स्वीकार आणि निर्धार :जे अवघड असते, ते अशक्य नसते!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2018 03:00 AM2018-08-05T03:00:00+5:302018-08-05T03:00:00+5:30

कोणताही प्रवास करताना आपण कोठे आहोत हे लक्षात घेऊन आपल्याला कोणत्या दिशेला जायचे आहे याचा निर्णय घ्यावा लागतो. आयुष्याचा प्रवास करतानादेखील असेच करावे लागते.

Acceptance and determination: is difficult, but not impossible! | स्वीकार आणि निर्धार :जे अवघड असते, ते अशक्य नसते!

स्वीकार आणि निर्धार :जे अवघड असते, ते अशक्य नसते!

Next
ठळक मुद्देकाहीवेळा आपण आहे त्या परिस्थितीत खूश असतो; पण प्रगतीसाठी कोणतेही प्रयत्न करीत नसतो. या स्थितीला आळस म्हणता येईल.

डॉ. यश वेलणकर

फ्रॉइड यांना आधुनिक मानसशास्त्नाचे आणि मानसोपचार पद्धतींचे जनक मानले जाते. त्यांनी मनोविश्लेषणावर आधारित मानसोपचार पद्धती विकसित केली. कोणतीही औषधे न वापरता रुग्णाशी संवाद साधून त्याचा  त्नास कमी करण्याच्या पद्धतीला मानसोपचार असे म्हणतात. अशा पद्धतींच्या उपचारांच्या तीन लाटा आतार्पयत आल्या आहेत असे म्हटले जाते.  वर्तनचिकित्सा म्हणजेच बिहेविअर थेरपी ही यातली पहिली लाट होय.
मनातील विचारांना बदलवण्याचा प्रयत्न करणारी बोधनचिकित्सा किंवा कॉग्निटीव्ह थेरपी  ही दुसरी लाट होय.  आज अनेक ठिकाणी वापरली जाणारी विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती म्हणजेच फएइळ ही दुसर्‍या लाटेतील एक पद्धती आहे.
शरीराच्या सजगतेवर आधारित माइण्डफुलनेस चिकित्सा ही मानसोपचारातील तिसरी लाट होय. 
पहिल्या लाटेतील वर्तनचिकित्सा ही मुख्यतर्‍ प्राण्यांवर केलेल्या प्रयोगांवर आधारित होती. त्यातील डॉ. पाव्लोव यांनी केलेला कंडिशनिंगचा प्रयोग प्रसिद्ध आहे. या प्रयोगात ते एका कुत्र्यासमोर अन्न ठेवताना एक घंटा वाजवीत. हे अन्न बघितल्यावर त्या कुत्र्याच्या तोंडात लाळ स्रवली जायची. काही दिवस असे केल्यानंतर ते त्या कुत्र्यासमोर अन्न न ठेवता फक्त घंटा वाजवू लागले आणि त्यांच्या लक्षात आले की, आता अन्न नसूनसुद्धा केवळ घंटेच्या आवाजामुळे त्या कुत्र्याच्या तोंडात लाळ स्रवत आहे. यालाच त्यांनी कंडिशनिंग असे म्हटले. माणसाला होणारे फोबियासारखे आजार हे अशा कंडिशनिंगचाच परिणाम असतात. ते कमी करण्यासाठी वर्तनचिकित्सेचा चांगला उपयोग होऊ लागला. 
पण वर्तनचिकित्सा मन नाकारते, केवळ वर्तनाला महत्त्व देते, मनातील विचाराना काहीच महत्त्व देत नाही. त्यामुळे नैराश्य, चिंतारोग अशा आजारांमध्ये या चिकित्सेचा फारसा उपयोग होत नव्हता.
- ही त्नूटी दूर करण्यासाठी बोधनचिकित्सा विकसित झाली. डॉ. बेक यांनी मनात येणार्‍या नकारात्मक विचारांना आव्हान देऊन ते बदलवण्याची पद्धती रूढ  केली. अल्बर्ट एलिस यांनी मनातील अविवेकी हट्ट समजून घेऊन ते बदलवण्याची पद्धती म्हणजेच  फएइळ विकसित केली. सध्या भारतात ही मानसोपचार पद्धती विशेष लोकप्रिय आहे.
दुसर्‍या लाटेतील या सर्व थेरपी मनातील विचारांवरच काम करतात, मनाचा शरीराशी असणारा संबंध त्या लक्षात घेत नाहीत. म्हणून सजगतेच्या तंत्नांचा परिचय असणार्‍या  दुसर्‍या लाटेतील काही तज्ज्ञांनी सजगतेवर आधारित मानसोपचाराची तिसरी लाट विकसित केली. 
सजग किंवा माइण्डफुल व्हायचे म्हणजे त्या क्षणी शरीरात जे काही होते आहे ते जाणत राहायचे, मनाने शरीराशी संवाद साधायचा, शरीरातील संवेदना जाणत त्यांचा स्वीकार करायचा. असे करताना आपण शरीर आणि मन यांचे इंटिग्रेशन साधतो, त्यांचा समन्वय करतो. आपले मन शरीरावर आणण्याचे हेच तंत्न वापरून आधुनिक मानसोपचारात विविध पद्धती विकसित झाल्या आहेत. त्यांची सुरुवात डॉ. जॉन कॅबट झनि यांनी केली. ते सजगतेवर आधारित मानसिक तणाव व्यवस्थापन म्हणजेच ह्यटइरफ -  माइण्डफुलनेस बेस्ड स्ट्रेस रिडक्शन’चे वर्ग घेऊ लागले. हे वर्ग मानसिक तणावांमुळे निर्माण होणार्‍या शारीरिक व्याधींवर खूप उपयोगी आहेत असे दिसू लागले. त्यापासून प्रेरणा घेऊन ह्यटइउळ झ्र माइण्डफुलनेस बेस्ड कॉग्निटीव्ह थेरपी’ अशी मानसोपचार पद्धती चिंतारोग, नैराश्य, मंत्नचळ म्हणजेच डउऊ अशा मानसिक व्याधींसाठी उपयोगात आणली जाऊ लागली. याच तिसर्‍या लाटेत बॉर्डरलाइन पर्सनॅलिटी डिसॉर्डर आणि त्यामुळे होणार्‍या आत्महत्या टाळण्यासाठी ह्यऊइळ  डाईलेक्टिकल बिहेवियर थेरपी’ डॉ. मार्शा लीनन यांनी विकसित केली. याच  तिसर्‍या लाटेतील आणखी एक लोकप्रिय थेरपी म्हणजे ह्यअउळ- अ‍ॅक्सेप्टन्स अ‍ॅण्ड कमिटमेण्ट थेरपी’ होय.
नैराश्य आणि चिंता या विकारांवर उपचार म्हणून ही थेरपी विकसित झाली असली तरी या थेरपीमधील तत्त्वे कोणताही मानसिक त्नास नसलेल्या व्यक्तींसाठीदेखील उपयोगी आहेत. वर्तमान परिस्थितीचा स्वीकार हा त्यातील एक भाग आहे. पण त्याचबरोबर आयुष्यात आपल्याला काय करायचे आहे याची दिशा ठरवून त्यासाठी आवश्यक कृती करण्याचा निर्धार म्हणजेच कमिटमेण्ट हाही एक महत्त्वाचा भाग त्यामध्ये आहे. निरोगी व्हायचे असेल आणि राहायचे असेल तर रोज व्यायाम करायला हवा. ज्ञान संपादन करायचे असेल तर रोज अभ्यास करायला हवा. संगीतात नैपुण्य मिळवायचे असेल तर नियमित रियाझ करायला हवा. हे करताना कंटाळा येतो, मेहनत करण्याची टाळाटाळ केली जाते. पण कोणत्याही क्षेत्नात यश मिळवायचे असेल तर त्या कंटाळ्यावर विजय मिळवत मेहनत करण्याचा निर्धार आवश्यक असतो.
कोणताही प्रवास करताना आपण कोठे आहोत हे लक्षात घेऊन आपल्याला कोणत्या दिशेला जायचे आहे याचा निर्णय घ्यावा लागतो. आयुष्याचा प्रवास करतानादेखील असेच करावे लागते. त्यासाठी मुद्दाम थोडा वेळ काढायचा आणि स्वतर्‍ला काय महत्त्वाचे वाटते याचा विचार करायचा. स्वतर्‍ला कोणती मूल्ये महत्त्वाची वाटतात हे ठरवायचे. स्वतर्‍तील क्षमता लक्षात घ्यायच्या. या क्षमता वापरल्या जातील आणि मूल्यांची जोपासना होईल अशी दिशा निवडायची. त्या दिशेने प्रगती होण्यासाठी कोणते प्रयत्न करायला हवेत ते ठरवायचे. आणि ती मेहनत घेण्याचा निर्धार करायचा. स्वतर्‍ला सक्रि य ठेवायचे, आनंदाने मेहनत करत राहायची, ती मेहनत एन्जॉय करायची.

1 औदासिन्य र्‍ 
काहीवेळा आपण आहे त्या परिस्थितीला नावे ठेवत असतो, दुर्‍खी असतो; पण ती परिस्थिती बदलण्यासाठी कोणतेही प्रयत्न करीत नसतो. या स्थितीत आपण आपल्या परिस्थितीसाठी इतरांना दोष देत राहतो. या स्थितीत अधिक काळ असणार्‍यांना औदासीन्याचे, डिप्रेशनचे रुग्ण म्हटले जाते. या स्थितीत आनंद नसतो आणि सक्रियताही नसते. 

2आळस र्‍ 
काहीवेळा आपण आहे त्या परिस्थितीत खूश असतो; पण प्रगतीसाठी कोणतेही प्रयत्न करीत नसतो. या स्थितीला आळस म्हणता येईल. या स्थितीत आपण टाइमपाससाठी वेगवेगळे मार्ग शोधतो, करमणुकीत मग्न राहतो. सकाळी झोपेतून जागे झाल्यानंतर पटकन अंथरूण सोडून बाहेर न पडता लोळत पडतो त्यावेळी आपण याच स्थितीत असतो.  या स्थितीत सुख असते; पण सक्रियता नसते.

3मानसिक तणाव र्‍ 
तिसरी स्थिती असते त्यामध्ये सक्रियता असते, माणूस खूप धडपडत असतो; पण आनंदी नसतो. ही स्थिती त्नासदायक मानसिक तणावाची असते. सक्रियता असते; पण आनंद नसतो.

4आनंदी सक्रियता र्‍ 
सजगतेच्या सरावाने आपण यापैकी कोणत्या स्थितीत आहोत ते जाणायचे आणि चौथ्या स्थितीत अधिकाधिक वेळ राहायचे. ती म्हणजे आनंदी सक्रियतेची स्थिती. परिस्थितीचा स्वीकार करून आनंदी राहायचे आणि निर्धाराने उन्नतीसाठी कृती करीत राहायचे. त्या कामाचा, रियाजाचा, व्यायामाचा, अभ्यासाचाही आनंद घ्यायचा.  

Web Title: Acceptance and determination: is difficult, but not impossible!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.