापासून मुक्त झाला असला तरी इथवर पोहोचण्याचा मार्ग खडतर होता. 1988 साली भारत पोलिओमुक्त करण्याची प्रतिज्ञा जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ आणि रोटरी या संस्थांनी घेतली. त्याकाळी भारतात मोठय़ा प्रमाणावर पोलिओची साथ होती. 1994 साली मुखाद्वारे दिली जाणारी लस तयार झाली आणि दिल्ली सरकारने पहिली लसीकरण मोहीम यशस्वीरीत्या राबवली. ‘दो बूंद जिंदगी की’ ही टॅगलाइनसुद्धा तेव्हाच लिहिली होती. त्यानंतर ही मोहीम भारतभर चालवण्याचा निर्णय घेतला गेला. या मोहिमेच्या प्रचारासाठी आरोग्य संस्थांनी खरं तर कुठलंही माध्यम सोडलं नव्हतं. कार्यकर्ते अक्षरश: दारोदारी फिरून जनजागृतीचं काम करत होते. वर्तमानपत्रात जाहिराती छापून आल्या, रेडिओद्वारे प्रक्षेपण झालं, पथनाट्यं सादर केली, भिंतीवर, ट्रकच्या मागे संदेश लिहिले गेले. काही गावांमध्ये तर जादूचे प्रयोगसुद्धा करून झाले. तरीही दरवर्षी पोलिओग्रस्त मुलं आढळतच होती. 2002 साली पुन्हा एकदा पोलिओच्या साथीनं उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांना प्रचंड प्रमाणात ग्रासलं. शेवटी आरोग्य मंत्रालय आणि युनिसेफ यांनी जनसंपर्काकरता पीयूष पांडे यांना नेमलं. पांडेंच्या मते हा संदेश  एखाद्या लोकप्रिय नेत्यानं दिला तरच जनतेला त्याचं गांभीर्य पटेल.यादृष्टीनं मोहिमेचे दूत म्हणून त्यांनी, सर्व भारतीयांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणार्‍या अमिताभ बच्चन यांची निवड केली. नव्या जाहिरातीत बच्चन यांची ‘अँग्री यंग मॅन’ची प्रतिमा पुन्हा एकदा वापरण्यात अली. ते प्रेमाच्या अधिकारानं एखाद्या पित्याप्रमाणे रागावून म्हणतात, ‘धिक्कार है हम पर ! पोलिओ बूथ मे इतने कम लोग?’. - याच धर्तीवर सात-आठ जाहिराती करण्यात आल्या. सुरुवातीला रेडिओतून आणि नंतर टीव्हीवर या जाहिराती प्रसारित करण्यात आल्या. अमिताभ बच्चन आपल्यावर रागावले आहेत आणि त्यांना दुखवणं बरोबर नाही असा भावनिक परिणाम साधला गेला आणि लसीकरण मोहिमेला अपेक्षित यश मिळालं. गेली 6-7 वर्ष भारत फक्त पोलिओमुक्त झाला नसून जगासमोर एक आदर्श ठरला आहे. जाहिरातीचं याहून मोठं यश कोणतं असणार?

snehal@designnonstop.in(लेखिका वास्तुरचनाकार आणि प्रॉडक्ट डिझायनर आहेत.)